पुरंदर पडला ...अगदी नेटाने झुंजला...मुरारबाजी फक्त सातशे मावळ्यांनिशी आणि दिलेरखानाच्या ५००० मोघलांना भारी पडला..पुरंदर शेवटच्या घटका मोजत होता...आणि आता मरायचे तर मारूनच मरायचे...काही कळण्याचा आत गडाचा दरवाजा उघडला गेला कोणी कल्पनाच केली नव्हती तिथे राजे मिर्झाराजे जयसिंग बरोबर वाटाघाटी करत होते इतके दिवस झुंजणारा गड असा पडला...दिलेरखानाला वाटले गड आला ताब्यात..लढाई काही काळ थांबली...मोघली फोज...नाचायला लागली...आनंद झाला सर्वाना...किल्लेदार मुरारबाजी आणि मावळे खाली धावत येताना दिसले.. येवढी कसली घाई होती त्यांना?? हत्यार टाकायची?? शत्रुसमोर मान झुकवायची??...मोघली वेढा क्षणाक्षणाला जवळ येत होता....पण हे काय दौड कमी करायची सोडून...अजून जोमाने दौडत होते..मोघली सैन्य आता काही हांतांवर होते..आणि अचानक मुरारबाजी आणि मावळ्यांच्या समशेरी तळपल्या..पहिला तडाखा असा पडला..काही गनीम कापले गेले...आणि आता तर त्या सर्वानी दिलेरखाना कडे मुसंडी मारली..जो कोणी मधे येईल तो कापला जात होता... मुरारबाजी तांडव करत होता...त्याचे शौर्य पाहून दिलेरखान बोलला..." ऐ सुरमा हमारी तरफ आजा.. तुझे मनसब देता हू..."पण ऐकेल तो राजांचा मावळा कसला...शेवटी कंठात लागलेल्या बाणाने ...किल्लेदार मुरारबाजी...सह्याद्रींत पुरंदरच्या पायथ्याशी विलीन झाले.
राजांना ते पाहवत नव्हते..एक वेळ गड किल्ले पुन्हा उभे करता येतील. पण हि माणसे कशी उभी करणार...तहात चार लाख होनचा मुलुख आणि २३ किल्ले राजांनी मोगलांना दिले...ते पुढीलप्रमाणे यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,
१. अंकोला
२. कर्नाळा
३. कोंढाणा (सिंहगड)
४ कोहोज
५. खिरदुर्ग (सागरगड)
६. तिकोना
७. तुंग
८. नंगगड
९. नरदुर्ग
१०. पळसगड
११. किल्ले पुरंदर
१२. प्रबळगड - मुरंजन
१३. भंडारगड
१४. मनरंजन
१५. मानगड
१६. मार्गगड
१७. माहुलीगड
१८. रुद्रमाळ
१९. रोहिडा
२०. लोहगड
२१. वसंतगड
२२. विसापूर
२३. सोनगड
पण राजांनी ह्या बाबतीत पण युक्तीने काम केले...नाव २३ पण प्रत्यक्षात दिले फक्त १९ ते २० किल्ले...खालील लिंक वर एकदा टिचकी मारा...सविस्तर वाचता येईल...
(https://chinmaykirtane.blogspot.com/2018/05/Purandar.html )
आणि तहानुसार राजांना आणि युवराज संभाजीना आग्र्याला बादशहाला मुजरा करायला जायचे होते....स्वराज्याचे धनी एकदा गेले तर औरंग्या सोडणार नाही असा...ज्याने स्वतःच्या सख्ख्या भावांना अतिशय क्रूरपणे मारले...बाप मरत नाही म्हणुन त्याच्या सर्वांगाला विष चोपडले... तो माफी देईल आणि दिली तरी ति राजे स्विकारतील का ???
उभा राजगड चिंतेत पडला...स्वराज्यावर हा घाला होता... आता साक्षात काळिकाळाशी दोन हात करायचे होते...राजांनी २५० ते ३०० खाशी माणसे निवडली..अट फक्त एकच वेळ पडली तर..साक्षात औरंगजेबावर पण तलवार टाकायला पुढे पाठी पाहायचे नाही...बहिर्जीचे नजरबाज सुद्धा दिल्ली आणि आग्र्यात पोहचले होते...मराठी मुलखातील किती कुटुंबे आहेत ?? कुठे पहारा कमी असतो ?? कुठे चोरवाटा आहेत?? कधी पहारे बदलले जातात ?? एक ना अनेक ठिकाणी राजांचे डोळे बघू लागले..आणि साऱ्या खबरा राजांना आणि बहिर्जींना मिळू लागल्या... मध्येच ते आवई उठवुंन देत...राजे दिल्लीला पोहचले आता खुद्द औरंगजेबाशी बोलत आहेत...आता इथे आहेत आता तिथे आहेत...बहिर्जींनी खास ४० जण नजरबाज वेगेळे काढले होते...जे न थकता रोज शेकडो किलोमीटर ची दौड मारतील जेणेकरून स्वराज्यातील खबरा राजांना आणि राजांच्या खबरा राजगडावर १ ते २ दिवसांच्या अंतराने पोहचतील ....ससाणे,गरुड,कबुतरे... ह्यांच्यामार्फत पण गुप्त संदेश पाठविण्याची तयारी केली होती...खुद्द बहिर्जीं राजांनाबरोबर निघणार होते...
आणि राजे आणि खाशी मंडळी निघाली बादशहाच्या वाढदिवशी भेट पक्की करण्यात आली ...दरमजल करीत प्रवास चालला होता...आणि जिथे जिथे थांबत तिथे तिथे बहिर्जी आपली माणसे पेरून ठेवत...फार धोका होता..खुद्द बादशहा ने आदेश दिले होते काही कमी पडता नये राजपुत्राप्रमाणे बडदास्त ठेवा..त्यामुळे मोगली सैन्य हरकदम डोक्यावरच असायचे...जागोजागी दिलेरखानाने जाळलेली गावे..उध्वस्त मंदिरे दिसत होते...राजे आतल्या आत पेटत होते...जगदंबा कृपेने सही सलामत परत आलो तर नक्की बदला घ्याचाच...
सकाळी प्रवास आणि रात्री आराम असा प्रवास चालू होता...शंभूराजे दमले होते..शामियान्यात गाढ झोपले होते...मध्येच जग आली तेव्हा...राजे आणि बहिर्जी...काहीतरी सल्लामसलत करण्यात गढून गेले होते.. मध्येच दोघेही आकाशात पहात होते.. आणि काहीतरी नोंदी करत होते....न राहून शंभूराजे त्यांना सामील झाले..आणि तिघेही...तारे वाचण्यात गुंग झाले...