Pralay - 23 in Marathi Adventure Stories by Shubham S Rokade books and stories PDF | प्रलय - २३

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

प्रलय - २३

प्रलय-२३

" मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार , म्हणूनच हे बुटके पाठवली होते तुझ्यासोबत , त्यांनाही त्याचं काम पूर्ण करून दिलेलं नाहीस . अरे तुझ्या एकट्याच्या स्वार्थासाठी संपूर्ण जगाचा विनाश केलास की तू...." तो म्हातारा वैतागून आयुष्यमानला बोलत होता ...
" आता आत्मबलिदानाचा विधी पूर्ण झाला म्हटल्यावर , ती संपूर्ण शक्तिशाली झाली . तिला आडवणे आता सर्वथैव अशक्य आहे . ... आता तो म्हातारा पुढे आयुष्यमान आहे हेही विसरला व स्वतःशीच बडबडत सुटला....
" आता काही खरं नाही . तिला कोण थांबवणार...? विनाश कोण रोखणार ....? याचे उत्तर कोणाला माहित आहे.....? कोण ..? कोण ..? कोण...?
तो वेड्यासारखा पळत सुटला...
" हा सापडला..... तंत्रज्ञ मंदार रक्षक राज्यातील उत्तरेच्या जंगलात असलेल्या गुप्त तळावरती आहे तो...... चल लवकर आपल्याला तिथे जायचं आहे.... सुरुकुला बोलव..... लवकर ....प्रलयकारीका कुठे गेली काय माहित......
भिल्लव सार्थक सरोज व उत्तरेच्या तळावरती असलेले सैनिक रक्षक राज्याच्या महाला वरती चालून निघाले होते . सर्व सैनिक काळी भिंत पाडण्यात व्यस्त असल्याने महालाच्या संरक्षणासाठी कमी सैनिक होते . त्याच संधीचा फायदा घेऊन सर्वांनी आक्रमण करण्याचे ठरवले होतं . महाराणी शकुंतलेला याबाबतीत सांगितलं होतं पण त्यांचं कुठेच लक्ष नव्हतं . त्यांचा मुलगा साऱ्यांच्या नजरेदेखत भरदिवसा पळवला होता व कोणीच काही करू शकलं नव्हतं . त्यात अधिक भर म्हणून तंत्रज्ञ मंदार यांनी आत्म बलिदानाचा विधी व त्यासाठी बळी म्हणून राजकुमाराना पळवलं असावं असं सांगितल्यावर तर महाराणी अधिकच निराश झाल्या . सर्व सैनिक दक्षिणेकडे कूच करायला तयार असतानाच आयुष्यमान तो म्हातारा व दोन बुटके त्याठिकाणी सुरुकु सोबत आले . त्यांना व सुरुकु ला पाहून सार्‍यांनी शस्त्रे उगारली . तंत्रज्ञ मंदारची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारली होती . तोही घोड्यावरती स्वार झालेला होता . सुरुकुला पाहिल्यावर तो बोलला ...
" अरे हे आपल्या बाजूने आहेत . प्रलयकारिकेला थांबवायचं असेल तर सुरुकु आणि त्याचा मालक लागणारच ना....
" अरे मंदार अगदी तसाच दिसतोय , अजिबात फरक नाही ....." तो म्हातारा मंदारला म्हणाला
" मग तंत्रज्ञ उगाच म्हणतात का लोक मला .... तू मात्र दिवसेंदिवस अधिकच म्हातारा होत आहेस.....
" अरे हा आयुष्यमान , वारसदारांच्या सभेचा प्रमुख . प्रलयकारिकेचा प्रियकर . त्याला जमले नाही . आत्म बलिदानाचा विधी पूर्ण झालाय....
" वाटलं होतं आता त्या तिघींना शोधावे लागेल . मारुत आग्नेय आणि जलधि जरी एकत्र आले तरी फार काळ ती एकी टिकत नाही . त्यामुळे त्यांना एकत्र आणण्यासाठी त्या तिघी शिवाय आपल्याला पर्याय नाही....
" कोण तिघी ..? काय बोलताय तुम्ही ....? " आयुष्यमान म्हणाला .
" कळेल तुला .... मग येतोय ना तिघांना शोधायला... तुला माहिती असेल त्या कुठे आहेत ....." तो म्हातारा मंदारला बोलला
" चला मागच्यावेळी मी ज्यांना पाहिलं होतं त्यावेळी त्या उडत्या बेटावरती स्थायिक होत्या . सुरुवात तिथूनच करूया......" मंदार सुरुकु वरती चढत म्हणाला . पुन्हा एकदा सुरुकु आकाशात उडाला आणि सैन्य दक्षिणेकडे रवाना झाले......
रक्षक राज्यातील आणि जलधि राज्यातील सैनिकांमध्ये युद्ध सुरू झालं होतं . मध्यरात्रीच्या आसपास सुरू झालेले युद्ध अजूनही चालू होतं . तोफा धडाडत होत्या . धनुष्यातून बाण सुटत होते . तलवारी रक्ताने माखलेल्या होत्या . सूर्योदय झाला होता . रक्ताच्या चिखलात अजूनही युद्ध चालूच होतं . एका साध्या करण्यासाठी हजारो सैनिकांचे प्राण जात होते . हळूहळू सूर्य अधिकच तळपू लागला . दोन्ही बाजूकडून नव्या दमाचे सैनिक रणांगणात उतरले . पण अचानक विजेचा कडकडाट झाला . भरदिवसा सूर्यास्त होऊन अंधार पडला . वारे शांत झाले . वातावरण शांत झालं . अचानक झालेला बदल पाहून सैनिकही स्तब्ध झाले...
" पहिल्या प्रलय पाहिला आणि जिवंत राहिले अशा काही मोजक्या लोकांपैकी माझे वडील म्हणजेच तंत्रज्ञ मंदार ........
सर्वत्र आवाज घुमत होता तंत्रज्ञ मंदारचा मुलगा शौनक बोलत होता .
" प्रलय काही एका दिवसात येत नाही . एक-एक घटना त्याला कारणीभूत ठरते . प्रलय येणार हे तेव्हाच नक्की झालं ज्यावेळी महाराज सत्यवर्मानी त्यांच्या राजपुत्राला राजमहालात जाळून दिलं . पण महाराज विक्रमांनी काळ्या भिंतीला पाडण्याचा आदेश देऊन प्रलयकाळ फारच जवळ आणला . तुम्हाला पाहायचंय का प्रलयकाळ काय असेल ......? "
आणि आकाशात चित्रे उमटू लागली . सर्व सैनिक ती दृश्य पाहून घाबरून गेले....
" काळी भिंत पाडल्यानंतर या गोष्टी होणार आहेत त्यामुळे लक्षात घ्या ..... आणखी एक गोष्ट . आपल्या साऱ्यांना माहित आहे । महाराज विक्रम त्यांच्यासाठी खास बनवलेल्या सुवर्ण पात्रात त्यांच्यासाठी खास बनवलेली विशिष्ट अशी मदिरा घेत असतात . ते पात्र व ती मदिरा मारुतांच्या पुजाऱ्यांनी बनवलेली आहे . त्यामुळे महाराज विक्रमांवरती मारूतांचे नियंत्रण आहे . तुमच्या राज्याचे खरे महाराज विश्वकर्मा हेच आहेत...."
हे ऐकताच रक्षक राज्याच्या सैनिकांची तळपायाची आग मस्तकाला गेली . सारे सैनिक विक्रमावरती धावून गेले . काही क्षणातच विक्रमाचे निपचित पडलेले शरीर त्यांनी भिंतीपलीकडे फेकून दिले . महाराज विश्वकर्माच्या नावाचा जयजयकार सुरु केला . सैनिकांनी केलेल्या कृतीची महाराज विश्वकर्मा ना जरी गृना वाटत असली तरी आता मात्र आता ते बोलण्याची वेळ नव्हती....
" जलधी राज्याची सैनात त्रिशुळ सैनिकांसोबत लढण्यासाठी दक्षिणेकडे उभी आहे . हे त्रिशुळसैनिक दुसरे-तिसरे कुणी नसून जलधि राज्याचे नागरिकच आहेत . बाटी जमातीच्या काही टोळ्यांनी ते सैनिक बनवण्यासाठी मारूतांची मदत केली असावी . त्या टोळ्या मारतांच्या जुन्या महालाकडे जात आहेत . आपल्याला कसेही करून त्या टोळ्यांना पकडायलाच हवं . प्रलयकात्र थांबवायचा असल्यास हे करायलाच हवं... "
रक्षक व जलधि राज्याच्या सैनिकांना घेत महाराज विश्वकर्मा जुन्या महलाकडे निघाले . विक्रमाच्या वधाची आणि इतर बातम्या घेऊन महाराज विश्वकर्मानी महाराज कैरव व महाराणी शकुंतले कडे दूत पाठवले....