चंदन आला १० मिनिटांनी, " कुठे गेला होतास... एक मॅडम बडबडून गेल्या तुझ्यामुळे... " ,
" कोण आलेलं ? " ,
" नावं नाही सांगितलं... तुला मेसेज करून ठेवते असं बोलून पुढे बोलल्या , फोन वाजला कि receive करायचा... तुझा फोन मी कसा उचलणार... बरोबर ना... " विनयने सगळी हकीकत सांगितली.
" अशी बोलली का ... बरं " चंदनने मेसेज बघितला.
" व्वा !! चांगलीच व्यक्ती भेटली तुला.. " ,
" का ... काय झालं... ".... विनय ...
" आधी सांग... तिला मॅडम वगैरे काही बोललास का.... " ,
" हो रे ... पण तुला कसं कळते सगळं... " ,
" तिला आवडतं नाही.... एकेरी बोलायचे तिच्याशी... तुला ओळख करून देणारच होतो या ४ जणांची... पण असं वाटते... तूच भेटशील त्यांना अधे-मध्ये... " ,
" म्हणजे " विनयला कळलं नाही.
" दिक्षा.... दिक्षा होती ती... या ४ जणांमधले सर्वात सुंदर असे पात्र... " इतक्यात चंदनच्या शेजारील फोन वाजला. " हो... येतो आहे... आलोच... " चंदन निघून गेला.
१५ मिनिटांनी आला. " दिक्षा ...... विचारत होती तुला... कोण नवीन जॉईन झाला आहे.... सांगितलं तुझ्याबद्दल... गाववाली आहे तुझी... " चंदन हसत म्हणाला.
" मी त्यांना ma'am बोललो म्हणून राग आला का त्यांना... " विनयने विचारले.
" नाही रे... राग का येईल.. तसा राग पट्कन येतो तिला... पण जातो सुद्धा पट्कन... आणि तिला एकेरी बोल... नाही आवडतं तिला मॅडम बोललेले... " ,
" तुला कसं माहित एवढं... " विनयला नवल वाटलं.
" हो... २ वर्ष झाली ओळखतो तिला.. ऑफिस मध्ये जे ४ महत्वाचे character आहेत ना ... त्यातले सर्वात strong character.... strong character का तर... कोणतीही परिस्तिथी असेल तरी घाबरत नाही... खूप छान मुलगी आहे... सावळी असली तरी दिसायला छान... नजर काढून टाकावी अशी... कारण एक वेगळंच सौंदर्य आहेत तिच्यात... कदाचित तिलाही हे माहित नसावे... इतकी सुंदर वाटते ती कधी कधी... मनातून सुद्धा तितकीच सुंदर.. कोणाबद्दल काहीच नसते तिच्या मनात... मुलींना कसे दुसऱ्या मुलीबद्दल राग , द्वेष असतो... jealous वाटते.. हे तिच्या मनात नाहीच... शुद्ध , सुंदर मन... कुठे असते सांग अशी मुलगी... जे मनात तेच चेहऱ्यावर... नाकी डोळस नीट... म्हणतात ना तशी अगदी... सगळ्या सोबत हसून बोलून राहणारी.. आणि हा... तिची smile इतकी सुंदर आहे ना... कोणीही वेडे होईल ते हास्य बघून.... हसली कि वाटते कळ्यांची फुले होतील.... कधी कधी वाटते एक सुंदर स्वप्न पडलं असेल देवाला .. तेव्हा इतकी सुंदर smile त्याने घडवली... कमाल आहे ना... मध्यम शरीरयष्टी... त्यात तिचा dressing sense इतका सुंदर आहे ना... विचारू नकोस.. म्हणजे तिचे ड्रेस खरंच बघण्यासारखे असतात... त्यात ती रोज नवीन hair style करून येते... तिच्या सौंदर्यात आणखी भर पडते. ग्रेट आहे ती... खरच... कामात सुद्धा चोख... कधीच टाईमपास करताना दिसणार नाही. अनोळखी सोबत कमी बोलते. पण एकदा ओळख झाली कि मग थांबत नाही बोलायची. हे आत्ताच , messaging ... chatting नाही आवडत तिला.. जे असेल ते समोर बोलावं असं तिचं म्हणणं. " चंदनने त्याचे बोलणे संपवले.
" wow !! खूप छान आहे रे ती. " ,
" आहेच ती तशी.. वेगळीच आहे.... बघ ना, एवढ्या गोड मुलीच्या कोण प्रेमात पडणार नाही... पण तिचा विश्वास नाही प्रेमवर... तीही कोणाच्या प्रेमात नाही अजून. सगळयांना मित्र मानते. " ,
" पण मैत्रीच्या पुढेही एक विश्व आहे ना.. " ,
" ते तिला समजावणार अजूनही तिला भेटला नाही... पण तिला कोणी चांगलाच भेटणार हे नक्की..वेड्यासारखं प्रेम करणारा भेटणार बघ तिला.. यात शंकाच नाही... दिक्षाचं meaning माहित आहे का इंग्लिश मध्ये... Gift of God .... तशीच आहे ती... देवाची सुंदर अशी रचना... दिक्षा !! "
============================================================
विनय पुन्हा आठवणीत गेलेला. " रे भावा .... जेवायला आणले हाय.. हा घे डब्बा.. " अविनाश आवाज देतंच आला.
" रे... तुझीच वाट बघत होतो. " ,
" आणि तू चल हा लवकर बरा होऊन... तिथे सगळे वाट बघत आहेत तुझी.. कोणाला करमत नाही तिथे... डॉक्टरला सांगतो, उद्या सोडायला तुला... जरा दम दिला कि होईल काम.. क्या !! " अविनाश विनय जवळ बसला.
" तू पण ना ... खरच .." विनय बोलला तशी अविनाशने त्याला मिठी मारली.
" खरंच यार ... चल लवकर.. नाही बर वाटतं त्या ऑफिसमध्ये... असाच बसून रहा.. काही नाही केलंस तरी चालेल.... पण तू ये ऑफिसला... " ....अवि..
" नाही रे... डॉक्टर सोडणार नाहीत.. " अवि नाराज झाला. तेवढ्यात त्याचे लक्ष रातराणीच्या फुलांवर गेले.
" वहिनी आलेल्या वाटते... " विनयला त्याने कोपराने ढकललं.
" गप्प रे... काही पण असते तुझं... " विनयला हसू आलं. तरी त्याचे लक्ष घड्याळात गेलं.
" तू जा... तुला लेट होईल परत जायला ऑफिसमध्ये.. "
" ते सोड .. आपलंच ऑफिस आहे.. आधी सांग... झोप लागली का तुला बरोबर.. " विनयचा चेहरा शांत झाला त्यावर. " तेच स्वप्न का पुन्हा " अवि सावरून बसला जरा.
" मला सांग... काय असते नक्की त्या स्वप्नात ... जरा detail मध्ये सांग... " ,
" समुद्रकिनारा .... असा दूरवर पसरलेला समुद्रकिनारा.... जरा पांढरी , जरा करड्या रंगाची मऊ मऊ वाळू.. वाळूवर जागोजागी शंख-शिंपले... थंडगार वारा.. आणि अथांग पसरलेला समुद्र.... एकटाच चालत असतो तिथे मी.. मी हि पांढरे शुभ्र कपडे परिधान केले आहेत. एक पांढरा सदरा आहे अंगावर... चालतो आहे असाच... किनाऱ्यावर नजर जाईल तिथवर कोणीच नाही... समुद्रात सुद्धा काही होड्या दिसतात दूरवर.. पुसट अश्या.. मग मी हि चालत राहतो , शंख-शिंपले वेचत.. ओंजळीत सुद्धा मावत नाही इतके.. तसाच ते ओजंळ भरून चालत जातो पुढे.. आणि अचानक एक सुगंध येतो... ओळखीचा.. रातराणीच्या फुलांचा.. विचित्र जरा, कारण सकाळी फुलतं नाही रातराणी... तरी सुवास येतो... त्या सुवासाचा माग काढत जातो तर पुढे एक मोठ्ठे झाडं दिसते रातराणीचे... तेही विचित्र.. रातराणी वडासारखी वाढत नाही... तरी तेवढ्याच उंचीचे झाड दिसते..आणि त्याखाली कोणी तरी बसलेलं दिसते... " ,
" कोण ? " अविने कुतूहलाने विचारलं.
" नाही माहित. एका विशिष्ठ अंतरावर थांबतो मी. तिथे एक अद्रुश्य भिंत आहे... काच कशी असते , दिसत नाही ... तशी... त्यापुढे जाऊ शकत नाही. पोहोचायचे आहे मला तिथे.... खुणावते ती रातराणी.. सारखी " विनयचं बोलून झालं.
" का आवडते रे तुला रातराणी... " ,
" आईमुळे.. मी लहान होतो ना... गावाला राहायचो.. तेव्हाची गोष्ट.. शेजारी-पाजारी सर्वच मोठी मुले..माझ्याशी खेळायला कोणी नसायचे. मग आईनेच सांगितलं होते... झाडांशी मैत्री कर... आणि तिनेच , एक रातराणीचे रोपटे आणून दिले होते. जप बोलली तिला... खूप नाजूक असते ती... ती माझी पहिली मैत्रीण .. बरं का.. मग काय, खूप छान गट्टी जमली आमची... तिच्याशी गप्पा मारायचो... जेवायला देयाचो तिला. चपाती- भात देयाचो तिला... ते आठवलं कि हसायला येते आता. त्यात आई खूप लवकर गेली माझी देवाघरी... तीची आठवण एकच, तेच रातराणीचं रोपटं... तेव्हाही खूप रडलो होतो... त्या झाडाशी बसून.. " आताही विनयचे डोळे भरत आलेले.
" घेऊन जाऊ का ती फुलं.... रडतो कशाला.. साल्या.. मला पण केलंस ना emotional.... " अविने डोळे पुसले.
" नको रे... जीव आहे त्या फुलांत माझा.. म्हणून तर दिक्षा न चुकता घेऊन येते... " ,
" तू लावलं आहेस ना झाड... ऑफिसच्या बाहेर... त्याचीच फुल आहेत हि... " अविनाश निघाला. परत आला.
" तू तयार राहा... उद्या आला नाहीस ना... उचलून घेऊन जाईन... " तडतडत निघून गेला...
" काय माणूस आहे ना... पहिला कसा भेटला होता.. आणि आता... " विनय हसला स्वतःशी.
-------------------------- क्रमश: ------------------