बापरे किती पसारा झालाय रूम मध्ये सिद्धांत ने पाहिलं तर ओरडेलच! आर्या रूम मधला पसारा पाहून स्वःत ला बोलत होती. काय ग आर्या एकटीच काय बडबड करतीये? इतक्यात सिद्धांत तिथे आला. झालं आता हा ओरडणार तिने मनाची संपूर्ण तयारी केली. पण त्याने काहीही react केल नाही तो आपला लॅपटॉप घेऊन काहीतरी चेक करत बसला. अरेच्चा! 'नवलच झाल चक्क सिद्धांत ने भांडण टाळल ग्रेट'! तिने थोडा हळू हळू च आवरायला सुरवात केली. अरे हा काही बोलत का नाही आहे इतका शांत कसाकाय झाला! जाऊदे ते बरच आहे म्हणा मी पण ना शांत आहे तरीही मला प्रॉब्लेम होतोय! पण हा बरा आहे ना नक्की? तिने त्याच्या कडे पाहिलं अरे हा इतका डिस्टर्ब का वायतोय!ती मनातच विचार करत होती. "सिद्धांत"तिने आवाज दिला. बोल ना,तो म्हणाला. काही झालय का? तिने विचारलं. कुठे काय झाल, तो तिच्या कडे न पाहताच म्हणाला. 'मग तू इतका डिस्टर्ब का वाटतोय जर काही प्रॉब्लेम असेल then you can share with me if you are comfortable!' नाही ग आर्या अस काही नाही आई आता म्हणाली की ती 2 महिन्यांसाठी बाहेर जातीये त्यांच्या ग्रुप नि काहीतरी organised केलय म्हणे आणि ते ही आजच निघायच म्हणतिये! तो म्हणाला.काय! अस अचानक कस काय ठरल,आणि हे मला तू आता सांगतोय! आणि मला कुणीच कस काही नाही बोलल! wait आलेच म्हणून ती बाहेर निघून गेली.हिला काय झाल अचानक. आणि हा काय पसारा! कोण आवरणार! मी मगाशीच पाहिला पण मी काहीच कस बोललो नाही आर्याला! की हेच सगळं खूप दिवसांनी बघतोय म्हणून कुठेतरी मलाच चांगल वाटतय, पुन्हा आर्यावर चिडून तिला दुखवण्याची ईच्छा च झाली नाही. असं का झाल? एरवी माझ्या स्वभावाच्या विरुद्ध थोडही वागल की मला त्रास होतो आणि मी हे सगळं सहन करतोय? आणि हा पसारा सोडून ही कुठे पळाली. तो त्याचाच विचार करत होता.
'अरे तुम्ही दोघे असा चेहरा पाडून काय निरोप देताय!'मी येणारच आहे लवकरच. त्याची आई दोघांनाही बोलत होती. 2 महिने म्हणजे लवकर झालं का? जाऊ दे मी बोलणारच नाही आहे ह्या विषयावर तू मला इतक्या वेळेवर सांगितलं हे! सिद्धांत म्हणाला. हे बघ तुला आधी सांगितलं असत पण मला माहिती होत तुझी reaction काय असणार ! आणि मला महिती आहे तू काही जास्त दिवस माझ्यावर रागावून नाही राहू शकत. 'चल आता निघायला हवं काळजी घे! आणि आर्या वर चिडत जाऊ नको हं! ती ला काही सांगायची आवश्यकता च नाही ती करेल च सगळं व्यवस्थित!'आई, तू नेमकी कुणाची आई आहे मला प्रश्न च पडतो, नेहमी तिचीच बाजू ? सिद्धांत म्हणाला. अरे काय लहान मुलांसारखा complaint करतोय मला निघायला हवं. चलो bye take care! आणि ते निघाले. कसे जाणार आता 2 महिने? सिद्धांत आर्याला म्हणाला.हो ना , पण एका दृष्टीने बरच झाल ना आई इथे नाही आहे! आर्या म्हणाली. आर्या, 'म्हणजे तू थोड्यावेळापूर्वी हातातलं काम सोडून आईला भेटायला गेली, आता पण डोळ्यात पाणी आणून उभी होती ते सगळं नाटक होत!' 'माझी आई माझ्यापेक्षा ही जास्त तुझी काळजी घेते आणि तू असा विचार करतेय!'सिद्धांत तिच्या ह्या वाक्यावर भडकलाच. माझं ऐकून तरी घे पूर्ण मला काय म्हणायचं, तुला जेवढं वाईट वाटतय तेवढंच मलाही वाईट वाटतय! आणि मी आज इथे त्यांच्यामुळेच आहे कळाल! ती म्हणाली. मग बर झाल का म्हणाली? सिद्धांत ने प्रतिप्रश्न केला. 'अरे आजपासून फ्री राहता येईल ना? म्हणजे फेक नवरा बायकोच नाटक करायच काम नाही'. ती अगदी सहज म्हणाली, आणि तिने तिच्या कामाला सुरुवात केली. किती सहज बोलून गेली ही ! काहीच कस वाटल नाही आर्याला अस बोलताना, किती लवकर तिने reality accept केली! किती आनंदी होती ती हे बोलताना इतका त्रास होतो का तिला अस खोट वागताना !मी कधीच हा विचारही केला नाही. मी फक्त माझ मत सांगून मोकळा होतो, तिच्या मनाचा कधीही विचार करत नाही. "सिद्धांत", आर्याच्या आवाजाने ती भानावर आला. 'काय बनवू तुझ्या साठी जेवायला सांग!', 'ती म्हणाली. काहीही तुला जे वाटेल ते कर माझं अस काही ही नाही'. तो म्हणाला. ठीक आहे तर मग आज माझ्या हातच खाऊन बघ मी करते काही तरी. 'काय करणार आता ही काय माहिती!'. एका दृष्टीने सिद्धांत ला आठवत नाही बरच आहे नाही तर त्याने मला अजिबात स्वयंपाक घरात येऊच नसत दिल. त्याला माझ्या हातच काहीही नव्हतं आवडत आवडेलही कस, हा इतका चांगला कूक जो आहे! काय करू पण, आता बोलून तर बसले मी! तिने आपलं सगळं ज्ञान पणाला लावून youtube च्या वेगवेगळ्या चॅनेल्स चा आधार घेऊन बैगन मसाला, व्हेज बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न केला.खूप मेहनतीने मी पहिल्यांदा च बनवलय काहीतरी आता फक्त सिद्धांत ला आवडाव! "आर्या" वाढ पटकन खूप भूक लागलीये! तिने त्याला वाढलं, तू पण जेवून घे! तो म्हणाला. नाही जेव तू आधी मी जेवते नंतर. त्याने एक घास खाल्ला. आर्या seriously, तू बनवलं हे ! त्याने विचारलं."हो",का काय झालं? आर्या तुला साधं जेवण पण नाही बनवता येत का ग तुला! किती बेचव बनवलंय हे सगळं! अग येत नाही तर विचारायचं ना,कसलीही चव नाही ! आर्याच्या डोळ्यात एकदम पाणीच आलं. मान्य आहे मला नाही जमत तुझ्या सारख पण म्हणून try पण नाही करायचं का! 'अग पण हे प्रयोग माझ्या वर का?' sorry पण मी खूप मनापासून बनवलं होत रे, पण ठीक आहे नेक्स्ट टाइम पासून मी अजून चांगला बनवण्याचा प्रयत्न करेल. ती म्हणाली अजुनही तिच्या डोळ्यात पाणी होतच. 'आर्या' माझ्या वर फक्त एक कृपा कर ह्या नंतर माझ्या साठी काहीही बनवत जाऊ नको मी माझं बघून घेईल'. तो तिला म्हणाला आणि त्याने थांबवलेल जेवण सुरू केलं. इतकं नाही आवडल तर नको खाऊ ना हे आर्या म्हणाली. हे बघ मी काही आनंदाने खात नाही आहे पण अन्न वाया घातलेल मला अजिबात आवडत नाही केवळ म्हणून खातोय, तो म्हणाला. आणि त्याने जेवण संपवलं.
क्रमशः
© Neha R Dhole