३. अनुषाज् पास्टलाईफ -
विमानात,
"तेथील पोलिसांचं काय?" त्यानं विचारलं.
"पोलीस इन्वेस्टीगेशन करताहेत. मी पर्सनली ही केस हाताळतेय."
"सो... मग मराठी कसं?" मिस्टर वाघनं विषय बदलला.
"हायपर्थेम्नशिया आहे मला. मी कोणतीच गोष्ट विसरत नाही. बारीक मधील बारीक घटनाही मला लिटेल्ड लक्षात राहतात. तुमच्याकडे येण्याआधी मी मराठी व्याकरणचं पुस्तक वाचलं, हिंदी मराठी डिक्शनरी आणि काही पुस्तके वाचली, काही मराठी फिल्म्स पहिल्या. म्हणून येते थोडी."
"हो. आणि या सिंड्रोमचा तुझ्या प्रोफेशन मध्ये तुला फायदा होत असून देखील तूला या आजारातून बाहेर पडायचंय आणि यासाठी तू 'अबीर जोशी' या रिनाऊंड सायकीयाट्रीस्टकडं ट्रिटमेंट घेत आहेस. तुला काही तरी विसरायचंय... प्रोबॅब्ली तुझ्या आई-वडिलांचा मृत्यू!" त्यानं एक कटाक्ष तिच्याकडं टाकला.
तशी तिनं त्याच्यापासून नजर चोरली. अतिशय गंभीर होत ती शांत झाली.
"इट वॉज नॉट युअर फॉल्ट!" तो अतिशय गंभीरपणे पण तिच्याकडं न बघताच म्हणून गेला.
"असं काय झालं होतं अनुषा यांच्यासोबत, की त्या आई-वडिलांचा विषय निघाल्यावर इतक्या अस्वस्थ झाल्या?" मी मिस्टर वाघला विचारलं.
"आपल्या आई-वडलांना डोळ्यांसमोर मरताना पाहिलंय तिनं. आणि तेच तिला विसरायचंय. पण तिचा आजार तिला ते विसरू देत नाहीये."
"बिचाऱ्या..." मी सहानुभूतीपूर्वक बोलून गेलो.
"अंहं! डोन्ट बी! तुझे शब्द मागे घे. ती खूप खंबीर मुलगी आहे!" मिस्टर वाघ मला म्हणाला.
"सॉरी!" मी अपराधीपणे माफी मागितली.
"तिचे आई-वडील दोघंही चांगलं सुखवस्तू आयुष्य जगत होते. आणि अनुषाने त्यांच्या घरी जन्म घेऊन त्यांच्या आनंदात भरच घातली होती.
"अनुषा आठ वर्षांची होती जेव्हा ही घटना घडली. तिचे वडील तिला रोज रात्री फिरायला घेऊन जायचे. ज्या रात्री हे झालं त्या रात्री; तिला आईस्क्रीम हवं होतं म्हणून ते आईस्क्रीम पार्लरपाशी थांबले. तेथे एका व्यक्तीवर अनुषाची नजर पडली. आणि तिनं तिच्या वडलांना सांगितलं, की चोरीसाठी वापरण्यात आलेली व्हॅन चालवताना तिनं या व्यक्तीला पाहिलं होतं.
"या घटनेपासून सात महिन्यांपूर्वी नैनिताल पासून 322 किलोमीटर दूर टिहरी इथं एका बँकेत मोठी चोरी झाली होती. त्यावेळी तिचे वडील याबद्दल त्यांच्या मित्राशी चर्चा करत असताना त्या चोरीसाठी वापरलेल्या व्हॅनचा नंबर तिनं वडलांकडून ऐकला होता. जो तिच्या लक्षात राहीला. चार दिवसांपूर्वी तोच नंबर असलेली व्हॅन तिनं शाळेतून घरी परतताना पहिली होती.
"त्यावेळी ती व्हॅन चालवणारा व्यक्ती आत्ता आइस्क्रीम पार्लर समोर उभा होता. अनुषाला हायपर्थेम्नशिया असल्यानं ती माणूस ओळखायला चुकणार नाही ही गोष्ट तिच्या वडलांना माहीत होती. आणि या घटनेबद्दल तिनं चार दिवसांपूर्वी त्यांना सांगितलंही होतं. म्हणून मग ते गडबडीनं अनुषाला घरी सोडून गस्त घालणाऱ्या पोलिसांकडं गेले आणि त्यांनी त्या चोराबद्दल सांगून पोलिसांना त्या आईस्क्रीम पार्लर जवळ ते घेऊन आले.
"पण तोपर्यंत तो माणूस तेथून गायब झाला होता. पुन्हा ती व्यक्ती दिसल्यास कळवण्याबद्दल सांगून पोलीस तेथून निघून गेले. आणि अनुषाचे वडील घरी परतले. आणि त्यांच्या मागून त्याच्या घरी पोहोचली, ती व्यक्ती!
"अनुषा आणि तिच्या वडिलांचे आईस्क्रीम पार्लर जवळ बोलणे चालू असताना त्याला या दोघांवर संशय आला होता, की ते त्याच्याविषयीच बोलत आहेत. म्हणून त्यानं यांचा पाठलाग केला होता. त्यानं अनुषाच्या वडलांना पोलिसांकडं गेलेलं पाहून तो चिडला आणि त्यानं त्यांच्या घरात शिरून अनुषाच्या वडलांना मारून टाकलं. तिची आई अडवायला मध्ये गेली म्हणून तीही प्राणाला मुकली. त्यांच्या घरातील आवाज ऐकून शेजारी त्याच्या घरी धावत आले. म्हणून त्या माणसाला तेथून पळावं लागलं आणि म्हणून त्यावेळी अनुषा वाचली.
"पण तिनं ठरवलं, की कधी ना कधी त्या माणसाला शोधून काढायचंच. फॉरेन्सिक सायन्सचं शिक्षण घेऊन ती प्रायव्हेट इन्वेस्टीगेटर झाली आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी तिनं त्या व्यक्तीला व त्याच्या टोळीला शोधून काढलं. तो आईस्क्रीम पार्लरवाला पण त्याच टोळीतला निघाला. त्यानं चोरीच्या पैशांतून ते आईस्क्रीम पार्लर काढलं होतं. तिनं त्यांना पुराव्यांसह पोलिसांच्या हवाली केलं. अशी धाडसी मुलगी आहे ती! तिच्या आडनांवावरून एक गोष्ट समजते, की ती शाक्त परंपरा पाळणाऱ्या घरण्यातली ती मुलगी आहे. उत्तराखंड मधील बोराह् हे चंद्रवंशी राजपूत आहेत जे 'खस' म्हणून ओळखले जातात म्हणजे पहाडांचे राजे. देवीची, शक्तीची पूजा करणाऱ्या घरण्यातली ती; शिवाय एक स्त्री! तिला असंच असायला हवं!" तो म्हणाला.
"ट्रुली अ ब्रेव्ह गर्ल!" मी बोलून गेलो. पण हे ऐकून मी सुन्न होतो...