मंदिरातन निघून विजू घराकडे निघाला,घर म्हणाल तर त्याच स्वतःच अस घर नव्हतंच,आई आणि बाबा लाहनपनीच देवाघरी गेलेले, त्यामुळे त्याच्या काकांकडेच तो रहायचा.काका तसे स्वभावाने चांगले,प्रेमळ,,काकू सुद्धा जीव लावायच्या,एकंदर आई बाबांची कमी कधी जाणवू नये असाच त्यांचा प्रयत्न असायचा.त्याना स्वतःच मुलं नसल्याने त्यांनी विजू आणि चिमणीला स्वतःच्या मुलाप्रमान जपलं होत.
विजू सगळं सामान घेऊन भरभर पाऊल टाकत घराकडे आला,तेच ते जून दगड मातीने बनलेलं पण प्रशस्त घर,घराच्या बाहेर एक छानसा गोठा होता,त्यात चार पाच गुर दिसत होती.विजू ने गोठ्यात जाऊन हळुवार पणे गायीवरून हात फिरवायला सुरुवात केली,तेव्हढ्यात त्याच्या पायाशी येऊन मोती रेलू लागला,,विजू ते सगळं बघून फारच खुश झाला.दोन वर्षानंतर गावात आल्यानंतर सुद्धा काहीच बदललं नव्हतं.
तो त्यांच्यात दन्ग होणार तितक्यात दारातून आवाज आला,
'विजू भाऊ आला,,काकू विजू भाऊ आला बघ",चिमणी चा आवाज होता तो,विजुची सख्खी बहीण, नावाने जरी चिमणी असली तरी आता मॅट्रिक ची परीक्षा देणार होती.चिमणी चा आवाज ऐकून काकू,काका बाहेर आले.
"विजू,,इतक्या सकाळी,,ये ये पोरा, दोन वर्षे झाले,,पार वाळून गेला बघ.काही खायला देत नाही का त्या सहरात",काकू म्हणाली.
विजू ने फक्त स्मित केलं.आणि सामान घेऊन तो घरात घुसला,प्रथम त्याने काका काकू चे चरण स्पर्श केले,चिमणी ला एक टपली मारली,आणि नंतर तिच्या हातात शहरातून आणलेलं एक गिफ्ट दिल.आतमधे घुसताच बाजूला खाटेवर बसलेली आजी दिसली.
आजीची परिस्थिती अझूनच खालावली होती.वरून आजीचा एक हात कधीतरी एका अपघातात गेला अस म्हणतात,त्याच अपघातात आजोबा पण गेले आणि आजीची वाचा सुद्धा.त्याने तिच्या पण पाय पडल्या आणि सामान ठेवून सरळ जाऊन लोळला.दोन दिवसांचा सगळं क्षीण होता ,आता मस्त झोपल्याशिवाय तो काही निघणार नव्हता.तो तिकडे झोपला अन इकडे पुतण्याला खायला काय करायचं याची काकूने घाई गडबड सुरु केली.
त्याला झोपत झोपत अचानक कविताची आठवण झाली,,कविता म्हणजे विजूच्या मामाची मुलगी.रंगाने गव्हाळ,नाजूक बांधा,कम्बरे पर्यंत लोम्बणारे केस,एकंदर बघता क्षणी कुणीही प्रेमात पडावी अशीच.दोघेही एकाच वर्गात होते,लहान असतानाच सगळे जण दोघाना नवरा बायको म्हणून चिडवायचे,आणि चिडवण्या चिडवण्यातच दोघांच प्रेम कधी जडलं हे त्यांनाही कळालं नव्हतं,,आल्या आल्या तिला भेटावं अस आतून फार वाटत होत,पण सध्या क्षीण एव्हढा आला होता ना कि तिला भेटण्यापेक्षा जरा आराम घेणं त्याच्या शरीराला महत्वाचं होत...
संध्याकाळ झाली होती,पाटलांचा वाड्यात ठरल्या प्रमाणे काही तरुण मुलं जमली होती.सोबत गावातली प्रतिष्ठित माणसं पण होतीच.विजू महेश सोबत एका बाजूला उभा राहून शांतपणे ऐकत होता.
"तर पोरानो,काल जे घडलंय त्यावरून एक स्पष्ट आहे की काहीतरी अडगळ त्या रानात माजलय"
"पण पाटील जब्या च्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा,त्ये बेन पूर्ण गावात रिकाम बोकळत सुटत,शिकायचा पत्ता नाही,शेतात रस नाही,मग अशा खुळ्याचं बोलणं कितपत ग्राह्य धरायचं?",शाळेचे हेडमास्तर बोलले.
"बरोबर आहे तुमचं ,म्हणूनच मी वाड्यावर काही ठराविक लोकांना बोलवलं हे सगळं स्पष्ट कराया"
"काय स्पष्ट करायचं होत"
"तेच जे त्या रानात झालं.खरतर धनाजी अन त्याचे साथीदार दर सालप्रमान रानाच्या तोंडापर्यंत सरपंचा सोबत होते,नेहमी प्रमाणेच सरपंच एकटेच आतमधे गेले आणि हे पहिलवान लोक त्यांची वाट बघत बाहेर उभे राहिले.पण त्यानंतर 3-4 तास सरपंच काही परत आलेच नाही,सगळ्यांचीच मन चलबिचल होऊ लागली,त्या रानात तर जाण्यास कुणाला परवानगी नव्हतीच म्हणून मग त्यांनी ठरवलं की सर्व माहिती येऊन मला सांगायची,त्यामुळं मग सूर्या संध्याकाळी आला आणि हे सगळं माझ्या कानी घातलं.ते कळताच लागलीच मी तिकडं गेलो,,तिथलची समदी माणसं जॅम तणावात होती,त्यांच्याशी बोलणं करून आमचं अस ठरलं कि कुणीतरी रानात जाऊन शोध घ्यायचा,मग ठरल्या नुसार धनाजी अन अजून एक पहिलवान सरपंचाला सापडाया रानात गेले,पण..."
"पण काय पाटील"
"धनाजी तूच सांग पुढलं"
ते ऐकताच धनजीला दरदरून घाम फुटला,पहिल्यांदाच धनाजी च्या चेहऱ्यावर भीती दिसली होती.तो कापत कापत सगळं सांगायला लागला,
"मी न विश्वास त्या वाड्याकड गेलो होतो.वाडा ज्या टेकडीवर होता तिथं माहित नाही का पर लक्ख प्रकाश हुता.तिथं नेमकं काय चालूये म्हणून मग आम्ही दोघ चढून वर गेलो..आम्ही जवळ जाऊन बघावं म्हणून दरवाज्या पाशी जाऊ लागलो तर आतून कुणीतरी हसत असल्याचा आवाज यायला लागला.अस वाटत होत जसकाय एखादी बाई आणि एखादा माणूस आळीपाळीने हस्ताय.... ते चेटकीनी सारखं हसन ऐकून माझी अन विश्वास ची जॅम घाबरगुंडी उडाली..."
"विश्वास न धीर धरून आवाज दिला,
'कोण हाय आत मधी,,सरपंच?सरपंच तुम्ही हाय का?',
आम्ही दोघ बी उत्तराची वाट बघत हुतो आणि आतून आवाज आला,
' कोण विश्वास अन धनाजी?बरोबर ना?मी सगल्यायला ओळखतो...या मधी या,मला लै भूक लागलीया पोरानो,या,हि हि हि हि ',,आणि एव्हढं बोलून एखादी चेटकीण हसावी असा हसण्याचं आवाज यायला लागला,,
आता तिथं थांबून काय फायदा नाही हे कळलं होतं म्हणून त्या जागेवरून आम्ही पळणार तेव्हढ्यात आतून तोच आवाज पुन्हा आला,
'द्या रे,,मला खाऊ द्या तुम्हास्नी,,लै भूक लागलीया,,किती येळ पळणार? येणार तर तुम्ही परत माझ्याचकड'
तो आवाज पुन्हा ऐकून तर आता दोघांची टर्रर्रर्र फाटली,"
"मग ,,मग काय केलं तुम्ही"
"काय करणार,,लगेच धूम ठोकली,,त्या टेकडी वरून लगबगीनं उतरत होतो,समोर एक पिंपळाच झाड होत,,आम्ही पळता पळता अचानक काहीतरी त्या झाडावरुन आमच्या पुढ्यात पडलं"
"दोन तोंड होती ती,एक सरपंचाच अन एक गण्या च"
"काय!!!!!",तिथं उपस्थित असलेले सगळेच जण एकाच आवाजात ओरडले,
"हो,,मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं ,सरपंच अन गण्या चे तोंड होती ती,तोंड म्हंजी फक्त तोंड,धड कुठं होत माहित नाय,ते तसलं बघून विश्वासन तर जागीच शुद्ध हरपली.मग त्याला खांद्यावर घेऊन लगबग करीत कसतरी रानातून बाहेर आलो ,तिथं पाटील अन बाकीची मंडळी होतीच,मग त्यांच्यासोबत गावात पोहोचलो.... ऐका माझं मला तरी वाटत तिकडं काहीतरी वन्गळ हाय...अन आपण तिकडं नाही गेलो ना तेच बरं राहील.मला वाटत पुऱ्या गावात दवनडी पेटवूया,,कि त्या रानात कुणीबी जायचं नाही.गेलेल्या माणसाला आपण परत आणू नाय शकत पण बाकी गावकऱ्यांना वाचू शकतो ना"
साक्षात धनाजी च अस बोलणं ऐकून आता मात्र बाकीच्यांची चेहऱ्यावर घोर चिंता पसरली होती...
"अहो भूतच हाय ते,,अस वाटत होत जसकाय आता ते आम्हाला खाऊनच घेईन,त्याचा आवाज,त्याच हसणं ,सैतान हाय त्यो...",आतापर्यंत गप असलेला विश्वास बोलला...
"बराबर हाय त्याच,,त्यो सैतान पुन्हा जागा झाला हाय,असच १५ वर्षांपूर्वी बी झाला हुतं,, तेव्हा बी अशेच लोक मेले होते,,तेव्हा बरं झालं या विजू च्या 'बा' न काय तरी केलं अन तो सैतान शांत झाला,पण बिचारा तेव्हाच स्वतःचा जीव देऊन बसला,,आता पण तसच होत हाय...आता पण आपले गावकरी मरतील,,पाटील आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावंच लागणार नाहीतर वेळ तशिबी वैऱ्याची हाय",,पाटलांच्या शेजारी बसलेला एक पंच बोलला...
बऱ्याच तरुण पोरांना त्यांचं बोलणं कळालं नाही,विजुची बाबांनी नेमकं काय केलं होतं हे कुणालाच माहित नव्हतं.स्वतः विजू पण आश्चर्य चकित झाला,त्याच्या चेहऱ्यावर पण मोठं प्रश्नचिन्ह दिसत होतं.सगळ्यांच्या मनात जे होत ते त्या पंचांनी बोलून दाखवलं होत.हळूहळू एकेक करून सगळे त्यांच्या हो ला हो करू लागले.अगदी पाटील पण त्याच विचारांचे वाटत होते,,पण त्या सगळ्यांना विरोध करत एक मुलगी समोर आली,
"धनाजी भाऊ,,तुम्हाला हा सगळा अनुभव आला पण तुम्ही प्रत्यक्षात काही बघितलं का?म्हणजे जी कोणी व्यक्ती आवाज देत होती तिचा चेहरा किंवा अजून वेगळं काही तुमच्या नजरेत आलं होतं का?"
"नाही ,देवाची कृपा म्हणायची तसलं काही वन्गळ बघाया नाही भेटलं,नाहीतर मी आणि विश्वास दोघ जागीच बेशुद्ध झालो असतो बघ"
"म्हणजे कुणीच नेमकं ते भूत का काय बघितल नाही ना,,जब्या ला पण काही सरळ दिसलं नव्हतं,कदाचित त्या गोष्टीला भूत किंवा अनैसर्गिक म्हणणं जरा घाईच ठरणार नाही का?"
हे सगळं बोलणारी मुलगी म्हणजे कविता होती,
"पोरी तुम्हा तरुणांना हे सगळं खोटं वाटत,,पण ज्याप्रमान देव या जगात हाय त्याच प्रमाण वाईट गोष्टी पण असतातच",पाटलांनी स्पष्टीकरण दिल.
"हो काका पण पूर्णपणे कळल्या शिवाय अस म्हणणं जरा घाईच नाही का ठरणार?"
कविताच अस धिटाई च बोलणं ऐकून सगळं समुदाय तिच्याच कडे बघू लागला...विजू च तर आधीपासून तिच्याकडंच लक्ष होत.
"बरोबर आहे अण्णा,कदाचित हे जर का कुना डाकुंच काम असलं तर,कदाचित गावकऱ्यांना घाबरवण्यासाठी ते हे करत असावे,बऱ्याचदा डाकुंच्या टोळ्या स्वतःचा असा अड्डा तयार करण्यासाठी आणि त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी असले उद्योग करतात", कविताच्या बोलण्याला समर्थन देत श्रीधर ने सुद्धा स्वतःच मत व्यक्त केलं,
पाटील आता गम्भीर झाले होते.
"ठीक आहे,,मला वाटत या पोरांची शँका सुद्धा नाकारता येणार नाही,पण सध्या तर आपण काहीच बोलू शकत नाही,,मात्र मला वाटत त्या ठिकाणी जे काही चालू आहे त्याचा पता मात्र काढलाच पहिजेन,,,,बाळू काका!!"
"बाळू काका ,गावात दवनडी पेटवा,गावातला एकसुद्धा माणूस बिना परवानगी रानात जाता कामा नये,,शक्यतो त्या वाटेने गावातून बाहेर जान सुद्धा टाळावं,,आता जोपर्यंत कळत नाही नेमकं तिथं काय चालूये तोपर्यंत आपल्याला दक्षता पाळावीच लागणार बघा."
"ठीक हाय पाटील,तुमच्या म्हणण्यानुसार आजच गावात दवनडी पेटवतो".
"बरं मंडळी,,आता ही सभा इथंच संपवावी म्हणतो,,तुम्ही गावात लोकांना सतर्क रहायला लावा अन कुणाचं पाव्हन बिव्हन येणार असण तर त्याला पण त्या रानात जाऊ देऊ नका,,गेलेल्या माणसाला परत अनु शकत नाही आपण पण जेव्हढे जीवन्त हाय त्यांना तर वाचवू शकतोच ना!!"
क्रमश: