रात्री १२ ची वेळ .....
अभिषेक त्याच्या बाईकवरून एकटाच येत होता. रस्त्यावरून कोणीही नाही.... फक्त आणि फक्त त्याचीच बाईक धावत होती रस्त्यावरून......... त्यात मुसळधार पाऊस कोसळत होता.... रस्त्यावरचे खड्डे चुकवत अभिषेक बाईक चालवत होता. रेनकोट घातलेला असला तरी पूर्णपणे भिजून गेलेला होता.... रस्त्यावरचे दिवे तर आतमध्ये पाणी गेल्याने काही ठिकाणी बंदच होते. अर्ध्या रस्त्यावर प्रकाश तर अर्ध्या रस्ता काळोखात बुडालेला.... वीजही मधेच कडाडत होती... त्यामुळे एक वेगळचं भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं.... तरीही अभिषेक घरी यायला निघाला होता.... उशीरच झाला होता त्याला....
कसाबसा अभिषेक त्याच्या एरियात पोहोचला. तिथेही काही वेगळ वातावरण नव्हतं... हवा सुटलेली... त्यात मुसळधार पाऊस ... वीज तर आकाशात धिंगाणा घालत होती.. आणि त्याची बाईक बंद पडली... " शट्ट यार.... हिला काय आताच बंद पडायचं होतं ? "..... खूप प्रयन्त केला त्याने , पण ती बंदच होती.... घडयाळात बघितलं त्याने ..... १२.१५ झाले होते . मग करणार काय ? बाईक ओढत ओढत तो घेऊन जाऊ लागला.... mobile बाहेर काढला तर पावसात भिजून बंद होणार म्हणून तो bag मध्येच राहू दिला... तसं घर आता जवळच होतं परंतु बंद पडलेली बाईक , सुसाट वाहणारा वारा, त्यात पाऊस या combination मुळे अभिषेक वैतागला होता...... कसाबसा पोहोचला घरी… बघतो तर काय... घरात काळोख... त्याने बाजूला डोकावून पाहिलं... " अरेच्या... आजूबाजूला तर लाईट आहे.... आमच्याच घरातली गेली वाटते... " अभिषेकचं घर तसं मोठ्ठ होतं.... बंगलाच जणू काही. त्याच्याबरोबर त्याची बायको, एक नोकर, आई-बाबा आणि लहान भाऊ राहायचे. पण आज कोणीच बाहेर आलेले नव्हते...... अभिषेकनी बाईक बाहेरच उभी केली. भिजलेला रेनकोट काढला आणि दाराबाहेरच्या कुंठीवर अडकवला.... दारावरची बेल वाजवली.... बेल सुद्धा बंद...
" काय झालंय इकडे.. " दारावर त्याने थाप मारली.... एकदा ... दोनदा.... आतून कोणाचा प्रतिसाद नाही... दरवाजा त्याने हातानेच ढकलून पाहिला तर दरवाजा उघडाच होता...
" दरवाजा उघडा कसा ? " अभिषेकला आता संशय येऊ लागला होता… तसाच तो आतमध्ये आला.... मिट्ट काळोख घरात.. पुढचं काहीच दिसत नव्हतं... बाहेर आकाशात वीज चमकली तरच काहीतरी दिसत होता... चाचपत तो घरात आला.. आणि त्याच्या बायकोला ... आई-बाबांना, भावाला हाक मारू लागला....
कोणताच प्रतिसाद नाही... तेवढ्यात .... " आलात साहेब.... मी तुमचीच वाट बघत होतो."असा आवाज आला, त्याच्या मागून... मागे वळून बघतो तर त्याचा नोकर मेणबत्ती पकडून उभा...
केवढा दचकला अभिषेक..... heart attack यायचा बाकी होता त्याला.. " गाढवा... असं कोण येत का समोर " अभिषेक बोलला ,
" आणि बाकीचे कुठे आहेत…. लाईट का घालवली आहेस .. " ,
"लाईट गेली आहे साहेब , म्हणून मेणबत्ती पेटवली आहे.",
" आणि बाकीचे कुठे गेले सगळे ? " त्यावर नोकर काही बोलला नाही.......
" अरे गधड्या.......... तुला विचारतो आहे मी ",
मख्ख चेहऱ्याने नोकर म्हणाला ," चला.... तुम्हाला पण पोहोचवतो तिथे.... " .... आणि तो पुढे चालू लागला...
अभिषेकला नक्कीच काहीतरी गडबड आहे याची खात्री पटली होती. तो नोकर त्याला आवडायचाच नाही. काहीतरी वेगळ्याच स्वभावाचा होता तो. संशयी नजर...
कामात चोख असला तरी... वेगळाच वाटायचा तो अभिषेकला... अभिषेकला तो main hall मध्ये घेऊन आला.
" काय झालं .. थांबलास का ? " अभिषेकने त्याला विचारलं.
" असंच.... तुम्हाला काही द्यायचं आहे... हि मेणबत्ती पकडा जरा... " अभिषेकने एका हाताने मेणबत्ती पकडली आणि दुसऱ्या हाताने तो आपली पिस्तुल शोधू लागला.
पण पिस्तुल तर बाईक वरच राहिली होती. नोकर वळला. तसा अभिषेकने त्याच्या हातात सुरी बघितली...
" काय करतो आहेस हे? " अभिषेक घाबरतच म्हणाला ," नाही.... तुम्ही बोलला होतात ना... बाकीचे कुठे आहेत ते... त्यांच्याकडे घेऊन जातो तुम्हाला... " त्याच्या नोकराने सुरी त्याच्यासमोर रोखून धरली.... जणू काही तो कोणत्याही क्षणाला त्याच्या छातीत भोसकणार.. तेवढयात....तेवढयात....आकाशात पुन्हा वीज जोरात कडाडून गेली.... आणि अभिषेकच्या हातातली मेणबत्ती विझली. पुन्हा भयाण शांतता ... आणि अचानक... घरातले सगळे दिवे लागले...
" surprise " घरातली सगळी मंडळी एकत्र बोलली आणि गाऊ लागली ....
Happy Birthday To You, Happy Birthday To You, Happy Birthday To Dear अभिषेक ,Happy Birthday To You......... सगळे होते..
अभिषेकच कुटुंब.... त्याचे मित्र-मैत्रीण... शेजारी.. " अरे... हो... आज माझा वाढदिवस आहे... विसरलोच मी... " अभिषेक मनातल्या मनात हसत बोलला... समोर केक होता.... आणि नोकर अजूनही हातात सुरी घेऊन उभा होता...अभिषेकने पुढे येऊन त्याच्या डोक्यावर टपली मारली आणि सुरी घेऊन केक कापला. खूप छान पार्टी जमली होती त्या रात्री....
" काय Inspector अभिषेक ...... घाबरवलं ना तुम्हाला... " त्याची बायको पुढे येऊन बोलली.
त्यावर अभिषेक हसला. " घाबरलो... अगं heart attack आला असता मला... खरंच खूप छान surprise होत .. मी कधीच विसरणार नाही हे... ",
" happy birthday अभी... " अभिषेकचा बेस्ट friend " महेश पुढे येऊन म्हणाला,
" काय डॉक्टर साहेब, तुम्हाला पण आठवण होती वाटते माझ्या वाढदिवसाची... " अभिषेक म्हणाला,
" Inspector, कामात असताना थोडं घरीही देत जावा जरा... " आणि अभी ने पुढे होऊन महेशला मिठी मारली.
अभिषेक Inspector होता आणि महेश डॉक्टर होता .... दोघेही एकत्रच काम करायचे. पोलीस Department साठी... लहानपणापासून मित्र होते ते ... एकत्र वाढलेले... एकत्र शिकलेले... दोघानांही पोलिसात जायचे होते. अभिषेकची निवड लगेच झाली. पण महेशची उंची थोडी कमी असल्याने त्याची निवड झाली नाही. मग त्याने डॉक्टर बनून पोलिसांची medical team join केली. वेगळ्या Department मध्ये असूनही मैत्री तरीही तशीच होती दोघांची. खूप केसेस त्या दोघांनी मिळून सोडवल्या होत्या. म्हणून त्या दोघांची जोडी फ़ेमस होती....
------------------- क्रमश : ----------------