" त्याला जर या सर्वांचे खून करायचे असते तर त्याने इतकी घाई केली नसती, म्हणजेच त्याला सगळ्यांना एका वर्षातच मारायचे आहे... पहिला खून जुलै महिन्यात झाला... म्हणजेच येत्या जूनपर्यंत त्याला " नीलम" यांना माराव लागेल... पण त्यांचा वाढदिवस कधी असतो ते कळलं तर बर होईल आपल्याला.... " ,
" अभी... त्या कोण आहेत हे सुद्धा माहित नाही, त्या कशा दिसतात हे माहित नाही. मग तू कसा वाचवणार त्यांना ? " ,
" मला वाटते , आपण वृत्तपत्र संपादकांना याबद्दल विचारायला हवं, त्यांना १२ वर्षापूर्वीची माहिती असेलच ना.. " तसे ते दोघेही एका वृत्तपत्र कार्यालयात पोहोचले आणि त्याच्या संपादकाला भेटले.
" हो... तशी एक केस झाली होती, १२ वर्षापूर्वी… ",
" नक्की काय झालं होत सांगाल आम्हाला.. " ,
"साधारण १२ वर्षापूर्वी , सुमारे १० कोटींची चोरी झाली होती, सरकारी तिजोरीतून... आणि सगळ्यांचा संशय होता तो,त्या ६ जणांवर .... Inspector परेश हि केस बघत होते तेव्हा... " ,
" तेच सहा जण का... त्यांच्यावरच का संशय होता... " अभिने पुढचा प्रश्न केला.
" हे ६ हि जण तेव्हाच खूप फ़ेमस होते... खूप चांगली चांगली कामे त्यांनी केली होती, लोकांसाठी.. जनतेसाठी... एवढी चांगली टीम होती त्यांची.. आणि त्या टीम चे बॉस होते सागर देशमुख... शिवाय Inspector परेश सुद्धा त्या टीमला खूप मदत करायचे, सपोर्ट करायचे... एकदा तर या सात जणांनी खूप मोठा सरकारी घोटाळा उघड केलेला… त्यामुळे ते जास्तच फ़ेमस झाले. या सात जणांची नावे जर ओळीनी लावली तर संगीतातले सात सूर तयार होतात म्हणून त्यांच्या बॉसने त्यांना " सप्तसूर " असं नाव दिलं होतं.... पण त्या दिवशी काय झालं कोणास ठाऊक … त्यांचे बॉस , सागर देशमुख त्यांनी त्या सहा जणांवर आरोप करून त्यांची तक्रार नोंदवली पोलिस स्टेशनमध्ये…… तशी तक्रार लिहिलीही होती… परंतू पुराव्या अभावी त्यांना सगळ्यांना सोडण्यात आलं.... पण मग तिसऱ्याच दिवशी सागर देशमुख यांना दोषी ठरवलं गेलं, १० कोटींच्या चोरीसाठी.".,
" खरंच त्यांनी चोरी केलेली का ? ",
"नाही ते शक्यच नव्हत.... त्यांच्या एवढा इमानदार माणूस नव्हता दुसरा... त्यांना त्यांच्याच ऑफिसमध्ये पकडलं होतं... लगेच पुरावेही सादर केले inspector परेशनी, त्यानंतर २ दिवसांनी त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली असं म्हणतात.... त्यांच्या कुटुंबाने तर हा खून आहे म्हणून केसही केलेली होती सगळ्यांवर.. परंतू पुराव्या अभावी त्यांना सगळ्यांना सोडण्यात आलं...." महेश सगळी माहिती लिहून घेत होता पटापट...
" त्यांचा फोटो वगैरे आहे का ? " अभिने विचारलं...
" आहे... पण आता नाही आहे... मी तुमच्या ऑफिसमध्ये पाठवून देतो नंतर.. ",
" ठीक आहे."असं म्हणत अभी आणि महेश ऑफिसमध्ये परत आले.
४ दिवसांनी अभिचे सर आले... तेव्हा त्यांनी लगेचच त्याला permission दिली त्या रूममध्ये जाण्याची… अभी आणि महेश लगेचच कामाला लागले... सगळ्यात पहिलं काय मिळालं ते म्हणजे सागर देशमुख यांचा post mortem रिपोर्ट..
" हे बघ, डॉक्टरने लिहिलं आहे कि त्यांच्या पोटात plaster of paris चे कण मिळाले... अगदी सेम आहे हे... मग त्यांनी आत्महत्या केलीच नसणार... त्यांचा खून झाला होता.. ",
" चल अजून काही माहिती मिळते का ते पाहू... " परंतू डॉक्टरच्या रिपोर्टशिवाय त्या रूममध्ये कोणतीच फाईल वा कागदपत्र नव्हती.
" कस शक्य आहे हे... एवढा मोठा घोटाळा झाला होता.... एका व्यक्तीची हत्या झाली होती... केसही झाली होती आणि एकही कागदपत्र नाही... असं कसं.. " अभी विचार करत होता..
" मला वाटते अभी , तू तुझ्या सरांना विचारलं पाहिजे, त्यांना माहित असणारच.. " तसे अभी आणि महेश दोघेही त्याच्या सरांकडे गेले..
" सर , तुमच्याकडून काही माहिती हवी होती आम्हाला." ,
" कश्या संदर्भात " ,
" सर... परेश सरांच्या संदर्भात.. " ,
" काय माहिती हवी आहे तुम्हाला.. " ,
" सर १२ वर्षापूवी काय झालं होतं.... परेश सरांनी त्या केसची काय माहिती गोळा केलेली होती, ते विचारायचे होते… " तसे अभिचे सर जरा चलबिचल झाले. महेशच्या नजरेतुन ते सुटलं नाही. तरी तो बोलला...
" प्लीज सर... अजून एका व्यक्तीची हत्या होणार आहे, त्याला वाचवायचे असेल तर तुम्हाला बोलावंच लागेल.. ",
" ठीक आहे... मी सहसा त्या गोष्टी कोणाबरोबर share करत नाही... कारण तेव्हा कायदा यावरचा माझा विश्वास उडाला होता... पण तुम्ही वचन दया कि या गोष्टी बाहेर जाणार नाहीत म्हणून.",
" हो सर, हि गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहील" , अभी बोलला.
" OK , १२ वर्षापूर्वी जी घटना घडली होती,त्याची माहिती तर तुम्ही मिळवलीच असेल ना... त्यात ६ जणांवर आरोप केला गेला होता, परेश सर ती केस handle करत होते. सर्व तयार होते... साक्षीदार, पुरावे,वकील... सगळी तयारी होती... पण कुणास ठाऊक , अचानक सगळे पुरावे गायब झाले... साक्षीदारांनी साक्ष फिरवली.... आणि त्यात अडकले ते सागर देशमुख…. सर्वाना माहित होतं कि एवढे सच्चे , इमानदार माणूस असं काही करणार नाही... पण नंतर मिळालेले पुरावे त्यांच्या विरुद्ध होते... तरी देखील... सागर सरांकडे एक पुरावा होता कि जो कोर्टात हजर केला तरी ते सहा जण त्यात अडकणार होते... त्या अगोदरच बातमी आली कि त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली... तसं त्यांनी एक Letter सुद्धा लिहून ठेवलं होतं कि मीच चोरी केली आहे म्हणून मी आत्महत्या करत आहे... अक्षरही त्यांचाच होतं त्यामुळे ती आत्महत्याच आहे हे साफ होते. पण त्यांच्या कुटुंबाने खुनाची केस केली होती.... ३ महिने त्यांची बायको यायची केससाठी.... मात्र नंतर कोणीच हजर राहिलं नाही केसला, त्यामुळे कोर्टाला ती केस बंद करावी लागली. " अभिच्या सरांनी माहिती पुरवली.
" मग सर , त्या दोन्ही केसेसची कागदपत्र,पुरावे ... फाईल कुठेच कसे नाहीत?" अभी म्हणाला,
"तेच तर... आम्हीही त्यावेळेस खूप ठिकाणी शोधलं, कितीतरी दिवस आम्ही फक्त तेच शोधत होतो, पण नाहीच भेटलं... कोणी म्हणायचं परेश सरांनीच त्या फाईल गायब केल्या. पैसे देऊन साक्षीदारांना फिरवल. कारण त्यांचाही नावं होतं ना केस मध्ये.",
" मग आता सर त्या फाईल कुठे गायब झाल्या त्या कस कळणार... ",
" आम्ही तेव्हा सर्व ठिकाणी शोधलं होतं, फक्त परेश सरांच्या घरी आम्हाला permission नव्हती. कदाचित तिथे त्या फाईल असल्या तर मिळतील, माझी permission आहे तुम्हाला." आणि अभी व महेश लगेचच परेश सरांच्या घरी जाण्यास निघाले.
रात्र झाली होती. महेशनी सगळी माहिती लिहून घेतली होती आणि अभी आता गाडी चालवत होता...... इतक्यात महेशच्या पेनाची शाई संपली.
" पेन दे रे जरा… अभी." ,
" तो घे ना, तिकडे ठेवला आहे तो.. " महेशने बाजूलाच असलेला पेन उचलला आणि लिहू लागला. परंतु जेव्हा जेव्हा लिहायचा प्रयन्त करायचा तेव्हा त्याची रिफील आतंच जायची..
" कोणाचा पेन आणलास रे... खराब आहे वाटते, सारखी आत जाते रिफील.. " अभिने पेन पाहिला..
" अरे हो, त्या लेखिका ... सुप्रिया madam चा पेन आहे तो... त्यांचा सेक्रेटरी विसरला होता ना आपल्याकडे... माझा भाऊ सुद्धा हेच म्हणत होता, कश्या लिहितात देव जाणे एवढे लेख.. " महेशने वैतागून तो पेनच उघडला, काय गडबड आहे ते पाहण्यासाठी आणि तशीच अभिला त्याने गाडी थांबवायला सांगितली.
------------------- क्रमश : ----------------