काय झालंय आर्या? अस का डोकं धरून बसलीये?
खूप दुखतंय रे माझं डोक.
कशाला घ्यायची इतकी मग, आपल्याला झेपत नाही तर.
सिद्धांतआता झाल्यावर बोलून काय फायदा ?
तेच मी आधी थांब पुरे कर म्हणत होतो ना तर म्हणे काही होत नाही. आता कळलं न त्रास आर्या अक्खी रात्र किती त्रास झाला माहिती आहे ना?
sorry ! माझ्या मुळे तुला पण त्रास झाला.
अग आर्या तू सॉरी म्हणावं म्हणून मी बोलतच नाही आहे!
हो रे तुझी काळजी कळतीये मला मी पण थांबणारच होते दोन पेग नंतर पण त्यांनी आग्रह केला मग नाही कस म्हणायचं ना? काय वाटलं असत त्यांना? म्हणून मी continue केल.
त्याने डोक्यालाच हात लावला, आर्या अग मंद आहे का तू? तो काही सत्यनारायनाचा प्रसाद होता का की नाही कस म्हणायच! तुझं आपलं काहीही असत. उद्या जर तुला कुणी विहरित उडी मार म्हंटल तर तू मारणार आहेस का? त्यांना कस वाटेल म्हणून!
इतकं कळत मला.ती म्हणाली.
हो ते दिसतच आहे किती कळत ! ही गोळी घे आणि आराम कर आज ऑफिस ला नको येवू.
तू जा मी थोड्या वेळाने येते ऑफिस ला बर वाटल की.
काल नाही ऐकलं आज तर ऐकणार न! यायचं नाही म्हणजे नाही आणि आलीच तर मी वापस पाठवून देईल!
ओके बॉस नाही येणार बस!
yehh thats like good girl.
तो तिच्या जवळ येऊन बसला त्याने तिचा हात हातात घेतला, sorry आर्या ! तो इतकच म्हणाला आणि निघालाही.
आर्याला कळलंच नाही तो असा का वागला काय झालं ह्याला अचानक आणि सॉरी का बोलला! तिने विचारेपर्यंत तो निघूनही गेला होता. का म्हणाला असेल हा सॉरी? रात्री हा भांडला ? नेमकं झालं काय ? कस कळणार ह्याच उत्तर फक्त सिद्धांत च देऊ शकतो त्याला आल्यावर विचारव लागेल.
काय श्रीमान आज एकटेच आपल्या अर्धांगिनी कुठे दिसत नाही आहे. विक्रांत ने सिद्धांत ला विचारले.
त्यांची प्रकृती थोडी खालावली आहे, काय आहे ना काल आपण आणि आपल्या परममित्रानी जो आग्रह केलाय ना तो त्यांना सहन नाही झाला.
काय तिला बर नाही आहे , हे बघ ह सिद्धांत ह्यात चुकी तिचीच आहे आम्ही काय काहीही म्हणू पण तिला कळायला नको का?
हो बरोबरच आहे तुझं मी तिला ही हेच म्हणालो!, 'पण का रे ,तुम्हाला माहिती होत ना तिला सवय नाही आहे'.' मी सांगत होतो तरी पण मला तर सगळे शांत च बसायला भाग पाडत होते'.
सॉरी यार सिद्धांत, चुकलं मला काय माहिती ती इतका कच्चा लिंबू असेल! आता बरी आहे का?
dont know! तिला झोपवून आलो. पण खरं तर माझही लक्ष लागत नाही आहे.असच होत माझं, खर तर इतकं काही झालेल नाही हे मला माहिती आहे पण तिला थोडही काही झालं तरी नाही लागत माझं लक्ष.का अस होत कळत नाही.
ठीक आहे तू जा वाटलंच तर घरी मी घेईन सांभाळून इथे! विक्रांत म्हणाला.
obviously घ्यावं च लागेल, कारण तुम्हीच आहात ह्याच्या मागचं!
बर हा लगे इतकं ऐकवू नको! जा तू.
ठीक आहे निघतो मी काही लागलं तर manage कर! आणि सिद्धांत निघाला.
अरे तू इतक्या लवकर कसकाय आला? बर नाही वाटत आहे का तुला.
मला काही नाही झालं बर तुला नव्हतं. ना म्हणून आलो मी.
कशाला आलास? एक कॉल करायचा ना,आता बर आहे मला!
तिच्या ह्या वाक्यावर सिद्धांत चा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
अरे यार मी पुन्हा माती खाल्ली, ह्याला राग तर नसेल आला न! sorry, म्हणजे मला तस नव्हतं म्हणायच तू काम सोडून का आलास अस म्हणायच होत!
माझ्या डोक्यात कस नाही आलं कॉल करावा, आर्याला बघायच होत पण मला ती खरच ठीक आहे न! किती possessive होतो मी आर्या च्या बाबतीत माझं डोकं च काम करणं बंद होऊन जात! अस का होत असेल.तो मनातच विचार करत होता.
'सिद्धांत"आर्या च्या आवाजाने तो भानावर आला.
बोल ना! काय झालं.
तू जातांना मला सॉरी का म्हणाला?
'असच ग सोड'!
नाही तू असच सॉरी म्हणणाऱ्यात ला नाही आहे, काय झालं सांग न? रात्री काही झालं का? आपलं भांडण झाल का?
नाही ग अस काहीच झालं नाही.
मला काहीच का नाही आठवत रे! काल मी काही बोलले का?
नाही ग आर्या, तू उगाचच टेन्शन घेतीये काहीच बोलली नाही तू मला.
सिद्धांत मला ना आता त्रास होतोय माहिती आहे का ? मला रात्री च काहीच आठवत नाही आहे.
'बघ तुला फक्त एका रात्रीच आठवत नाही आहे तर इतका त्रास होतोय',' माझा विचार कर माझं काय होत असेल?' अस म्हणून तो रूम मध्ये निघून गेला.
shut, का विषय काढला मी हा! किती वाईट वाटलं मी त्याला. खरच पण तो ही काही चुकीचं बोलत नव्हता. माझ्या अपेक्षा आहेत त्याच्या कडून पण त्याच्या मनाचा ही विचार करायला हवा मी, तो कधीच बोलत नाही, एका रात्रीच मला आठवलं नाही तर मला त्रास होतोय सिद्धांत च्या सॉरी म्हणण्या मागचा अर्थ नाही काळाला . त्याला काय वाटत असेल ? माझ्या वागण्याचा ही त्याला असाच कधी कधी त्रास होत असणार जसा आज मला झाला.ती त्याच्या कडे गेली.
सिद्धांत सॉरी, i know तू hurt झाला असशील. पण.......
नाही ग आर्या मी दुखवण्याच काहीच कारण नाही. जे सत्य आहे ते मी बोललो.
पण मग ते सॉरी.........
आर्या तू का त्या एकाच गोष्टीच्या मागे लागली, मी सहज बोललो कस असत आपण कधी कुणाला unknowingly hurt केलेलं असत. त्यासाठी होत ते.
म्हणजे मी नक्की काहीतरी बोलले जे तुला माहिती नव्हत म्हणून तू सॉरी म्हणाला. काय बोलले मी???
अग आर्या काय लावलंय तू ? इतक्या वेळ सॉरी च reason विचारत होती. आता काय म्हणे काय बोलली ते सांग. मी म्हणतोय ना काही नाही बोलली मग ठेव न विश्वास. आता मात्र तो चिडला.मी विचारतो का तुला कधी past बद्दल अस खोदून खोदून मग इतका अट्टाहास का?
ok नको सांगू , चुकलं माझं ! उगाचच विचारल तुला ! आर्या पण थोडस चिडूनच म्हणाली. आणि ह्या पुढे गरज नाही तुझ्या सॉरी ची.आधी चुकीचं वागायचं आणि मग सॉरी म्हणायच.
बर माझं सॉरी वापस घेतो, आणि मी काही चुकीचं वागलो नाही ह, उगाचच आलो यार मी घरी!
मी बोलावलं नव्हतं तुला तुझा तुच आला.
हो तेच ना, उगाचच काळजी करतो मी! तुला काहीच नाही त्याच.सोड, मी पण कुणाला बोलतोय.मला ना ईच्छाच नाही आहे मुळात तुझ्या सोबत बोलण्याची. शक्यतो नकोच बोलायला.
तुला जर इतका च प्रॉब्लेम असेल ना तर मी नाही राहत इथे जाते मी !
धमक्या नको देऊ हा मला, कुठे जायचं तिथे जा मी नाही अडवणार. आणि असही तू कुठे माझं ऐकते.
क्रमशः
©Neha R Dhole.