तो सकाळी उठला पण आज नेहमीसारखी आर्या त्याचा आजूबाजूला नव्हती. थोडा disturb झाला पण लगेच त्याने नॉर्मल केलं स्वतःला. आणि आवरून ऑफिस ला आला. त्याला खूप वाटत होतं की आर्याला कॉल करावं भेटावं पण त्याने टाळल आर्या ने पण बरीच वाट बघितली आणि शेवटी तिला कळून चुकलं की हा नाही येणार आणि आपण कुणावर जबरदस्तीही करू नये. त्याला जर माझ्याविषयी काही वाटलं तर आला असता तो मी उगाचच इतका सिद्धांत चा विचार करते त्याला माझ्या विषयी काहीही नाही वाटत. आता मी ही त्याच्या कडून काही expectations नाही ठेवणार उगाचच त्रास होतो मग आता त्याला आठवेल तेव्हा आठवेल अशी प्रेम कर म्हणून जबरदस्ती नाही करू उलट ह्यामध्ये माणूस आणखीन दुरावतो मला तर वाटतय की आता पुन्हा नाही जावं त्याच्या कडे पण घरी काय सांगायचं त्याच्याही आणि माझ्याही काय ताण झालाय हा! जाऊ द्या आता जितके दिवस इथे निघतील तितके काढावे मग पुढचं पुढे बघू असा विचार करून तिने आपलं मन पुस्तकात रमवायला सुरूवात केली. पण त्यादिवशीही तो आला नाही. दुसऱ्या दिवशीही तो नेहमीप्रमाणे ऑफिस मध्ये आला morning meetings वगैरे झाल्यावर विक्रांत त्याच्या कडे येऊन बसला. काय रे सिद्धांत आर्या अजूनही बर नाही का? त्याने विचारल. नाही रे बरी आहे आता सिद्धांत म्हणाला. मग join का नाही झाली अजून बऱ्याच सुट्ट्या झाल्या म्हणून विचारलं. ती तिच्या आईकडे आहे सध्या आणि एकप्रकारे चांगलच आहे ना नाही येत ते सिद्धांत बोलून गेला. काय चांगलच आहे? तुमचं काही भांडण झालं? का ती तिकडे का गेली ? इकडे कधी येणार आणि join कधी होणार? त्याने एकादमातच सगळे प्रश्न विचारले. अरे ऐ किती प्रश्न पडतात तुला! हे बघ आमचं काही भांडण नाही झालं तिला घरी कंटाळा आला म्हणून ती तिकडे गेली आणि बाकीच्या तुझ्या प्रश्नांची उत्तरे नाही आहे माझ्याकडे मुळात मला नाही तुझ्या सारखी चौकश्या करण्याची सवय ती ठरवेल तीच तीच सिद्धांत म्हणाला.मी चौकश्या नाही करत आहे काळजी आहे म्हणून विचारलं. ईतक्या तिरसट पणे बोलण्याची काही गरज नाही. नसेल सांगायचं तर नको सांगू मला तिची काळजी वाटत होती म्हणून विचारलं, येतो मी. म्हणून तो निघाला. मला वाटत इथे मला सोडून बाकी सगळ्यांनाच आर्याची काळजी आहे. पण खरच आता पर्यंत तिने join करायला हवं होत. 2-3 दिवस झाले तिच्याशी काही contact पण नाही झाला. पण तिने तरी कुठे केला मला एखादा कॉल at least कसा आहे हे तरी विचारावं पण तिचा ego आडवा येत असेल तीही काही कमी नाही जाऊदे का विचार करायचा तिचा अस म्हणून त्याने ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल. आणि आजही तो तिला न भेटताच घरी गेला. जेवताना मात्र आज त्याच्या आईने त्याला विचारलं का रे सिद्धांत आर्या कधी येणार आहे? माहिती नाही ग आई म्हणजे त्या विषयावर बोलणं नाही झालं. 'बर आता कशी आहे ती ?',ये म्हणावं लवकर,करमत नाही रे ती घरात नसल्यावर. हो भेटल्यावर सांगतो. अरे असा तुटक तुटक का बोलतोय काही बिनसलं का तुमचं. आणि आज भेटला नाही का तू? त्यांनी विचारलं. हे बघ आई मला सध्या खूप काम आहे मला नाही वेळ मिळाला! किती निर्दयी सारखा वागतो तू! तुला एकदाही वाटलं नाही की तिला विचारावं कशी आहेस बर आहे का ? अरे तिची इथे असताना काय परिस्थिती होती तिची तू ही पाहिलीये ना तरीही असा वागतो तिच्या सोबत, आई हे बघ तू चिडू नको माझं ऐकून तर घे... त्या त्याला मधेच थांबवत म्हणाल्या मला काहीही ऐकायचं नाही आहे. तू आर्या सोबत असा वागू शकतो अस मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.जाऊ दे तुझ्या कडून आता कुठलीही अपेक्षा च ठेवायला नको.
माझ्यामुळे आई पण दुखावल्या गेली जायला हव होत मी काय वाटलं असेल खरच आर्याला पण तिने ही कुठे कॉल केला? म्हणून मी माझं कर्तव्य सोडायच. आर्याला बर असेल ना, की तिला बर नसेल म्हणून तिने कॉल नसेल केला. पण बर नसत तर कळवल असत मला. कदाचित आर्याने कळवू ही नसेल दिल तिला अशीही कुणाची मदत घ्यावी वाटत नाही आणि माझी तर नकोच वाटत असेल बरी असेल ना आर्या?जाऊ का आता तिच्या कडे नको फार उशीर झालाय चांगल नाही वाटणार तिला कॉल च करतो त्याने लगेच कॉल केला पण तिने काही उचलला नाही. हा इतक्या रात्री का कॉल करतोय? नक्कीच काहीतरी काम असणार इतक्या दिवस आठवण नाही आली, काम असली की च माझी आठवण काढायची का? मी पण नाही receive करणार काय करायच ते कर म्हणा. ती पण कॉल ignore करून मस्त tv पाहत बसली. आर्या ला खरच बर नसणार नाहीतर तिने उचलला च असता आता काय करू जाऊनच येऊ का तिच्या कडे हो होऊदे कितीही उशीर मला कोण काय बोलणार ! आणि तो तडक तिच्या घरी निघाला.
आर्या मस्त पैकी हॉल मधेच tv पाहत बसली होती 2-3 वेळेस door bell वाजली तरीही तीला काही ऐकू आली नाही. अग ऐ आवाज कमी कर ना कुणी आलाय बेल वाजतीये ते ही ऐकू येत नाही आहे का तुला? आयुष तिच्यावर चिडूनच म्हणाला. आलाच आहेस ना आता बघ मग कोण आहे ते तुझाच कुणी तरी मित्र आला असेल ती म्हणाली. त्याने दार उघडलं अरे सिद्धांत जिजू इतक्या उशिरा! ये ना आत!
क्रमशः
©Neha R Dhole