" काय रे काय झालं एवढं... ? " लगेचच महेशने त्याला पेनाची रिफील दाखवली.
" तू म्हणत होतास ना, सवय कोणतीही असो .... एकदा लागली कि लागली.... आणि हि रिफील सुद्धा तशीच कट केली आहे.",
" याचा अर्थ ? खून त्या लेखिका करत आहेत ? त्यांचाच पेन आहे ना " ,
" काही कळत नाही… पण त्या तर बोलल्या काही मदत लागली तर contact करा ..... मग त्या कश्या खून करू शकतील ? " ,
" आता काय करायचं ... पुण्याला जायचं का ? " ,
" ते नंतर..... कारण शेवटची व्यक्ती " नीलम" कोण आहेत ते तरी कळलं पाहिजे .... निदान त्या पेपर्समध्ये त्यांचा फोटो तरी असेल... " तशी अभिने लगेचच गाडी स्टार्ट केली आणि परेश सरांच्या घरी आले दोघेही .
दोन रूममध्ये परेश सर आपल्या महत्वाच्या गोष्टी ठेवायचे. तिथे जाण्यास कोणालाच permission नव्हती,म्हणून अगोदर जेव्हा अभिने तपास केला होता तेव्हा तो त्या रूम मध्ये जाऊ शकला नव्हता. आणि आता त्याने permission आणली होती.
" महेश.... तू त्या रूममध्ये शोध … मी इकडे शोधतो.. ",
" ठीक आहे.. चल लवकर.. " आणि दोघांनीही शोधाशोध सुरु केली. अर्धा तास झाला असेल.
" महेश , चल लवकर..... " अस अभी ओरडतच बाहेर आला. महेशला कळेना काय झालं ते,
" काय झालं ? " ,
" चल , वेळ नाही आहे आपल्याकडे... बसं गाडीत पटकन… सगळं सांगतो... " दोघेही गाडीत बसले.
" पुण्याला जायचं आहे आपल्याला आता... तू तयार आहेस ना आणि त्या madam चा पत्ता आहे ना.. " अभीने महेशला विचारलं,
" हो रे ... पण काय झालं ते तर सांग... ",
" सांगतो..... आता किती वाजले आहेत?",
" आता , रात्रीचे १२ वाजले आहेत." ,
" म्हणजे पुण्याला पोहोचायला ४ तासाप्रमाणे आपण ३ च्या सुमारास पोहोचू... " अभी म्हणाला
"अरे ... पण उद्या निघू ना सकाळी... एवढ्या रात्रीचा कशाला ? " महेश म्हणाला
" तू पहिला दोघांच्या घरी फोन करून सांग कि आपण पुण्याला चाललो आहोत ते… मग मी सांगतो... " अभी गाडी चालवत म्हणाला. महेशनीही call करून घरी कळवलं.
" आता सांग, कसली एवढी घाई आहे..... " ,
" लेखिका सुप्रिया यांचा खून होणार आहे... ",
" हे कसं शक्य आहे ? .... त्यांना आपण पकडायला चाललो आहोत कि वाचवायला... " ,
" वाचवायला .. " ,
" शिवाय.... त्यांचा खून कसा होऊ शकतो... खून तर नीलम चा होणार आहे ना... " ,
" हो.... सुप्रिया याचं लग्नाअगोदरच नावं " नीलम" आहे... ती फाईल उघडून बघ, त्यांचा फोटोसुद्धा आहे... " लगेच महेशने ती फाईल उघडून पाहिली. सहा जणांची संपूर्ण माहिती होती... त्यात सर्वात शेवटी माहिती होती ती सुप्रिया यांची फोटोसहित…
" हो रे... नीलम म्हणजेच सुप्रिया... आणि या माहितीनुसार यांचा वाढदिवस... परवा आहे, म्हणजे काहीही करून आपल्याला आजच पोहोचावं लागेल तिथे... " ,
" म्हणून मी आजचं पुण्याला जायचं ठरवलं... म्हणजे आपण खुन्याला खून करण्या अगोदर पकडू शकतो... " अभी म्हणाला...
" means तुला खुनी कोण आहे ते माहित आहे.. " महेशने अभिला विचारलं.
" हो म्हणून तर घाई करतो आहे मी.. " म्हणत त्याने गाडीचा speed वाढवला.. पुढे हायवेवर एक अपघात झालेला असल्याने प्रचंड ट्राफिक लागलेलं...
" शट यार... जेव्हा कधी लवकर पोहोचायचं असते तेव्हाच ट्राफिक लागते नेहमी... ",
" शांत हो अभी... कशाला तापतोस एवढा.. " ,
" अरे त्याला पकडायला हात शिवशिवत आहेत रे.. ",
" तू मला अजून तो कोण आहे ते सांगितलं नाही आहेस." ,
" सुप्रिया madam चा खुनी नीरज .... तो खुनी आहे.. " हे ऎकून महेशला shock बसला..
" तुला कसं कळल.. ",
" सागर देशमुख यांच्या कुटुंबात फक्त तीनच व्यक्ती होत्या... स्वतः ते , त्यांची बायको आणि त्यांचा १५ वर्षाचा मुलगा.. आणि लहान मुलांना permission नसते कोर्टात येण्याची... त्यामुळे त्यांची बायकोच यायची केससाठी... शिवाय त्या माहितीप्रमाणे त्यांचा मुलगा नाशिकला शिकायला होता त्यावेळेस, म्हणून त्याला कोणी पाहिलच नाही.... नीरजच पूर्ण नावं आहे
" नीरज सागर देशमुख" त्यांचा एक family फोटो देखील आहे बघ... आणि हे फक्त परेश सरांनाच माहित होतं वाटते... शिवाय धनंजय यांच्या घरी जो ग्रुप फोटो सापडला त्यातले दोन अनोळखी व्यक्ती म्हणजे एक सागर सर आणि दुसऱ्या नीलम उर्फ सुप्रिया... " महेशने तो फोटो पाहिला... तो नीरजच होता...
" पण कशावरून तोच खून करत असेल…? " ,
" तुला अजूनही कळल नाही... तो पेन सुप्रिया madam चा नाहीच आहे... तो नीरजचा आहे.. त्या पेनाने लिहिताना तुला किती प्रोब्लेम येत होता... परत माझा भाऊसुद्धा तेच सांगत होता... पण जेव्हा निरजने त्यांचा पुण्याचा पत्ता याच पेनांने लिहिला, तेव्हा कसा त्याने पटापट लिहिला होता... कारण त्याला त्या पेनाची सवय आहे... तुला बोललो होतो मी ... कि तो पेनच मला खुन्यापर्यंत पोहोचवेल... नीरजच खुनी आहे.... " .
ट्राफिकमुळे त्यांचा खूप वेळ वाया गेला. पहाटे ५ ला ते त्यांच्या पुण्याच्या घरी पोहोचले. घरी पोहोचता क्षणी , दारावरची बेल वाजवली महेशनी. आतून कोणताच प्रतिसाद आला नाही… मग पुन्हा बेल वाजवली… त्यावेळेस मात्र नीरजनीच दरवाजा उघडला.. तसा अभिने त्याच्या समोर पिस्तुल धरली आणि " Hands Up " सांगितले... त्यावर नीरज फक्त हसला आणि त्याने आपले हात वर केले...
------------------- क्रमश : ----------------