बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका ६
आपल्या वाढदिवशी अनेक देशी परदेशी पाहुणे,वकील,सरदार...आणि त्यातल्या त्यात महत्वाचे म्हणजे.. पर्शीयन अर्थात इराणचा बादशहा शहा अब्बास दुसरा यानेही औरंगजेबाचे अभिनंदन करण्यासाठी आपल्या दरबारातील कवी,सरदार,वकील यांना पाठविले होते.. आणि त्यांच्यासमोरच इतर लोक माना झुकवून उभे असताना...हा असा मस्तवालपणा कोण दाखवणार ??
इराणचे भल्या मोठ्या साम्राज्याच्या सर्व मुसलमान जगतात या आधी वरचष्मा होता...औरंगजेबासारखे अनेक राजे त्यांच्या दरबारात माना झुकवून उभे असत .. इराणचा बादशहा शहा अब्बास दुसरा याने आधी एक खरमरीत पत्र लिहून औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते..निम्मित होते औरंगजेब जेव्हा आपल्या वडिलांना आणि सख्या बंधूंना आणि पुतण्याना मारून " मयूर-सिहांसन" वर बसला.. इराणचा बादशहा शहा अब्बास दुसरा याने आपले काही प्रतिनिधी आणि खलिता औरंगजेबाचे अभिनंदन करायला पाठविले होते..औरंगजेबानेही त्यांची विशेष दखल घेतली होती..आणि त्यांना परत पाठवताना खूप मानसन्मान दिला होता..शहाच्या खलित्याला उत्तर देताना आपण हे दिल्लीचे "मयूर-सिहांसन" कसे काबीज केले..असे वर्णन होते.. आणि त्यात स्वतःला "आलमगीर" म्हणजे जगजेत्ता अशी पदवी लावली होती...त्या खलित्याला उत्तर देताना बादशहा शहा अब्बास दुसरा याने उत्तर पाठविले होते..
"तुम्ही स्वतःला आलमगीर हि उपाधी लावून घेता..जगाचे सोडा आधी हिंदुस्थानातील तो काफीर शिवाजी तुम्हाला त्रास देतो आहे..त्याने तुमची मोगलांची अनेक गावे ,बंदरे लुटली आहेत..अनेक सरदार,सैनिक याना मारले आहे..त्याला पाहून अजुनही काही उठाव होतील..कोणीही मग इस्लामविरुध्द उभे राहील..त्याचे येवढेसे चिमटीएवढे राज्य धुळीत मिळावायला कितीसा असा वेळ लागतोय..आज ना उद्या तो तुम्हाला नक्कीच टक्कर देईल आणि हे मोगली साम्राज्य मातीमोल होईल..तुम्ही, हुमायुनचे वारस, त्यांना हि आम्ही पूर्वी सिहांसन काबीज करायला मदत केली होती हे तुम्ही निश्चितच जाणून असाल..आताही मोगल साम्राज्य तुमच्या अकार्यक्षमतेमुळे अडचणीत आहे म्हणून आमच्या प्रचंड सैन्यानिशी खुद्द हिंदुस्थानात यावे आणि शिवाचा नायनाट करून तुम्हाला भेटावे व गोंधळ नाहीसा करावा अशी माझी तीव्र इच्छा आहे..आणि मग मी तुम्हांला सांगेन "आलमगीर" म्हणजे काय असतो ! "
उघड उघड धमकी होती..आणि आता हा असा अपमान काय वाटेल शाहला?? उद्या त्याने जर आक्रमण केले तर ?? कितीसा वेळ लागेल मोगली साम्राज्य मोडायला??
काही करून शिवाजीला संपवायचे...असा विचार अपमान झालेला "आलमगीर" आपली जपमाळ ओढत ओढत आपल्या शयनगृहाकडॆ निघून गेला..जाताना दरबार बरखास्त करायची हि त्याला आठवण राहिली नाही.
झाल्या प्रकाराने राजे,शंभू राजे आणि आपले इतर मान्यवर सरदार काही काळ भांबावले होते...लाल किल्ल्यात न थांबता तडक रामसिहाच्या हवेलीच्या दिशेने निघून आले..राजांचा आणि इतर सरदारांचा शामियाना रामसिहाच्या हवेलीच्या मोकळया जागेत उभारला होता...ज्या योगे राजे रामसिहाच्या नजरेसमोर आणि कडव्या राजपुतांच्या पहाऱ्यात सुरक्षित राहतील...राजे बसेल ना बसले तोच...रामसिह धावतच आला... " राजन ये क्या कर दिया आपने....आलमगीर को खफा कर दिया"...राजे तडकले " रामसिह..हमने और आपके आलमगीर ने जो हमें इज्जत बक्षी उसके बरे मैं कुछ नही कहेंगे आप"...राजांच्या अश्या बोलण्याने रामसिह पण शांत बसला..काही काळ शामियान्यात तणावपूर्ण शांतता होती..रामसिह राजांनां विनवणीच्या स्वरात सांगु लागला..." राजन माफ किजिये पर...आपकी जान को खतरा हॆ..और ये आपके युवराज...आलमगीर किसको नहीं बक्षेगे..राजन आपने बारे मे ना सही..अपनी माँसाहेब उनके बारे मै तो सोचिये"
क्षणार्धात राजांच्या नजरेसमोर आपली वाट पाहत असलेल्या माँसाहेब आल्या...अजरस्त्र हातांनी आपल्याला मिठीत घेण्यासाठी उभा असलेला सह्याद्री आठवला..राजगड,तोरणा,प्रतापगड..आणि आपल्यासाठी जीव देण्यासाठी तयार असलेली प्रजा आठवली...दोन आसवं राजांच्या गालावर ओघळुन गेली..नाही असे रडता कामा नये...शंभू बाळ, माँसाहेब आणि ह्या बारा मावळांतील आपल्या प्रजेसाठी आपल्याला जगावेच लागेल..राजे आता बरेच शांत झाले होते..ते रामसिहाला बोलले .."कुंवर गल्ती तो हमसे भी हुई है..हम माफी चाहते है" ..अभी आपही माफी दिला दिजिये.. कुछ किजीये..हम अभी आलमगीर के पास कौनसा मुह लेके जाये"..रामसिह पण विचारात पडला..आता राजांना औरंगजेबासमोर घेऊन गेलो तर औरंगजेब नक्की रागवेल.." हम देखते है..हम क्या कर सकते है.." असे बोलून उद्या औरंगजेबासमोर आपले गाऱ्हांणे मांडू असा विचार करून तो शामियानाच्या बाहेर आला...आणि आपल्या राजपूत सैनिकांचा बंदोबस्त अजून राजांभोवती वाढवला....
रात्रीच्या प्रहरी राजांच्या शामियान्यात शंभू राजे,बहिर्जी नाईक,हिरोजी फर्जंद,निराजी रावजी,रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर,तानाजी मालुसरे,येसाजी कंकं अशी खाशी मंडळी जमली होती...मदारी मेहतर पलंगावर चिंतेत बसलेल्या राजांचे पाय दाबत होता...वातवरणात एक प्रकारची भीती दाटून आली होती...केलेल्या अपमानाची खबर पूर्ण आग्रा शहरात पसरली होती...अजूनही कोणाच्याही डोळ्याला झोप रात्रीचा चौथा प्रहर जेमतेम सुरु झाला असेल...आणि एकाएकी रामसिहाच्या हवेलीबाहेर गडबड उडाली होती...शामियान्यातुन सर्व आपल्या तलवारी उपसुन बाहेर धावले...रामसिहपण हवेलीबाहेर धावतच आला पण तो पर्यँत मोगली ५ ते १० हजाराच्या सेनेने...रामसिहाच्या हवेलीभोवती बादशहाने आपला पोलादी पंजा आवळायला सुरुवात केली होती...
आणि थोड्या वेळाने एक मोगली सरदाराची पावले राजांच्या शामियान्याच्या दिशेने वळली होती....
क्रमश :