'आर्या तू उठलीच आहेस तर थोडस खाऊन घे' तो म्हणाला. नाही अजिबात नाही मला ईच्छा च नाही आहे आर्या म्हणाली. हे बघ तुला कुणी विचारलं नाही मी सांगतोय खाऊन घ्यायचं. तो थोडासा रागवूनच म्हणाला. सिद्धांत please नको ना आता काहीच मी हवं तर थोड्या वेळाने खाईन. त्याने तिचं काहीही ऐकलं नाही तो सुप घेऊनच आला. चल इतकं संपव नंतर पुन्हा खा, आणि आर्या मला नाही ऐकायची सवय नाही,माहिती असेल ना तुला? तो हक्काने म्हणाला. तिला ही माहिती होत आता आपलं काहीही चालणार नाही एकदा हा जिद्दीला पेटला की कुणाचही ऐकत नाही. त्याने आर्याला उठवायला मदत केली तो स्वःत तिला भरवत होता. तो तिला भरवत असतानाच थांबला त्याला काहीसं धूसर आठवलं. सिद्धांत काय झालं? तिने विचारल. आर्या ह्या आधी पण अस कधी मी तुला भरवलं होत का? पण ते आपलं घर नव्हतं आणि तुझही नव्हतं मग कुठे, अस झालाय का आधी काही? तो विचारत होता. तिच्या डोळ्यांमध्ये एकदम पाणीच आले. हो माझा अकॅसिडेंट झाला होता तेव्हा आणि बरोबर म्हणतोय तू ते घर नव्हतं ते hospital होत.सिद्धांत तुला आठवलं हे ! तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती. 'नाही स्पष्ट नाही मला फक्त अस जाणवतंय की अस ह्या आधी काहीतरी झालं आहे'. 'आणि काय तुझा accident झाला होता?' खूप लागलं होतं का? तो आजही तितक्याच काळजीने विचारत होता. 'नाही रे थोडसच'.अच्छा, पण आर्या मला आता अस थोडही जे जाणवलं ना अस AC च्या बाबतीत झालं असत तर..... अरे ठीक आहे आणि काही AC मुळे नाही बिघडली माझी तब्येत. ती त्याला मधेच थांबवत म्हणाली. हो पण indirectly का होईना मीच जबाबदार आहे तू सकाळ पासून माझ्या सोबत असूनही मी तुझ्या कडे लक्ष नाही दिल really sorry for that! अस नव्हतं वागायला पाहिजे मी! अरे ह्यात तुझी काहीही चुकी नाही मुळात मीच लक्ष नाही दिल स्वःत कडे त्याचा परिनाम आहे हा. तू प्लीज स्वतःला दोष नको देऊ नाहीतर मी काहीच खाणार नाही ह! ती म्हणाली. ऐ अशी काय धमकी देतेय! तुला ना आर्या न खाण्यासाठी काहीतरी कारण हवं असत. आणि तुला माहिती आहे का तुला जर बर नाही वाटलं तर admit करायला सांगितलंय, मग बघ विचार कर ! काय!!हॉस्पिटलमध्ये, नाही सिद्धांत please नाही मी तुझं काहिही ऐकायला तयार आहे पण हॉस्पिटल नाही! तू काहीही कर पण मला तिथे नाही जायचं! ती केविलवाणा चेहरा करून त्याला म्हणाली. आता मात्र त्याला आर्या चा चेहरा पाहून हासायला च आलं अग आर्या तू ना खरच लहान च आहे अजून! आणि तुला काय phobia आहे का हॉस्पिटल चा?तो म्हणाला. 'अस समज हवं तर आणि मी लहान नाही आहे पण मला नाही जायचं तिथे!' 'चल मग आता खाऊन घे!' तिने काहीही आढेवेढे न घेता खाऊन घेतलं. हे बघ आर्या आता medicine घे आणि आराम कर. थोडया वेळाने घेते ना आता नको, ठीक आहे नको घेऊ आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ चालेल ना? तो म्हणाला. आण इकडे घेते ती खुप घाणेरडा चेहेरा करून म्हणाली. हे बघ आर्या तू कितीही वाईट चेहरा केलास ना तरीही घ्यावच लागेल तो तिला tablet देत म्हणाला. मी पण कोणाला expressions देतीये एक वेळ दगडाला पाझर फुटेल पण सिद्धांत ला नाही तिने मनातच विचार केला. हो नाही च फुटणार पाझर! तू कितीही expression दिले तरी आर्या मला आठवत नाही म्हणजे मनातलं कळत नाही अस नाही बर! तो म्हणाला. 'अरे यार मी विसरलेच होते ह्याला मनातलं कळत'. खूप घाण लागतात सिद्धांत ह्या औषधी! ती म्हणाली. ह्या वेळेस घे आपण next time डॉक्टरांना सांगू की testy medidicine द्या. तो मिश्कीलपणे म्हणाला. हा जोक तर त्याहूनही घाण होता! ती म्हणाली. i know that but that doesn't matter! तू घे चुपचाप! तो ऑर्डर देतच म्हणाला. आता आर्याने सगळे शस्त्र टाकले आणि गोळ्या घेतल्या. 'good! आता आराम कर'. हो तुलाही ऑफिस ला जायचं असेल ना? ती म्हणाली. तो तिच्या डोक्यावर हात फिरवला तुला वाटत का ह्या परिस्थितीत तुला एकटीला सोडून जाईन का मी?. आणि ऑफिस मध्ये सांगून देईन यायचं होत पण बायकोने खूप त्रास दिला खाण्यासाठी औषधांसाठी! तो हसून म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर फक्त हसू होत. आणि ते पाहून आता तरी त्याला समाधान वाटत होतं.
तो आपलं काम करत बसला आर्या ला बोलून छान वाटलं. मी उगाचच तिचा इतका राग केला का ती अजिबात राग करण्यासारखी नाही आहे. किती वाईट वागतो मी तिच्याशी तरीही ती मनात काहीच ठेवत नाही. तीच खरच दुखत होत पण मला नाही कळलं ते कारण मी मनानी तिच्या जवळ नसतोच कधी. पण मी तिचे अस्तित्व नाकारू शकत नाही काहीही झालं तरी आणि मला आठवत नसले तरीही ती माझी पत्नी आहेच नकळत का होईना मी हे तिच्या समोर बोलून गेलोच, पण ह्या नात्यांचा उपयोग काय हे फक्त लेबल राहील आता आणि म्हणूनच ते मला नको आहे कारण मुळात माझा नात्यांवर विश्वास च नाही! ह्या गोष्टींचा जास्त विचार नको करायला जितका जास्त विचार करू तितकं अधिक गुंतत जात माणूस आता फक्त आर्याचे reports normal यावे म्हणजे झालं. आणि तो पुन्हा आपल्या कामात गढून गेला.
क्रमशः
©Neha R Dhole