" महेश .... तू आत जाऊन madam ला बाहेर घेऊन ये.. त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊया... " महेश धावतच गेला आत.. अचानक महेशचा आवाज आला,
" अभी लवकर आत ये.. " अभिने नीरजची कॉलर पकडली आणि त्याला आत घेऊन आला.. समोर बघतो तर सुप्रिया यांचा खून झाला होता.. अभिने नीरजला एका खुर्चीवर बसायला सांगितले... नीरज निमूटपणे जाऊन बसला... महेश आणि अभी , दोघेही हताशपणे मृत शरीराकडे पाहत होते...
" Well Done , inspector अभिषेक आणि तुला सुद्धा शाबासकी Doctor महेश... तुम्हा दोघांबद्दल खूप ऐकलं होतं.. आज त्याचा अनुभवसुद्धा घेतला... " नीरज म्हणाला...
" Shut up ... " अभी रागातच म्हणाला...
" शांत हो अभी ... " महेशने अभिला शांत केलं...
" का केलंस तू हे सगळं.."
"माझा प्रतिशोध पूर्ण केला मी." ,
" त्यांनी काय केलं होतं तुझं... " ,
"माझ्या वडिलांनी तरी काय केलं होतं... त्यांना मारलं तेव्हा कुठे होते पोलिस... काय चूक होती त्यांची... इमानदार होते म्हणून... सगळे पुरावे गायब केले, साक्षीदारांना फिरवलं... काय आमची चूक होती.. " ,
" अरे पण केस का मधेच बंद केलीत तुम्ही.. " ,
" केस चालवायला पैसे नकोत... माझ्या आईने सर्व काही दिलं... पैसे, दागिने, ... आमची बाजू खरी होती तरी कोणीही मदत नाही केली आम्हाला... आईचं कश्यावरच लक्ष नाही राहिलं.. माझ्याकडे नाही … स्वतःच्या तब्बेतीकडे नाही.. आजारी पडली ती.. मी तर तेव्हा १५ वर्षाचा होतो... शिक्षण सोडून आलेलो... काय कमावणार... मदत मागितली तर मला " आम्ही चोरांना मदत करत नाही" असे म्हणायचे…medicine ला पैसे नाहीत… तशीच ती गेली मला सोडून... एकटा पडलो मी... माझं सगळं कुटुंब संपवलं त्यांनी... तेव्हाच मी ठरवलं कि या सगळ्यांना संपवायचे... काहीही झालं तरी.. " नीरज सांगत होता...
"मग तू एवढी वर्ष कुठे होतास ? " , महेशने विचारलं...
" या सगळ्यांची माहिती गोळा करत होतो... कारण सगळेच वेगळे झाले होते, त्यानंतर मी एकेकाचा विश्वास जिंकत गेलो... गेल्या १० वर्षात सातही जणांकडे मी जॉबला होतो... " ,
" त्यामुळेच तू त्यांच्या रूममध्ये कधीही जाऊ शकत होतास.. CCTV कॅमेरे बंद करत होतास... " ,
" आणि माझ्या वडिलांना त्यांनी विष देऊन मारलं होतं , तेही त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी…. मग मीहि त्यांना तसंच मारलं.",
" सुप्रिया यांचा वाढदिवस तर परवा होता... मग त्यांना आज का मारलस.. ",
" त्यांच्या वाढदिवसाची तारीख चुकीची आहे त्या पेपर्समध्ये... त्यांचा वाढदिवस आजच होता…. म्हणून त्यांना आज मारलं मी.. " नीरजने आपलं बोलणं संपवलं.
आता तिघे शांत बसले होते... थोड्यावेळाने अभी उठला... " तुझी अवस्था मी समजू शकतो तरीसुद्धा तू पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे होती... कायद्याची मदत घ्यायला पाहिजे होती.... तुला आता मला arrest करावंच लागेल." अभी बोलला.
" कायद्याची मदत... ? " नीरज हसतच म्हणाला." त्यांनीच तर फसवलं आम्हाला... तुमच्या परेश सरांनी तर पुरावेच गायब केले. मग कसा विश्वास ठेवायचा कानून व्यवस्थेवर... सांग ना.. " अभी तसाच उभा होता. " माझ्या वडिलांनी ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला.... त्यांनीच त्यांचा घात केला... माझ्या पप्पांना त्या सर्वांचा खूप अभिमान होता.. त्यांच्याबद्दल खूप सांगायचे ते... त्यांना कुटुंबातले मानायचे, माझे पप्पा त्यांना "सप्तसूर" म्हणायचे.... आणि स्वतःला ते त्या सुरांमधला वरचा " सा " मानायचे. ते नेहमी म्हणायचे.. ' हे सप्तसूर एकत्रच राहावे सदैव... ' पप्पांच्या death नंतर सगळेच विखुरले गेलेले.. त्यांना मी फक्त एकत्र आणण्याचे काम केलं… बस्स." महेश आणि अभिषेक नुसतेच ऐकत होते....
" मला सगळ्यांना एकत्र आणायचे होते…. माझ काम संपलं... आता मीही जातो माझ्या कुटुंबाकडे... " तसा तो पटकन उठला आणि टेबलावर ठेवलेल्या पिस्तूलमधून त्याने स्वतःलाच गोळी मारून घेतली..... काही कळायच्या आतच हे सगळ घडलं. अभिषेक काहीच करू शकला नाही.… महेशही तसाच बघत राहिला. थोडयावेळाने अभी भानावर आला... लगेचच त्याने पुण्यातील पोलिसांना फोन केला आणि तिथे बोलावून घेतले.
त्या पोलिसांनी , महेश आणि अभिषेकची जबानी घेतली आणि त्यांना जाऊ दिलं.महेश घराबाहेर पडला. आणि अभी मात्र तसाच उभा होता, नीरज शेजारी.शेवटची नजर टाकली त्याने आणि तोही घराबाहेर आला. महेश त्याची वाट पाहत होता ,
"काय करायचं केसचं अभी... ?" महेशने त्याला विचारलं...
"नीरजने काही चुकीचं काम केलं असेल असं नाही वाटत मला... जे त्यांनी त्याच्या कुटुंबासोबत केलं होतं , तेच नीरजने त्यांना परत केलं.... खरं तर हे ... परेश सरांचे काम होते, त्याला न्याय मिळवून दयायचं... पण त्यांनीही... ... नीरजने तर समाजातली घाण साफ केली रे फक्त.... जी आपल्याला करायची होती.... आणि केसचं बोलतोस तर.... केस त्याने स्वतःच close केली आहे... चल गाडीत बस.... " दोघेही गाडीत बसले.. कुणास ठाऊक ,…अभिषेक पुन्हा गाडीतून उतरला. त्याने महेशला Driving seat वर बसायला सांगितले. तसा महेश बसलाही.
" नाही रे... आज तू driving कर.... खूप दिवस झोपलो नाही आहे.... आणि आज एका चांगल्या माणसालाही भेटलो.... निदान त्याच्यामुळे तरी आज झोप येते का ते बघतो. " आणि महेशने गाडी स्टार्ट केली. गप्पा मारत महेश गाडी चालवत होता. बोलता बोलता त्याने अभिषेककडे नजर टाकली. तो तर कधीचाच झोपला होता, एकदम शांत झोप.......
=====================================================================================
***समाप्त***
------------------- क्रमश : ----------------