किती हौशीने बनवलं होत मी जेवण, काय झाल असत थोड चांगल म्हणाला असता तर पण हा स्पष्टवक्ता खोट कस बोलणार! पण त्याची तरी काय चुकी आहे, त्याला नाही आवडल त्याने बोलून दाखवले.आणि ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न आहे. मला खर बोलतो सिध्दांत मला साध जेवण पण बनवता येवू नये!. त्याने काय म्हणून खायचं आणि मला का वाईट वाटतय तो बोलला तर चुकी माझीच आहे मला च नाही येत काही बिचारा माझ्या मुळे त्याच पोटही नसेल भरल. त्याने काहीही खाल्लेल नव्हतं. ती त्याच्या जवळ गेली 'सिद्धांत, i know तुझ जेवण नीट झालेल नाही तुला हव असेल तर तू जेवून ये बाहेरून or काहीतरी मागवून घे'.'आर्या मी माझ बघून घेईन तुझी advice नको मला'. तो खूप rudely बोलला. आर्याला खूप वाईट वाटल त्याच बोलणं ऐकून.आणि आता मात्र इतक्या वेळ अडवून ठेवलेले अश्रु बाहेर आलेच.
सिद्धांत sorry रे मी मुद्दामून नाही केल अस! मी खूप मनापासुन करण्याचा प्रयत्न केला होता पण नाही जमल मला, त्याने तिच्या कडे पाहिल तिच्या डोळ्यांतले पाणी बघून त्याला खूप वाईट वाटलं तो लगेचच तिच्या जवळ गेला. आर्या, इतक नको मनाला लावून घेऊ.नाही रे मी खरच मूर्ख आहे मला साध्या साध्या गोष्टी पण नाही जमत. माझ्या मुळे तुला उपाशी राहावं लागतंय. really very sorry सिद्धांत! त्याने तिचे डोळे पुसले,shhh आर्या, शांत हो अग अस काहीच नाही आहे, आणि इतका का त्रास करून घेतीये तू? sorry, माझंच चुकलं मी थोडा जास्तच react झालो पण माझा स्वभाव माहिती आहे ना तुला मग इतका का त्रास करून घेत आहेस. तो म्हणाला. तस नाही रे, पण मला काही येत नाही हे खरच आहे ना ! ती म्हणाली. हे बघ आर्या सगळे जण प्रत्येक गोष्टीत perfect नसतात, प्रत्येक जण स्पेशालिस्ट असतो! पण area वेगवेगळे असतात. आता तुला कूकिंग येत नाही म्हणजे तुला काहीच येत नाही असं कोण म्हणाल. तुझा बाकीचा परफॉर्मन्स किती चांगला आहे. आणि कूकिंग यायलाच हवं हे कुठे compulsory आहे. तो तिला समजावून सांगत होता. 'हो पण थोडं तरी जमायला हव ना नाहीतर अस होत!'ती म्हणाली. 'हो मग जमेल ना ! तुला कुठे लगेच कुठल्या competition मध्ये जायचं'. तो म्हणाला. असच जर चालू राहील तर मला कधीही नाही जमणार. मी एक काम करते उद्या पासून ऑफिस झाल्यावर कूकिंग क्लास च जॉईन करते म्हणजे प्रश्नच मिटला,ती म्हणाली. कशाला क्लास मी आहे ना! तुझी एवढी ईच्छा आहे न शिकण्याची मी शिकवेन तुला! ते काही रॉकेट सायन्स नाही,न जमायला. सिद्धांत म्हणाला. तू खरच शिकवणार? तिला विश्वास च बसत नव्हता की सिद्धांत तयार झाला ह्या गोष्टीसाठी.हो त्यात काय माझ आवडीचा विषय आहे ! पण एक प्रॉब्लेम आहे आर्या, तो म्हणाला. आता काय? तिने विचारल. माझ्या हाताखाली शिकण सोप नाही बर मी थोड बोललो की तू रडणार मग कस?तो तिला चिडवत म्हणाला. नाही रडणार आणि असही मला ऑफिस मध्ये सहन करण्याची सवय झालीच आहे ना! ती बोलून गेली. अरे यार काय बोलून बसले मी हे! तिला तिची चूक लगेच समजली. काय म्हणालीस आर्या तू ऑफिस मध्ये सहन करते मला, त्याने लगेच थोडस रागावून विचारल. नाही नाही म्हणजे मला तस नव्हतं बोलायचं, ती बोलतच होती. 'कळाल मला तू काय विचार करते माझ्या बद्दल'! तो म्हणाला. 'अरे खरच मला अस म्हणायच होत की', 'ऑफिस मध्ये मी बरच शिकले न तुझ्याकडून इंफॅक्ट मी सगळं तुझ्याच कडून शिकले, तर आता सवय झाली'. ती आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करत होती. मी ना नको तिथे बोलते, पण काय करू सत्य बाहेर येऊनच जात ती मनातच विचार करत होती. हो आर्या सत्य शेवटी बाहेर येतच! don't worry,आणि अस खोट बोलण्याचा प्रयत्न करत जाऊ नको तुझा चेहरा साथ नाही देत, तो मिश्कीलपणे म्हणाला.ती फक्त हसली तिला काय react करावं काहीही सुचतच नव्हत. मग कधी पासून ट्रेनिंग स्टार्ट करायच? त्याने विचारल. तू म्हणत असशील तर आता पासून! आर्या म्हणाली. good! असाच उत्साह पुढे ठेव कामी येईल,पण आज पासून नको, उद्या पासून. तो म्हणाला.ओके डन! आर्या म्हणाली. बर तुझ आजच्या जेवणाच काय? त्याने विचारल. खाऊन घेईल काहीतरी बनवून ती म्हणाली. नको आज केलं ते खूप झालं आता काहीही बनवण्याचा प्रयत्न करू नको,त्यापेक्षा आपण कुठेतरी बाहेर जाऊ! काय म्हणते? त्याने विचारल. तू म्हणशील तस मीऑलरेडी खूप घोळ घातलाय आता नको!ती म्हणाली. चल मग रेडी हो पटकन, तो म्हणाला.
आर्या लगेच तयार होऊन आली ती नेहमीप्रमाणे च छान दिसत होती तिने सगळे केस one side घेतले होते.तो तिच्या कडे बघतच राहिला, त्याच लक्ष तिच्या नेक वरच्या बटरफ्लाय च्या टॅटू कडे गेल. मी आधी कसा नाही पहिला हा टॅटू की मी आता आर्या कडे थोडं जास्त च लक्ष द्यायला लागलोय!, चल सिद्धांत! ती म्हणाली, आणि तो एकदम विचारातून बाहेर आला. हो चल, आर्या म्हणाली. त्याच सारख सारख लक्ष त्या टॅटू कडेच जात होत. आर्या च्या लक्ष्यात ते आलं, काय झाल सिध्दांत काही विचारायचं आहे का ती म्हणाली. नाही काही नाही! तो म्हणाला.त्याने लक्ष ड्राइविंग वर दिल. पण मला आजच कसा दिसला हा! आधी कसा नाही दिसला त्याच्या डोक्यात अजूनही त्या टॅटू चा च विचार होता." आर्या",तो म्हणाला. 'बोल ना'! तू हा टॅटू आता काढून घेतला का? शेवटी त्याने विचारलेच. नाही खूप दिवस झाले, का ? चांगला नाही दिसत ! तिने विचारल. नाही नाही मस्त दिसतोय मी फर्स्ट टाइम बघितला म्हणून विचारल. तो म्हणाला. नाही तू फर्स्ट टाइम नाही बघत आहे ह्या आधीहीकितीतरी वेळा बघितलेला आहे पण तुला आठवत नाही आहे, ती म्हणाली. त्याला थोड वाईट वाटलं, hmm बघितला असेलही पण ह्या वेळेस माझ्या साठी पहिल्यांदाच बघत होतो तो म्हणाला. किती दुर्दैव आहे, सिद्धांत ला काहीच कस आठवत नाही त्याला तर किती आवडायचा हा टॅटू पण आज त्याला आठवलाही नाही मी लग्नानंतर काढलेला आणि त्याच्याच आवडीचा काढला होता पण तरीही त्याला काहिच आठवलं नाही.मंदार ला ह्या विषयावर बोलायला हवं ह्याला ट्रीटमेंट लागू पडतिये की नाही? नाही मला बोलायलाच हवं. अस किती दिवस चालणार? ते काही नाही मी उद्या मंदार ला बोलणार. तिने मनाशीच निश्चय केला.
क्रमशः
©Neha R Dhole