" excuse me ... अनुजा miss.. " विनयने हाक मारली. " तुम्ही कविता करता ना..." अरेच्या !! याला कसे कळले .. अनुजा विनय जवळ आली.
" तुम्हाला कसं कळलं ते... " ,
" मला माहित आहे... शिवाय तुम्ही गाता आणि गिटार सुद्धा वाजवता ना... बरोबर ना... " याला कसे माहित हे सर्व... अनुजाच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह.. " का बंद केलंत ... तुम्ही तर ऑफिसमध्ये सुद्धा गायचा ना... मग आता का बंद केलंत सारे... " यावर मात्र अनुजाकडे उत्तर नव्हते आणि तिला तो विषयही नको होता. तशीच वळली आणि चालू लागली. विनय काही बोलू लागला मोठयाने.
" कोण आहेस तू...
सकाळी डोळे उघडल्या वर पहिल्यांदा होणारा किरणांचा स्पर्श,
की हवेत दरवळणारा मोगर्याचा सुवास.
कोण आहेस तू...
कोणी तरी मला हळूच बघतय़ ह्याचा होणारा आभास,
की वा-या सोबत मानेवरुन घसरण्यार्या केसांमध्ये तुझा होणारा खट्याळ भास.
कोण आहेस तू...
सकाळी किलबिलणार्या पक्ष्यांच्या सुरेल गीतां मध्ये
तुझ्या निखळ हास्याचा होणारा भास,
की मी तुझ्या सोबतच आहे असा प्रत्येक क्षणी
येणारा तुझा दिलासा.
कोण आहेस तू...
मन म्हणतं की मी ओळखलयं तुला,
पण दुसर्याच क्षणी मनात येणारा प्रश्न,
खरचं, खरचं ओळखलय का मी तुला..
अजून ही माझ मन एकच विचारतो प्रश्न,
काय सांगू ह्या मनाला कोण आहेस तू...
कोण आहेस तू... "
ते ऐकून अचानक थांबली ती. आपलीच कविता हि... तशीच वळून ती विनय जवळ आली.
" तुला ... i mean तुम्हाला कशी माहित हि कविता... " विनयला माहित होते अनुजा नक्की येणार फिरून.
" तुमच्या लॅपटॉपमध्ये सापडली. सॉरी हा... but त्यादिवशी तुम्ही चंदनकडे दिला होता ना लॅपटॉप ... रिपेअर साठी. तर त्याला काहीतरी वेगळे काम होते म्हणून माझ्याकडे दिला. रिपेअर करून झाल्यावर तुम्हाला परत देणार होतो तर तुम्ही निघून गेला होता. मग विचार केला.. आतमध्ये डोकावून बघूया... तर खूप आतमध्ये ... हि कविता सापडली. खूप छान आहे.... मीच किती वेळा वाचली माहित नाही... पाठ सुद्धा झाली बघा. खरच खूप छान आहे. थांबवू नका लिहिणे.. " आता याला काय रिप्लाय करू ... खरच ती कविता अनुजाला खूप जवळची होती.
" तुम्हाला माहित आहे का ... मला का आवडली कविता... कारण ती तुम्हाला आवडली.. बघा... आपल्या आवडी किती जुळतात... मीही कविता करतो... तुम्हीही करता... गाणी , गिटार तर आहेच... गजल ऐकायला आवडतात... " ,
" जगजीत सिंग ... ना " अनुजा पट्कन बोलली.
" हो.. तेच तर...आपल्या आवडी खूप same आहेत ना... खरंतर , आपल्याला आधीच मित्र असायला पाहिजे होते... " विनय पट्कन बोलून गेला. अनुजा हसली त्यावर. " सॉरी हा... पट्कन बोललो.. " ,
" its ok .. no problem ... पण मी नाही बनवतं नवीन मित्र आता ... आणि गाणी, गिटार ... सगळे सोडून दिल आहे सध्या... हि कविता कोणालाही ऐकवू नका... please ... " ,
" इतकी छान तर आहे कविता.. तुमच्या आवडी का बंद करता.. वाहू दे त्यांना वाऱ्यासारख्या... बाकीचे जाऊ दे... मित्र तर होऊ शकतो ना आपण.. जर तुम्हाला वाटतं असेल तर.. ".... विनय...
" मिस्टर विनय ... खूप फास्ट आहात तुम्ही ... आणि मैत्रीचं ... बघूया.. आता ऑफिसमध्ये जाते... तुम्ही सुद्धा या आता ऑफिस मध्ये... काम असते ना.. कि देऊ माझ्याकडेच... " अनुजा हसतच गेली.
विनयला सुद्धा मोकळं मोकळं वाटलं बोलून. मग निघाला तोही. लिफ्ट जवळ आला. लिफ्ट वरून खाली आली. दरवाजा उघडला तर दिक्षा लिफ्ट मध्ये. ती काही बोलणार ते विनयचं बोलला. " का सारखं माझ्या मागे मागे... बघावं तिथे मागून येतेस... काय सुरु आहे तुझं... " विनय भरभर बोलून गेला. आणि लिफ्ट मध्ये शिरला. अरे !! याला काय वेडबिड लागलं आहे का ... दिक्षा बघतच राहिली त्याकडे. पण लिफ्ट चा दरवाजा बंद होताना विनय हसताना दिसला तिला. तिलाही हसू आलं. खरच पागल आहे हा ...
============================================================
दिक्षाच लक्ष नव्हतं आज कामात. राहून राहून तिला विनयची आठवण येतं होती. काम तसंच बाजूला ठेवलं आणि ऑफिस मधून खाली आली.. कुठे जाऊ आता... मनात म्हणत असताना तीच लक्ष बागेत गेलं... विनयची रातराणी होती तिथे ना.. बहरून आलेली.... कितीतरी कळ्या... रात्रीची वाट बघत होत्या... उमलायचे होते ना त्यांना... दिक्षा आली तिच्याजवळ. रातराणी वरून मायेने हात फिरवला. विनय असंच करायचा ना ... गोंजारायचा तिला. तिथेच बसली दिक्षा. विनयची आठवण काढत... का आले ते रिपोर्ट... पण .... विनयचं का आला माझ्या life मध्ये... ये ना विनय ... वाट बघते आहे तुझी.. रातराणी तिला आता अस्पष्ठ दिसू लागली .... डोळ्यात पाणी जमा झालेलं ना...
============================================================
" कुछ लोग पास होते है जिंदगी में ,
पर कुछ कुछ खास है जिंदगी में,
अक्सर मांगा था खुदा से वो मिला तो नही,
लेकिन आपकी दोस्ती प्यार से कम भी तो नही,
आपकी एक मुस्कुराहट सुकून है इस दिलका,
वैसे तो कभी बताते नही आपको हाल इस दिल का,
अब तो तनहाई मे भी आपके के खयाल रेहता है,
क्या करें,आप इस दिल में जो रहेते हैं ...... "
अनुजाने तिची कविता संपवली. " टाळ्या !! टाळ्या बजाओ बच्या लोग... " विनय टाळ्या वाजवत उभा राहिला. बागेत असलेले बाकीचे लोकं या दोघांकडे पाहू लागले. अनुजाने पट्कन त्याचा हात पकडला आणि खाली बसवलं. " सॉरी !! " अनुजा सर्वांकडे पाहत म्हणाली.
" किती आगाऊ आहेस तू... काय हा वेडेपणा... अजूनही सगळे आपल्याकडे पाहत आहेत. निघूया चल ... " अनुजा निघाली सुद्धा.
" अरे !! थांब तर .... " अनुजा पार गेट पर्यंत पोहोचली होती. नाईलाजाने, विनय सुद्धा बाहेर आला मग. अनुजा त्याच्या बुलेट जवळ उभी. " एवढी छान कविता केलीस. ती सुद्धा हिंदीमध्ये ... wow .. too good .... " ,
" पुरे झाली स्तुती... सुरु कर तुझी बुलेट... " ,
" आणखी थोडा वेळ बसलो असतो तर ... ".... विनय...
" नको , राहू दे... तुझा वेडेपणा वाढला असता आणखी. " अनुजा त्याच्या मागे बसत म्हणाली .
" आता कुठे जायचे.. ? " ,
" मला घरी जायचे आहे. तू मला पुढच्या सिग्नलला ड्रॉप कर ... " ,
" ड्रॉप करू तुला.... लागेल ना तुला मग... " विनय मस्करीत बोलला. तशी अनुजाने त्याच्या पाठीवर चापट मारली.
" खरच... खूप आगाऊ झाला आहेस आजकाल.... By the way, एक विचारू का " ,
" नको " विनय हसत म्हणाला.
" विचारणार मी... तुझा पहिला जॉब ना .. मग हि बुलेट कशी तुझ्याकडे... तुझ्या पप्पांची आहे का.." ,
" नाही ग.. मी स्पर्धामध्ये जायचो ना.. कॉलेज मध्ये असताना... तेव्हा एकतरी बक्षीस हमखास ठरलेलं असायचे. पहिलं नाही पण बाकीच्या नंबर मध्ये असायचो... कधी काळी पहिला यायचो. तेव्हा पैसे मिळायचे ना, ते साठवलेले पैसे आणि बँकमधून थोडे Loan... झालं काम. मला घेयाची होतीच.... बरं पडते कुठे फिरायला गेलो कि... " अनुजाचे ठिकाण आले.
" चलो bye ... then... " ,
" Bye नाही बोलायचे पोरी.. see you बोलायचे... ",
" ok ... बाबा...see you " अनुजा हसतच गेली.
-------------------------- क्रमश: ------------------