समित आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता .
एक बहीण होती पण ती लग्नानंतर आपल्या पतीसोबत परदेशी स्थायिक झालेली होती .
त्याचे आईवडील दिल्लीला स्थायिक होते .तिथे त्यांची मोठी कोठी असुन
पिढीजात कार व्यवसाय होता समितचे काका व वडील मिळुन हा व्यवसाय पहायचे ..
सी ए झालेल्या समितने स्वतःचे ऑफिस नागपूरला येथे थाटले होते .
प्रथम भाड्याच्या जागेत असलेले हे ऑफिस तीन चार वर्षातच स्वतःच्या जागेत स्थलांतरित झाले होते .
शिवाय त्याचा स्वतःचा चार खोल्याचा एक ब्लॉक पण होता .
लहान वयात त्याचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे होते,
हे स्थळ अगदी लाखात एक होते ,प्रियाला कसलाच त्रास होणार नव्हता ना कसली जबाबदारी असणार होती .
शिवाय रिया आणि प्रिया नागपुरातच राहणार होत्या .
दोघींना एकमेकींची चांगली सोबत होती कारण सुदीप च्या घराजवळच समित राहत होता .
खारेतर ही बातमी आधीं प्रियाला द्यायची होती पण
प्रिया सध्या परीक्षेच्या गडबडीत असल्याने आणि लग्नघरी अभ्यास होणे अशक्य असल्याने निधीच्या घरीच राहायला गेली होती .
त्यामुळे तिची परीक्षा संपेपर्यंत हा विषय नाही काढता आला .
दोन तीन दिवसांनी प्रियाची परीक्षा आटोपली आणि ती घरी परत आली .
निधी पण लग्नानिमित्त प्रियाकडेच राहायला आली होती .
जेवताना रियाने तिला समितच्या “मागणी” बद्दल सांगितले .
तेव्हा ती खुपच अपसेट झाली ..
“आई काय चाललेय हे ?
अजुन शिकायचे आहे मला ..
इतकी जड झालेय का मी तुम्हाला ?
ताईला मात्र लग्नानंतर नोकरी पण करायला दिली आणि माझे अजुन शिक्षण पुरे व्हायचे त्याआधीच लग्न ?
प्रियाने उगाचच आकांड तांडव सुरु केले
आणि मुख्य म्हणजे मला आणि निधीला इतक्या लवकर नाही लग्न वगैरे करायचे .हो न ग निधी ..
यानंतर तिने निधीची पण साक्ष काढली
निधीने तिच्याकडे पाहुन मान डोलवली ..
“प्रिया काहीतरीच असते तुझे अग समितला भेटली आहेस न तु ?
किती चांगला मुलगा आहे तो आणि नोकरी बिकरी करायची गरज काय तुला ?
राजाच्या राणी सारखी राहशील तिथे .
काही म्हणजे काहीही खोट नाही समितच्या स्थळात ..समजले ?
रियाचा स्वर रागीट झाला
आईबाबांनी पण रियाचीच बाजु उचलून धरली होती .
आई तर म्हणाली,” काय ग मुली आईवडीलाना कधी जड होतात का ?
उगाच काहीच्या काही बोलायचे ते ,आणि ताई तुझ्यासाठी चांगलाच तर विचार करणार ना “
बाबांनी प्रियाला जवळ घेतले तिच्या डोक्यात एक टप्पल मारली आणि म्हणाले
“कुल कुल प्रिया बेटा .
.आपण सावकाश शांतपणे विचार करू ओके ?
तुला मंजुर असेल तरच हो म्हण ,बळजबरी नाही काही “
जेवताना बरेच नातेवाईक सोबत होते त्यामुळे हा विषय तिथेच थांबला ..
प्रिया आणि निधी बेडरूम मध्ये गेल्या जेवल्यावर
“निधी काय ग करायचे आता ?मला तर काही सुचतच नाहीये .
निधी तर खुपच रागावली होती ..
“प्रिया आपण ठरवले होते न लग्न नाही करायचे मग तिथल्यातिथे नाही म्हणायचे ना ..
एवढे पण डेअरिंग नाही तुझ्याकडे “
अशीच मुळूमुळू वागणार आहेस का कायम ?
प्रिया आता मात्र रडायला लागली
ते पाहुन मग निधी जरा विरघळली
घरच्या लोकांना धाडकन नकार द्यायचे धाडस नव्हतेच प्रियाकडे हे माहित होते निधीला .
“लगेच रडतीस का ग ..तु रडलेले मला नाही ग सहन होत माहित आहे ना ?
असर म्हणून निधीने प्रियाला जवळ बसवुन घेतले .
तिच्या केसातून हात फिरवला आणि तिला थोडे थोपटले
“हे बघ आता रडु नकोस ,
मला माहित आहे घरच्या लोकांच्या पुढे तुझे काही नाही चालणार ..ठीक आहे बघु आपण यातुन काही मार्ग निघतो का “
निधी असे म्हणाली तेव्हा प्रियाला खुपच आधार वाटला ..
प्रियाला लग्नासाठी तयार करण्याचे काम घरात जोरदार सुरु होते .
समितच्या स्थळात तसे काहीच आक्षेपार्ह नव्हते .
आई, बाबा, आजी, आजोबा, काका ,आत्या घरच्या इतक्या सगळ्यांचे प्रियाचे मन वळवणे चालले होते
निधीची ताटातूट होतेय म्हणुन प्रिया लग्नाला नाही म्हणत होती की काय
असे वाटुन रिया म्हणाली ,” प्रिया थोडे दिवसात निधीसाठी पण आपण तिकडचे स्थळ पाहु मग तर झाले .”
निधी आणि प्रिया यावर काहीच नाही बोलल्या .
तशात खुद्द समितचे फोन प्रियाला येऊ लागले .
समितच्या आर्जवाने प्रियाच्या मनात “चलबिचल” होत होती .
अखेर एकदाची नाईलाजानेच प्रिया लग्नासाठी तयार झाली!!
निधीला हे बिलकुल पटले नाही पण सद्य परिस्थितीत काहीच उपाय तिला सुचत नव्हता .
सुदीपच्या लग्नासाठी समितच्या सोबत त्याच्या घरचे लोक पण आले होते प्रियाला पाहायला
त्यांनाही खुप आवडली प्रिया .
आता साखरपुडा करून जायचे असे त्यांनी ठरवले .
समितचे आईवडील दिल्लीला राहणारे होते तरीही ,
इतक्या लांबून ते आपल्या मुलाने पसंत केलेली मुलगी पहायला आले म्हणल्यावर प्रियाच्या घरच्या लोकांना त्याचे खुपच”अप्रूप” वाटले ..
प्रिया खरेच नशीबवान होती !!!
रियाच्या लग्नानंतर लगेच प्रियाचा साखरपुडा पण झाला .
लग्नाचा मुहूर्त पंधरा दिवसा नंतरचा निघाला
समित खुप खुष होता.प्रिया जाम आवडली होती त्याला .
प्रियाच्या मनाचा तसा कुणालाच काही अंदाज येत नव्हता .
पण होईल लग्नानंतर सगळे ठीक असे घरच्यांना वाटले.
पुढचे पंधरा दिवस खुप वेगाने पार पडले
या दिवसात निधी आणि प्रिया सतत एकत्र होत्या
रियाच्या लग्नासाठी राहायला आलेली निधी परत गेलीच नव्हती .
एकदोन वेळा समित भेटायला आला होता दागिने ,कपडे पसंती साठी ..
पण त्यालाही प्रिया एकटी अशी भेटलीच नाही ..
सोबत निधी असायचीच ..
दोघींच्या घरच्या लोकांना ही बाब थोडी खटकली होती .
पण आता लग्न जवळ आलेय कशाला दोघींना नाराज करा असा विचार झाला त्यांचा आणि ते गप्प राहिले
समितच्या पण मनात आले, इतकी जुनी घट्ट मैत्री आता दोघींची सोबत पण संपणार होती
..राहूदे सोबत दोघींना.
क्रमशः