आर्या च तरीही लक्ष TV तच होत. दीदी बघ सिद्धांत जिजू आलाय आयुष म्हणला. उगाच त्याच नाव काढू नको आणि तुला अस वाटत असेल की तू त्याच नाव काढलं की मी लगेच घाबरून tv वगैरे बंद करणार तर अस काहीही होणार नाही.मी घाबरत नाही कुणालाच आणि सिद्धांत ला तर अजिबातच नाही so don't disturb me. ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली. हे बघ जिजू मला काय वाटत ना आजारपणामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झालाय so तू तिला इतकं seriously नको घेऊ करत असते ती अशीच बडबड. पण मनात काही नसत रे तिच्या. तुमचं चालु द्या मी येतो. आणि तो निसटला. सिद्धांत चा रागाने तर एव्हाना सातवा आसमान क्रॉस केला होता. त्याने आयुष ला जाऊ दिल आणि TV चा main switch बंद केला. आर्या तर त्याला पाहून उडालीच 2 min तिला विश्वासच बसत नव्हता. की हा इथे. तू इथे काय करतोय? आणि ह्या वेळी? तिने घाबरूनच विचारलं एरवी थंडी वाजणाऱ्या आर्याला आता मात्र घाम फुटला. अग घाबरतीयेस का!' तू तर कुणालाच घाबरत नाही न !काय, असच काहितरी म्हणाली होती ना आता' कुठे घाबरते मी कुणाला आणि कोण म्हणाल मी घाबरली. अग घाम फुटलाय आर्या तुला बघ एकदा! अरे तो गर्मी ने खूप उकडा वाढलाय ना हल्ली बाकी काही नाही. ती काहीतरीच उत्तरे देत होती. बर तुझा फोन कुठे आहे, तो घे आधी आणि चल तुझ्या रूम मध्ये तिथे बोलूया तो स्वतःचा राग खूप control करत म्हणाला. अरे कशाला बसूया ना इथेच! ती म्हणाली. नको आर्या कारण देऊ नको पटकन चल, तो रागातच म्हणाला. अरे का असा मागे लागला हा इथे काही बोलणार नाही, आणि ह्याचा आताचा राग पाहून तर अस वाटत की रूम मध्ये गेल्यावर कच्चा खाऊन टाकेल हा ! काय करू, ती विचारच करत होती. सिद्धांत तू हो पुढे मी आलेच ती म्हणाली. कुठे चालली तू. अरे तुला पाणी वैगरे काही विचारलच नाही ना, तू जा मी आलेच पाणी घेऊन ती म्हणाली. Shut up आर्या मी रात्री तुझ्याकडे ह्या वेळेला पाणी प्यायला तर नक्कीच नाही आलो काय लावलंय हे तो थोडा चिडून आणि मोठ्याने बोलला. ती घाबरलीच अरे हळू आई झोपलेली आहे उठेल ना तुझ्या आवाजाने, ती म्हणाली. मला कळतंय ते म्हणूनच मी आत चल म्हणतोय. आणि तो तिच्या हाताला धरून घेऊन गेला. त्याने जोरात दार लावून घेतले . आर्या ला कळून चुकलं आता झालं आपलं काही खर नाही ! काय चाललंय तुझं? तो म्हणाला. काही नाही TV बघत होते ती casually म्हणाली. आर्या तुला माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय हे फालतू उत्तरे नको आहेत मला. तुझा फोन बघू तिने द्यायच्या आधीच त्याने तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि तिला missed call दाखवत म्हणाला हे काय आहे? missed call ती म्हणाली. ohh great मला दिसत नव्हतं ना म्हणून विचारलं तुला तो म्हणाला. अरे तू केला होतास का फोन माझ लक्ष नव्हतं. काहीतरी कामात असेल नसेल गेलं लक्ष ती म्हणाली. कामात होतीस तू? तो रागातच बोलत होता. sorry म्हणजे टीव्ही पाहत होती. पण इतकं कोणतं urgent काम होत तुझं, आणि नाही गेलं लक्ष तर त्यात काय एवढ ती म्हणाली. तू ला काहीच कस कळत नाही का ग तू कळूनही न कळल्याच नाटक करत आहेस. तू फोन नाही receive केला 2-3 दिवस झाले एकही कॉल नाही मला कस कळणार की तू बरी आहेस की नाही. एकदा तरी कॉल करायचा ना समोरचा आपल्याला काहीतरी विचारण्या साठी कॉल करतोय तो ही उचलायचा नाही आपण काळजी वाटत वाटत होती मला पण तुला काय तू बघ आपला टीव्ही, हे बोलताना त्याचा आवाज बराच वाढला होत्या. अच्छा तर हे कारण आहे का ह्या वागण्यामागच मला आता कळाल, पण काय आहे ना सिध्दांत तू कुठल्या नात्याने माझ्या कडून कॉल ची अपेक्षा ठेवतो तू केलास मला एक तरी कॉल आलास भेटायला? विचारावं वाटलं आर्या मेली आहे की जिवंत, आर्या काहिही नको बोलू हा तो मधेच तिला थांबवत म्हणाला. मला बोलू दे ना इतक्या वेळ तर तुला माझं ऐकायचं होत ना आता ऐक मी मुद्दामून नाही उचलला तुझा कॉल पहिला होता मी नव्हतं बोलायचं मला तुझ्याशी. 'आर्या तू हे मुद्दामून केलं? शोभत तुला अस वागणं? आणि वर तोंड करून सांगतीये की मी मुद्दामून केलं हे म्हणजे तुला सांगताना थोडही guilt वाटत नाही आहे का की आपण चुकीचं वागलो'.हे बघ सिद्धांत माझं आयुष्य आहे मी ठरवेल कोणाला बोलायच कोणाला नाही आणि तुझ काय तुझा मूड असला तर कॉल करणार नाहीतर विचारणार पण नाही आधी बर नव्हतं तेव्हा इतकी काळजी घेतली वाटलं आता ह्याला वाटतय काही तरी पण नाही पुन्हा तेच वागणं. त्यानंतर साधी चौकशी पण नाही केली काय वाटलं असेल मला ह्याचा विचार केला कधी! विचार केला असता तर असा वागला ही नसता म्हणा! मला पण काही भावना आहेत अरे ! कधी समजणार सिध्दांत तुला ? मीच मूर्ख आहे तुझ्या कडून थोड्या जास्तच अपेक्षा ठेवते सोड ! तुला किती चिडायचं चिडून घे ,काय बोलायचं बोल मी, आहे सगळं ऐकण्यासाठी तयार, सवय झाली आहे त्याची आता! कधी आठवणार तुला काय माहिती ! इतक्यावेळ चिडलेला सिद्धांत हे ऐकून शांत च झाला त्याच्या कडे ह्या वर काहीही उत्तर नव्हतं 'आर्या मला फक्त काळजी वाटली तुझी म्हणून बोललो ग!'आणि मलाही कळत की माझ्यमुळे तुला suffer करावं लागत असेल तरीही मी हे मुद्दामून नाही करत आहे! तो म्हणाला.आर्याला कळून चुकलं की आपण रागाच्या भरात ह्याच्या तब्येती विषयी नव्हतं बोलायला पाहिजे त्याला त्रास होतो. 'sorry सिद्धांत मला अस नव्हतं म्हणायचं अरे !''ठीक आहे आर्या खरच आहे ते!'. जाऊदे मी येतो इथे थांबूनही काही फायदा नाही. तो म्हणाला. 'सिद्धांत प्लीज जाऊ नको आता खूप रात्र झाली आहे', आर्या त्याला म्हणाली. हे बघ आर्या मी काही लहान नाही आहे, तो म्हणाला. तू लहान नाहीच आहे पण इतक्या रात्री नको आधीच एक accident झाल्यापासून खूप काही गमावलं आहे आता मला भीती वाटते please नको. ह्या वेळेस ऐक माझं. त्याला ही तिच्या इतक्या आग्रहासमोर नाही म्हणता नाही आलं. आणि त्याने तिथेच थांबायचा निर्णय घेतला.
क्रमशः
©Neha R Dhole