इतक्या रात्री कोण आलय...? मी पण काय बावळट आहे इतक्या रात्री चोरांशिवाय दुसरं कोण येणार..... बापरे आता काय करु सिद्धांत पण घरी नाही. कुणाला बोलावू ? गेट च्या आवाजाने आर्या चांगलीच घाबरली होती. काय करू यार???? तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला, चावी तर माझ्या आणि सिद्धांत शिवाय इतर कुणाकडे नाही आहे सिद्धांत तर आज रात्री येणं मुळीच शक्य नाही. मग.... चोर ....पण त्याच्या कडे चावी कुठून आली??? पण दाद द्यायला हवी किती कॉन्फिडन्स आहे डायरेक्ट चावीने दार उघडून चोरी..! पण हा विचार करण्याचा ही वेळ नाही आहे. आता काय करु?? मी लपून राहिलेलं च बर ! हो उगाच त्याला दिसलं आणि मला काही केलं तर! ह्या विचारानेच तिला घाम फुटला. आणि ती सोफ्याच्या मागे लपली. मी उगाच आले इकडे यायला च नको होतं. झाली असती चोरी तर झाली असती पण अस जीवावर तर नसत बेतलं ना? ती तिच्याच विचारात होती आता मात्र तिला सगळे तेहत्तीस कोटी देव आठवत होते. इतक्यात हॉल मधले लाईट्स ऑन झाले.
अरे बाप......!!!!! काय हिम्मत लाईट्स पण ऑन केले फारच कॉन्फिडेंट आहे हा चोर!!! ती पुटपुटली. मी काय करू उजेडात तर मी सहज दिसेल माझं काही खर नाही आता..... झालं संपल सगळं. आता लपुनही काही फायदा नाही. तिने त्याच्या कडे हळूच बघितलं,सिद्धांत!!!!! छे..... तो कसा असणार??? मला तर हल्ली कुठे पण सिद्धांत च दिसतोय! म्हणून काही ह्या चोरा मध्ये पण तो दिसावा?? तिला तीचच आश्चर्य वाटलं. अरे हा सिद्धांत च आहे बॅग्स पण आहेत ना ह्याच्या कडे! आवाज देऊन बघू का? हो असच करते आणि तिने हळूच आवाज दिला "सिद्धांत". त्याने मागे वळून पाहिलं. आणि त्यालाआश्र्चर्याचा धक्काच बसला.
"आर्या"....... तू काय करतीये इथे.
म्हणजे तू खरच सिद्धांत आहे???? ती म्हणाली.
खरा सिद्धांत म्हणजे??? त्याला काहीच कळत नव्हतं आर्या काय बोलत होती.
आणि हे काय ही काय अवस्था करून घेतली स्वतःची. किती घाम आलाय तुला! काय झालं आर्या?? तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तो म्हणाला.
काही नाही! ती म्हणाली.
अस कस काही नाही एकदा स्वतः कडे बघ जरा काय अवस्था झालीये. कुणी आलं होतं का? तू घाबरलेली का दिसात आहेस?
अरे काही नाही झालं, आणि काय रे तू आता कसकाय आला ? तू उद्या येणार होता ना!
हो पण माझं काम कालच झालं, म्हंटल मग एकदिवस आधी जाऊन तुला सरप्राईज द्यावं पण......झालं उलटंच.
अरे मग आधी सांगायचं न.. आणि असा चोरासारखा का आला??
ऐ चोरासारखा कुठे माझ्या चावीने दार उघडून आलो! मी का येऊ माझ्याच घरात चोरासारखा! आणि काय ग हे मी तुला विचारायला पाहिजे , की तू इथे काय करतीये? तू पण उद्याच येणार होती न?
हो पण मला वाटलं तू येण्याच्या आधी जावं आणि surprise द्यावं!
म्हणून इथे एकटी थांबणार होती , कशाला आर्या? आज जर माझ्या जागी खरच चोर आला असता तर? काय केलं असत? तुला कळत कस नाही ग! आता तो चिडला होता.
सॉरी ह्या नंतर नाही होणार अस ! आर्या म्हणाली.
नाहीच होणार! कारण मी अस काही होऊच नाही देणार!मी तुला ठेवणार च नाही एकटीला. तो बोलून गेला पण त्याच्या बोलण्यात राग अजूनही होता.
आर्या त्याच्या जवळ येऊन म्हणाली सॉरी ना, मला पण पटलं की तू बरोबर बोलत होतास, नव्हतं राहायला पाहिजे मी एकटीने.
ठीक आहे ! तो म्हणाला.
तिला इतक्या जवळून प्रत्यक्ष पाहून सिद्धांत ला खूप छान वाटत होतं. कितीतरी वेळ तो तिच्याच कडे बघत होता. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्याचा प्रवासाचा क्षीण कुठल्या कुठे गेला.
अरे असा काय बघतोय ? ती लाजून म्हणाली.
ती च्या बोलन्याने तो भानावर आला.
काही नाही खुप दिवसांनी खूप छान वाटतय शेवटी आपलं घर ते आपलं घर!
हो मला खूप भारी वाटतय माहिती आहे का! म्हणजे मला खरच वाटलं नाही की तू असा अचानक येशील. मस्त होत सरप्राईज! थोडं हॉरर होत पण मस्त वाटलं.
आर्या तू म्हणजे ना सरप्राईज किलर आहेस माहिती आहे का सगळी वाट लावली माझ्या सरप्राईज ची! उलट तुला पाहून मी च सरप्राईज झालो.
एकंदरीत काय तर आपल्या दोघांच्याही मनात एकच होत !
hmm पण इतकं घाबरायला काय झालं होतं ग तुला?
अरे ती वेळच तशी होती. जाऊ दे पण आता आलास न तू आता काही टेन्शन नाही! आता मी बिनधास्त आहे.आणि खर सांगू का मला न अजूनही विश्वास बसत नाही आहे की तू आलाय !
तो तिच्या डोक्यात एक टपली मारत मारत म्हणाला आता पटलं!
"सिद्धांत"काय रे! आणि काय रे इतक्या दिवस एक साधा फोन नाही मेसेज नाही मी केला तर त्याला ही रिस्पॉन्स नाही.
कामात होतो ग!
राहू दे इतकं कोणतं काम होत की तुला 5 मिनिटे पण माझ्या साठी नाही काढता आले. की तुला माझी आठवनच नाही आली.
हा अन्वी होती न, आणि तुला माहिती आहे का आर्या ती न परफेक्ट आहे अग सगळ्याच बाबतीत इव्हन कूकिंग मध्ये पण! मग तिच्या सोबत वेळ कसा जायचा कळायचाच नाही. तो मुद्दामून म्हणाला.
मग राहायचं न तिथे इथे कशाला आला.आर्या आता मात्र चिडली.
हा राहिलो असतो पण मला त्या इंपरफेक्ट आर्या ची सवय झाली न ! मग आलो.
आर्या नि त्याला मिठीच मारली "सिध्दांत" किती घाबरले होते मी माहिती आहे का? वाटलं आवडली आता तुला ती.
का विश्वास नव्हता माझ्या वर!
होता पण तुला मी आठवतच नाही न मग होऊ शकत ना ,की तुला दुसरं कुणी आवडू शकतं. आणि अस झालं असत तर मी काहीच नसते करू शकले.
त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणाला, का सारखा सारखा हा च विषय काढायचा,आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा. ह्या नंतर हा विषय कधीच नाही काढायचा.
पण सिद्धांत.......
नाही काहीच नाही बोलायच...... चल आता आराम कर. आणि त्याने तिला शांत केलं.
सिद्धांत ने बॅग्स त्याच्या रूम मध्ये नेऊन ठेवल्या आणि त्याला काहीतरी आठवलं म्हणून तो बाहेर आला. आर्यच त्याच्या ओपन सॅक कडे लक्ष गेल तिने सहज म्हणून पाहिलं तर त्यात तुला बुक्स दिसले तिने सहज म्हणून पाहिलं तर तिला शॉकच बसला कारण ते तिचे बुक्स आणि डायरी होती.तिने पटकन काढून घेतली आणि लपवून ठेवली.
बापरे ......!!! म्हणजे सिद्धांत किती खोटारडा आहे हा!!! माझी डायरी ह्यानेच नेली चोरून! तिला ह्या क्षणी सिद्धांत चा खूप राग येत होता. पण मलाही बघायचच आहे की अजून किती खोट बोलणार आहे हा!
इतक्यात सिद्धांत तिथे आला का ग झोपली नाही का? त्याने विचारल.
नाही रे झोपते आता ती जबरदस्तीने हसून म्हणाली.तिने फक्त डोळे मिटले पण तिच्या मनात अजूनही तेच विचार चालू होते.
सिद्धांत च त्याच्या बॅग्स कडे लक्षच नव्हतं,त्यामुळे तो मात्र निशिंतपणे झोपला.
क्रमशः
© Neha R Dhole