" अरे... तो नीरज पेन आणि वही इकडेच विसरून गेला. " महेश म्हणाला...
" आता काही खरं नाही त्याचं... madam ची वही आणि पेन इकडेच विसरला लेकाचा.. " तसे दोघे हसायला लागले.. खूप दिवसांनी हसत होते दोघे मिळून. ...
" चल... आता खूप रात्र झाली आहे, घरी जाऊया." महेश बोलला,
" हो.. हो…चल.. " असं म्हणत त्याने टेबलावरचे सगळे कागदपत्र, फोटो .. त्याच्या bag मध्ये टाकले.
" अरे, त्या madam ची वही आणि पेनाच काय करायच.. " अभीने विचारलं...
" जा घेऊन घरी... तुझ्या भावाला उपयोगी पडेल ते.... कदाचित तोही लेखक होईल.. "हसतच महेश बोलला, तसं अभीने सगळं घरी आणलं..
" Wow... दादा... सुप्रिया madam चा पेन.... " अभिचा लहान भाऊ... त्यांचा खूप मोठा fan होता...
"आता हे पेन मीच ठेवणार.. आणि वापरणारही... ",
"हो... तूच वापर.... मला नको आहे तो पेन.. तुलाच ठेव... " आणि त्याने ती वही आणि पेन स्वतःकडे ठेवून घेतलं…
दुसऱ्या दिवशी, नव्याने तपासाला सुरुवात झाली. बाकीच्या घरातून तसं काही महत्त्वाचं मिळालं नाही. पण धनंजय यांच्या घरी एक जुना फोटो सापडला, तसा महेश चमकला. लगेचच त्याने अभिला तो फोटो दाखवला. अभी सुद्धा आचर्यचकित झाला. तो फोटो म्हणजे आतापर्यंत खून झालेल्या व्यक्तीचा एक ग्रुप फोटो होता, जुना...
" अरे... त्या madam बरोबर बोलत होत्या.. ग्रुप फोटो आहे म्हणजे सगळे मित्र असतील ना.. ",
" हो .. मग या फोटोमध्ये ती शेवटची व्यक्तीही असू शकते ना.. " परंतु फोटो खूप जुना होता... काही ठिकाणी खराब झालेला होता... फोटोमध्ये एकूण ८ व्यक्ती होते.. हत्या झालेले ६ जण फोटोमध्ये स्पष्ठ दिसत होते.. एक व्यक्ती अनोळखी होती तर कोपऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीची इमेजच खराब झालेली असल्याने ती स्त्री आहे कि पुरुष तेच समजत नव्हत.
" काय कळते का तुला ? " ,
" नाही रे.. " मग दोघेही विचारात गढून गेले.
" मला वाटते ना... यांचा सगळ्यांचा एकमेकांशी अजून काहीतरी संबंध असणार म्हणून तो खुनी यांनाच मारत आहे. " महेश बोलला.
" मग आता एकच करायला पाहिजे. या सगळ्यांची जुनी माहिती गोळा करायला हवी. " पुन्हा एकदा सगळी कागदपत्र नव्याने पाहायला सुरुवात केली दोघांनी.… त्यात महेशला काहीतरी सापडलं..
" हे बघ अभी.. सागर, महेंद्र , गजेंद्र , रेशमा... या चोघांच्या घरात काही सरकारी कार्यालायातली कागदपत्र सापडली मला. याचा अर्थ हे ४ जण सरकारी नोकरीत होते कदाचित... " ,
" पण आता तर ते वेगळ्या profession मध्ये होते, मग सरकारी नोकरी.... ? " ,
" हि कागदपत्र जुनी आहेत. त्यामुळे आपल्याला यांची माहिती मिळू शकते सरकारी कार्यालयात..... तरच कळेल कि ते तिथे जॉबला होते कि नाही ते.. "असं म्हणत ते दोघेही पोहोचले सरकारी कचेरीत.
लगेचच त्यांना माहिती मिळाली ... " हे बघ... आतापासून १२ वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही.. "अभीने महेशला बोलावून सांगितले…"हे सगळे सरकारी नोकरीतच होते." ,
" हो रे.. पण तेव्हा काहीतरी घडलं होते त्यामुळे या सगळ्यांनी अचानक राजीनामा दिला होता. " अभिने माहिती पुरवली. अभीने अधिक माहिती गोळा केल्यावर कळलं कि १-२ महिन्यातच सगळयांनी राजीनामे दिले होते.
" नक्कीच काहीतरी झालं असणार, नाहीतर सरकारी नोकरी कोणी सोडत नाही सहसा. " अभी म्हणाला..
" आणि हे बघ.... अभी, तुमचे परेश सर... त्यांचाही contact होता यांच्याशी.. म्हणजे तुझ्या Department मधून काहीतरी माहिती मिळू शकते आपल्याला. " महेश म्हणाला ,
" आणि जर ती सरकारी कामातली गोष्ट असेल तर नक्कीच पेपर्समध्ये सुद्धा आली असेल ना... " अभिने विचार व्यक्त केला... " हो रे... बरोबर... ",
" मग असं करूया.. तू जुने newspapers... ११- १२ वर्षापूर्वीचे, ते घेऊन ये आणि मी माझ्या ऑफिसच्या जुन्या रेकॉर्ड मध्ये काही मिळते का ते बघतो.. " अस म्हणत अभी आपल्या ऑफिसमध्ये पळाला तर महेश वृतपत्र कार्यालयात.... बरोबर २ तासांनी महेश , अभीच्या ऑफिसमध्ये पोहोचला... तर अभी ऑफिसमध्ये येरझाऱ्या घालत होता..
" काय रे... असा काय फेऱ्या मारतो आहेस... " महेशने आल्या आल्याच विचारलं.
" अरे जुन्या रेकोर्डची रूम सिल केलेली आहे.... मी तिकडे जाऊ शकत नाही…. मला permission घ्यावी लागेल सरांची... ",
" अरे , मग माग ना permission ." ,
" सर .... परदेशी गेलेले आहेत... कामानिमित्त.. आणि त्यांना call ही करू शकत नाही मी" ,
" call करायला काय आहे त्यांना.. ",
" त्यांनी जाताना तसं सांगून ठेवलं आहे कि इंडिया मधून कोणीही call करायचा नाही त्यांना, ते का अस म्हणाले ते माहित नाही... आणि ते ४ दिवसांनी येणार आहेत,तेव्हाच मी जाऊ शकतो तिथे.. " अभी बोलला. ...
"चल जाऊ दे , ४ दिवसांनी बघू... हे बघ, मी १२ वर्षापूर्वीचे पेपर्स आणले आहेत. " महेश म्हणाला आणि अभी ते पेपर्स पाहू लागला .
"१२ वर्षापूर्वी एक घटना घडली होती. ती म्हणजे पैश्याची अफरातफर. रक्कमही मोठी होती, १० कोटी " ,
" १० कोटी ... तेही १२ वर्षापूवी म्हणजे केवढी मोठी रक्कम... आणि यात ६ जण अडकले होते असं यात लिहील आहे." पुढे अजून माहिती होती.
" ह्या पेपरमध्ये अधिक माहिती आहे बघ... नंतर मात्र एक कोणीतरी वेगळाच आरोपी पुढे आला,त्यालाही पकडलं होता पोलिसांनी. पण नंतर त्याने आत्महत्या केली अस लिहील आहे. त्या आरोपीच्या कुटुंबाने नंतर केसही केलेली होती खुनाची या ७ लोकांवर , केसच काय निकाल लागला ते नाही लिहील आहे या पेपरमध्ये." महेश सांगत होता.
" नाव आहेत का त्यांची, त्या सात जणांची" ,
" हो... सागर, रेशमा,गजेंद्र , महेंद्र ,परेश,धनंजय आणि नीलम .. " ,
"म्हणजे शेवटची व्यक्ती स्त्री आहे , नीलम नावाची. ... आणि नंतर कोणावर आरोप झाला होता ... ? " ,
" हं... हा... त्याचं नावं होत... सागर देशमुख..... " ,
" सागर देशमुख.... OK अजून काही आहे का माहिती.. ",
" नाही, मला वाटते तुमच्याच रेकोर्ड मध्ये असेल माहिती सगळी."
ती रूम बंद होती. त्यामुळे अभीला त्यांची येण्याची वाट पाहावीच लागणार होती…. अजून काही माहिती मिळते का ते पाहण्यासाठी पुन्हा त्याने सगळ्या फाईल open केल्या. पहिला खून जुलै महिन्यात झाला होता. आणि शेवटचा खून मार्च महिन्यात झाला होता...
" याचाच अर्थ असा होतो कि नीलम यांचाही खून येत्या चार महिन्यात होऊ शकतो." अभीने अंदाज लावला.
" तो कसा काय? " महेश बोलला,
------------------- क्रमश : ----------------