PETH FORT OR KOTHLIGAD FORT in Marathi Travel stories by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE books and stories PDF | पेठ किंवा कोथळीगड

Featured Books
Categories
Share

पेठ किंवा कोथळीगड

पुन्हा एकदा गुलाबी थंडीच्या रविवारी आमच्या अंगातली मस्ती उफाळून आली आणि आम्ही सकाळच्या ६ . १८ च्या कर्जत ट्रेन ने कर्जत गाठले ह्या वेळेला आम्ही गड निवडला (पेठ/कोथळीगड) … ट्रेन बरोबर ८. ०० वाजता कर्जत ला पोहचली…आणि तिथून कर्जत इस्ट ला ५ मिनिटांवर असलेले S. T stand धावत धावत गाठले तेव्हा समजले गडा जवळ जाणारी पहिली बस ८. ३० ची आहे … तो पर्यंत मग नाश्ता करून घेतला आणि मग ८. ३० ची जामरुख S.T पकडली आणि आंबिवली गाठले…. आंबिवली शेवटून २ रा stop असल्यामुळे गाडीत गर्दी ही तो पर्यंत कमी झाली होती आम्ही चार ( मी , प्रसाद , भिवाजी आणि अमित आणि अजून काही ५ ते ६ आमच्यासारखे भटक्या जमातीचे लोक होतो ).…जवळ जवळ तासाभराने गाडी आंबिवली ला पोहचली .... कंडक्टर ला सांगितले त्याने आम्हाला बरोबर उतरवले,जिथे उतरलो तिथेच "कोथलागड " ( मालक . गोपाळ सावंत ) नावाचे हॉटेल आहे… तिथे शाकाहारी आणि मासाहारी जेवणाची सोय होते.पुन्हा एकदा थोडा नाश्ता करून आम्ही चालायला सुरुवात केली...

गडाकडे जाणारा रस्ता त्याच हॉटेल जवळून गेला आहे १५ ते २० मिनिटे काहीच वाटले नाही... पण एके ठिकाणी डांबरी रस्ता संपतो आणि अस्सल सह्याद्रीचा लालेलाल मातीचा रस्ता चालू होतो..तिथुन फक्त ११ नंबरची गाडी...मध्येच वारा आला कि हि मुठ मुठ भर धूळ नका तोंडात जात होती... आणि वरून तापलेले कळकळीत ऊन्ह.. रस्ता फार थकवणारा आहे जवळ जवळ हॉटेलपासून १. ३० ते २. ०० तास किल्य्याच्या पायथ्याचे गाव गाठायला लागले. तिथे काही शाळकरी मुले लिंबू सरबत विकत होते..प्रत्येकाने २ ते ३ तीन ग्लास रिचवले आणि पुढे झालो..त्या मुलांनीच सांगितले रस्ता चुकलात तर हि शाळा लक्षात ठेवा...आजुबाजुला कसलीच सोय सुविधा नाही काय जीवन असेल तिथे त्या लोकांचे असो... … पण बऱ्याच दिवसांनी मस्त पायपीट झाली .

थोडे अजून १५ ते २० मिनिटं चाललो आणि गडाच्या पायऱ्या दिसल्या...तिथे भली मोठी गुहा दिसली १५ ते २० जण आरामात राहतील एवढी जागा होती गुहेत छताला आधार देणारे कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. गुहेत ४-५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जुने तोफेचे गोळे आहेत.
गड माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या एकसंघ कातळातून कोरून काढल्या आहेत. वरती पाण्याची ३ टाकी... बस गड पाहायला ३० ते ४५ मिनिटे पुष्कळ होतात....

किल्ल्यात बघण्यासारखे काही जास्त नाही पण वरून दिसणारा आजुबाजुचा परिसर बघून सारा थकवा कुठच्या कुठे निघून जातो एक दिवसात किल्ला आणि आसपासचा परिसर पाहून होतो …थोडा आराम करून आम्ही गड उतरलायला सुरुवात केली आणि थोडे खाली उतरून आलो आणि आम्ही रस्ता चुकलो थोडे थांबलो आणि तिथुन येणाऱ्या आजोबांना रस्ता विचाराला "कोथलागड" हॉटेल ला जायचा रस्ता ...थोडे चाललो त्यांचा पाठून आणि ते बोलले आज इतेच वस्ती का आम्हाला कळेच ना असे का विचरतात आहे ते ... आम्ही बोललो तिथुन गाडी पकडून आम्हाला कर्जत गाठायचे आहे...तेव्हा ते बोलले अहो पाव्हणं ते हॉटेल राहालं त्या डोंगऱ्याचं पल्याड..."कोथलागड" नावाचेच हॉटेल तिथे खाली गावात हि आहे ते सुद्धा गोपाळ सावंत ह्यांच्या बंधूचे ... मग चुकलेला रस्ता नीट शोधला आणि मेन रोड ला आलो ... नंतर असेहि कळले कि आंबिवली "कोथलागड" हॉटेल जवळून ५ ते १० मिनिटापासून काही लेणी आहेत. पण वेळ झाला असल्यामुळे तिथे नाही जाता आले . यथावकाश रिक्षा पकडून कर्जत गाठले आणि मुंबई गाठली .


कर्जत स्टेशन ला आंबिवली पासून "कोथलागड" हॉटेल जवळून दुपारी २. ३० आणि ५. ३० ची बस आहे … त्या चुकल्या तर ६ आसनी रिक्षा ६०० ते ७०० रुपये भाडे घेतात...