हॅलो, हा आई बोल काय झालं ह्या वेळेला फोन केला सगळं नीट आहे ना? आर्याने विचारलं. अग हो आर्या सगळं नीट आहे थोडा श्वास तर घे सगळं एकाच दमात बोलून गेलीस.आणि माझ्या मुलीला मी कधीही फोन करू शकते ना? बरोबर ना? सिद्धांत ची म्हणाली. हो पण हा वेळ सिद्धांत चा घरी येण्याचा आहे सहसा आपण ह्या वेळेला बोलण्याचं टाळतो म्हणून म्हणाले. नाहीतर आपल्याला बोलायला कुठलं आलंय वेळेच बंधन. आर्या म्हणाली. हो ते ही आहे पण आज मी तुला एका वेगळ्या कामासाठी फोन केला आहे. तू आता माझ्याबरोबर येवू शकते डॉक्टरांकडे. त्यांनी विचारलं. काय झालं तुला बर वाटत नाही आहे का ? तुम्ही ना खरच स्वतःच्या तब्येतिकडे अजिबातच लक्ष देत नाही आर्या ला मधेच थांबवत त्या म्हणाल्या अग आर्या किती काळजी करशील मला काहीही झालं नाही. मग डॉक्टरांकडे कशाला. आता मला हॉस्पिटल च नावही काढलं की अंगावर काटाच येतो. आर्या म्हणाली. हो तुझं साहजिक आहे हे म्हणणं मी समजू शकते पण सिद्धांत च्या डॉक्टरांकडे जायचं आहे म्हणून तुला चल म्हणतिये. काय झालं सिद्धांत ला बरा आहे ना तो, ऑफिस मध्ये तर चांगला होता. अचानक काय झालं आर्याच काळजी करण चालूच होत. अग ऐ आर्या खरच किती काळजी असते तुला सिद्धांत बरोबर म्हणायचा आर्या म्हणजे टेन्शन च दुकान आहे सगळ्या जगाची काळजी असते तिला. त्याला पण काहीही झालेलं नाही तो तर अजूनही ऑफिस मधून आला नाही. तू भेट मग सांगते मी तुला. चालेल मी येते लगेच तुम्हाला घ्यायला जाऊ आपण. अस म्हणून आर्या निघाली. सावकाश ये अस म्हणून त्याच्या आईनेही फोन ठेवला. थोड्याच वेळात आर्या त्याच्या आईला घेऊन डॉक्टरांकडे पोहचलिही. मला आता तरी कळेल का काकू काय झालंय. किती suspense ठेवताय. हो अग कळेलच थोड्या वेळात. welcome सरदेसाई मॅडम, वा अलभ्य लाभ आज तुमचा चरण स्पर्श झाला माझ्या हॉस्पिटलला मंदार ने त्यांचे हसून स्वागत गेले. आणि ह्या कोण ? त्याने आर्या कडे पाहून विचारलं. आर्याला तर काय चालल काहिच कळत नव्हतं आणि समोरचा डॉक्टर आहे की असाच कुणी तरी हे ही कळत नव्हतं कारण तिने त्याला ह्या आधी पाहिलेल च नव्हतं. अरे हो तुमची ओळख नाही ना, आर्या, हा मंदार सॉरी डॉक्टर मंदार माझा विद्यार्थी आणि सिद्धांत चा बालमित्र हा खूप मोठाPsychiatric आहे बर! नेमका तुमचा accident झाला तेव्हा भारतात नव्हता. आता आला तर पुढे हाच हँडल करणार आता. आणि मंदार ही आर्या सिद्धांत ची पत्नी. hii, तू आहेस आर्या सिद्धांत सरदेसाई? खूप ऐकलं होतं तुझ्याबद्दल सिद्धांत कडून आणि मानलं हा तुला हे भल्या भल्या मुलींना नाही जमलं ते तू करून दाखवलं. आर्या फक्त जुजबी हसली कारण आता तिने सगळ्याच गोष्टींवर react होणं सोडलं होत. मंदार एक चांगला
Psychiatric होता त्यामुळे त्याला आर्याचा गंभीर चेहरा पाहून कळाल की प्रकरण खरच गंभीर आहे असले फाजील विनोद करून काहीही फायदा नाही मग त्याने डायरेक्ट विषयालाच हात घातला. हे बघा काकू आपलं जस फोन वर बोलणं झालं आणि तुम्ही पाठवलेली file ही बघितली मी स्पष्ट च सांगतो थोडं कठीण आहे पण अशक्य नाही. आणि म्हणूंनच मी सल्ला दिला की आर्या ला दूर ठेवून तर हे कधीही शक्य होणार नाही, तिला सिद्धांत सोबत राहवच लागेल तिला तुम्हाला घरी घेऊन जावंच लागेल. तो बोलत होता. काय !!आर्या एकदम आश्चर्य चकित होऊन म्हणाली. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलत आहात किती रिस्की आहे हे आणि सिद्धांत ला काय सांगणार, आणि हा जर धक्का तो पचवू नाही शकला तर मी तर पुढची कल्पनाच नाही करू शकत, सॉरी मला हे मान्य नाही. अग आर्या !त्याची आई म्हणाली. नाही ह्या बाबतीत नाही आई! ह्या विषयावर मला काही नाही ऐकायचं निघायचं का आपण? आर्या ठामपणे म्हणली.आर्या तू पण सिद्धांत सारखीच आहे अगदी काहीही फरक नाही किती हट्टी आहेस तू! आधी माझं ऐकून घे मग ठरव. हे बघ आर्या मग त्याने पूर्ण सिद्धांत ची केस तिला समजून सांगितली, आणि तू म्हणतेस तस की तो हे सहन नाही करु शकणार वगैरे अस काहिही होणार नाही कारण आपला सिद्धांत खूप strong आहे खूप धक्के पचवले त्याने आयुष्यात.आणि काही झालंच तर मी कश्या साठी आहे dont worry let me handle काहीही होणार नाही. आणि अजून किती दिवस वाट बघणार आहोत आपण फक्त अरे प्रयत्न करायला काय हरकत आहे. and you should be positive अस राहून कस चालेल आर्या. एक चान्स तर घेऊ झालं तर चांगलं च नाहीतर मग वाट पाहणं आलच पण बघ with your permission ! ह्यातून जर तो लवकरात लवकर बाहेर यावा अस तुला वाटत असेल तर तूच काहीतरी करू शकते. तो इतकं बोलून थांबला. ठीक आहे काय करावं लागेल मला आर्या म्हणाली. हीच अपेक्षा होती मला तुझ्याकडून.तुला काही नाही फक्त उद्या पासून सिद्धांत च्या घरी सॉरी म्हणजे तुझ्या घरी राहायला जायचं. सिद्धांत ला काय बोलायचं आम्ही बघतो.तो इथे येईलच थोड्या वेळात मी बोलवलं आहे त्यालाही. इतक्यात त्याचा फोन वाजला हा ये आत! इतकंच म्हणून त्याने ठेवला. हे बघ आर्या सिद्धांत कधीही येईल तू काहीही react नको करू. इतक्यात सिद्धांत आत आला. hi मंदार कसा आहेस? आणि आई तू इथे बर आहे ना ?काय झालं. त्याने आल्याआल्या प्रश्नांची सरबत्ती चालू केली. अरे काही नाही काकू सहज आल्या म्हणून तुलाही बोलावून घेतलं. मंदार म्हणाला. नक्की ना? सिद्धांत ने विचारलं. आणि ही इथे काय करतीये ?त्याच आता लक्ष आर्या कडे गेलं. नाही पण एक सांगू का आर्या तू एकदम बरोबर जागी आली थोडा उशीर केला पण तुला आता चांगली ट्रीटमेंट मिळेल.सिद्धांत पुढे बोलला. आर्या ने थोडं आश्चर्य चकित होऊन च पाहिलं त्याच्या कडे.माझी एम्प्लॉयी आहे बर का ही सिद्धांत चांगली ट्रीटमेंट दे आणि लक्षात राहण्याच्या काही गोळ्या असतील तर त्या ही दे सांगितलेलं काहीही लक्षात नाही राहत अरे हिच्या, त्याने टोमणा मारलाच. आर्याला त्याच अस बोलणं ऐकून फार वाईट वाटलं मंदार ला कळाल आता ही जर अजून थोड्या वेळ थांबली तर काही खर नाही. म्हणून तो सिद्धांत ला मधेच थांबवत म्हणाला ती माझी पेशंट आहे ना मी ठरवेन कस ट्रीट करायचं. तू नको लक्ष घालू. आणि आर्या तू आता निघालीस तरीही चालेल फक्त मी सांगितलेलं लक्षात ठेव. आणि ती तिथून निघाली.
क्रमशः