रिपोर्ट काही वेगळा नव्हता... तीच वेळ खून करण्याची... पण यावेळेस तिथे मिठाईचा बॉक्स सापडला होता,
" काय सापडलं मिठाई मध्ये.. ? " ,
" मिठाईत नाही, त्याच्यावर सापडलं.. " ,
" काय " ,
" मलाही तेच वाटत होतं कि पावडर मिठाईत mix करून दिली असणार... पण त्याने मिठाईवर पावडर टाकून त्यांना खायला दिली असेल.... ",
" असं होय.... " ,
" बाकी काही मिळाला का पुरावा वगैरे.. ",
" नाही रे... खूनी भलताच हुशार आहे... काहीच मागे ठेवत नाही.. ",
"अरे हो... एक सांगायचं राहून गेलं तुला." तसा महेश उठला आणि एक पेन घेऊन आला..
" हे काय ? " ,
"हा पेन त्यांच्या मुठीत सापडला..... बहुदा याच पेनाने त्यांनी ते letter लिहिलं असेल, त्या खुन्याने त्यांच्याकडून लिहून घेतलं असेल... " अभिषेकने ते पेन पाहिलं...
" यावर काही बोटांचे ठसे मिळाले का ? " ,
" हो.... फक्त " महेंद्र" यांचे ठसे होते पेनवर.",
"म्हणजे नक्की हा त्या आरोपीचा पेन असणार... अजून काही माहिती मिळाली का या वरून.. ",अभीने महेशला विचारलं,
" एक गोष्ट आहे…. हा पेन इतर पेनांपेक्षा थोडा लहान आहे... त्यामुळे नॉर्मल रिफिल्स यात जातंच नाहीत,म्हणून रिफीलचा मागचा भाग थोडा कट करावा लागतो... बघ पेन उघडून.. " अभिषेकने पेन उघडून रिफील बघितली... महेशच म्हणणं बरोबर होतं, त्याने रिफील थोडी कापली होती आणि तीही थोडी तिरकी,
" अशी का कट्ट केली रिफील त्याने ? " ,
" तो पेन बघ जरा... जिकडे पेनाचं बटन प्रेस करतो,तिथे थोड तिरकं बटन आहे म्हणून तिरका कट्ट दिल्याने रिफील बरोबर राहते एकदम.",
" आता हा पेनच मला कदाचित आरोपीकडे पोहोचवणार बहुतेक" अभिषेक बोलला.
" ते कसं काय ? " डॉक्टर महेशने विचारलं.
" तू एवढं सगळं पाहिलंस... पण महत्त्वाची गोष्ट विसरलास . ",
" ती कोणती ? " ,
" पेन जर निरखून पाहिलास तर कळेल... हा खुप जुना पेन आहे. मला तरी आठवते... साधारण ९-१० वर्षापूर्वी असे लहान पेन मिळायचे... आणि त्याचं वेळेस त्याच्या रिफील सुद्धा मिळायच्या... आता असले पेन मिळतही नाही आणि रिफ़िलही नाही.",
" मग या वरून तुला काय कळलं ? " डॉक्टर महेशने विचारलं,
" माणसाला जर एखादी सवय लागली.. मग ती चांगली असो किंवा वाईट ,ती सहजासहजी सुटत नाही. त्याचा पेन जरी आता आपल्याकडे असला तरी जेव्हा तो कोणताही नवीन पेन वापरायला घेईल तेव्हाही रिफील भरताना,तशीच कट्ट करेल. " अभीने आपला विचार मांडला.
" अरे अभी , मग आता काय तू सगळ्यांचेच पेन चेक करणार आहेस तू का ? ",
"जमलं तर तसही करू."
८ महिने होतं आले होते... त्या ४ हत्येचा शोध अजूनही लागला नव्हता.. तपासाला गती येत नव्हती.. अभिषेक आणि डॉक्टर महेश, यावरचे tension अजूनही तसंच होतं... आरोपी अजूनही मोकाट फिरत होता. अभिषेकची झोप कधीच उडाली होती. पहिलीच अशी केस त्याला मिळाली होती कि त्याने त्याला संपूर्ण हलवून सोडलं होतं..... घरी उशिरा येणं... रात्र-रात्रभर केस विषयी काम करत बसणं.. उशिरा झोपणं.. लवकर उठून पोलिस स्टेशनला जाणं. या सगळ्यांमुळे त्याची तब्येतही खालावली होती... असंच चालू होतं सगळं, आणि अशाच एका दिवशी, सकाळी.... पुन्हा... अभिषेक चा फोन वाजला,
" Hello सर , लवकर पोहोचा पोलिस स्टेशनमध्ये .",
" काय झालं ? " ,
" सर,आपल्या Department चे परेश सर आठवतात ना.. ",
" हो... २ वर्षापूर्वी रिटायर झाले ते ना.. ",
" हो.... हो सर... त्यांचा खून झाला आहे.",
" काय ? " अभिषेक उडालाच. तसाच पोहोचला धावत धावत त्यांच्या घरी. तिकडे पोहोचल्यावर, तसंच सगळं पुन्हा.....मारण्याची पद्धत,Letter, चहाचा कप, तसचं सगळं... अभिषेकला काय करावं तेच कळत नव्हतं आता. पत्रकारांनाही त्याचं वेळेस call आले होते. २ पत्रकारांचे फोन रेकॉर्ड केले होते. आवाज रेकॉर्ड केलेला होता. त्यावरून काहीच कळलं नाही.विचार करून डोक्याचा भुगा झाला होता अभीच्या. त्याचा मित्र, डॉक्टर महेश सुद्धा त्याला काहीही मदत करू शकत नव्हता.
" अभी, मला वाटते... तुला आरामाची गरज आहे .. " ,
" अरे .... कसा काय आराम करू... बघतो आहेस ना, ५ हत्या झाल्या…त्याची नावाजलेल्या लोकांच्या आणि मी काय करतोय.... काहीच नाही... त्यावर तू म्हणतोस आराम कर... कसा करू आराम.. " अभिषेक रागातच बोलला, तसा महेश गप्प बसला....अभीला स्वतःच्याच बोलण्याचा राग आला,
" Sorry यार, माझं डोकंच चालत नाही रे.",
" म्हणून तुला सांगतो मी... ,थोडा आराम कर... मग Fresh mind नी पुन्हा तपास सुरु करू... कसं " ,
" ठीक आहे... मी विचारून बघतो सरांना." दुसऱ्याच दिवशी त्याने त्यांच्या Senior अधिकाऱ्यांना सुट्टी बद्दल विचारलं... त्यांनाही माहित होतं कि गेले ८ महिने तो या केसेसमधे एवढा गुंतून गेलेला होता कि एकही सुट्टी घेतली नव्हती. त्याची तब्येतही खालावली होती… त्यांनी त्याला सुट्टी देण्याचे ठरवले.
" ठीक आहे, Inspector अभिषेक... तुम्ही ७ दिवस सुट्टी घ्या.. पण ८ व्या दिवशी कामाला वेळेवर हजर राहा. "
सुट्टी तर मिळाली होती पण शहरात राहिलो तर अभिषेकला तेच ते सतावत राहणार म्हणून त्याच्या बायकोने गावाला जाण्याचा निर्णय घेतला. तिकडे त्याचं मोठ्ठ घर होतं. तिकडेच गेले ते. तिथे खूप शांतता होती.आराम मिळाल्याने अभीला जरा बरं वाटलं होतं, त्याने त्या शांत जागी त्या केसेसचा पुन्हा नव्याने तपास सुरु केला.... दोन पूर्ण दिवस अभिषेकने त्या पाचही केसेसचा पूर्ण अभ्यास केला...
" आज , काहीतरी भेटलं वाटते तुम्हाला.. "अभीच्या बायकोने त्याला विचारलं,
" काहीतरी नाही... खूप काही मिळालं... आता फक्त महेशला बोलावयाचे आहे इकडे... " लगेचच त्याने महेशला फोन करून गावाला बोलावून घेतलं आणि महेश पोहोचलाही लगेच.
" बोल अभी, काय एवढया तातडीने बोलावून घेतलंस." ,
" अरे.... केस संबंधी चर्चा करायची होती." ,
" हा... बोल, काय झालं ? " ,
"OK.... पहिली तू सांग माहिती.. कि तुला आतापर्यंत काय काय माहिती मिळाली आहे.. " ,
------------------- क्रमश : ----------------