आजी,आजोबा म्हणजे वयो वृद्ध,ज्यांनी आयुष्यात अनेक पावसाळे पाहिले,
खस्ता खालल्या.सुख दुःखाचे प्रसंग पाहिले.
त्यांच्या पाठीशी मोठा अनुभव आहे.त्यांच्या कडून समाजाला मार्गदर्शन व्हाव.,त्यांच्या अनुभवाचा फायदा पुढच्या पिढीला व्हावा ,व्हायला
पाहिजे असं काहींना वाटत.तसाच आजी आजोबांना पण वाटत. त्यांच्या काळात एकत्र
कुटुंब पद्धत होती.एकत्र कुटुंब पद्धतीत,विचारात
भिन्नता असते तरी सुद्धा एकमेकाला समजून
घेत असत.काळा नुरूप नंतरची पिढी शिकली
आणि साहजिकच नोकरी निमित्त म्हणा अथवा
व्यवसाया निमित्त बाहेर पडली.
या नवीन पिढीच्या प्रगती करिता,आई
वडिलांनी कधी विरोध केला नाही,त्यांच्या उत्कर्षाला प्रोत्साहन दिले.इतकेच नव्हे प्रसंगी
आर्थिक मदत केली.
असं असून सुद्धा ,ज्या वायात
त्यांना , आपुलकीची,प्रेमाची,जिव्हाळ्याची जरूर असते ती त्यांना मिळत नाही. किंबहुना त्यांच्या भावनांचा कोणी विचार करीत नाही .अशाच आजी आजोबांची व्यथा,सांगण्याचा प्रयत्न आहे.
निवृत्त होई पर्यंत त्यांना स्वत:चा वास्तू
नव्हता,स्वतःचे घर नव्हते, नोकरीत असतांना
मुलांचे शिक्षण,मुलींचे लग्न यात पैसे खर्च झाला
त्या मुळे साहजिकच घर घेता आले नाही.सेवा
निवृत्ती नंतर सुद्धा मुलीचे लग्नाची जबाब दारी
होती.त्या करिता करिता पेन्शन विकून रक्कम
शिल्लक ठेवली होती.म्हणून काही दिवस भाड्याच्या घरात राहत होते.एका शहरात घर
घेण्याचा विचार आला.व मुलाच्या नावावर कर्ज
काढून घर घेतले आणि आजोबा स्वतः च्या
पेन्शन मधून हप्ते भरत होते.सहाजिकच त्या
घराविषयी त्यांना जिव्हाळा होता.तसे मुलाने
व सुनेने एका ठिकाणी घर घेतले होते.त्यांना
अजून एक घर शहरात घ्यावयाचे होते.त्या
करिता अधिक पैशाची जरुरी होती.आणि अपेक्षा
होती आजोबांनी ज्या घराचे हप्ते भरले ते विकावे
आजोबांनी थोडा विचार करून लगेच ते घर विकावयास परवानगी दिली.वस्तुतः ते घर आयुष्यात पहिल्यांदाच घेतलेले होते.ते विकू नये
असे त्यांना वाटत होते.कारण निवृत्ती नंतर सुद्धा
त्यांनी त्याचे हप्ते भरले होते.मुलगा व सुने करिता
त्याग करायला आई वडील नेहमीच तयार असतात.हो!म्हणत असतांना त्यांच्या मनाला
वेदना झाल्या.पण त्याचा कोण विचार करणार?
त्यांचा नातू हुशार होता.12 वित असताना खाजगी क्लास लावला होता.बारावीची
परीक्षा सुरू झाली. तेवढ्यात कोणीतरी नातेवाईक आले व त्यानी सांगितले की एक
सरकारी परीक्षा आहे ती दिली की परदेशात
शिकण्यास जाता येते.काहीही विचार न करता
त्याला त्या परीक्षेचे पुस्तक आणून दिले.वस्तूत:
12 वीची परीक्षा महत्वाची,ती चालू असतां दुसऱ्या परीक्षिचे ओझे टाकणे चूक होते.आजोबानीशिक्षण क्षेत्रात नोकरी केलेली होती,पण त्यांचेकोणी ऐकण्यास तयार नव्हते,किंवा त्यांना विचारत नव्हते,परिणामी नातू पुस्तक वाचून कंटाळला,व त्याची अभ्यासाची गोडी कमी झाली. पण आजोबा शिकलेले असून त्यांनाकोणीही किंमत दिली नाही.समाज नुसता म्हणतो असतो वृद्धांच्या अनुभवाचा ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे पण प्रत्याक्षात अशी वस्तूस्थितीआहे का?नवीन पिढी त्यांना तेवढी किंमत देतनाही.भलेही ज्येष्टांचा सल्ला मानू नका निदान विचारा, पटला तर अमलात आणा.अर्थात
आजी आजोबांना वाईट वाटते पण करणार
काय? शेवटी ते हतबल.आणि शेवटी परिस्थितीशी जुळवून घेणे भाग आहे.आणि संघर्ष नको वाद नको म्हणून काही बोलत नाही.
2) 'अखेर घर सोडून निघून गेले."
हे दांपत्य म्हणजे आजी आजोबा असे आहेत
की मुलगा सून दोन नातू.एका खाजगी कंपनीत
नोकरी केली. दोन मुलींचे लग्न , मुलाचे लग्न
या मध्ये पैसे खर्च झालेंजू.मुलगा कामाला लागला
पण स्वतः जवळ पैसे नसल्याने नोकरी करणे भाग होते.वयाच्या ७६व्या वर्षा पर्यंत नोकरी करीत होते.पण कोणी म्हणत नव्हते की नोकरी
करू नका.खुद्द स्वतः ची त्यांची पत्नी सुद्धा
म्हणत नव्हती.सकाळी सात वाजता जाणार
आणि रात्री आठ वाजता येणार.काय करणार
घरात पैसे तर दिले पाहिजे.खाजगी छोटा कारखाना असल्यामुळे कामाला घेत असत.
कामावरून घरी येण्यास उशीर झाल्यास कोणी
चौकशी करीत नव्हते. बायकोच्या माहेरचे लोक
घरात जास्त लक्ष देत असत.मुलाचा विचार थोडा
बाजूला ठेवला,तर निदान पत्नीला तरी काळजी
असली पाहिजे पण पत्नी पण निष्टूर झाली.
आणि एक दिवस सकाळीच तुम्ही आमच्या साठी काय केले यावरून मुलगा व आई
हृदयाला लागेल असे आजोबास बोलले.मुलगा
हे विसरला वडिलांनी कष्ट करून आपल्याला
शिक्षण दिले म्हणून आज आपल्याला चांगली
नोकरी व पगार मिळाला.पत्नी हे विसरली की,
काटकसर करून,मुलींचे लग्न शिक्षण केले.तीच
पत्नी नवऱ्याला दोष देत होती तेही वयाच्या 75 व्या वर्षी ज्यावेळी नवरा आर्थिक दृष्ट्या या व शारीरिक दृष्ट्या दुर्बल झालेला होता.ज्या वेळेस
त्याला खऱ्या आधाराची जरूर असते.
सगळ्यांचे बोलणे जिव्हारी लागल्या मुले सदर वृद्ध आजोबा,सकाळीच घरातून निघून गेले.कुणीही त्यांना अडवले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी,मुलाने काकांना फोन केला बाबा इकडे अलका? लगेच काका व काकू ,त्याच गावात राहात असल्याने,लगेच तेथे
गेले.काकांनी म्हणजे पत्नीच्या दिराने विचारले
चोवीस तास तुम्ही का चौकशी केली नाही.,तर
उत्तर मिळाले त्यांना फोन करणे आवडत नव्हते.
आम्हाला वाटले येतील.म्हणजे निष्टूरतेचा किती
कळस? मुलगा सोडा,पत्नी सुद्धा इतकी निर्दय
असू शकते!
या घटनेला पाच वर्षे झाली अद्यापही
ती व्यक्ती आलेली नाही.(ही सत्य घटना आहे)
कोणाला त्याचे सुख ना दुःख.
सुधाकर काटेकर