२. एन एन्काऊंटर विथ अ ब्युटी -
या घटनेच्या वेळी मिस्टर वाघ खूप महत्त्वाच्या केसवर दुसऱ्या शहरात काम करत होता (पण नेहमी प्रमाणं या केस बद्दल मी तुम्हाला सांगू शकणार नाही. कारण तसा मिस्टर वाघने दंडक घातलाय... काही सिक्युरिटी व कॉन्फिडेन्शियल सिक्रसी इशूज आहेत... मिस्टर वाघला काही प्रॉब्लेम नकोत म्हणून मी कधी काळ, वेळ, शहर, स्थळ-ठिकाणांची नांव मेन्शन करत नाही, पण ही केसच मिस्टर वाघच्या इतर केसेस प्रमाणं एक्सेप्शनल असल्यानं इथे मला शहराचं नांव सांगावं लागतंय. होप, मिस्टर वाघ समजून घेईल. आणि त्याला काही प्रोब्लेम्सना सामोरे जावे लागणार नाही... असो!) त्यानं ती केस कम्प्लिट केली. पण मिस्टर वाघला निवांतपणा इतक्यात मिळणार नव्हता.
त्या रात्री तो एका बार(?) मध्ये गेला.
(युज्वली मिस्टर वाघ कसलंच व्यसन करत नाही [माणसं मारायचं व्यसन सोडल्यास]. मग त्या रात्री बारमध्ये का?)...
त्यानं एका ड्रिंकची ऑर्डर दिली. तो ग्लास ओठाला लावणार, तोवर एक अतिशय सूंदर मुलगी त्याच्या जवळ येवून त्याच्याशी लगट करायला लागली. मिस्टर वाघनंही यावर काहीच आपत्ती दर्शवली नाही. आणि ड्रिंक एन्जॉय करू लागला. मिस्टर वाघ त्या मुलीच्या वागण्यावर काही आपत्ती जरी घेत नसला, तरी तो तिला अटेन्शनही देत नव्हता. शेवटी ती मुलगी वैतागून त्याच्या पासून लांब झाली...
मिस्टर वाघ ड्रिंकचं पेमेंट करून तेथून बाहेर पडला. कोपऱ्यावर त्याला तीच मुलगी उभी दिसली. सुमसान रस्ता होता. गाडी थोडी पुढं पार्क करून तो मागे तिच्यापाशी आला. त्यानं तिला कच्चकन जवळ ओढलं.
"एवढीच आवडले होते, तर मघाशी भाव पण का नाही दिला?" तिनं मिस्टर वाघला विचारलं.
"रेप्युटेशन!" असं म्हणून त्यानं तिला डोळा मारला,
"मी बाईकडं बघत पण नाही असं लोकांना वाटतं. तुला तिथं जवळ घेतलं असतं, तर माझ्या इमेजला धक्का लागला असता ना!" तो स्मित करत म्हणाला.
"अजबच आहे तुमचं. बाटली चालते, आणि बाई चालत नाही?!"
मिस्टर वाघनं तिला अजूनच जवळ खेचून चालायला सुरुवात केली. म्हणाला,
"बाटली काही तासांसाठीच माणसाला बरबाद करते, पण बाई आयुष्यभरासाठी बरबाद करून सोडते! म्हणून कोणत्या बाईशी कसलीच कमिटमेंट ठेवायची नाही!"
"मग मी जाऊ का?" तिनं दूर होत विचारलं.
त्यानं तिला पुन्हा खेचलं,
"एवढी काय घाई आहे?"
म्हणत त्यानं तिला आपल्या गाडीत बसायला भागही पाडलं,
"मी बाईपासून लांब राहतो असं लोकांना वाटतं, पण तुला तर खरं काय ते कळलं ना!" तो तिला डोळा मारत चावट हसला.
आणि त्याची गाडी त्याच्या हॉटेलकडं धावू लागली...
मिस्टर वाघची हॉटेल स्वीट,
दोघं आत आलीत. त्यानं गाडीची व रूमची चावी टेबल वर फेकली.
"वॉन्ट टू बी फ्रेश!" त्यानं तिला विचारलं.
"नो आयेम गुड!" तिनं उत्तर दिलं.
"बी कम्फर्टेबल! आईल् कम इन फ्यू मिनिट्स." तो तिला म्हणाला.
आणि तिला जवळ घेऊन किस् करण्यासाठी त्यानं ओठ पुढं केले. तिनं लाडिकपणानं तोंड फिरवलं. पण मिस्टर वाघही गप्प बसणारा नव्हता. त्यानं जबरदस्ती तिच्या गालाचं चुंबन घेतलंच.
"येऊन बदला घेतो!" म्हणत तो बाथरूम मध्ये शिरला...
मी मिस्टर वाघला मध्येच थांबवत,
"मी आधीच सांगितलंय हे असलं काही मला सांगू नका!" आणि मी नाराजीनं उठलो.
मिस्टर वाघनं माझा आत धरला,
"तुला मी आधीच सांगितलंय. धिस इज इंपॉर्टेन्ट! प्लिज सीट!"
तो कमालीच्या गंभीर स्वरात म्हणाला. त्यानं 'इज' या शब्दावर जोराचा भर दिला होता. यावरून तो या घटनेला घेऊन किती सिरीयस आहे ते मला जाणवलं. मी पुन्हा माझ्या पूर्वीच्या जागेवर बसलो.
त्यानं इन्सिडेंट कंटीन्यू केला...
मिस्टर वाघ परत येईपर्यंत त्या मुलीनं बेडचा ताबा घेतला सुद्धा होता. वाघ आला तसा त्याला तिनं जवळ ओढला. मिस्टर वाघ तिला किस् करणार इतक्यात तिनं त्याला बेडला बांधून टाकला.
"नॉटी गर्ल!"
मिस्टर वाघ अजून पण तिच्या सौंदर्याच्या धुंदीतच होता. तो बांधलेल्या अवस्थेतही उठून तिला किस् करायला बघत होता.
त्याचवेळी त्या मुलीनं आपल्या बॅग मधून 'ग्लॉक नाइंटिन' काढून मिस्टर वाघच्या डोक्यावर तिचे हँडल जोरात मारले. आणि ती गन त्याच्यावर रोखून धरली.
"व्हॉट द..." ऐकताना माझ्या तोंडून अनावधानानं हे मौलिक शब्द बाहेर पडले.
"माईंड युअर लँग्वेज!" मिस्टर वाघनं मला रोखलं.
"माफ करा. पण मग ती मुलगी कोण होती? नैनितालच्या इन्सिडेंट मधलीच होती का ती?"
"ती नैनितालचीच होती..." त्यानं सांगायला सुरुवात केली.
मिस्टर वाघला त्या बांधलेल्या अवस्थेत ठेऊनच ती मुलगी सर्विलेन्स कॅमेराज् व सिस्टिम कुठे लपवून ठेवली आहे का याचा शोध घेऊ लागली. तिला तसं काही सापडलं नाही. मग ती सरळ मुद्यावर आली...
"मी..."
"मिस अनुषा निर्मल बोराह्! वय सव्वीस! प्रायव्हेट आय फ्रॉम नैनिताल!"
"प्रायव्हेट आय?" मी पुन्हा त्याला इंटरप्ट केलं. यावेळी मी जरा जास्तच वेळा त्याला रोखत होतो, पण मी तरी काय करणार? त्या दिवशीची ही घटना आणि मिस्टर वाघचं वागणं मला धक्क्यावर धक्के होते...
"म्हणजे ती पण एक डिटेक्टिव्ह होती?" मी अचंब्यानं विचारलं.
"होय!"
"म्हणजे ती नैतिताल हॉटेल इन्सिडेंट मधली मुलगी नव्हती?" मी पुन्हा विचारलं.
"नाही!" तो सहज उच्चारून म्हणाला.
"मग मला मघाशी तसं का सांगितलंत?" मी नाराजीनं विचारलं.
"मी ती नैनितालची आहे म्हणालो. हॉटेलवाली मुलगी ती हीच असं थोडी म्हणालो?" माझी खेचण्यासाठी तो बोलला.
त्याच्या अशा बोलण्यानं मी थोडा रागावलो,
"प्लिज मिस्टर वाघ! ही घटना गंभीर आहे असं तुम्ही स्वतः म्हणता आणि तुम्हीच या घटनेचं गांभीर्य घालवून टाकताय. प्लिज काय असेल ते सरळ सांगा!" मी वैतागून अक्षरशः मिस्टर वाघला ठणकावलं.
आणि काही वेळाने मला माझी चूक लक्षात आली. मी मिस्टर वाघवर आवाज चढवण्याचं धाडस केलं होतं... पण मिस्टर वाघ शांत होता. मीही रिलॅक्स झालो. आमच्यात आता असं नातं तयार झालंय, की इतकं खपून जातं (पण कधी पर्यंत...).
"सॉरी!" त्यानं माफी मागितली.
"यु आर फॉलोविंग मी सिन्स टू डेज्. काल तू मला एका प्रॉस्टिट्यूट सोबत बघितलंस म्हणून आज ही अशी समोर आलीस!" मिस्टर वाघचं बोलणं ऐकून ती अवाक् झाली.
म्हणजे अनुषाला फसवण्यासाठीच तो त्या रात्री बार मध्ये गेला होता. तरीच म्हंटलं...
"तुम्हाला तर सगळंच माहिती आहे! पण तुम्हाला कसं..." ती आश्चर्यानं बोलून गेली. आणि काही वेळानं अचानक तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि काही तरी जिंकल्याच्या आविर्भावात ती बोलती,
"याचा अर्थ तुम्हाला भेटण्याच्या माझा निर्णय योग्य होता!"
"कम टू द पॉईंट! प्रशंसा ऐकायला आवडत नाही मला!" त्यानं तिला दरडावलं.
"पण कसं? तुम्हाला तिच्याबद्दल आधीपासून कसं माहिती होतं?" मी तयाला मध्येच थांबवत गोंधळून विचारलं.
अनुषाला जरी तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसलं, तरी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं.
"सूरज, ती दोन दिवस माझा पाठलाग करत होती रे. मग हे माझ्यापासून लपून राहील का? मी तिची माहिती नाही काढणार? तू तर मला ओळखतोस ना? तरी तुला असा प्रश्न पडतो?" त्यानं मलाच उलट प्रश्न केला.
त्याला माहित आहे, त्याला समजून घेणं हे माझ्याच्यानंही शक्य नाही. तरी त्यानं असा प्रश्न केला होता. मी निरुत्तर होतो. गप्प राहिलो. मला गप्प पाहून त्याला समजलं, की त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नाही. म्हणून मग त्यानं सत्य काय ते सांगितलं. म्हणाला,
"या घटनेचं कव्हरेज होत असल्यानं मी नैनितालमध्ये कोण-कोण इन्वेस्टीगेटर्स ऑपरेट आहेत हे पाहिलं. भारतातील सगळ्या इन्वेस्टीगेटर्सची माहिती ऑलरेडी माझ्याकडे आहे! कोणी नवीन रजिस्ट्रेशन झालं तर त्याची इन्ट्री माझ्याकडे येतेच! त्यातून अनुषाबद्दल कळलं. मग तिची माहिती काढायला वेळ नाही लागला. दॅट्स व्हाय आय नो हर!"
माझं समाधान झालं. पण तरी मी काही बोललो नाही. पण चेहऱ्यावरचे भाव मात्र शिथिल केले. मला शांत बघून मिस्टर वाघ समजला पुढं ऐकण्याची माझी तयारी आहे. त्यानं घटना सांगायला पुन्हा सुरवात केली...
मग मिस्टर वाघनं तिच्या मदतीशिवाय स्वतःच स्वतःला मुक्त केलं. दरम्यान तिनं वर नमूद केलेली केस त्याला सांगितली आणि त्यात भर टाकली,
"ही केवळ एकच अशी केस नाही. अशा अजून तीन घटना याआधी नैनिताल मध्ये घडल्या आहेत. पोलिसांना काहीच लीड सापडत नसल्यानं त्या मृतांमधील एक हरिश पंत या एकवीस वर्षाच्या विक्टीमची मोठी बहीण नैना त्याची केस घेऊन माझ्याकडं आली. एव्हरीवन टर्न्ड् इन्सेन बिफोर देअर डेथ्स्!"
"तुला प्राथमिक चिकित्सेमध्ये काही आक्षेपार्ह गवसलं?"
"प्लिज जरा नॉर्मल मराठी बोलाल? मी एवढी डीप मराठी नाही शिकलीये..." ती वैतागल्यासारखी बोलली.
मिस्टर वाघ तिला आणखी चिडवण्यासाठी हसला. पण त्याच्याकडं लक्ष न देता ती तिच्या बॅगमध्ये काही शोधू लागली,
"हो. मी हरिशची बॉडी एक्झामाईन केली. आणि मला हे सापडलं."
तिने एक केस मिस्टर वाघ समोर धरला. तो केस त्यानं हातात घेतला व नीट पाहिला. आतापर्यंत चेष्टा मस्करी करणारा मिस्टर वाघ तो केस निरखून पाहिल्यावर गंभीर झाला.
"अ ब्लॅक कलर्ड् नॅचरल ब्लॉन्ड हेअर! शीज नॉट ऐन इंडियन!"
"ब्लॉन्ड? सोनेरी? अशी केसं असलेले लोक खूप रेअर असतात ना?"
"हो! अराऊंड ओन्ली टू परसेन्ट इन द वर्ल्ड." मिस्टर वाघ उत्तरला!
"याचा अर्थ हिला शोधणं खूप अवघड आहे..." अनुषा हताश होत नाराजीनं म्हणाली.
"अंहं! थिंक डिफ्रंटली! आपलं काम उलट खूप सोपं झालंय. आपल्याला आता त्या दोन परसेंटमधील नेमकं कोण नैनितालमध्ये आहे ते पाहायचंय!" मिस्टर वाघ आशावादी बोलला.
"तुम्ही खूपच ऑप्टिमिस्टिक व पॉसिटीव्ह आहात!" अनुषा इंप्रेस होत बोलली.
"तो तर मी आहेच!" असं म्हणत त्यानं केसाचा वास घेतला,
"सुगंध छान आहे. या मुलीला भेटाय लागतंय!" गंभीरपणा क्षणात झटकून तो चावटपणे बोलला.
"मला बराच वेळ लागेल. तूला काही खायचं असेल, तर ऑर्डर कर. थोडा आराम कर." असं अनुषाला त्यानं सांगितलं.
आणि तो त्याच्या हॉटेल स्वीट मधील दुसऱ्या एका खोलीत शिरला आणि पहाटे कधीतरी तो बाहेर आला. अनुषा जागीच होती. तिनं काही खाल्लं देखील नव्हतं. ही केस तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तो बाहेर आला तशी ती लगोलग उठून उभी राहिली.
तिला काय विचारायचं हे स्वाभाविक असल्यानं तिच्या प्रश्नाची वाट न बघता अनुषाच्या अधीर आधारावर शब्द येण्या आधीच त्यानं त्या मुलीबद्दल इत्म्भूत माहीती अनुषाला सांगितली,
"ती स्वीडिश आहे! वय अर्ली ट्वेन्टिज!"
"तुम्हाला कसं कळलं?" अनुषानं आश्चर्यचकीत होऊन विचारलं.
"मी तिच्या केसामधील डीएनएची 'जिनियॉलॉजिकल डीएनए टेस्ट' केली." मिस्टर वाघनं उत्तर दिलं.
"अरे... मी याचा विचारच केला नाही..." अनुषा रिलॅक्स होत बोलून गेली.
"हो कारण तुला माझ्याकडं यायची घाई होती!" मिस्टर वाघनं पुन्हा तिला खिजवण्याचा प्रयत्न केला.
तिला चिडलेलं त्यानं पाहिलं, पण त्यावर तिला काहीही प्रतिक्रिया देण्याचा वेळ न देता मिस्टर वाघ बोलला,
"काय मी नैनिताल मधील हरिशनं वापरलेली रूम पाहू शकतो?" त्यानं अनुषाला विचारलं.
"म्हणजे तुम्ही येताय?" तिनं आनंदानं विचारलं.
"काय मला हे विशेष सांगावं लागेल?" त्यानं उलट प्रश्न केला.
आणि स्वतःशीच पण अनुषाला ऐकू जाईल असं पुटपुटल्यासारखा बोलला,
"शी मस्ट बी अ स्वीटडिश!"