" पहिली गोष्ट... खून हा रात्रीचाच होतो, ३ ते ४ दरम्यान... आरोपीला science ची चांगली माहिती आहे. Plaster of Paris हे दुधात किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थात mix केलं कि त्याचं slow poison तयार होते, हे त्याला माहित आहे. तेच देऊन तो लोकांना मारतो, त्यानंतर त्यांच्याच पिस्तुल मधून गोळीही मारतो.... दुसरी गोष्ट, आरोपी ओळखीचाच असणार.. कारण येवढ्या रात्रीचा एखाद्याच्या खोलीत जाणार... तेही दरवाजाचा lock न तोडता... मग तो ओळखीचाच असणार... शिवाय कोणतेही फिंगर प्रिंट्स मिळत नाहीत. याचा अर्थ तो कुठेही स्पर्श करत नसणार किंवा हातात glove घालत असणार.... कोणतेच पुरावे मागे ठेवत नाही,CCTV कॅमेरे बंद करतो. म्हणजेच त्याला पोलिसांची आणि ते कसा तपास करतात याची चांगली जाण आहे... बस्स एवढंच मला माहित आहे... तुला सांगतो ना अभी... एवढा चलाख , तल्लख बुद्धीचा माणूस मी अजून नाही बघितला कुठे..... बरं.... तुला काय सापडलं ते सांग. "
" या सुट्टीत, खूप काही गोष्टी पुढे आल्या. खूप अभ्यास केला मी या गोष्टींचा. तो आपल्यावर दबाव टाकण्यासाठी, त्या मिडीयाला आधी call करतो... तेही computer वरून,वेगळीच पद्धत एकदम. या ५ खुनांमध्ये खूप गोष्टी common आहेत. तू बोलला होतास ना… काहीतरी नजरेसमोर आहे,पण ते दिसत नाही… " अभी बोलला,
" हो... बोललो होतो मी ... त्याचं काय ? " डॉक्टर महेश म्हणाला,
" त्याचं Letter वाचलस ना तू... तोच तर Clue आहे.",
" कसं काय ? " महेशने विचारलं.
" सुरुवातीपासून सांगतो.... " सागर " यांचा खून झाला,त्याच्या दुसऱ्यादिवशी त्यांचा वाढदिवस होता, बरोबर. " ,
" बरोबर" ," आणि इतर ४ खूनही तेव्हाच झाले... प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर... " महेशने प्रत्येकाच्या Date चेक केल्या.
" हो... रे , माझ्या लक्षातच नाही आलं.... " ,
" आणि पाचही व्यक्ती नावाजलेल्या होत्या त्यामुळे वाढदिवसासाठी पाहुणे अगोदरच आलेले होते, त्यांच्या घरी... त्यांच्या राहण्याची सोयही केलेली होती त्यांनी. याचाच फायदा आरोपीने घेतला..... त्या Guest पैकीच कोणीतरी खुनी आहे... " ,
" अरे पण अभी, सगळे पाहुणे V.I.P. आहेत ना .... आपण त्यांच्यावर पुराव्याशिवाय आरोप करू शकत नाही. " मी सगळ्या लिस्ट चेक केल्या, ज्या या सर्वांच्या बर्थडे पार्टीच्या होत्या... त्यात मला काही नावं common दिसली... असे एकूण १५ जण आहेत, कि ज्यांची नावं सगळ्या लिस्ट मध्ये आहेत.... अजून एक गोष्ट आहे. " ,
" ती कोणती? " ,
" सागर यांच्या बर्थडे लिस्ट मध्ये या इतर चार जणांचीही नावं होती." ,
" काय ? " डॉक्टर महेश उडालाच.
" हो... शिवाय, यांचाही लिस्टमध्ये एकमेकांची नावं होती... याचा अर्थ कळला का तुला ? " , अभिने महेशला विचारलं...
" हो.... याचा अर्थ असा कि हे सगळे एकमेकांना चांगले ओळखत होते…",
" बरोबर बोललास अगदी. "
" आणि त्या Letter वरून काय कळलं तुला ? " डॉक्टर महेशने अभिषेकला विचारलं.
" त्या Letter मध्ये काय लिहिलं आहे. " संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा " .... तुला माहिती आहेत ना संगीतातले सात सूर कोणते ते ? " ,
" हो..... सा, रे, ग, म, प,ध,नी , सा.... " महेशने लगेच बोलून दाखवले," अरे , पण ' सप्तसूर' असं म्हटलं आहे ना त्या Letter मध्ये, मग सूर तर आठ आहेत ना... " महेशने अभिषेकला विचारलं,
" शेवटचा किंवा वरचा " सा " धरत नाहीत. त्यामुळे "सप्तसूर" असेच म्हणतात सगळीकडे. " ,
" हो... पण त्याचा इथे काय संबंध ? " ,
" संबंध आहे... या सगळ्यांच्या नावाचे पहिलं अक्षर बघ जरा आणि हे सूर बघ.",
" हो.... अगदी बरोबर.... "सा" वरून सागर , "रे" वरून रेशमा, "ग" वरून गजेंद्र,"म" वरून महेंद्र आणि "प" वरून परेश.... म्हणजे तो त्यांचाच खून करत आहे,ज्यांची नावं या सुरांवरून सुरु होतात." महेश बोलला,
" बरोबर, पण एक गोष्ट मला कळत नाही... या अक्षरांवरून कितीतरी जण आहेत... मग तो यांनाच का मारत आहे आणि का ? ... " ,
" कदाचित.... यांचा काहीतरी संबंध असेल एकमेकांशी किंवा त्या खुन्याशी... ",
"असेलही कदाचित... ते जर कळल तर पुढचे खून आपण थांबवू शकतो आणि त्यालाही पकडू शकतो." अभी बोलला.
" एक मिनिट... " महेश मधेच बोलला,"आता तो " प " या सुरावर पोहोचला आहे... याचा अर्थ अजून दोन खून होणार आहेत ... ? " ,
" हो अजून दोन खून.... तरच " सप्तसूर " पुन्हा एकत्र येतील... अस त्याचं म्हणणं आहे... पण कोण आहेत ते दोघे जण.... खरंच…कोण असतील ते आणि त्यांना कोण मारणार असेल ? "
विचार करता करता अजून २ दिवस निघून गेले. अभिषेकची सुट्टीसुद्धा संपत आली होती. महेश तिथेच थांबला होता,अभिषेकच्या गावाला.
" अजून काही माहिती मिळाली का तुला महेश ? " अभिषेकने महेशला विचारलं...
"तशी काही महत्त्वाची माहिती नाही मिळाली,पण मला वाटते कि या guest list मधेच काहीतरी मिळू शकते. ",
" ते कसं काय ? " ,
" हे बघ... सागर यांच्या लिस्ट मध्ये इतर पाचही जणांची नावं होती. शिवाय इतर लिस्टमध्ये सुद्धा बाकीच्याची नावं होती.",
" मग यावरून काय कळलं तुला ? " ,
" मला वाटते.. या लिस्ट मधेच आपल्याला पुढची दोन नावं मिळू शकतील... कदाचित." ,
" अगदी बरोबर."असं म्हणत अभीने लगेचच लिस्ट पाहायला सुरुवात केली. सगळ्या लिस्ट मध्ये एकूण १५ जण common होती, त्यातील ५ जणाची हत्या झाली होती.... उरलेल्या १० व्यक्ती पैकी ३ नावं " ध " अक्षरावरून सुरु होत होती.....
" अरे, तिघे जण आहेत. मग यातील नक्की कोण असेल ? " तीन व्यक्ती मधले,दोन वकील तर एक अभिनेता…
" आपण त्यांना सांगूया का ? " अभिने महेशला विचारले. ...
" अरे पण कस सांगणार त्यांना आपण... उगाच सगळीकडे घबराट पसरेल.. ",
" मग काय करायचं आपण ... त्यांना असंच मारायला द्यायचं का.. " अभी बोलला...
" थांब जरा... मला विचार करू दे... उगाच घाई करू नकोस,मला विचार करू दे." मग महेशनी अजून search करून त्या तिघांच्या birth-date काढल्या....
" काय विलक्षण योगायोग आहे... " महेश बोलला,
" कोणता रे",
" या तिघांच्या birth-date एकच आहेत.... मग तू कोणाला वाचवणार आता... " महेश विचारात पडला. कोणाला सांगणार सावध राहा म्हणून... Date सुद्धा जवळ आलेली...
" चल, आपल्याला निघायला हवं आता.. " असं म्हणत अभिषेक,त्याच्या कुटुंबासहित शहरात येऊन पोहोचला,सोबत महेशही होता.
------------------- क्रमश : ----------------