किल्ले दौलतमंगळ आणि भुलेश्वर मंदिर
शनिवार दिनांक २३.०२.१९ सकाळी ४. ०० वाजता आमचा दिवस चालू झाला...जवळ जवळ १ वर्षांनी एका मित्राला भेटायला जायचे होते..स्थळ होते पुणे
आधी ठरल्याप्रमाणे मी आणि भिवाजी दोघे ठाणे स्टेशनला भेटलो सकाळी ५.४५ ला .. २२१०५ इंद्रायणी एक्सप्रेस पकडून जायचे ठरले..किती जण येणार ते माहिती नव्हते .. त्यामुळे रिझरवेशन आम्ही केले नव्हते...आणि आम्ही अंदाज बांधला होता..आम्ही दोघे जण जाणार म्हणजे रेल्वे आमच्यासाठी २ सीट त्यापण जनरल मध्ये राखून ठेवणार...ठाणे ला आत घुसतानाच मारामारी बसायला काय कपाळ मिळणार.. त्यात आत घुसत असताना..माझ्या बॅगेचे दोन्ही पट्टे एका आजीने जोरात खेचले..का तर तिला वर चढता येत नव्हते..आणि ऐन वेळेला समोर मीच आलो..मग काय बोलणार...
आत जाऊन बघतो तर ट्रेन फुल्ल पॅक..मग फक्त बॅग वर ठेवायला कशीतरी जागा मिळाली...आम्ही उभेच उरली सुरली जी काही जागा राहिली होती...ती पण कल्याण जंक्शनला भरून निघाली...मग काय पार शिवाजीनगर पर्यंत आम्ही उभेच... शिवाजीनगरला जरा कुठे टेकायला जागा मिळाली...तेवढ्यात पुणे जंक्शन आले ९.१५ वाजले असतील ...आमच्या नशिबाने प्रसाद आम्हाला घ्यायला स्टेशन वरच आलं होता...आणि जवळ जवळ तीन तासांनी आम्ही बसलो गाडीत...व्वा काय वाटले असेल सांगू तेव्हा.. आमचा प्लॅन असा होता पुणे जंक्शन ते किल्ले दौलतमंगळ आणि भुलेश्वर मंदिर परत रिटर्न राष्ट्रीय युद्ध स्मारक दक्षिण कमांड ते श्री. महादजी शिंदे छत्री... जवळ जवळ तीन ते चार तासात सर्व आटोपणार होते...
पण पण आधी पोटोबा आणि मग....लोणी काळभोर चा टोल नाका पुणे पॅरा केल्यावर एक छोट्या पण साध्या हॉटेल मध्ये गेलो..तिथे काही वेगळं म्हणून ऑर्डर दिली २ "वडा-सॅम्पल" आणि "मिसळ पाव"...आम्हां मुंबईकरांना वाटले एका बशीतना ऑर्डर येईल...बघतो तर काय.."वडा-सॅम्पल" म्हणजे लाल तर्री त्यात दोन्ही वडे आकंठ डुबलेले...बाजूला पापड,काकडी,मिरची आणि तिखट लागले तर २ छोटे गुलाबजाम...व्वा ते बघूनच पॉट भरले..मुद्दामुन फोटो नाही काढला..जा स्वतः आणि खाऊन बघा... मस्त ढेकर दिला आणि आमच्या मित्राला ला भेटायला आम्ही चौघे निघालो...मी,प्रसाद,भिवाजी आणि प्रसादची कार...लोणी काळभोर ते किल्ले दौलतमंगळ आणि भुलेश्वर मंदिर अंतर ५० ते ५५ मिनिटांचे आहे...सोलापूर पुणे हायवे ने यवत गावी यावे आणि तिथून उजवीकडे वळले कि दौलतमंगळ काही वेळातच आपल्याला खुणावू लागतो...आणि गावकुस सुरु होते...एक छोटासा घाट आहे.. आणि घाट बघत जाणवते..कि तो रस्ता तयार करण्यासाठी किती कष्ट करावे लागले असतील...
गाडी एकदम भुलेश्वर मंदिराजवळ जाते...दोन बुरुज आणि एक प्रवेशद्वार याच्याशिवाय किल्ले दौलतमंगळ चे अस्तितव काहीच नाही...मात्र ती कसर
भुलेश्वर मंदिर भरून काढते..आखीव रेखीव बांधकाम...मंदिरात खालून वर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांमुळे मंदिर दुमजली वाटते...बाहेर कळकळीत ऊन असले तरी मात्र मंदिर परीसरात आणि आत मंदिरात थंडगार वातावरण आहे...मंदिर पाहताना वेळ कसा जातो तेच काही कळत नाही...
मंदिर पाहून झाल्यावर आम्ही अचानक प्लॅन बदलला आणि थेऊर च्या चिंतामणी चे जाऊन दर्शनघेतले..जास्त नाही ४० ते ५० मिनिटे वेळ लागला..पोचायला..दर्शन घेऊन १० ते १५ मिनिटांत बाहेर पडलो...छान छोटं आणि आटोपशीर मंदिर आहे १५ रुपयात जेवण...आणि मंदिराजवळच भक्तनिवासाची सोय देखील उपलब्ध आहे... फोटो नाही काढले..कारण मंदीरात जाताना जागोजागी पाट्या लावलेल्या दिसतात..फोटो काढणे निषिद्ध आहे.. नंतर जेवण आटपून पुणे जंक्शनला येई पर्यंत ५. ३० वाजले होते... संध्याकाळची ५.५५ ची इंटरसिटी एक्सप्रेस पकडायची ठरवली होती.. वाटले आरामात बसायला मिळेल पण बघतो तर काय... ट्रेन ५. १५ लाच येऊन उभी राहिली होती आणि जनरल मध्ये बऱ्यापैकी गर्दी होती..झाले आतापण उभे राहायचे.. मग काय तेच..बसायला जागा एकदम ठाणेला..पण काही वाटले नाही घरी परतायची आस लागली होती आणि आमच्या पिल्लांची आठवण पण येत होती.
अजून एक मित्र भेटला (दौलतमंगळ) आणि बोलला आमच्याशी आणि गुढघे जाणीव करून देत होते..बास झाले ट्रेंक्क आता पाहिल्यासारखे झेपत नाही आणि जमत हि नाही...पण मन मात्र अजून बोलते...अजून एक बस्स अजून एक...हे ट्रेकिंग चे भूत..एकदा मानगुटावर बसले कि तुमचा सहजासहजी पिच्छा नाही सोडणार...कितीही तुम्ही प्रयत्न करा..चला बाय पुन्हा एकदा भेटू...अजुन खुप साऱ्या मित्रांची आणि तुमची ओळख करून द्यायची आहे...
फोटो पहाण्यासाठी माझ्या फेसबुक अकाउंट ला नक्की भेट द्या....
फेसबुक वर मला मिलिंद कल्पना राजाराम धनावडे ( पूर्ण मराठीत) ह्या नावाने शोधा
अधिक माहितीसाठी ट्रेकक्षितीज च्या साईट वर हा किल्ला शोधा
http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Daulatmangal-Trek-D-Alpha.html