किल्ले कर्नाळा...एक फसलेली मोहीम (थोडक्यात आमचा पोपट झाला तो दिवस) ०२.०५. २०१०.
झाले ठरले " किल्ले कर्नाळा." करायचा आम्ही सहा जण तयार झालो अमित ,अनिल ,भिवाजी ( ठाणे ला भेटणार होते) ,किरण ,प्रसाद आणि मी ( दादर ला भेटणार होतो ).. आठवडाभर अगोदर ठरवून झाले... दादर स्टेशनला सकाळी बरोबर ६.०० वाजता भेटायचे..त्यात काही अस्मादिक दादर स्टेशन वर बरोबर अगदी ८ वाजता पोहचले ते साहेब म्हणजे आमचे किरण साहेब ...मी आणि प्रसाद अगदी ५. ५५ पासून वाट पाहत होतो..जेव्हा कधी किरण ला कॉल करत असू तेव्हा त्याचे उत्तर एकच होते...अरे चिंचपोकळी स्टेशनला ला उभा आहे...हा काय ट्रेन मध्ये चढलो आहे... दादर ते चिंचपोकळी तब्ब्ल २ तास..त्या २ तासात तो नक्की काय करत होता ..ते अजून नाही कळलेले .
शेवटी एकदाची ठाणे ट्रेन पकडली ... आणि यथावकाश ठाणेला उतरलो..बघतो तर काय तिथे फक्त अमित आमची वाट पाहत उभा होता...बाकी दोघे तारे अजून उगवले नव्हते....कारणं तर काय भिवाजी : " अरे नाही रे डोळा लागलेला नाही उठलो वेळेवर.... अनिल " अरे यार मेरा सॉक्स नाही मिल रहा था...तेव्हा अमित ने त्याची कारणे ऐकून जे काही त्यांचा उद्धार केला होता ....तौबा तौबा...असो.
शेवटी ६ जण एकत्र आलो आता ठाणे स्टेशन बाहेरून लाल डब्बा पडणार तेव्हढ्यात अमित पोटावर हात ठेऊन कळवालायला लागला...कारण पोटात खड्डा पडला होता... ठाणे स्टेशन वरचे सगळे कावळे त्याच्या पोटात बसून ओरडत होते.. मग काय ट्रेंक्क राहिला बाजूला ..st सुटली आणि हॉटेल मध्ये जाऊन आम्ही ८ मिसळ पाव आणि ६ चहा उडवल्या ...कावळे शांत होईपर्यंत ११.०० वाजले होते..११. १५ ची st पकडली पनवेलला जवळजवळ १२. १५ ला पोहचलो.. तेथून अजून अर्धा तास " किल्ले कर्नाळा." ...बस मधून उतरणार तेवढ्यात इतका वेळ गप्प असलेल्या किरण ने ..बस कंडकट्टरला एक निरागस प्रश्न टाकला.. हि ST तिथे वर किल्ल्यावर जाते का ?? झाले...कंडकट्टरला चक्कर यायची तेवढी बाकी राहिली होती.
असो आता अर्धा दिवस सरला होता १.३० ते १.४५ वाजले होते...आणि पुःन्हा अमित पोटावर हात ठेऊन कळवालायला लागला...मग पुन्हा मी भिवाजी अमित आणि प्रसाद फक्त पैसे घेऊन वडा-पाव आणायला निघालॊ आणि एक शाणपणा केला सर्वांचे मोबाईल माझ्या बॅगेत टाकले आणि वडा-पाव आणायला जाताना मी माझी समजून भलतीच बॅग आणली.... हॉटेल शोधता शोधता अजून अर्धा तास वडा-पाव घेऊन निघणार तेवढ्यात आम्हा तिघांच्या पोटात कळवालायला लागले मग काय अजून ३ मिसळ पाव स्वाहा, वडा-पाव घेऊन किल्ले कर्नाळा. प्रवेश करेपर्यंत २. ३० वाजले..आणि अमितच्या पोटाच्या दुखन्याणे पुन्हा उचल खाल्ली...मग त्याला एका मी आणि अनिल ने झाडाला टेकून बसवले आणि त्याच्या समोर वडा-पाव आणि कांदा-भजी ठेवली ...ती खाऊन आराम करून नंतर सर्वात शेवटी ट्रेकिंग ला सुरवात झाली ३.०० वाजता..मध्येच एखादा स्पॉट बघून आमच्यातले चॉकलेट हिरो फोटो काढण्यात मग्न होते ... अर्धा तास चालून झाल्यावर पहिला हॉल्ट घेतला ...जेव्हा बाकीचे ग्रुप परतीच्या प्रवासाला लागले होते तेव्हा आम्ही वर्तीच्या प्रवासाला लागलो होते..
काही अंतरावर चालून आल्यावर एक उजवीकडे आणि एक डावीकडे २ रस्ते लागले...मग आम्ही मोठ्ठा शाणपणा केला...छापा- काटा उडवूंन रस्ता पकडला डावीकडचा....हाच तो क्षण आणि हीच ती वेळ आमचा पोपट व्हायला सुरवात झाली...काही वेळ चालून गेल्यावर ग्रुप फोटोसाठो एक दगडावर बसलो फोटो काढून झाला...पुढे निघालो ...आजून थोड्या वेळाने पुन्हा एक दगडावर बसलो फोटो काढून ...पुन्हा निघालो आणि पुन्हा तोच दगड.. आम्हाला वाटले असेल सर्व एकसारखे ..थोडे पुन्हा वळून आलो पुन्हा तोच दगड....शेवटी कळले आम्हाला आमचा पूर्ण पोपट झाला आहे ...फिरून फिरून ४ वाजले होते.. तेव्हा मात्र एकमताने शाणपणा करून आम्ही यशस्वी माघार घेतली आणि परतीच्या वाटेला लागलो... "कर्नाळा." अभयअरण्याच्या बाहेर आलो आणि बाहेर "इथून इथे जा आणि तिथून तिथे जा आणि इथून गेल्यावर इथे वर किल्य्याची पायवाट लागेल असे त्यात ठळक अक्षरात आणि स्पष्ट लिहिले होतं "