किती हळवे असते नाही आपले मन. क्षणात हसते, तर क्षणात रुसते. क्षणात कोणावर तरी जडते. तसच तीच ही. तिने पहिल्यांदाच त्याला पाहिलं. सहा फुट हाईट. गोरा रंग. डोळ्यावर चष्म्या. ब्लॅक पॅन्ट आणि लाईट ब्लू कलरचा शर्ट. नवीन ऑफिस मध्ये तो तिला पहिल्यांदाच दिसला. त्याच क्षणी स्वतःचे हृदय त्याला देऊ केलं.
इतर मैत्रिणीकडून येत्या आठवड्याभरात ओळख ही काढली. तो सिंगल म्हणुन ही मात्र खुश झाली. मग रोज येता जाता त्याला बघणं. त्याच्या बोलण्याची स्टाईल, चालण्याची स्टाईल. अगदी वेडी झालेली ती. म्हणजे तशा ऑफिसमधल्या सगळ्याच मुली त्याच्यावर फिदा होत्या. पण ही मात्र जास्तच.
धाडस करून एकदा तो कॉफी पित असताना जाऊन ओळख काढली. "हाय...मी प्रांजल. न्यू ज्योईन झालेय." त्याने फक्त एकदा बघितले आणि परत कॉफी पिऊ लागला. पण ती आज ओळख करूनच जायचं ठरवुन आलेली.
परत एकदा तिने स्वतःचा खाऊच डब्बा पुढे करत विचारलं, घेणार का..? त्याने फक्त एक हलकी स्माईल देत नको म्हटलं. "घ्या ओ पैसे नाही घेणार मी", अस बोलताच त्याला हसू आलं. मग गप्पपणे एक बिस्कीट घेत खाऊ लागला.
ती झालेली ओळख पुरेशी होती त्यांच्या नात्याला.
हळु हळु मैत्री आणि मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर झाल हे त्यांनाही नाही कळलं. आता ती बॉस होती ऑफिसमध्ये नाही, रिअल लाइफमध्ये. छान चालु होते त्यांचं. फिरणं, एन्जॉय करण. एकत्र घालवलेला वेळ तिच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा होता. असेच दोन वर्षे कशी झाली हे त्यांनाही कळलं नाही. छान चालू असताना एके दिवशी त्याने तिला भेटायला बोलावले. ती रोजच्या सारखी हसत त्याला भेटायला गेली. पण तिला काय म्हाहित होते की आज काय वाढुन ठेवलंय तिच्यासाठी पुढे.
त्यांच्या रोजच्या कॅफेमध्ये तो तिची वाट बघत होता. ती येताच तिने त्याला मिठी मारली, त्याने ही मारली. पण त्या मिठीत तो आपलेपणा नव्हता. त्याच तिला जरा वाईट वाटलं.
कॉफी मागवत तिने त्याला का बोलावले म्हणून विचारताच.. त्याने फक्त "यापुढे हे नाते मला टिकवता येणार नाही", एवढेच म्हणत तो उठुन निघून ही गेला.
एक क्षण तिला कळलंच नाही काय झालं. स्वप्न बघत आहोत असं तिला वाटलं. पण ते सत्य होत जेव्हा वेटर त्यांची कॉफी घेऊन आला. आता समोर दोन कप कॉफी होती. पण तिच्या सोबत ती पिणार तो मात्र केव्हाच निघुन गेलेला.
कशी बशी दोन्ही कॉफी तिने संपवल्या आणि बिल पे करून तडक घरी निघाली. डोक्यात फक्त एकच वाक्य घुमत होत, "यापुढे हे नाते मला टिकवता येणार नाही", का..? कशाला..? काय प्रॉब्लेम आहे.. न सांगता तो निघुन गेलेला.
घरी आली आणि तडक आपल्या रूमध्ये जात तिने त्याला कॉल केला. नंबर बंद दाखवत होता. एकक्षणी वाटलं नंबर बंद आहे की, मलाच ब्लॉक केलंय. मनाला पटवून तिने परत परत कॉल केले पण मोबाईल मध्ये एकच वाक्य येत होतं. "तुम्ही करत असलेला नंबर बंद आहे. जरा वेळाने पुन्हा प्रयत्न करा." ती रात्र उशी भिजून गेलेली.
स्वतःला सावरत दुसऱ्या दिवशी ऑफिस ला गेली. तोच दिवस शेवटचा आपल्या आयुष्यातला आहे असा भास तिला झाला. ऑफिसमध्ये पूर्वी सारखाच तो, पण एका केबिनमध्ये बसुन छान कॉफीचा एक एक घोट घेत होता.
लंचमध्ये कानावर आला की प्रमोशनसाठी तो बॉसच्या मुलीसोबत लग्नासाठी तय्यार झाला. येत्या रविवारी त्यांचा साखरपुडा ही आहे असं कानावर आल. तिच्या मात्र पायाखालची जमीन सरकली. काही लोक तिच्या आणि त्यांच्या नात्याला ही नाव ठेवत होते. फक्त टाईमपास होता. तो तिला मूर्ख बनवत होता आणि ती बनली. यावर टाळ्या देऊन सगळे हसत होते. तिला काय करावे सुचेना. बस उठली वॉशरूममध्ये निघून गेली. परत आली ती नोकरी सोडण्याचा निर्णक घेऊनच. तडक अर्ज भरून तिने तो जॉब सोडला.
प्रमोशन खातर स्वतःच्या प्रेमाचा बळी त्याने घेतला होता. एवढं स्वस्त झालंय का प्रेम...
तिने मनाशी पक्क करत रात्र जागवली. सकाळी उठुन बॅग भरत ती गावी निघुन गेली. आई-वडिलांजवळ. काही दिवस त्रास झाला शेवटी प्रेम जे केलं होतं. पण त्याने मात्र ते टाईमपास समजून सोडून दिले होते एक प्रोमोशनसाठी. स्वतःला सावरत एक वर्ष कधी गेलं कळलंच नाही.
काही कारणास्तव पुन्हा मुंबईत येन झालं. त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पण स्वतःच्या मनावर ताबा ठेवत तिने इकडे ज्यासाठी आलोत ते करून निघू अस मनात ठरवले.
स्वतःच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी आज ती परत एकदा मुंबईत आलेली. पण लग्नात परत त्याची भेट झाली. आधी सारख त्याच्या चेहऱ्यावर ते तेज नव्हतं. तो टापटीपणा ही गेलेला. तिला बघताच तो शुध्दीत आला. भेटायची इच्छा होत असल्याने एका संधीची वाट बघत असतानाच त्याला ती मिळाली. ती समोरून येत होती. त्याने तिला बाजूला घेत तिची तो माफी मागू लागला. भेटण्यासाठी होत जोडू लागला. मग तिने भेटायच ठरवल. "उद्या दहा वाजता त्याच कॅफेमध्ये", सांगत ती निघून गेली.
आजही तोच लवकर येऊन तिची वाट पाहत होता. ती आली पण आधी सारखी स्माईल नव्हती. त्याने मिठी मारण्यासाठी म्हणुन पुढे येताच तिने फक्त हात पूढे केला.
ती बसत तिने वेटर ला कॉफीची ऑर्डर दिली. तो बोलू लागला.
मी खरच खुप मोठी चुक केली ग तुझ्यासारख्या माझ्यावर खर प्रेम करणाऱ्या मुलीला सोडुन मी त्या बॉसच्या मुलीसोबत लग्न केलं. आधी चांगकी वागायची ती, पण नंतर नंतर तिच्यातला सायकोपणा बाहेर येऊ लागला. मला कोणासोबत बघितल की, घरी गेल्यावर जेवायला द्यायची नाही. माझा मोबाईल तर रोज चेक करते. रात्रीची झोप नाही. अशाने माझी तब्बेत बिघडत आहे.. मीच चुकलो तुला सोडून त्या मूर्ख मुलीशी लग्न केलं.. माफ करशील का ग मला..." त्याने आपली मान खाकी झुकवली. "आपण परत एकत्र येऊ. मी तुझ्यावर आधी सारख, त्याहून जास्त प्रेम करेन." अशी वचन तो तिला देत होता.
पण तिच्या चेहऱ्यावर फक्त एक स्माईल होती. वाफळलेली कॉफी समोर होती. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि एकदा कॉफीकडे. आणि ती बोलू लागली, "जस एखादी काच तुटल्यावर ती जोडता येत नाही ना, तसच आपलं हे नातं ही पून्हा जोडणं मुश्कील आहे." आणि ती तिथुन उठुन निघून गेली.
तो तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीला बराच वेळ बघत राहिला. किती तरी वेळ तो तसाच बघत होता. स्वतःच्या नशिबाला कोसत.
=========★■★=======
********■■◆■■*******
नाती जपा जेव्हा ती वेक्ती जवळ आहे,
म्हाहित नाही कधी कोण निघून जाईल.
प्रत्येक क्षण साजरा करा जोपर्यंत ती वेक्ती सोबत आहे,
नाहीतर आयुष्यभर जोडत रहाल तुटलेल्या नात्याचे तुकडे.
********■■◆■■*******.