Nishabd - 6 - Last Part in Marathi Fiction Stories by Siddharth books and stories PDF | निशब्द - भाग 6 - Last part

Featured Books
Categories
Share

निशब्द - भाग 6 - Last part

सर्वांच्या संमतीने आम्ही लग्न करायचं ठरवलं ..ती मला म्हणाली की , " आपण थाटामाटात लग्न करूया ." ..पण ती केवळ माझ्या आनंदासाठी हे सर्व बोलत होती हे मला जाणवलं ..मात्र मी निर्दयी नव्हतो ..त्यामुळे मी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला ..
प्रेमाचा दिवस ..14 फेब्रुवारी ..त्याच दिवशी आम्ही विवाह करण्याचा निर्णय घेतला ...लग्नात अगदीच मोजकी मंडळी होती ..आंतरजातीय विवाह म्हणून आम्हाला काहीं पैसे देखील मिळाले होते आणि ते आम्ही अनाथाआश्रमाला भेट दिले ..दुसऱ्या दिवशी काही मोजक्याच मंडळींच्या समवेत जेवण - खाण झालं आणि फक्त एकाच दिवसात आमचा छोटासा विवाह सोहळा पार पडला ..श्रेयसी आता दीपकच घर सोडून येणार होती आणि पुन्हा कधीच त्यांच्याशी भेट होणार नाही हे बहुतेक तिला माहिती होत त्यामुळे त्या घरी तिने शेवटचे अश्रू गाळून घेतले आणि सर्वाना आलिंगन देऊन ती माझ्यासोबत सुंदर प्रवासाला निघाली ..आम्ही फक्त दोन - तीन दिवस माझ्या घरी थांबलो ..सुट्ट्या संपल्या होत्या त्यामुळे कामावर लवकर जाण भाग होत ..याच दोन दिवसात केतकीने घरी सर्वाना वेड लावलं ..श्रेयसि देखील या दिवसात कधी नव्हे ती खळखळून हसली होती शिवाय हा अध्याय देखील संपला ..

अब फनाह होणा
चाहता हु तेरे ईश्क मे
तू हा कह दे तो
एक नया जहा बना दु 'तेरी खिदमत मे ..

दीड वर्षानंतर माझी बदली कोकणात झाली ..कोकण हा सर्वच दृष्टीने बहरलेला प्रदेश ..समुद्र , नद्या , हिरवागार निसर्ग ही त्याची वैशिष्ट्ये मी तिला घेऊन गेलो पण तिला माझ्यासोबत खुलायला आणखी वेळ लागणार होता ..लोक म्हणतात की लग्नानंतर शरीरसंबंध शिवाय आनंदाचा दुसरा क्षण नाही पण सुरुवातीला आमच्यात असं काहीच नव्हतं ..आम्ही मनाने जुळत होतो आणि त्यातच मला आनंद मिळत होता..एका दिवशी मी सायंकाळी घरी परत आलो आणि श्रेयसीजवळ जाऊन बसलो ..आमची परी टीवी पाहत होती पण श्रेयसी मात्र एकटीच बसून होती ..मला चहा खूप आवडतो त्यामुळे ती चहा घेऊन आली आणि मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली , " श्रेयसी मी आपल्याला बाळ होऊ नये म्हणून शस्त्रक्रिया करून आलो आहे . "
सुरुवातीला ती माझ्यावर रागावली .. कितीतरी दिवसांनी ती मला हक्काने रागवत होती आणि रागवता रागावताती काही क्षणांसाठी शांत झाली .. आज तिने आपल्या मनातलं सर्व दुःख अश्रुत वाहिलं होतं आणि तिने आपल्याला दुसरं मूल न होण्याचा निर्णयाला देखील लगेच मान्य केलं...
आता कुठे आमचे ऋणानुबंध घट्ट व्हायला लागले होते.. ती आधी सारखीच हसायला, खेळायला लागली होती .. मी जास्तीत माझा वेळ जास्त दोघांनाही देत होतो .. वेळ मिळाला तेव्हा बाहेर फिरायला जाणं हे आमचं नित्याचं होत..मुळात या निसर्गात राहून तिने आयुष्याचा आनंद घ्यावा अस मला वाटत होतं ..आणि रविवार म्हणजे बाहेर जेवणाचा दिवस ..थोड्या वेळासाठी का होईना श्रेयसीला बाहेर फिरायला मिळत होतं .. कधी कधी आई बाबा आम्हाला भेटायला यायचे त्यामुळे आनंद द्विगुणित व्हायचा .. श्रेयसी देखील त्यांची काळजी तेवढ्याच आनंदाने घेत होती..आता आमच्यात शरीर संबंध सुद्धा व्हायला लागले होते.. त्यामुळे तो आनंद देखील हवाहवासा वाटू लागला.. आपल्या आवडीचा स्पर्श जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा जग देखील स्वर्ग वाटू लागतं.. त्यामुळे ती खूप आनंदी होती.. मी अधून मधून काही दिवसासाठी कामानिमित्य बाहेर जायचो ..पण ती मला कुठलीही तक्रार करत नसे.. मी जेव्हा केव्हा बाहेरून परत येत असे त्यावेळी आमच्या परीला खूप काही आणायचो ..त्यामुळे ती सर्वात जास्त माझ्या सोबत असायची .. श्रेयसी केतकी मात्र अधिकच खोडकर होत चालल्याची मला तक्रार करायची पण मी याहीवेळी मात्र केतकीचीच बाजू घ्यायचो ..
केतकी हळू-हळू मोठी होत होती..आता ती सहा वर्षाची झाली होती..त्यामुळे तिला पहिल्या वर्गात टाकल.. ती माझ्यासारखीच खूप हुशार होती पण खोडकर मात्र खूप होती ..एका दिवशी मला तिच्या शाळेतून बोलावून आल आणि हे ऐकताच मला पोटात गोळा आला ..आज आपली काही खैर नाही अस वाटून गेलं त्यामुळे शाळेत जायची देखील भीती वाटू लागली .. मला वाटलं परीने काहीतरी केलं असेल पण तिच्या शिक्षकांनी विशेष माझ्याशी बोलण्यासाठी मला बोलावून घेतलं होतं..केतकीदेखील त्या वातावरणात छान रुळु लागली .. ती खोडकर जरी असली तरी अभ्यासात हुशार होती ..बहुदा श्रेयसीतले सर्व गुन परी मध्ये आले होते ..ती खोडकर जरी असली तरी कधीही तिची तक्रार आली नव्हती..आमच सर्व मस्त चालू होत.. आनंद म्हणजे नेमका काय असतो हे तेव्हा कळत होतं त्या दोघांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करत होतो ..तिला तर आता ती जादूची नगरिक वाटू लागली होती ..बदली ही नेहेमीच होत होती पण त्याबदद्दल दोघाणीही कधीच तक्रार केली असल्याचं मला आठवत नाही..
एकदा असाच पाणी पडत होता आम्ही तिघेही घरीच होतो.. श्रेयसीला काय झाल माहिती नाही पण ती उठली आणि अगदी पाण्याने ओली चिंब भिजली ..तिने पावसात आपला संपूर्ण भूतकाळ काढून फेकून दिला.तीच भीजली नाही तर मला सुद्धा तिने ओढून नेल.. मग आमचं पिल्लू कसं मागे राहणार ?
.. आम्ही तिघेही अर्धा तास पडणार्‍या पाण्याचा आनंद घेत होतो आणि मग काय पिल्लू आणि मी सर्दीने आजारी पडलो .. पण त्याच श्रेयसीला फार वाईट वाटलं .. आम्ही तिचा रुसवा काढता यावा म्हणून वेगळे - वेगळे जोक मारून तिला हसवायला लागलो शिवाय ऑर्डर वर ऑर्डर देत होतो . चहा आन , भजी आन अस आमची पिल्लू म्हणायची आणि तिच्यासोबत मलाही खायला मिळायचं.. ती देखील म्हणायची ," बाप-लेक दोघेही शोभता ह मस्त नाटकी कुठली !! " हाच एक प्रसंग माझ्या आठवणीत आह...त्या संपूर्ण काळात आम्ही मनभरून जगून घेतलं आणि आम्ही एकमेकांचे जिवलग झालो ..
आमचं पिल्लू पाचवीला होत.. मला एका महिन्याच्या ट्रेनिंग करता बाहेर जायचं होतं त्यामुळे मी श्रेयसीच्या आईला त्यांच्यासोबत बोलावून घेतलं .. मी एक महिन्याची ट्रेनिंग करून परत आलो होतो.. बघतो तर श्रेयसी अंथरुणावर पडून होती.. मी तिला डॉक्टरकडे घेऊन जाणार तेव्हाच तिने माझा हात पकडला आणि खाली बसवलं आणि म्हणाली मला तुला काहीतरी सांगायचं आहे..
" तू नेहमीच बाहेर असतोस याची तक्रार नाही पण असंच दोन वर्षाआधी मी डॉक्टकडे गेले होते त्यावेळी मला डॉक्टरांनी ब्लड कॅन्सर झाल्याचं सांगितलं.. मला हे तुला तेव्हाच सांगायचं होत पण खूप दिवसांनी तुझ्या आयुष्यात आनंद आला होता त्यामुळे मला त्यात विरजण पाडायचं नव्हतं आणि माझी हिम्मत देखील झाली नाही.."

मी धीरगंभीर होऊन तिला विचारल , " डॉक्टर काय म्हणाले ? "
ती उत्तरली , " फक्त काहीच दिवस , त्यातला 80% काळ उलटला आहे तेव्हा केव्हाही बोलावून येऊ शकत.."
मी चेहर्‍यावरचे सर्व भाव लपून केवळ स्मित केलं पण कदाचित तिला माझ्या भावना कळाल्या असाव्यात .. तिने मला मांडीवर घेतल आणि कितीतरी वेळ आम्ही तसेच होतो..मी अश्रू गाळत होतो आणि ती पुसत होती आणि मला वारंवार सांगत होतीे मी जेव्हा जाईल ना तेव्हा तू रडू नकोस कारण तू कमजोर पडला तर आपल्या पिल्लूला कोण सांभाळणार ??..जणू तिने स्वतःचा स्वीकारल होत की ती आता या जगात नसेल पण ती एवढं सांगायला विसरली नाही की मला माझ्या आयुष्याचा शेवटचा काळ तुझ्यासोबत जगता येईल हाच खूप आनंद आहे ..ती आज खूप वेळ बोलत होती.. मी माझं अश्रूंच आकाश रिकामी केलं आणि काही झालच नाही असंच वागू लागलो .
तो दोन महिन्याचा काळ जास्तीत जास्त वेळ मी तिच्यासोबत होतो आणि ती आमच्या दोघांसोबत.. कधी अनावर झाल की मग श्रेयसची कुशी असायची.. आम्ही दोघेही एकमेकांचा सहारा बनलो होतो..
3 जून हा तो दिवस ..श्रेयसी सकाळी सहा वाजताच उठली होती..मी तिला चहा आणून दिला आणि आम्ही बोलायला लागलो.. ती आज आपल प्रत्येक सिक्रेट सांगत होती .. त्यातल एक सिक्रेट तीच डायरी लिहिण्याच होतं .. आज तिने मला तिची डायरी हातात दिली आणि आजपासून ही तुझीच आहे असं सांगितलं .. मी तरीही स्थिरच होतो माझ्या भावना तिला कळाल्या नव्हत्या ..ती आज मन भरून बोलत होती ..जस तिला कळलं असावं की यानंतर हे क्षण मला जगायला मिळणार नाहीत .. माझ्या बद्दल, पिल्लू बद्दल आई बद्दल सर्वच काही बोलत होती .. आज तिने आमच्या कॉलेजच्या आठवणीनादेखील उजाळा दिला होता आणि ते आठवताना तिचा चेहरा फार खुलू लागला ..तिने मला कॉलेज लाइफ मध्ये जे काही घडलं होत , ती माझ्याबद्दल काय विचार करत होती हे सर्व सांगितलं आणि आम्ही दोघेही हसू लागलो ...आज मला कळलं होत की ती मला अकडू म्हणायची .आम्ही तो प्रत्येक क्षण पुन्हा एकदा नव्याने जगत होतो .. बोलताना दोन तास कसे गेले कळलेच नाही..बोलता - बोलता तिने मला शेवटी मिठी मारली , कपाळावर किस केलं आणि काही वेळ ती तशीच मला बिलगून होती ..अचानक बोलणार तुफान थांबलेलं होतं ..तीच संपूर्ण शरीर थंडगार पडलं ..श्वासाची गर्मीही आता कुठेतरी दूर पळून गेली होती आणि मला कळून चुकलं की ती मला या वाटेला एकटच सोडून गेली ..पण ती आज सारं काही मला सांगून गेली होती..बहुदा आज तिला मनाने चैन पडणार होत .नाही म्हटलं तरी मी विश्वासचा विश्वासघात केला ही गोष्ट ती मनातून काढू शकली नव्हती ..तिला मी तसच बेडवर ठेवली ..आज तिचा चेहरा अगदीच शांत भासत होता ..त्या क्षणी मी तिला तिथेच ठेवल आणि आईला सांगितलं ..आई मला कितीतरी वेळ पकडून रडत होती .पिल्लुला काय झालं तेच कळत नव्हतं ..आईला सांभाळून मी सर्वांना फोन केले.. फोन केल्यानंतर आईबाबा फ्लाइट घेऊन आले होते शिवाय दिपकचे आईबाबा पण आले .. सायंकाळपर्यंत सारी मंडळी जमली होती ..त्यातला प्रत्येक व्यक्ती रडत होता पण माझ्या डोळ्यातून एक अश्रू देखील येत नव्हता..सर्वच मला वेगळ्याच नजरेने पाहू लागले ..मी श्रेयसीला रडणार नाही असं प्रॉमिस केलं होत त्यामुळे सर्वजण माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते .. श्रेयसीदेखील खूप स्वार्थी होती.. तिने माझ्या कुशीत जीव सोडून शेवटच स्वप्न देखील पूर्ण केलं होतं ..
सायंकाळी चार वाजता प्रेतयात्रा निघाली ..श्रेयसीला दागिन्यांनी सजवलं होत ..आज ती खूपच सुंदर दिसत होती .ती आता उठेल आणि मला लगेच मिठी मारेल अस वाटत होतं पण अस काहीच घडणार नव्हतं .तिला सर्वांनी खांद्यावर उचललं ..आम्ही सायंकाळी 5 ला स्मशानात पोहोचलो..ती स्मशानात आगीवर शांत झोपली होती .काळ्याही जळून राख झाल्या होत्या सर्वजण घरी आले ..मी आताही तिच्यापाशीच बसून होतो.. ती जरी राख झाली असली तरी मला ती समोर दिसत होती .. आणि आम्ही जणू काहीही न बोलता बरंच काही बोलत होतो..अगदी निशब्द पणे..तिने मला न बोलताच खूप सारी वचने मागितली होती मी देखील तिला ती दिली मी सायंकाळी सातला परतलो ..पण तिच्यापासून दूर जाताना एक विचार सतत येत होता ...

तेरे बिन मै यु कैसे जिया
कैसे जिया तेरे बिन
तेरे बिन मै यु कैसे जिया
कैसे जिया तेरे बिन

लेकर यादे 'तेरी , राते मेरी कटी
लेकर यादे 'तेरी , राते मेरी कटी
मुझसे बाते 'तेरी , करती है चांदणी
तन्हा है तुझं बिन राते मेरी
दिन मेरे दिन के जैसे नही

तन्हा बदन तन्हा है रुह ,नम मेरी आंखे रहे
आजा मेरे , अब रुबरु
जिना नही बिन तेरे
तेरे बिन मै यु कैसे जिया
कैसे जिया तेरे बिन

कबसे आंखे मेरी राह मे 'तेरी बीछि
कब से आंखे मेरी , राह मे 'तेरी बीछि
भुले से ही कभी , तू मिल जाये कभी
भुले ना मुझसे बाते 'तेरी
भिगी है हर पल आंखे मेरी

क्यू सास लू , क्यू मै जियु
जिना बरा सा लगे
क्यो हो गया , तू बेवफा , मुझको बता दे वजह
तेरे बिन मै युं कैसे जिया
कैसे जिया तेरे बिन
तेरे बिन मै यु कैसे जिया
कैसे जिया तेरे बिन ...

तेरे बिन..
तेरे बिन ...
तेरे बिन ...
चार-पाच दिवसात सारीच मंडळी आपापल्या घरी परतली.. आई-बाबा थांबणार होते पण मी त्यांना घरी जायला सांगितले .. परंतु श्रेयसीच्या आईला मात्र सोबत ठेवलं ..पिल्लू कधी कधी श्रेयसीची आठवण काढत होती पण मी तिला समजावून सांगत होतो ..यावेळी मी सर्वकाही सोडलं होतं.. आयुष्यात हाही प्रसंग कधीतरी येईल असं कधीच वाटलं नव्हतं ..माझ्या विनंतीवरून सरांनी मला कमीत कमी वेळेची शिफ्ट दिली होती .. मी माझा संपूर्ण वेळ पिल्लूला देत होतो .. तिलाही कळायला लागलं होते की आता आई कधीच परत येणार नाही ..त्यामुळे तिने देखील हट्ट करणं सोडलं .. तिची डायरी आतादेखील मला त्रास द्यायला लागली होती त्यामुळे मी तिला एका ड्रॉपमध्ये नेहमीसाठी बंदिस्त केलं....
आता श्रेयसी हा चॅपटर जणू सर्वांसाठी क्लोज झाला होता पण आठवणीत ती नेहमीच राहणार होती.. मी पिल्लुला आई-वडील दोघांचही प्रेम देत होतो पण आई ती आई असते त्यामुळे कधीतरी कमी पडायचो मग आम्ही दोघेही श्रेयसीच्या आठवणीत गुंतायचो ..तासंतास फक्त तिच्याबद्दल बोलायचो आणि नंतरच सर्व काही चांगलं वाटायचं.. ती आमच्यातून गेलीच नाही असं वाटायचं ..ती प्रत्यक्षात माझ्याशी बोलायची .. या संपूर्ण काळात तिच्या आजीने केतकीचा सांभाळ केला पण ती देखील तशीच निघून गेली.. आणि काही काळातच माझे बाबा देखील आम्हाला सोडून गेले..मी आता एकटा पडलो होतो पण छोट्या पिल्लूने मला सावरलं ..आईला मी माझ्या सोबत राहण्याची विनंती केली पण तिला बाबांच्या आठवणीत जगायचं होतं आणि ती जगता - जगता श्वास घ्यायच विसरून गेली आणि अगदी पाच वर्षात माझे सारे आधार नष्ट झाले.. आता माझा एकमेव सहारा होता ते म्हणजे पिल्लू ..
ती आता पंधरा वर्षाची झाली होती .. एकदा मला पिल्लू म्हणाल की बाबा मला तुम्हाला पुन्हा त्याच धडाडी ऑफिसरच्या नेतृत्वात बघायच आहे..आईचं स्वप्न पूर्ण करायचं आहे पण तुमच्या सारखच खूप नाव कमवायच आहे ..प्लीज बाबा तुम्ही माझ्यासाठी पुन्हा ते आधीचे नाही बनणार का ?? ...मुळात तीच माझं सर्वस्व होती त्यामुळे तिच्या साठीच आता सर्व काही करायचं होतं..आणि पुन्हा एकदा मी आपलं काम जोमाने सुरू केलं.. पिल्लू माझी आई बनली .. तिला मेडिकल क्षेत्रामध्ये फार आवड होती त्यामुळे त्यासाठी ती हवे ते कष्ट करू लागली . मला देखील सांभाळत होती..जणू माझी आईच होती ..तरी तिला आईची आठवण आली की ती माझ्या कुशीत येऊन झोपायची.. पुन्हा दुसऱ्या दिवशी सर्व काही नॉर्मल व्हायचं..
जेव्हा जेव्हा तिच्या शाळेत जायचो तेव्हा तिच्याच नावाने ओळखला जायचो .. ही माझ्यासाठी खूप आदराची गोष्ट होती .. आमची जोडी जिथे पण असायची तिथे नेहमीच हर्षोउल्हास असायचा .. मी माझ्या आयुष्याबद्दल पिल्लुला सर्वकाही सांगायचो त्यामुळे ती छोटी- छोटी गोष्ट देखील मला सांगायची..मला आठवतय कि ती माझ्यासाठी अंगाई देखील गायची.. दोघांचेही गुन तिच्यात आले होते ..मला तर ती आमच्यापेक्षाही हुशार वाटत होती ..तिने जर कधी काही अचिव केलं त्यावेळी आम्ही श्रेयसीच्या फोटोसमोर एक छोटासा केक कापायचो आणि सेलिब्रेट करायचा असेच आमचे दिवस जात होते
दहावीला , बारावीला , पदवीलादेखील केतकी विद्यापीठांमध्ये टॉपर आली होती तरी गर्व नावाची गोष्ट तिच्यात नव्हतीच बहुदा हा गुण तिला श्रेयसीकडून मिळाला होता ..वयाच्या चोविसाव्या वर्षी तिने आपले स्वप्न पूर्ण केलं आणि डॉक्टर बनली .श्रेयसी ज्या आजाराने गेली होती तो प्रत्येक आजार नष्ट करावा यासाठी तिने यासाठी तिला डॉक्टर बनायचं होतं ..तिची आवड सामाजिक क्षेत्र असल्याने अगदी जाणत्या वयापासूनच ती सामाजिक क्षेत्रामध्ये उतरली होती .. एकदा तिची मुलाखत घेण्यात आलिबतेव्हा ती म्हणाली की , " मी जे काही आहे ते बाबांमुळे ..काही जण म्हणतात की मी फक्त माझ्या आईची मुलगी आहे पण असे बाबा जर मिळणार असतील तर कदाचित मला माझ्या खऱ्या बाबांची देखील गरज वाटत नाही ..आज त्यांच्याच शिकवणुकीमुळे मी खर तर आहे असं म्हणू शकते ..मी आज माझं नाव केतकी श्रेयसी विश्वास इनामदार आहे असं आनंदाने सांगीन कारण त्या दोघांविना मी अपूर्णच आहे
मग आमच्या पिल्लुचा काळ सुरू झाला ..ती रात्रंदिवस कामात व्यस्त राहत असे आणि सर्वाना मोफत ट्रिटमेंट देऊ लागली ..समाजकार्यात तर ती माझ्यापेक्षाही समोर होती..नेहमीच कुठल्यातरी पुस्तकात तिचा लेख यायचा ..त्यामुळे मन फार खुश व्हायचं ..आम्ही दोघे आपल्या स्वप्न जगत होतो आणि समाजासाठी कार्य करू लागलो . कधी कधी तर एकाच कार्यक्रमात भेट व्हायची आणि आपल्यापेक्षाही चांगलं बोलणाऱ्या मुलीकडे पाहून डोळे आनंदाने भरून यायचे ..
अशाच एका दिवशी केतकी राहुल ला सोबत घेऊन आली.. आणि ती म्हणाली , " की बाबा मला राहुल शी लग्न करायचं आहे पण तुमच्या संमतीने ."

मी काही काळ शांत होतो आणि त्यांचे ऐकून घेतल्यावर त्यांना बाहेर जायला सांगितलं .. मला वाटलं की जिला आयुष्यभर सांभाळलं ती चिऊताई किती मोठी झाली ना !! आणि कोण हा राहुल जो माझ्या पिल्लूला माझ्यापासून दूर घेऊन जाणार .. प्रश्न असंख्य पडले होते पण पुन्हा एक विचार येऊन गेला की जी चुक श्रेयसीच्या बाबाने केली ती चूक मला करण्याचा हक्क नाही..त्या एका निर्णयाने कितीतरी नाते क्षणात संपले होते.. तेव्हा त्या दोघांच्या विवाहास संमती देणे गरजेचे होतं..
23 ऑगस्ट 2014 या दिवशी दोघांचा विवाह सोहळा होता .. श्रेयसी आणि मी आमच्या लग्नाच्या इच्छा पूर्ण करू शकलो नव्हतो पण तेच आज त्यांच्या मार्फत आम्ही जगून घेत होतो ..केतकीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला श्रेयसीची आठवण झाली ..आज राहुल मध्ये मला मी भासत होतो आणि पिल्लू मध्ये श्रेयसी..आम्ही पुन्हा एकदा दोघेच लग्न करणार होतो अगदी विधिविधान पद्धतीने .. हजारो लोकांनी तो हॉल भरला होता पण केतकीची नजर आताही फक्त माझ्याकडे होती ..दिवस जायला वेळ लागत नाही तशी तीही मला स्वतःची काळजी घ्या असं म्हणून राहुलच्या घरी निघाली..आता आपले बाबा कसे जगतील म्हणून तिला वाईट वाटत होत त्यामुळे तिने मला कितीतरी वेळ घट्ट पकडून ठेवलं होतं ..शेवटी मीच तिला राहुलच्या स्वाधीन केलं आणि ती कायमची निघून गेली . आनंद हाच होता की विश्वास आणि श्रेयसीच्या वाट्याला आलेलं दुःख त्यांना भोगाव लागणार नव्हतं ..
माझ शेवटचा प्रेम म्हणजे पिल्लू आता तीही मला सोडून गेली .. आता आमच्या घरात आपलं म्हणावं असं कुणीच नव्हतं .. आलिशान घर होतं पण तेदेखील आज पडक्या वाड्यासारखंं भासत होत .. घरात मी आज एकटाच होतो..मन फारच बेचैन झालं होतं.. तेव्हा मी आमच्या बेडरूम मध्ये गेलो आणि काहीतरी शोधता-शोधता ती डायरी हातात लागली .. श्रेयसी गेल्यानंतर पहिल्यांदाच ती डायरी मी वाचणार होतो ..तेव्हा डायरी घेऊन मी अंगणात आलो ..आज संपूर्ण आकाश चांदण्यांनी भरलेलं होतं ..मला ती एका चांदण्यात दिसू लागली ..ती माझ्याकडे पाहून हसत होती .. आणि डायरीच पहिलं पान उघडलं त्यात लिहून होतं...

तू जहा जहा चलेगा
मेरा साया साथ होगा
मेरा साया ...मेरा साया..

" विश्वास ...सॉरी ...मी पुन्हा एकदा माझं वचन तोडलं ...तुझ्यासोबत घालवलेले हे काही वर्षे माझ्या आयुष्याचे अविस्मरणीय क्षण आहेत.. दीपकशी लग्न झाल्यावर मला वाटलंच नव्हतं की मी तुझी कधी होऊ शकेन ..पण ते झालं ..केतकी माझा जीव ..तिला दुसऱ्याच्या हातात सोपवन मला कठीणच होत पण तुझे हात मला माझ्यापेक्षाही सुरक्षित वाटले म्हणून मी तिला तुझ्याकडे सोपवून आले ..खरच मी स्वार्थी आहे नाही तर तुला एकटी सोडून आले नसते..मी पुढच्या जन्मी भेटेन ना तर आपण वेगळं नाही व्हायचं बर का ??..पुन्हा देशील एक वचन ..दुसऱ्या जन्मी भेटण्याच..सांग ना देशील वचन ??
मी आकाशात तिच्याकडे बघून हसत होतो आणि हृदयातून शब्द आले " अशी कशी ग तू वेडाबाई ? "...आणि ए वेडाबाई मी तुलादेखील जास्त वाट पाहायला लावणार नाही मी येतोय तुझ्या भेटीला ..उरलेल्या गप्पा मारायला ...मलाही हवी आहे ऊब तुझ्या मिठीची ..भेटशील ना आणि घेशील मला मिठीत ...आयुष्यभरासाठी ??...घेशील ना ??

इक प्यार का नगमा है
मोजो की रवानी है
जिंदगी और कुछ भी नही
'तेरी मेरी कहाणी है

कुछ खोकर पाना है
कुछ पाकर खोना है
जीवन का मतलब तो
आना और जाना है
परछाईया रेह जाती
रेह जाती निशाणी है
जिंदगी और कुछ भी नही
'तेरी मेरी कहाणी है
'तेरी मेरी कहाणी है ...

Some stories have never end ..they will be continue at the last breath of love & not a person ..

( काही कथांना अंत नसतो त्या सदैव जिवंत असतात काहींच्या मनात तर काहींच्या शब्दात )

समाप्त .....