राजगड-कसा झाला प्रवास-२
फोटो काढण्याच्या नादात आम्ही भलतीकडे भरकटलो... मग त्या ग्रुप कढून समजले जे सौर ऊर्जेचे दिवे लावले आहेत ती वाट पकडून चालत गेल्यास पद्मावती माचीजवळ असणाऱ्या चोरदरवाजाजवळ पोचते व्हाल..मग त्यांना धन्यवाद देऊन आम्ही वाट वाकडी केली....अर्धा ते पाऊण तास चालल्यावर चोर दरवाजा आला...त्या दरवाजातून अगदी रांगत जावे लागते..थोडे वरती आलो तिथे थोडी मोकळी जागा होती...आणि ६० ते ७० आधीच वर गडावर होते...झाले आता कसली जागा मिळणार झोपायला...
राजगडावर जरा कधी गेलात आणि रात्री मुक्काम करायचा असेल तर " पद्मावती मंदिर आहे....ऍडजस्ट करून राहिलात तर ४० ते ५० जण आरामात राहू शकतात... बाकी अजून गडावर मुक्काम करण्यासाखे जास्त काही नाही...नाही म्हणायला पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत पण त्याची अवस्था काही ऐवढी चांगली नाही..देवळाच्या जवळच पाण्याचे कुंड आहे...पाणी मात्र एकदम अमृतासारखे आहे..
मोकळ्या जागेवर थोडे बसलो आणि आणलेला सुखा खाऊ खायला सुरवात केली...तेवढ्यात अनिल ने पुन्हा आपला मोठाठाठाठाठाठा DSLR कॅमेरा बाहेर काढला आणि नको नको बोलत असताना सुद्धा फोटो काढायला...वाढलेल्या गवतात गेला...आणि फोटो काढता काढता वेडयासारखा आमच्या दिशेनं धावत सुटला आम्हांला कळेच ना काय झाले....आंणि आम्ही त्याचा दिशेने धावत ...नंतर तो जवळ आला तसा त्याचा आवाज स्पष्ट येत होता " भागो भागो भागो साप लगा है पीछे "... मग आम्ही तरी कशाला थांबतोय तसेच उलटया पावली बॅगा उचलून " पद्मावती मंदिराजवळ " येऊन बसलो...थोडे थांबलो आणि विचार केला...पाया पडूया आणि फिरुया... मंदिरात डोकावतो तर काय मोजून १० जण मंदिरात होते... पद्मावती देवीने आशिर्वाद दिला होता...त्या १० जणांनी पण सांगितले मंदिर आता रिकामे आहे तर जागा अडवून ठेवा...संध्याकाळी पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही ... मग काय आम्ही बॅगा ठेवून जागा अडवली आणि भिवाजीने आणलेले घावणे १५ मिनिटात संपवून नाही नाही म्हणता २ तास ताणून दिली...तीन ते चार च्या सुमारास आम्हांला जाग आली.. मग काय आम्ही मोकळे सुटलो..सुवेळा माची ,संजीवनी माची, पद्मावती माची, बालेकिल्ला,पद्मावती तलाव आणि सुवेळा माचीवरचे नेढं( नैसर्गिक प्रक्रीयेमुळे कातळात पडलेले छिद्र असते त्याला "नेढं" म्हणतात. कित्येक शतकांच्या अविश्रांत वाऱ्यामुळे ही भौगोलिक किमया घडते.) खूप भटकलो..एका ठिकाणी तर ढग अक्षरशः हाताजवळ आले होते...फक्त हात पुढे करायचा अवकाश होता...ह्या राजगडावर फ़िरताना एक गोष्ट लक्षात आली सह्याद्रीने इतर गड,किल्यांपेक्षा भरभरून निसर्ग सौदंर्य दिले आहे...निसर्गाने सुद्धा आपले रंग हातचे न राखता मनसोक्त उधळले आहेत...अगदी बेफाम..उगाच नाही राजे आणि त्यांचा कुटुंकबिला तब्ब्ल २५ ते २६ वर्षे राजगडावर वास्तवाला होता...ते भाग्य फक्त राजगडाचे...
फिरून फिरून भयंकर दमलो होतो.." पद्मावती मंदिराजवळ " येऊन बसलो गप्पा मारेपर्यंत ८ ते ८. ३० वाजले ..तेव्हा एका ट्रेक्करने आम्हाला देवळात आरतीसाठी बोलावले… निमित्त होते दुसऱ्या दिवशी येणारा दसरा…. नेहमीप्रमाणे आरती झाली आणि आम्ही निघणार येव्ढ्यात…. त्या ट्रेक्करने सुरुवात केली …… प्रौढ प्रताप पुरंदर!, क्षत्रिय कुलावतौश! गो ब्राम्हण प्रतिपालक!अखंड लक्ष्मी अलंकृत ! हिंदू कुलं भूषण! सिव्हासनाधीश्वर! महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज कि …पुढे काय झाले कळलेच नाही एक वीज चमकून गेली अंगातून …. आणि असेल नसेल तेवढा जोर काढून प्रत्येक जण राजांचा जयजयकार करत होता..तो दसरा खास होता आमच्यासाठी...
आणि रात्री जेवणात काहीच नव्हते आमच्याकडे .. घावणे सकाळीच संपवुन झाले होते...मग मी आणि भिवाजी आणलेलं ब्रेड आणि बटाटे चे सॅण्डवीच करून द्याला लागलो...आम्ही करत होतो आमचे भिडू खात होते...शेवटी मी आणि भिवाजी दोन बटाटे आणि एक काकडी खाऊन झोपलो...मंदिराची जमीन अशी काही थंड होती ना... मग काय शूज आणि आणलेलं अजून कपडे घालून झोपलो...त्यात रात्री ३ वाजता किरण झोपेत जाबडायला लागला " आई थंडी वाजतेय एक चादर दे...काय बोलणार आता...दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ५ वाजता उठलो गड उतरायचा होता..पण इतर ट्रेकरनी सांगितले ..अजून थोड्या वेळाने उतरा...आपण डोगरावर आहोत..आणि हि वाट जंगलातून जाते..तेव्हा त्यांचे अनुभवाचे बोल ऐकून आम्ही ७ वाजता गाद उतरायला सुरुवात केली.. आमच्या अगोदर आमच्या एका भिडूने खाली येऊन...टाटा सुमो अडवून ठेवली होती..गाडीचे ड्राइव्हर बोलले गाडी भरली कि निघू..आधीच त्यात २ जण बसले होते...आणि आम्ही ८ जण आणि ड्राइव्हर पकडून १ असे एकूण ११ जण आम्हला वाटले निघेल आता गाडी..पण तब्ब्ल २५ जणांना घेतल्यावर त्यात ५ ते ६ जण टपावर ,पुढे ४ जण...आणि कुठे कुठे कोण कसे बसले होते...जवळ जवळ अर्ध्या तासाने आम्ही त्याच अवस्थेत स्वारगेट स्टॅन्ड ला पोहचलो..
आणि काय म्हणावे आमचे नशीब जोरावर होते "मुबंई-पुणे" एशियाड लागली होती...मग त्यातच झोपून आम्ही मुबंई गाठली आमच्या घरांच्या ओढीने.
अजून काहीही माहिती हवी असल्यास खालील लिंक वर टिचकी जरूर मारा..
http://trekshitiz.com/marathi/Rajgad-Trek-R-Alpha.html