Naa kavle kadhi - 2 - 23 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | ना कळले कधी Season 2 - Part 23

Featured Books
Categories
Share

ना कळले कधी Season 2 - Part 23

आर्या आज मंदार ची पार्टी आहे आपल्याला जायचं आहे बर का, सिद्धांत ने सांगितल.

अरे पण तू आधी का नाही सांगितलं अस वेळेवर कस जाणार.

सॉरी अग माझ्या डोक्यातून निघूनच गेल आता त्याचा मेसेज बघून लक्षात आलं.आणि वेळेवर काय तुला तर तयार व्हायची पण गरज नाही अशीही छान च दिसते तू !

काहीही काय! अशी येणार मी नो वे! आणि काय रे असा पटकन कस ठरवणार कुठला ड्रेस घालणार? ज्वेलरी अन ऑल कस होईल? तू एक काम कर तू जा आणि सांग की आर्या ला बर नाही म्हणून ती नाही आली.

किती फालतू कारण देते ग तू आर्या मी जर त्याला अस म्हणालो की आर्या ला बर नाही तर तो म्हणणार नाही का की मग तू इथे काय करतोय? तू तिच्या जवळ असायला हवं होतं मग काय सांगणार.

अरे हो! बरोबर आहे तुझं.पण मला वेळ लागेल.

आपल्या कडे वेळ नाही आहे ऑलरेडी आपण लेट आहोत. मी रेडी होतोय तोपर्यंत तू पण हो.तो ऑर्डर देऊन मोकळा झाला.

सिद्धांत तयार होऊन तिची वाट बघत बसला होता. इतक्यात आर्या आली तिने black one piece, त्यावर सूट होतील असे एअरिंग्ज light रेड कलर ची लिपस्टिक,आणि high heels इतकी साधी ती तयार झाली होती. आणि हाच तिचा साधेपणाच तिचा खरा दागिना होता. कुठल्याही मेकअप शिवाय ती ह्यावेळस त्याला एखाद्या अप्सरेहूनही सुंदर भासत होती. तिने सिद्धांत कडे पाहिलं आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हसू आलं कारण त्याने ही ब्लॅक शर्ट घातला होता.

काय यार आर्या दुसरा घालायचा ना ड्रेस! तुला पण ब्लॅक च घालायचा होता का?

मलाही तेच वाटतय उगाचच घातला मी पण तू किती घाई करत होता, मला थोडाही आवरायला वेळ नाही दिला.जाऊदे आता कोण काय बोलणार .

अग अजून काय बाकी होत, आणि मला ब्लॅक ड्रेस सोबत काहीही प्रॉब्लेम नाही, पण तिथे गेल्यावर विक्रांत आणि मंदार खूप खेचतील ह्यावरून माझी!. anyway चल उशीर होतोय.

गाडी चालवताना आज पहिल्यांदाच आर्याकडे बघून त्याच लक्ष विचलित होत होत.कितीही नाही म्हंटल तरी आज त्याच सारख लक्ष आर्या कडेच होत. इकडे आर्याची अवस्था ही काही वेगळी नव्हती. ती तर मनातही त्याच्याविषयी विचार करू शकत नव्हती. दोघांमध्ये फक्त शांतता होती. शेवटी सिद्धांत ने fm ऑन करून शांततेचा भंग केला. दोघांचही लक्ष मग गाण्यांवर concentrate केलं.
नेमकं त्या वेळेस
ये शाम मस्तानी मदहोश किये जाए ,
मुझे डोर कोई खींचेतेरी और लिए जाए ।
हे गाणं लागलं सिद्धांत ने लगेच चॅनेल change केलं.
नेक्स्ट चॅनल वर
लग जा गले कि फिरये हसीं रात हो न हो
शायद फिर इस जनम मेंमुलाक़ात
हो न हो | लागलं होत आज का हे सगळे असेच गाणे प्ले करत आहेत. अस म्हणून त्याने पुन्हा पुन्हा चॅनेल चेंज केलं.
प्यार हुआ इक़रार हुआ है,
प्यार से फिर क्यों डरता है दिल
कहता है दिल, रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल ।
तो पुन्हा चेंज करणार आर्या ने बंदच केलं.

काय चाललंय सिद्धांत तुझं? का सारखे सारखे बदलतोय किती चांगले गाणे चालू होते. आणि old songs तर आवडतात ना तुला मग आज काय झालं?

आज ईच्छा नव्हती माझी, काय गाणे लावत होते ते असे लावतात का कुणी? दुसरे पण असतात ना? नाही बरच झालं तू बंद केलास.

जाऊ दे तुझं वागणं मला केव्हाच कळत नाही.

ते पार्टी मध्ये पोहचले, त्यांना तसा थोडा उशीर च झाला होता. पार्टी सुरू झाली होती.

वेलकम श्री व सौ देसाई. hmm क्या बात आज तर दोघही मॅचिंग मॅचिंग! मंदार म्हणाला.
and Aarya You look really amazing today!

thank you Mandar!

सिद्धांत ला त्याचे सगळे जुने मित्र भेटले होते तो
त्यांच्या मध्ये गुंतून गेला. आर्याला मात्र एकटीला जाम बोअर होत होत. ती असाच टाईमपास करत बसली होती. सिद्धांत च तिच्या कडे लक्ष गेलं. त्याला कळाल की तिला बोअर होत असेल.

hey आर्या, come here त्याने तिला बोलावून घेतले, आणि सगळ्यांसोबत ओळख करून दिली.

त्यांच्या सोबत थोड्यावेळ तिने गप्पा मारल्या पुन्हा ते त्यांच्या गप्पांमध्ये रंगून गेले. आणि आर्या एकटी पडली. थोड्यावेळाने सिद्धांत तिच्या जवळ येवून बसला.

सॉरी सॉरी, तुला अस एकटीला सोडून गेलो पण ते ही खूप दिवसांनी भेटले ना?

अरे its okk! काही प्रॉब्लेम नाही.

hiiiii love bird's , should we join? विक्रांत आणि मंदार ने विचारल.

मी नाही म्हंटल तरीही तुम्ही इथेच बसणार आहात मग ह्या formalities कश्याला.सिद्धांत म्हणाला.

आणि ते दोघेही त्यांच्या सोबत बसले.

हो पण म्हंटल उगाच डिस्टर्ब कशाला करायचं म्हणून विचारल. मंदार म्हणाला.

ठीक आहे मग उठा इथून, सिद्धांत म्हणाला.

'काय रे, तुला नीट बोलताच येत नाही का?' नेहमी असा काय तिरसटा सारखा बोलतो. आणि काय रे तिथे सगळ्यांना सोडून इथे येवून बसला, तुला थोड्या ही वेळ करमत नाही का आर्या शिवाय?विक्रांत म्हणाला.

अस काही नाही आहे ती एकटी बोअर झाली होती म्हणून आलो मी.

बघ आर्या किती लकी आहेस तू?? तुझा किती विचार करतो सिद्धांत. मंदार म्हणाला.

आर्याने फक्त smile दिली.

अरे हो खूप लकी आहे ती मी ह्याचा प्रत्यय आज ऑफिस मध्ये च घेतला लंच टाइम मध्ये, अरे मंदार तुला तर तो किस्सा सांगायलाच पाहिजे विक्रांत म्हणाला.

अरे यार विक्रांत प्लीज नको ना ! आणि तू जस समजतोय ना तस काहीच नव्हतं त्याच्या मागचं कारण खरच वेगळं आहे, आर्या म्हणाली.

नाही रे सांग, तीच नको ऐकू !मंदार म्हणाला.

सिद्धांत सांग ना त्याला नको सांगू, काहितरी बोल न , आर्या त्याला म्हणाली.

हे बघ आर्या तू जेवढं नाही म्हणली ना तो तेवढ्या उत्साहाने सांगेल कारण फार हौस आहे त्याला गोष्टी रंगवून सांगण्याची. तुला ऐकायचं न मंदार काय झालं? हे बघ त्याने आर्याचा बोटाला लागलेलं दाखवलं. ह्यामुळे तिला जेवताना त्रास होत होता मी मदत केली बस एवढंच. तो म्हणाला.

सगळी सांगण्याची मजा घातली ह्याने अस सांगत का कुणी ? विक्रांत म्हणाला.

हे बघ असच घडलं होत तेच सांगितलं. सिद्धांत म्हणाला.

मंदार ड्रिंक तयार करत होता, will you? त्याने आर्याला विचारल.

I don't drink ती म्हणाली.

का? आवडत नाही की सिद्धांत नाही घेत म्हणून?

नाही असं काहीही नाही, म्हणजे मला आवडत नाही म्हणून मी try च नाही केलं.

then you should try Aarya ! विक्रांत म्हणाला.

हा आर्य, कुठलीही गोष्ट try करावी आणि मग चांगली वाईट ठरवावी. अस न घेताच वाईट म्हणू नये. मंदार म्हणाला.

वा!! काय हुशार लोक आहात रे तुम्ही, तुम्ही कश्यासाठी motivate करताय कळतय का तुम्हाला? आणि ती नाही म्हणतिये ना? मग संपल, सिद्धांत म्हणाला.

तू शांत रहा रे सिद्धांत तुला कुणी बोलतय का आम्ही तिला बोलतोय ना ! आपला विषय नाही हा! आणि कुणी जबरदस्ती नाही करत आहे ह ! विक्रांत म्हणाला.

माणसाने आयुष्यात सगळ्या गोष्टी try तरी कराव्या ह्या मताचा आहे मी मंदार तिला म्हणाला.

ती विचारात पडली, तिला विचार करताना पाहून सिद्धांत म्हणाला, काय सॉलिड convincing power आहे रे तुमची, एकदम समोरच्याला विचार करायला च भाग पाडता.

क्रमशः
©Neha R Dhole.