सिद्धांत काय शोधतो आहे ? किती वेळ च बघतीये मी! काही हरवलं का तुझं? आर्या ने त्याला विचारल.
सिद्धांत सकाळी उठल्या पासून ती डायरी आणि बुक्स शोधत होता. पण ते काही त्याला मिळत नव्हते.
नाही ग आर्या काही नाही!
काही नाही कस किती अस्वस्थ वाटतोय तू! सांग काय झालं ते.
आर्या प्लीज यार! सांगितलं न एकदा काही नाही म्ह्णून का मागे लागलीये तो चिडून म्हणाला.
आर्याचा चेहरा पाहून त्याला कळलं की आपण विनाकारणच चिडलो.सॉरी, म्हणजे मला अस नव्हतं म्हणायच पण तू ह्या मध्ये नको पडू.
ठीक आहे, आणि ती तिथून निघाली.
मला काही कळत नाही का तू काय शोधतोय! पण तू ती डायरी किती ही सापडली तरिही तुला ह्या जन्मात तर नक्कीच नाही सापडणार! बस शोधत तुला ही कळू दे वस्तू ठरवल्यावर कीती त्रास होतो. तिने जिथे डायरी ठेवली तिथून काढली आणि लिहायला घेतली.
कुठे गेली डायरी मी नक्की बॅग मध्ये टाकली होती मला चांगलं आठवतंय! पण बॅग तर मी आजच ओपन केली, मग डायरी गेली कुठे? आर्या ने तर नसेल घेतली. नाही तिला काही इंटरेस्ट नसतो अस बॅग वगैरे चेक करण्यात मग कुणी घेतली असेल ! किंवा मी रूम मधेच तर नाही विसरलो ! नाही मी टाकली होती! जर ती दुसऱ्या कुणाच्या हाताला लागली तर ! नाही काहीही करून मला शोधायलाच हवी. आल्यावर मी हॉल मध्ये बराच वेळ होतो कदाचित तिथे कुठे पडली असेल तर! हा होऊ शकत. तो तडक हॉल मध्ये आला, आर्या तिथेच सोफ्यावर बसून लिहीत होती. सिद्धांत ने तिच्या कडे लक्ष नाही दिल. आणि तो शोधायला लागला. पण त्याला कुठेच दिसली नाही शेवटी कंटाळून तो तिच्या बाजूला येऊन बसला.
आर्याने मुद्दामून त्याला ignore केलं. आता त्याच लक्ष आर्या कडे गेलं.
काय लिहितेय?
डायरी.....ती म्हणाली.
अच्छा तो इतकच म्हणाला. आणि त्याने डोळे मिटले त्याला मधेच आठवलं आर्या काय लिहीत आहेस म्हणाली. त्याने विचारल.
"डायरी"ती अगदी सहज म्हणाली.
बापरे ही डायरी हिला कुठे मिळाली?
नाविन घेतली का? कारण तुझी तर हरवली होती ना? तुच नाही का म्हणाली.
नाही रे सापडली.... तू म्हणाला ला घरातच असेल एकदा नीट बघ मग शोधली सापडली.
अग पण कस शक्य आहे......?
का शक्य नाही सिध्दांत आणि तू का एवढा possessive होतोय!
नाही ग मी कुठे, बर मला एक सांग तुला डायरी कुठे आणि केव्हा सापडली?
कालच सापडली माझ्या स्टडी टेबल वरच होती. ती म्हणाली.
कस शक्य आहे मी डायरी बॅग मधून काढलीच नाही तर त्या टेबल वर कशी जाणार? तो गोंधळूण म्हणाला.
काय म्हाणाला एकदा परत बोल आर्या थोडी कठोर होत म्हणाली.
अरे यार खाल्ली मी माती! कळाल हिला , जाऊ दे कळाल तर कळाल. हो डायरी माझ्या बॅग मध्ये होती आणि मी ती बॅग ओपनच नाही केली तर मग डायरी वर आलीच कशी?
म्हणजे तू चोरली होती ना?, आणि वरून खोट बोलला ! आर्या म्हणाली.
हे बघ आर्या काही माहिती नसताना वाट्टेल ते आरोप करू नको ह!
सिद्धांत प्लीज मला तुझं काही explanation नकोय ! मुळात माझा न आत तुझ्या बोलण्यावर विश्वास च नाही राहिला.तिचा पारा चांगलाच चढला होता.
हे बघ आर्या तुझा गैरसमज होतो आहे! ऐक माझं त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवले आणि तो शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करीत होता.
आर्या ने रागाने त्याचे हात झटकले, तुला इतकं खोट बोलताना थोडीही लाज नाही वाटली. किती आशेने मी तुला कॉल केला होता डायरी हरवली म्हणून पण तू ला मजा वाटली असेल ना! शी तू इतका खोटारडा वागशील अस वाटलंच नव्हतं मला!
"आर्या enough", इतक्या वेळ शांत असलेल्या सिद्धांत चा राग आता उफाळून वर आला होता. त्याचे डोळे चांगलेच लाल झाले आर्याही क्षण भर घाबरलीच. हे बघ मी पुन्हा पुन्हा सांगत होतो ऐकून घे ! पण तुझं आपलं नाहींच! सरळ सरळ आरोप लावतीये तू माझ्या वर! आणि काय ग , त्याने तिचा हात जोरात पकडला. इतक्या वेळ मला चोर, खोटारडा काय काय म्हणालीस, आणि तू काय केलं माझ्या नकळत माझ्या बॅग ला हात लावला हे चालत का तुला ही चोरी नाही!
सिद्धांत ह्या विषयावर तर तू काही बोलायलाच नको तू ही माझ्या नकळत च माझी डायरी आणि बुक्स घेतले न! आणि ती तिचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती तोच त्याने आणखी घट्ट पकडला.
मी तुझ्या नकळत फक्त बुक्स घेतले होते ती डायरी चुकीने आली कळलं का आणि मी जर बुक्स मागितले असते तर तू सहजा सहजी दिले नसते!,
हो मग नकळत घेतल्या वर तरी सांगायची पद्धत असते न! आणि मी तुला कॉल केला तेव्हा तरी सांगायचं न!
नाही सांगितलं नव्हतं सांगायचं मग आज जे होतंय न ते तिथे झालं असत तू त्या डायरी साठी आली असती तिथं पर्यंत. म्हणून नाही सांगितलं. आणि तुझा मुळात विश्वास कुठे आहे माझ्या वर तुला फक्त आरोप लावता येतात. आणि तू त्या दिवशीही हेच केलं असत.
आता तू काहिही सांगितलं तरीही विश्वास नाही आहे माझा! कर तुला किती बडबड करायची ते कर ! आणि आधी हात सोड माझा, आर्या म्हणाली.
तिच्या ह्या बोलण्याने तो आणखीन दुखावला आणि त्याचा राग अजूनच वाढला त्याने तिचा हात आणखीन घट्ट पकडून ठेवला आणि म्हणाला, मी मूर्ख आहे का बडबड करायला ! आणि ऐक मला ही फुकटचा वेळ नाही आहे तुला explain करत बसायला. तू बॅग का ओपन केली ह्याच explanation आहे तुझ्या कडे, नाही ना कस असणार! मुळात तुझंही चुकलच आहे पण ते तू मान्य करणारच नाही !
सिद्धांत मी ती बॅग उघडली नाही ती उघडीच होती......
तिला मधेच थांबवत तो म्हणाला, मला नाही ऐकायची तुझी भंकस !
ठीक आहे नको ऐकू मला पण काही आवश्यक ता नाही वाटत की तुला काही सांगावं, हात सोड माझा जाऊ दे मला.ती च्या डोळ्यात मात्र आता पाणी होत.
ऐ हे बघ तुला ना विनाकारण रडायची सवयच झाली आहे आज तू कितीही रडली ना तरीही नाही फरक पडत मला सो प्लीजआता माझ्या समोर कुठलाही ड्रामा करू नको! आणि नाही सोडणार काय करते ते कर!
तुला आता तो ड्रामा वाटत असेल तर ठीक आहे मी काहीच बोलु नाही शकत आणि तुला त्रास च द्यायचा म्हंटल्या वर काय म्हणणार! तीच्या डोळ्यात अजूनही पाणी होत पण ती मात्र शांत झाली होती. खर तर ती सिद्धांत च्या अश्या बोलण्यामुळे आणखीन दुखावल्या गेली होती.
तीला तिथून निघून जायचं होतं पण सिद्धांत मुळे तिला जाताही येत नव्हतं. त्याला ही तिला बोलण्याची अजिबात ईच्छा नव्हती पण तरीही त्याने तिचा हात काही सोडला नाही.
खर तर ना त्या accident मध्ये तुझी मेमरी नाही मीच जायला हवं होतं! म्हणजे ना पुढे काही प्रश्नच नसते राहिले. आणि तू पण सुटला असता देव पण इतका अंत का पाहतो माहिती नाही. ती वैतागून म्हणाली.
"आर्या", सिद्धांत तिच्यावर ओरडलाच आणि त्याने हात सोडला. काहीही काय बोलते शुद्धीत आहे का तू ! तुला तरी कळतंय का की काय बोलतीये ते!
का नको बोलू बरोबर बोलतीये मी कोण सुखी आहे आपल्या दोघांपैकी सांग मला आणि जर आपण एकत्र राहूच नसेल शकत तर फायदा काय! त्याने तिच्या हाताकडे पाहिलं तिचा हात चांगलाच लाल झाला तो ते पाहून चमकलाच त्याने हातात घेण्याचा प्रयत्न केला पण आर्या ने त्याला हात नाही लावू दिला. नको झालं तितकं पुरे. आर्या बघू मला हात काय झालंय ते! तो म्हणाला. काही नाही झालं आणि झालंच तर बरं होईल !ती म्हणाली. का अस टोकाचं बोलतीये? तो म्हणाला. मला आणखीन वाद नको आहेत spare me! आणि ती चालल्या गेली.
आर्या ऐक माझं तो तिला आवाज देत होता पण ती नाही थांबली.
सिद्धांत तिथेच बसला त्याच लक्ष त्या डायरी कडे गेलं. त्याने हातात घेतली आणि बंद करून ठेवली.
क्रमशः
© Neha R Dhole