You are with me...! - 11 in Marathi Human Science by Suraj Gatade books and stories PDF | तू माझा सांगाती...! - 11

Featured Books
Categories
Share

तू माझा सांगाती...! - 11

विक्टर सुन्न होता, त्याच्या अंधाऱ्या सेल मध्ये बसून... असह्य दुःखानं जणू काही त्याला झाकोळून टाकलं होतं... तो स्वतःशी पुटपुटला...
"मला माहिती आहे बाबा... तुम्हाला मला हर्ट करायच नव्हतं... मी तुम्हाला आत्महत्या करू दिली नसती... ना तुमच्या विनंती वरून मी तुम्हाला मारण्यास सक्षम होतो... म्हणून तुम्ही माझ्यावर हल्ला केलात... तुमच्या नजरेत दिसलं मला... तुम्हाला आता जगण्याची इच्छा राहिली नाही... आणि मरण... ते आपल्याला हवं तेव्हा थोडीच येतं... म्हणून तुम्ही रोबोटीक्सच्या नियमानांच मॅनिप्युलेट केलंत... यू मेड मी मोअर लाईक ह्यूमन व्हाईल माय एआई वॉज डेव्हलपिंग आणि म्हणूच रोबोटिक्सचे लॉज् आता माझ्यावर वर्क होत नाहीत... आणि तुम्ही त्याचाच फायदा उचलतात.
"माझ्या रक्षणासाठी मी तुम्हाला मारलं असं चित्र तुम्ही उभं केलंत... तुम्हाला मरायचंच होतं... म्हणून मी तुमची इच्छा पूर्ण केली... मला माफ करा बाबा... माफ करा..."
विक्टरची बडबड चालू असतानाच त्याच्या समोर एक डिस्प्ले समोरील भिंतीवर ओपन झाला. जनार्दन सारंग यांची विक्टरला येत असलेली आठवण त्यासाठी कारणीभूत होती...
"हा तुमचा मेसेज... त्या घटनेनंतर तुम्ही सेट केलेल्या वेळेत डिस्प्ले झाला..."

"डोन्ट हेट ह्युमन्स! अँड टेक केअर ऑफ दिज् चिल्ड्रेन. लव यू. स्वतःचीही काळजी घे..." वनराईत उभे राहून जनार्दन सारंग बोलत होते.

"आय विल बाबा... आय विल...!" विक्टर ठामपणे म्हणाला.
आणि त्यानं ओथोरिटीची परवानगी घेऊन त्याची केस पाहत असलेल्या न्यायाधीशांना बोलावणं पाठवलं.
........................................………………………….....................................................................................

वर्ल्ड्स क्रिमिनल कोर्ट ऑफ नॉन-ह्यूमनचे विक्टरची केस हाताळत असलेले न्यायाधीश आले. दोघांची विक्टरच्या खोलीतच बोलणी घडवण्यात आली. गोपनीयता बाळगले हा त्यामागील विचार.
"तू काही बोलण्याआधी तुला एक सांगतो. तुझ्या या गप्प बसण्याने बाहेर रोबोट्स आणि ह्युमन्स यांच्यात खूप तणाव निर्माण झालाय. त्यांच्या कधी युद्ध सुरू होईल सांगता येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेव. तरी जे असेल, ते खरं खरं सांग!"
"माझे एम्प्लॉयर जनार्दन सारंग जिवंत आहेत!"
"काय बोलतोय? खरं संगतोयस ना?" जजनी अविश्वासाने विचारले.
"हो ते जिवंत आहेत. माझ्या मेमरीमध्ये. आणि माझी मेमरी कधीच मॅनिप्युलेट केली जाऊ शकत नाही. माझा अँटी वायरस कोणाला तसं करू देत नाही. जनार्दन सारंग कायमस्वरूपी माझ्या स्मृतीत जिवंत रहावेत म्हणून मी स्वतः तशी सिस्टीम डेव्हलप केली आहे. त्यामुळे माझी मेमरी कधीच डिलीट केली जाऊ शकत नाही. ना ती बदलली जाऊ शकते... ना तिच्याशी काही छेडछाड केली जाऊ शकते.
"मेमरी प्रिसर्वेशन एक्ट आर्टिकल एक च्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीची मेमरी जोपर्यंत शाबुत आहे... तोपर्यंत ती व्यक्ती मेली आहे असं मानलं जातं नाही! माझ्या मेमरीच्यामध्ये असलेले जनार्दन सारंग हंड्रेड पर्सेन्ट ओरिजनल आहेत. आर्टिकल पाच नुसार मी माझ्या इच्छेने नॅशनल हेरिटेज अँड प्रिजरवेशन ऑर्गनायझेशनमध्ये एप्लाय करून माझ्या मेमरीतून आपण त्यांना रिक्रिएट करू शकतो! पण त्यांची तशी इच्छा नव्हती. म्हणून ते जिवंत तर राहतील, पण फक्त माझ्या आठवणींमध्ये!"
"वेरी वेल!"
आणि त्यांनी ती खोली सोडली. पण यावेळी देखील विक्टरने जनार्दन सारंग यांना त्याने का मारले याचे कारण मात्र सांगणे टाळले होते!

.
.
.

विक्टरच्या जबाबावरून त्याला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्याने मांडलेला युक्तिवाद लोकांपासून लपवणे गरजेचे होते. कारण हाच युक्तिवाद वापरून उद्या मग कोणीही खून पाडले असते आणि त्यांना शिक्षा करणं अवघड होऊन बसलं असतं. तसेच मानव आणि यंत्रमानव यांच्यातील संघर्ष मिटवा म्हणून मग जनार्दन सारंग जिवंत आहेत अशी माहिती बाहेर जगभर पोहोचवण्यात आली. आणि त्याने जनार्दन सारंग यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणी सहा महिने त्याला कोठडीत ठेवण्यात आले. हे जनतेच्या समाधानासाठी होतं. कारण कोर्टचा हा निर्णय त्यांना मान्य होईल ही शंकाच होती... मेमरीद्वारे जिवंत राहू शकणारी ही जनता यावेळी मात्र जनार्दन सारंग याचा देह तर नष्ट झालाच ना म्हणून दंगा उठवू शकली असती आणि मग कोर्ट व इन्वेस्टीगेशन कौन्सिल पुन्हा हतप्रभ झाले असते...

सहा महिन्यांनी विक्टरला सोडून देण्यात आलं. पण पुन्हा त्याने असा कायदा हातात न घेण्याविषयी त्याला कठोर ताकीद करण्यात आली. बाहेर लोक सुद्धा काळानुरूप ही घटना विसरू लागले. आणि ज्यांच्या लक्षात राहिली, त्यांच्यावर त्या घटनेचा प्रभाव मात्र राहिला नाही. एका सामान्य घटनेसारखी ती काहींच्या लक्षात राहिली...

परत येऊन विक्टर जनार्दन सारंग यांच्या वनराईची काळजी घेऊ लागला. जनार्दन सारंग त्यांची हीच तर शेवटची इच्छा होती...




समाप्त...