तिथे खलिता पोचता झाला...आणि तिथे दिलेरखान आणि मिर्झाराजे यांनी पुरंदरच्या पायथ्याशी तळ टाकला ...जिथे बघावे तिथे अफाट सैन्यसागर... प्रथम वज्रगडावर हल्ला सुरु झाला.. मिर्झाराजे जयसिंगाने शिवाजी महाराजांविरोधात कुशल रणनीती अवलंबली होती...आधी किल्ल्याचा आसपासचा सपाटीचा प्रदेश जिकून...किल्ल्यावर होणारी रसद तोडायची आणि आसपासच्या परिसरात जाळपोळ, लुटालूट आणि किल्ल्याकडे येणारे जाणारे सर्व मार्ग रोखून धरायचे...
राजांना वाटले त्यापेक्षा मिर्झाराजांशी कडवी झुंज होत होती...दोघेही कसलेले सेनानी होते...पण मोगलांच्या तुलनेत स्वराज्याचा खजिना आणि मनुष्यबळ कमी पडलं होते..राजे आपल्या वकिलांमार्फत वाटाघाटी करायला ऊत्सुक होते पण मिर्झाराजांनी स्पष्ट शब्दात आदेश दिला होता...जो काही तह होईल तो त्यांच्या अटींवर होईल.. आणि ते सांगतील त्या ठिकाणीच होईल... आणि लवकरात लवकर पुरंदरच्या पायथ्याशी येऊन भेटा...काहीच विचार करायला वेळ नव्हता...तेवढ्यात बहिर्जीच्या नजरबाजाने खबर आणली...खबर पक्की होती...एक मोगली सरदाराला फितवून त्यांच्याकडून काढून घेतले होते...खबर अशी होती...तहाचे कारण पुढे करून मिर्झाराजे राजांना आणि शंभू राजांना आग्र्याला पाठवणार हे नक्की होते..बहिर्जीनी पुन्हा एकदा खात्री करून घेतली....रामजी अशी उडती खबर नक्कीच आणणार नव्हता...पटापट पावले उचलायला हवी होती...उभा राजगड चिंतेत पडला..स्वराज्य आत कुठे रांगायला लागले होते..आणि हा तडाखा ?? कसे होणार??
बघा जरा विचार करा त्या माऊलीची काय स्थिती झाली असेल...आपला मुलगा आणि नातू त्या कळीकाळाच्या तोंडी चालले आहेत..सुखरूप येतील कि नाही याची खात्री नाही...पण तेवढी काळजी करायला आणि रडायला तर बिलकूल वेळ नाही...का तर स्वराज्य वाढवायचे आहे.. आपण रडत बसलो तर आताच पांगुळलेले स्वराज कायमचे जायबंदी होऊन जाईल...राजे पण इथे निर्वाणीचे बोल बोलत आहेत...आमचे काही बरे वाईट झाल्यास..जाणत्या व्यक्तीस पुढे करून स्वराज्य चालवावे ...
तहाची तारीख ठरली १२ जून १६६५...फक्त १० दिवस हातात होते...बहिर्जी आणि राजे आणि खाशी सरदार मंडळी बराच वेळ खलबत खान्यात बसली होते .. दोनदा जेवणाचे थाळे परत पाठविले गेले...रामजी कडे कसलासा निरोप देऊन बहिर्जी पुन्हा बैठकीत गुंग झाले...उगवतीच्या दिशेला जसे झुंजूमुंजू झाले तसे..सर्व उठले...आणि बहिर्जी मुजरा करून...गडाखाली आले...रामजीने आधीच घोडे तयार ठेवले होते....दोघांनीही घोडे भरधाव सोडले...आणि आधीच ठरलेल्या ठिकाणी आले...रामजीने आपले काम चोख बजावले होते...जवळ जवळ ३०० ते ४०० नजरबाज तयार होते...बहिर्जी नि सर्वाना सूचना दिल्या...२०० जणांना आग्र्यात आणि आसपास च्या परिसरात शक्य तितक्या लवकर पोचायचे होते..कुठे लपायला जागा आहे?? कुठे जंगल आहे ?? कोण आपल्याला ऐनवेळेला कमी येऊ शकतो ?? कुठच्या चोरवाटा आहेत?? किती सैन्य आहे?? ...सर्व सर्व माहिती पाहिजे होते ...स्वराज्यावर संकट आले होते.. ठरलेले सर्व निरोपाचे विडे घेऊन...दौडत सुटले... बाकीचे राहिलेले त्यांना सूचना दिल्या राजे जेव्हा प्रवासाला निघतील तेव्हा...त्यांच्याभोवती एक अदृश्य धावत रिंगण तयार करायचे... इथल्या खबरा आणि आग्र्याच्या खबरा राजांना वेळेवर मिळाल्या पाहिजेत...
सर्वात आधी राजगडाची शिबंदी वाढवण्यात आली...न जाणो दिलेरखानाची बुद्धी कधी फिरली आणि तो सरळ राजगडावर चालून आला तर..मग राजांच्या कबिल्याचे करायचे काय???
आणि काही जणांना फक्त सांगितले अफवा पसरवा...राजे एकचवेळाला दोन ठिकाणी संचार करू शकतात... १५ फूट उंच हवेत उडी मारता येते ...कधीही गायब होता येते... भूत ,पिशाच आणि रानपाखरं त्यांना वश आहेत एक ना अनेक ...बैठक संपवून बहिर्जी उठले आणि घोडा न घेताच अजून जंगलात चालत गेले...भिवाजी आणि जिवाजी दोघेही बहिर्जीची वाट पाहत होते...आणि बहिर्जीना पुन्हा पाहताच त्या मुक्या पक्ष्यानी कल्ला करायला सुरुवात केली...बहिर्जी सांगत होते हे आपले स्वराज्य जगावे म्हणुन आपले धनी त्या औरंग्याला कुर्निसात करायला चालले आहेत आताची झेप फार उंच घ्यावंची आहे.. पार आभाळाला हात लावून यायचे आहे..आपला राज सुखरूप आलं पाहिजे..आपण मेलो तरी चालेल पण ह्या सह्याद्रीचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे
क्रमश :