Love or friendship - 2 in Marathi Fiction Stories by मनवेधी books and stories PDF | प्रेम की मैत्री? भाग-2

Featured Books
Categories
Share

प्रेम की मैत्री? भाग-2

श्रेया च्या मनमोकळ्या स्वभावामुळे वेदांत आणि त्याच्या नवीन झालेल्या मित्रांमध्ये लगेच मैत्री झाली.. जसजसे दिवस जात होते, त्यांचा खूप छान ग्रुप बनत होता... सोबतच श्रेया आणि सार्थक चीही मैत्री फुलत होती...

श्रेयाला वाटला होता तसा सार्थक अजिबात नव्हता... तो खूप समंजस, आणि साधा भोळा होता... दिसायला जरी जेमतेम असला तरी त्याच्या मध्ये एक charm होता... पण श्रेया चा स्वभाव आणि सार्थक चा स्वभाव ह्यांच्यामध्ये जमीन असमान चा फरक होता...त्यामुळे त्यांच्याकध्ये तसे वारंवार खटके ही उडायचे... पण तेही हे सगळं enjoy करायचेत..
हे सगळं सुरू असताना श्रेया ची मैत्रीण स्वाती आणि सार्थक ह्यांची ओळख झाली... तशी स्वाती सोबत श्रेया ची मैत्री होऊन काहीच दिवस उलटले होते.... पण श्रेया च helping nature असल्याने तिने लागलीच स्वाती ला आपलंसं केलं होतं...

एकदिवस श्रेया स्वाती ला घेऊन तिच्या ग्रुप सोबत ओळख करून द्यायला आली... "काय काय भावांनो.. " अशी कोल्हापूरी शैलीमध्ये हाक मारत तिने सार्थक च्या डोक्यावर टपली मारली...कोल्हापूर मध्ये मित्रांना देखील भावां म्हणायला पोरी घाबरत नाहीत आणि एखादी मुलगी आपल्याला भावा म्हणते ह्याचा पोरांना कॉम्प्लेक्स देखील येत नाही.. कोल्हापूर चा विषय च वेगळा...
"ये टवाळे... डोक्यात मारू नको... केस विस्कटले ना.... " सार्थक चिडून च बोलला.. बहुतेक स्वाती च्या पुढ्यात श्रेया ने अस डोक्यात मारलेली टपली त्याला थोडी awkward वाटली असावी..
"गप ये ढापण्या.... आला मोठा The Hero... बंद पड... " श्रेया त्याला बोलली... सार्थक गप्प च बसला कारण त्याला माहित होतं की ह्यापुढे हा काही बोलला तर श्रेया काही गप्प बसणार नाहीं..
मग श्रेया ने स्वाती ची ओळख करून देत म्हणाली, "भावांनो ही स्वाती...आपल्याच वर्गात आहे.. आता ही देखील आपल्याच ग्रुप मध्ये असेल" श्रेया चे हे बोलणे ऐकून सगळ्यांचेच डोळे चमकले.... कारण श्रेया च्या ग्रुप मध्ये श्रेया सोडली तर सगळेच मूल होती... आणि स्वाती तशी दिसायला ही चांगली होती... आणि तसेही श्रेया ला कधी ते मुलगी समजत च नसत. ते नेहमी तिला मुलासारखे वागवत असत, त्याप्रमाणे तिची तेवढीच काळजी ही घेत असत..
स्वाती ला पाहून सगळेच खूप खुश होते.. त्यात सार्थक देखील कमी नव्हता... आणि हे श्रेया ने हेरलं होत व तिला ह्याची खूप मजा देखील येत होती...

कॉलेज चे दिवस पुढे सरकत होते... तसे सगळे मजेत एन्जॉय करत होते.. सोबतच सगळे स्वाती ला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न ही करत होते... पण सार्थक आणि स्वाती ची मैत्री ही वाढत होती... त्यांचे chats रेग्युलर सुरू होते... हे पाहून बाकीच्या मुलांनी स्वाती चा नाद सोडला... व सगळे स्वाती आणि सार्थक ला चिडवू लागले...त्यामध्ये श्रेया देखील होती

"सार्थ्या... काय सुरू आहे रे तुझं आजकाल??" श्रेया ने फिरकी घेत सार्थक ला विचारले.
"काय कुठं ग?", सार्थक दुर्लक्ष करत म्हनाला..
"श्रेया.. आजकाल खूप लोक मोबाईल ला adict झालेत ना?" वेदांत बोलला....
"हो ना अरे.. " रोहित ने मध्येच डोकं घातलं...आणि सर्वजण हसायला लागले...
"ये... बंद पडा रे सगळे... monday ला सगळं सबमिशन सबमिट करायचं आहे त्यावर लक्ष द्या. ", सार्थक उत्तराला...
तोपर्यंत स्वाती तेथे आली.... आणि परत सगळे हसू लागले... तिला काय झालं हे जाणवलं पण तिने दुर्लक्ष करत सार्थक कडे मोर्चा वळवला..
"सार्थक ही तुझी इंग्लिश ची assignment complete केली आहे.... अजून कोणती आहे का? असेल तर दे..." अस स्वाती बोलताच सगळे आश्चर्याने तिच्याकडे व सार्थक कडे सगळे बघू लागले...
"Thank you" इतकंच बोलून सार्थक गप्प बसला..
"स्वाती मला पण दे ना ग asignment complete करून..." रोहित बोलला.
"मला आता वेळ नाही रे... माझं च खूप राहील आहे अजून.." अस म्हणून स्वाती तिथून निघून गेली.. रोहित चा पडलेला चेहरा पाहून परत सगळे हसायला लागले... व त्याची खिल्ली उडवायला लागले...
हे सुरू असताना सगळ्यांनी मोर्चा सार्थक कडे वळवला...
"ह्यो काय रे विषय" श्रेया ने सार्थक ला विचारलं..
"काही नाही" असं म्हणून सार्थक तिथून निघून गेला...
ह्या सगळ्याच श्रेया ला खुप नवल वाटत होतं व त्यांची खिल्ली उडवताना त्यांना मज्जा देखील येत होती... पण जेव्हा जेव्हा स्वाती आणि सार्थक एकत्र येत होते तेव्हा तेव्हा हा सगळा ग्रुप त्या दोघांना चिडवत होता...
.
क्रमशः