"सिद्धांत"त्याच्या आई च्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला. आणि तो कॅमेरा सोडून गेला. छान एकदम मनासारखं झालं माझ्या त्याची आई म्हणाली. सध्या सगळ्या गोष्टी तुझ्याच मनासारखं चाललंय. तो पुटपुटला. 'आर्या, थकली असशील आता आराम कर असेही सगळे गेले'. हो चालेल म्हणून ती रूम मध्ये गेली तिला तिच सामान पण सेट करायचं होतं पण सिद्धांत कडून एक wardrobe मिळवायचा होता. ती त्याचीच वाट बघत होती. किती चांगला वागला ना आज सिद्धांत वाटलं पण नव्हतं इतक्या लवकर सगळं नीट होईन त्यातल्या त्यात तो पूजे साठी पण बसला,सिद्धांत खरच बदलला? आज दिवसभरात एकदाही नाही चिडला तो.ह्या पेक्षा अजून काय पाहिजे. मंदार ची treatment चांगलीच लागू पडली म्हणावी. चला आता सगळं सुरळीत होतंय. इतक्यात सिद्धांत रूम मध्ये आला "अरे आलास तू !" thank you सिद्धांत ती त्याला hug करत म्हणाली. खूप मिस केलं मी सगळं, हे घर, ही रूम,तू ,सतत तुझ्या सहवासात असण आता हे सगळं पुन्हा मिळणार!खूप वाट पाहिली मी! हे सगळं बोलताना तिच्या डोळ्यात पाणी होत."आर्या",त्याने तिला दूर केले सिद्धांत ला काय बोलावं काहीच कळत नव्हत. हे बघ मला तुला दुखवायचं अजिबात नाही आहे, पण तो मधेच थांबला. आर्यने एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं. पण काय? तिचा प्रश्न. हे बघ, मी थोडा स्पष्टच बोलतो मी तुला आर्या, 'मला अजूनही आधीच काहीही आठवत नाही आणि अस एका दिवसात रिऍलिटी accept करणं खूप कठीण आहे अग',म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला? आर्या ने विचारलं. 'तेच तुला सांगतोय ऐक हेच मी आईला समजून सांगायचा प्रयत्न केला पण तिने अजिबात ऐकले नाही आणि तिने हट्ट च धरला की तुला घरी आणायचा. आणि माझ्या समोर दुसरा कोणताच option च नव्हता'. आणि मला तिला अजिबात च दुखवायचं नव्हतं. म्हणून तर खर तर मी तयार झालो ह्या गोष्टीसाठी. सिद्धांत बोलत होता. आर्या स्तब्ध होऊन ऐकत होती. आर्या please समजून घे. तो म्हणाला. पुढे बोल सिध्दांत ती रागातच म्हणालीम्हणाली. तिचा रागातला आवाज बघून सिद्धांत ला चिडायचं कारण च सापडलं. हे बघ आर्या शांतपणे ऐक ! तो थोडस रागाने पण हळू आवाजातच म्हणाला. मी ऐकतीये सिद्धांत तू बोल ना पटकन! ती अजून चिडूनच बोलत होती. आर्या तुला चांगल्या भाषेत समजून सांगितलेलं कळत नाही का मी तुला वाईट नाही वाटावं म्हणून किती अदबीने सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुला नीट बोलताच येत नाही आता मात्र त्याचा चांगलाच पारा चढला. हे बघ सिद्धांत तू कसाही बोलला तरी सत्य परिस्थिती बदलणार नाही आहे. जाऊदे माझंच चुकलं फार अपेक्षा ठेवल्या मी तुझ्याकडून. आर्या संतापाने म्हणाली. माझंच चुकलं मी उगाचच तुझ्या मनाचा विचार करत बसलो ऐक तुला हौस च आली आहे ना मला तुला माझी बायको म्हणून घेण्यात काहीही interest नाही आहे, कळाल!' फक्त आणि फक्त माझ्या आई ला वाईट वाटू नये म्हणून मी तुला घरात आणलं आणि इथून पुढे ही राहू देणार ह्या व्यतिरिक्त आपला काहीही संबंध नाही! is that clear! माझ्या साठी तू फक्त एक आश्रित आहे'. तो अतिशय रागाने म्हणाला. 'झालं तुझं हेच ऐकायचं होत मला'.आणि ती तडक उठून बाहेर निघाली. आर्या थांब, अरे यार ही कुठे निघाली. आर्या खाली आली तिथे सिध्दांत ची आई तिथेच होती. ती ला त्यांना पाहून control नाही झालं. तिने त्यांच्या जवळ एकदम राडायलाच सुरवात केली. ह्या वेळी तिच्यासाठी ती एकच जवळची व्यक्ती होती. काय झालं आर्या का रडत आहेस? सिद्धांत काही बोलला का? ती काहीही बोलली नाही सिद्धांत ने वरूनच हे पाहिलं 'झालं आता ही सगळ बोलणार, आणि ह्या गोष्टीचा आईला त्रास होणार, इतकी कशी मुर्ख आहे आर्या थोडाही डोक्याचा वापर करत नाही'. आर्या बोल ना राजा काय झालं? काय झालं नेमकं तू काहीच नाही बोलली तर मला कस कळणार? सिद्धांत चिडला का? त्यांनी विचारलं ती मानेनेच नाही म्हणाली.मग काय? त्यांचं विचारणं चालूच होत. thank you आई, खूप दिवसांनी अस जगायला मिळाल, मला माझं सगळं परत देण्यासाठी, आर्या म्हणाली.आर्या वेडी आहेस का तू? आता सगळं नीट होतंय तर राडतीयेस का. सिद्धांत ने सुटकेचा श्वास सोडला.आर्याची तब्येत तर ठीक आहे ना? आता तर माझ्याशी भांडत आणि लगेच ट्रॅक सोडला. पण जाऊदे चांगलच झालं. आणि तिच्या जवळ येऊन उभा राहिला. काय झालं आई? त्याने विचारलं. किती नाटकी माणूस आहे हा आताच भांडला माझ्याशी आणि वर तोंड करून विचारतोही काय झालं. तिला अजूनही सिद्धांत चा प्रचंड राग येत होता. काही नाही आर्या म्हणाली. आज तुम्हा दोघांना कितीतरी दिवसांनी सोबत पाहून खूप छान वाटलं. त्याची आई म्हणाली. दोघेही त्यावर फक्त हसले. चला झोपा आता बराच उशीर होतोय सकाळी ऑफिस पण आहे पुन्हा. हो चालायच आर्या? तो तिचा हात पकडून घेऊन गेला.हात सोड माझा इतकं नाटक करण्याची काहीही गरज नाही रूम मध्ये पोहचल्यावर ती म्हणाली. मी पहिलेच सांगितलं हा मला अजिबात interest नाही तुझ्यात ते फक्त आई समोर होती म्हणून, आणि काय ग किती खोट बोलते तू ! आईला रडण्याचं खर कारण का नाही सांगितलं? म्हणजे मला का वाचवलं? हे बघ आर्या तुला अस वाटत असेल की तू हे असलं काही करून माझ्या नजरेत फार महान वगैरे बनणार आहे तर मला असल्या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही त्यामुळे असे प्रकार ह्या नंतर नको करू तो म्हणाला. 'हे बघ माझी आता भांडण्याची अजिबात ईच्छा नाही''मुळात माझी तुला बोलायचीच ईच्छा नाही आहे',' आणि एक गोष्ट clear मी खोट बोलले कारण खर बोलली असती तर आईला त्रास झाला असता' आणि ते मला कळत, 'त्यामुळे मी तुला वाचवलं वगैरे असे चुकीचे गैरसमज अजिबात करून घेऊ नको'. ती रागातच म्हणाली. तिच बोलणं ऐकून तो आणखीन संतापला त्याने रागाने तिचा हात दंडाजवळ पकडला आणि म्हणाला कुणाशी बोलतेस ह्याच भान ठेव हा आर्या! तुला कळतंय का तू काय बोलतीये? माझा हात सोड, दुखतोय तो !ती कळवळून म्हणाली. हे बघ तुझ्या अश्या नाटकांनी मला अजिबात फरक नाही पडत आणि हा विचार आधी करायचा तुला काहीही अधिकार नाही मला बोलण्याचा. सिद्धांत please हात सोड रे माझा, आता मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने पटकन हात सोडला. तिच्या गोऱ्या हातांवर त्याच्या बोटांचे व्रण दिसून येत होते. ती तिथून बाजूला झाली. इतक्यावेळ तिच्याशी rude वागणाऱ्या सिद्धांत ला तिच्या हाताकडे पाहून स्वतःचीच चीड आली,आणि तिची दया आली. तिने आपलं ब्लॅंकेट घेतलं आणि सोफ्यावर झोपण्यासाठी गेली, आर्या तू झोप बेड वर मी झोपतो तिकडे सिध्दांत तिला म्हणाला. तिने अजिबात त्याच्या कडे लक्ष ही दिल नाही. ती ब्लँकेट ची घडी काढण्याचा प्रयत्न करत होती पण तिला एका हाताने काही जमत नव्हतं. तो आला त्याने ब्लँकेट तिच्या अंगावर टाकलं तिने मात्र त्याच्या कडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं तिच्या डोळ्यांतील पाणी आणि हातावरचा व्रण पाहून त्याला त्रास होत होता.
क्रमशः