ट्रेकिंग
ट्रेकिंग म्हणजे साहसी खेळ... सह्याद्रीच्या कड्या - कपाऱ्यात कधी कळकळणाऱ्या उन्हांत भटकणं किंवा सह्याद्रीला अभिषेक घालणाऱ्या राक्षसी पावसात केलेली विनाउद्देश भटकंती...तिथे गेल्यावर निसर्गाला शरण गेलात तरच तुमचा निभाव लागेल...सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या ट्रेकिंग आणि पिकनिक ह्या दोघांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे... आता मी का हे सर्व सांगतोय तर मी जवळपास २६ ते २७ ट्रेकक केले आहेत..त्यामुळे माझ्या ट्रेकिंग च्या पोतडीत काही थोडेसे अनुभव जमा झाले आहेत ते फक्त तुम्हा सर्वांसमोर ठेवत आहे.
प्रथम सुरवात करू स्वतःपासुन
१) आजारी असाल किंवा सर्दी खोकला झाला असेल तर अजिबात जाऊ नका...ट्रेकिंग ला कधी कधी ३ ते ४ तास चालावे लागते डोंगर दऱ्या खाली वर कराव्या लागतात..कधी कधी तोंडाला लावायला पाणी पण सापडत नाही....पूर्ण तंदुरुस्त असल्याशिवाय जाण्याच्या विचार करू नका.
२) ट्रेकिंग ची तारीख पक्की झाली कि १ ते २ आठवडे आधी रोज जेवढे जमेल तेवढे चाला... १ ते २ आठवडे आधी शरीराला चालण्याची सवय होऊंदे .
३) हाता पायांची नखें जेवढी लहान असतील तेवढे उत्तम...कारण ट्रेकिंग ला काही ठिकाणी फक्त हाता पायांवर जोर टाकूनच पुढे जाता येते..किंवा कडे कपारीत हात टाकून पुढे जावे लागते.
४ ) ट्रेकिंग चा पोशाख सुटसूटीत असावा पूर्ण बाह्यांचे टी-शर्ट आणि ट्रॅक्स पॅन्ट स्पोर्ट्स शूज किंवा कॅनवास शूज.
५) दाग दागिने घालुन जाणे टाळा...कधी कधी प्रवास पूर्ण अनोळखी गावातून आणि जंगलातून असतो.
६) ट्रेकिंग ची बॅग सर्वात महत्वाची ...बॅग भरताना सर्वप्रथम १ जोडी कपडे हवेच नंतर एक मेडिकल किट मेडिकल शॉप मध्ये ३०० ते ४०० रुपयांत सहज उपलब्ध होते....आणि ३०० रुपयांपुढे आपला जीव महत्वाचा. पावसात जात असाल तर कपडे आणि खाऊ सुरक्षित ठेवायला प्लॅस्टकची पिशवी.
७) सुखा हल्का खाऊ ...आणि पाणी ! एकवेळ खाऊ विसरलात तरी चालेल पण ट्रेकिंग करताना पाणी विसरण्यासारखे दुसरे पाप ( गाढवपणा ) नाही.
८) ज्या गडावर जाणार असाल त्या गडाचा आणि त्या आसपास च्या परिसराचा नावे वाचता येईल असा नकाशा.
९) त्या परिसरात आपल्या ओळखीचे कोणी राहत असतील तर तिथले हवामानःतिथले रस्ते ,तिथे जाणारी येणारी वाहन व्यवस्था ह्याची सखोल माहिती.
१०) ट्रेकिंगला सुरवात करायची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी ७ ते ९..तेव्हा पुरेसा उजेडही असतो आणि उन्हांचा येवढा त्रासही होत नाही.
११) तिथल्या परिसरातला एखादा वाटाड्या असेल तर उत्तम...जर तुमचा ट्रेकक दोन ते तीन दिवसांचा असेल तर ते तुमच्या राहण्याची आणि जेवणाची सोय सुद्धा करून देतील.
१२) आता बहुतेक ठिकाणी दिशादर्शक बाण किंवा खुणा केलेल्या असतात...त्या मार्गांवरून चालाल तर उत्तम माहित नसताना जंगलदऱ्यात अनोळखी वाटेवर जाऊ नका.
१३) गड उतरताना शक्यतो पुरेसा प्रकाश असताना खाली उतरायला सुरवात करावी...जंगलदऱ्यात काळोख लवकर होतो.
१४ ) आणि ट्रेकिंग करताना उत्तम पद्धत म्हणजे पहिला मावळा आणि शेवटचा मावळा हि सर्वोत्तम पद्धत...म्हणजे ट्रेक लीडर च्या पुढे कोणी जायचे नाही आणि शेवटी असेलला लीडर ... हो शेवटी असेलला तो आला कि समजायचे पाठी कोणी हरवले नाही.
१५) आणि सर्व ग्रुप मेंबर चे मोबाईल नंबर सर्व ट्रेक मेंबर च्या घरी न विसरता देणे.
१६ ) ट्रेकिंग ला एकट्याने जाणे टाळा...४ किंवा अधिक जणांनाचा ग्रुप असेल तर उत्तम..समजा एखाद्याला काही झाले.. तर त्याचा बरोबर एक भिडू थांबेल आणि दोघे खाली जाऊन त्याच्यासाठी मदत घेऊन येतील.
१७) गडावर एखादी चोरवाट किंवा एखादे भुयार सापडले तर वाटाड्याच्या योग्य मार्गदर्शनाशिवाय तिथे जाण्याचा धोका पत्करू नका.उदा.साप,विंचू असू शकतात.
१८ ) उन्हाळा असो कि पावसाळा डोक्याला संरक्षण देण्यासाठी टोपी एकदम महत्वाची आहे.. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आणि पावसाच्या आडव्या तिडव्या सपकाऱ्या पासून वाचण्यासाठी.
१९ ) काही गड-किल्ले अनवट वाटांवर असतात...तिथे इंटरनेट सोडा साधी मोबाईल रेंज पण नसते...तेव्हा उत्तम ऑपशन म्हणजे तिथले रहिवाशी...गुगल मॅप पेक्षा अचूक माहिती आणि कधीही न ऐकलेला इतिहास समजतो त्याच्याकडुन.
२०) आपले वाहन घेऊन जात असाल तर..एकदा गाडी पायथ्याशी उभी केल्यावर नीट झाकुन ठेवा नाहीतर साप ,विंचू वस्तीला आलेच समजा.
२१) संध्याकाळी गड चढणे किंवा उतरणे टाळा...कधी कधी वाहन व्यवस्था नसल्यास अनोळखी ठिकाणी आपण अडकू शकतो.
२२) गडावर एक रात्र रहाणार असाल तर टॉर्च मस्ट आहे...एखाद्या देवळात किंवा वरती असलेल्या धर्मशाळेतच मुक्काम करा...ऊघड्यावर झोपणे शक्यतो टाळा.
२३) एखादा मार्गदर्शक असेल तरच रात्री दुर्गभ्रमंती करा...कारण अनोळखी पायवाट आणि अडथळे ह्याची आपल्या सवय नसते.
२४ ) शक्यतो अंधार होण्याआधीच रात्रिच्या जेवणाचा जुगाड करून ठेवा.
२५) आणि त्या गड-किल्याचा आदर करा ते तेव्हा उभे राहिले म्हणुन हा महाराष्ट्र आणि आता आपण उभे राहिलो.
सर्वात शेवटी ट्रेंक्क करताना वाटले कि आपण पुढे नाही जाऊ शकत किंवा आपला भिडू दमला आहे...तर सरळ माघार घ्या... उगाच रेटू नका... त्यात काहीही वाईट वाटण्यासारखे नाही..."शेवटी जान सलामत तो ट्रेंक्क हजार "... ते गड-किल्ले गेली हजार वर्षे उभे आहेत अजूनही पुढे हजार वर्षे आपल्यासाठी उभे राहतील... तेव्हा त्या मित्राला नंतर कधीतरी भेटा..
धन्यवाद....
एक सहयाद्री वेडा
आणि सर्वात महत्वाचे गड-किल्ले आणि सहयाद्री त्यांचा मन राखा
अजून खूप काही आहे...पण जरा whatsapp facebook च्या जगातून बाहेर येऊन स्वतः भटका आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर खेळा आणि अनुभवसंपन्न व्हा.