Me aek Ardhvatraav - 10 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | मी एक अर्धवटराव - 10

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

मी एक अर्धवटराव - 10

१०) मी एक अर्धवटराव !
नेहमीप्रमाणे मी मारोतीरायाचे दर्शन घेतले. आणि तिथून जवळच असलेल्या आमच्या गॅस कंपनीत गेलो. तिथली कामे करून मी घरी परतलो दाराबाहेर चप्पल काढत घराचे दार ढकलले. ते नुसते लोटलेले होते. मी दारातून आत प्रवेश केला न केला की, आतून हिचा आवाज आला,
"अहो, आलात काय?"
"होय. आलो की. अग, मला नेहमी पडणारा एक प्रश्न असा की, आजच नाही तर मी जेव्हा जेव्हा बाहेरून येतो आणि तू समोर नसतेस त्या प्रत्येक वेळी तू मला 'आलात काय?' हा ठरलेला प्रश्न विचारतेस? हे तुला कसे जमते ग? तुला कसे समजते ग?" "ह्यालाच म्हणतात एकमेकांवरचे प्रेम! म्हणून तर पती-पत्नी हे संसाररुपी गाड्याची दोन चाके आहेत असे म्हणतात. तुमच्या पावलांच्या आवाजावरून मला तुमची चाहूल लागते..." बाहेर येत बायको म्हणाली, "अग, पण एखादे दिवशी हा तुझा आत्मविश्वास तुझी फजिती करू शकतो बरे. मी आलोय असे समजून तू काही तरी म्हणशील आणि स्पष्टच सांगायचे तर तू आत्यंतिक चांगल्या मुडमध्ये असशील तर 'आलात का हो, अर्धवटराव?' असे विचारशील पण नेमकी येणारी व्यक्ती दुसरीच कुणीतरी असेल..."

"असे कदापिही होणार नाही. बरे, हा कौतुक सोहळा जाऊ द्या. गॅस संपून सव्वा महिना होतोय. लावलेली दुसरी टाकी केव्हाही राम म्हणू शकते. आठ दिवस झाले मी सारखी नंबर लावा... नंबर लावा.. घसा खरडतेय पण तुमच्या कानात शिरेल..."
"अग, ऐकून तर घे. आत्ता गॅसकंपनीत जाऊनच येतोय..."
"परमेश्वरा, पावलास रे बाबा! " ही हात जोडत म्हणाली
"आता ह्यात त्या देवाचा संबंध कुठे आला? मी कंपनीत जाऊन तुझे काम करून आलोय..."
"पावलात हो पावलात, अर्धवटराव, पावलात! झाले समाधान?" सौभाग्यवतीने हसत पुढे विचारले, "नंबर लावलात ना? कधी येणार आहे टाकी?"
"नंबर? टाकी? हे काय बोलतेस तू?"
"म्हणजे तुम्ही गॅस कंपनीत गेलाच नाहीत?"
"गेलो होतो ग, पण नंबर कसा लावणार? आज कंपनीला सुट्टी असते हे माझ्या लक्षातच नव्हते."
"धन्य आहे हो, तुमची धन्य आहे! मला सांगा फोनवरून चोवीस तास नंबर लावता येतो ना..."
"अग, खरेच की. मी पार विसरूनच गेलो होतो की. बरे लावतो... " मी म्हणालो तशी सौ. हसतच स्वयंपाक घरात गेली. फोन लावावा की लावू नये या विचारात मी असताना मला काही महिन्यांपूर्वी घडलेला गॅससंदर्भातील एक प्रसंग आठवला...
त्यादिवशी मी देवपूजा करीत असताना ही चहा करीत होती. मला म्हणाली,
"अहो, एक-दोन दिवसात गॅस संपेल बरे का, पुन्हा सांगितले नाही म्हणाल. नंबर लावून या. असे करा ना, पूजा, नाष्टा झाला की, नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शन घेऊन झाले की, कंपनीत जाऊन क्रमांक लावा."
पूजा झाली. फराळ झाला.बाहेर जायचे कपडे घालत असताना हिने विचारले,
"अहो, लक्षात आहे ना?"
"हो. हो. पक्के लक्षात आहे. उभाराचे दर्शन घेतो आणि मंदिरात जाऊन नंबर लावतो..."
"काय? काय म्हणालात? उभाराचे दर्शन? हे काय आहे? तुमचेही काही चुकले नाही म्हणा, आजकाल रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, घरोघरी आणि यत्र तत्र सर्वत्र तेच तेच..."
"अरे, बाप रे! तसे नाही ग. मला म्हणायचे होते, मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतो आणि आपल्या 'उभार गॅस' या नावाने असलेल्या कंपनीत जाऊन नंबर लावतो. निघायची गडबड होती ना म्हणून.."
"बरे झाले. घरीच गडबड झाली. नाही तर कंपनीत जाऊन नंबर लावायचा सोडून उभार...उभार असे म्हणत बसला असता तर..."
"तेवढा काही मी ..."
"अर्धवटराव, बावळट, वेंधळा नाही आहात ते माहिती आहे मला..." ती हसत म्हणाली आणि मी बाहेर पडलो...
त्यादिवशी बायकोला मी मोठेपणाने म्हणालो पण मी कंपनीच्या 'चोवीस तास' या योजनेचा लाभ घेतला नाही. ह्या सेवेचा उपयोग करून क्रमांक लावणे म्हणजे भलतेच कटकटीचे काम असते. एकामागोमाग एक सूचना मिळतात की, 'हा क्रमांक दाबा, तो क्रमांक दाबा. यातला एखादा ही क्रमांक किंवा आकडा इकडेतिकडे झाला की, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!' ती झंझट नको म्हणून विचार केला की, दुसऱ्या दिवशी सकाळी प्रत्यक्ष जाऊया. एक तर समोरासमोर क्रमांक लावता येतो आणि सुकोमल, आनंदी चेहरेही पाहता येतात...
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चहा करताना बायकोला आठवण झाली. नंबर नाही लावला असे सांगताच तिचा जळफळाट झाला. पुन्हा शिव्यांची आवर्तने झाली. माझ्यापुढे खाली मान घालून ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तिचे तेच तेच बराच वेळ ऐकल्यानंतर मी साळसूदपणे म्हणालो, "बोलून बोलून तुझ्या घशाला कोरड पडली की नाही ते मला माहिती नाही परंतु गॅस-गॅस ऐकून मला नं चहा घ्यावासा वाटतोय ग. करशील का?..."
"अग्ग माय ग! कमाल आहे बुवा तुमची! चहा करते पण आधी फोन लावा..."
"अग, त्या उभार गॅस कंपनीत फोन करणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच आहे ग. एक तर लागत नाही आणि चुकूनमाकून लागलाच तर उचलतच नाहीत."
"अहो, कंपनीचे तीन-चार क्रमांक आहेत ना. मग दुसरा एखादा लावून बघा."
"सारे नंबर वांझोटे आहेत. एकही लागत नाही. कबड्डीच्या डावात चढाई करण्यासाठी एक-एक भिडू पाठवावा ना तसा एक-एक क्रमांक लावतोय पण व्यर्थ! चुकून एखाद्या वेळी उचलला ना तर अशा त्रासिक आवाजात बोलतात ना, जसा 'चहा कर' म्हटल्यावर तुझा चेहरा होतो..."
"व्वाह। दुसरी उपमा सुचलीच नसेल. मी एवढा त्रागा केला असता ना तर 'चहासम्राट' अशी तुमची ख्याती चोहीकडे पसरलीच नसती. बोलण्यात मला गुंतवू नका. नाही तर पुन्हा विसरून जाल. आधी फोन लावा बरे. त्याशिवाय मी इथून उठतच नाही.
"बाप रे ! बैठा सत्याग्रह! ठीक आहे बाप्पा!" असे म्हणत प्रत्यक्ष जायची मनोमन इच्छा आत दाबत मी गॅस कंपनीचे सारे क्रमांक एकानंतर एक दाबत सुटलो. 'प्रयत्नांती परमेश्वर' याप्रमाणे एक क्रमांक लागला...
"हल्लो, उभार गॅस कंपनी..." तिकडून मधाळ आवाज आला
"हॉलो, उभार मिळेल का?"
"का...य?" पलिकडून आश्चर्याने विचारले
"स.. स.. सॉरी! मला म्हणायचे होते उभारात ... म्हणजे कंपनीत सिलेंडर आहे का?"
"हाऊ ज्योकिंग सर! उभारात गॅस... बघा सर, तुमच्यामुळे मीही.. आपला क्रमांक सांगा ना..."
" हो.हो..३६-२४-३६!... " मला क्रमांक तोंडपाठ होता तो सांगितला
"सॉरी! सर, मी गॅस ग्राहक क्रमांक विचारला आणि तुम्ही..."
"मीही ग्राहक क्रमांक सांगितला..."
"वॉ..व! व्हाट अ नंबर! सर, एक महत्त्वाची सूचना नवीन योजनेनुसार उभार आता ३६ आणि १८... सॉरी अगेन! आपल्या कंपनीचे सिलेंडर आता १८ किलो आणि ३६ किलो असे आहेत..."
"चांगले आहे. ३६ ची पाठवा. मोठी असली म्हणजे बरे असते..."
"ठीक आहे सर. उद्या टाकी घरी येईल आणि एक सरप्राईजही सोबत असेल..." असे सांगत तिकडून फोन कट झाला. लागलीच बायकोने विचारले,
"लावला का हो नंबर?"
"हो. लावलाय नंबर. उद्या येईल टाकी. आणि हो काही तरी सरप्राईजही पाठवणार आहेत म्हणे. काय आहे ते नाही सांगितले. आता उद्या कंपनीला दांडी मारावी लागेल..." असे मी बोलत असताना बायको आत गेली आणि मी भ्रमणध्वनीत शिरलो...
दुसऱ्या दिवशी मी सकाळपासून अगतिक होऊन टाकीची वाट पाहताना आत-बाहेर करीत असल्याचे पाहून सौभाग्यवती म्हणाली,
"अहो, इतके काय डोळ्यात प्राण आणून वाट पाहताय? अशी माझी कधी वाट पाहिलीय का?"
मी काही उत्तर देणार तितक्यात बाहेरून कोमल आवाज आला,
"गॅस टाकी आली आहे..."
तो आवाज ऐकून मला नवल वाटले. नेहमी गॅसची टाकी आली म्हणजे दूरवरून तिचा खडखडाट ऐकू येतो. माणूस भसाड्या आवाजात ओरडतो. आज गाडीचा आवाज नाही आणि इतका कोमल आवाज? मी गडबडीने बाहेर आलो आणि आश्चर्यात पडलो कारण टाकी आणि गाडी घेऊन एक सुंदर मुलगी आली होती. तिच्या शरीरावर कंपनीचा गणवेश होता पण आधीच्या माणसाप्रमाणे तो मळकट, कळकट नव्हता तर एकदम स्वच्छ होता. मुलीच्या टॉपवर एका विशिष्ट ठिकाणी ठळक अक्षरात 'उभार' असे लिहिले होते तर त्याखाली अगदी बारीक अक्षरात 'गॅस कंपनी' असे छापले होते. कोणताही कानठळ्या बसणारा आवाज न करता सिलेंडर उतरवून ती मुलगी येत असल्याचे पाहून मी तिला मदत करावी अर्थात स्वार्थी हेतूने पुढे निघाल्याचे पाहून ती तरुणी मोहक आवाजात म्हणाली,
"नको सर, नको. मदतीची आवश्यकता नाही. बघा टाकीला चाके आहेत. त्यामुळे ही टाकी कितीही दूर, कितीही उंचावर सहज नेता येते..." ते ऐकून माझा चेहरा उतरला परंतु तितक्यात तिथे पोहचलेल्या बायकोचा चेहरा उजळला असल्याचे माझ्या लक्षात आले. तिने त्या मुलीकडे बघत विचारले,
"का हो, हेच आहे वाटते, कंपनीचे गिफ्ट? आवडले का?" मी काही बोलण्यापूर्वीच ती मुलगी हसत हसत म्हणाली,
"होय, मॅडम! कंपनीने आता मुलींची भरती केली आहे. यानंतर आम्ही मुलीच आपणास सेवा देऊ."
"बरे झाले. सिलेंडर उचलताना दम लागणे नको. नेहमी येणाऱ्या त्या माणसाचा वैतागलेला चेहरा पाहणे नको आणि प्रदुषण तर नकोच नको. हो ना ग..." मी हिच्याकडे बघत विचारले
"हो. हो. आवाजाचे प्रदुषण होणार नाही पण..." बोलता बोलता त्या मुलीकडे बघत पुढे म्हणाली,
"भविष्यात वेगळेच प्रदुषण होऊ नये म्हणजे मिळवले. आत्तापर्यंत गॅस घोटाळा वरच्या पातळीवर होतो असे ऐकिवात होते परंतु या अशा मुली टाक्या घरोघरी पोहोचवणार असतील तर ठिकठिकाणी वेगळेच घोटाळे होतील..." असे म्हणत ती मुलीच्या मुलीच्या मागोमाग आत गेली. जाताना मला 'इथेच थांबा' असा इशारा करून गेली. मी बिच्चारा हात चोळत बाहेरच थांबलो. काही क्षणात ती मुलगी बाहेर आली. तिच्याजवळ मी नोंद घेण्यासाठी पुस्तक आणि पैसे देत म्हणालो,
"उभार! उभार!!..."
"काय?" त्या मुलीसोबत बायकोही किंचाळली
"सॉरी! सॉरी!! मला आभार असे म्हणायचे होते..."
"झाले! साधे आभार म्हणतानाही वेंधळेपणाच का? अहो, सरळ धन्यवाद किंवा थँक्स म्हणायचे ना कशाला त्या उभाराच्या भानगडीत म्हणजे आभाराच्या भानगडीत..." ती बोलत असताना मी हसत म्हणालो,
"बघ आता. मला वेंधळा म्हणतेस आणि आता तू कशी वागतेस?" ते ऐकून त्या दोघीही माझ्यासोबत हसू लागल्या...
@ नागेश सू. शेवाळकर