सिद्धांत काय बोलतोय ह्या कडे आर्याचं अजिबात लक्ष नव्हतं. तो उठला आर्याच्या जवळ गेला, हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला. आणि त्याने विचारलं, 'आर्या काय झालं? सगळं ठीक आहे ना?' ती एकदम दचकली आणि भानावर आली. 'काही विचारलं का सर?' 'अगं तुझं लक्ष कुठे आहे? तेच विचारतो आहे मी.' 'नाही कुठेच नाही.' जर तिच्या जागी दुसरं कुणीही असत तर आता पर्यंत सिद्धांतने त्या व्यक्तीला अपमानित करून बाहेर पाठवलं असत पण केवळ ती आर्या असल्यामुळे तो हे सगळं सहन करत होता. 'आर्या काहीतरी बोल काही टेन्शन आहे का?' एव्हाना ऑफिस सुटलं ही होत आता त्यांच्या शिवाय कोणी राहील नव्हतं. आर्या काहीच बोलत नव्हती तशीतशी सिद्धांत ची काळजी वाढत होती. तो तिला बरच बोलतं करण्याचा प्रयत्न करीत होता पण ती निशब्द होती. सिद्धांत तिला बोलत असतानाच तिने त्याला एकदम मिठी मारली आणि ती रडायलाच लागली . सिद्धांतला हे अनपेक्षित होत पण लगेचच त्याने स्वतःला सावरले आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. 'आर्या काय झालंय तू काही बोललीच नाही तर कस समजेल मला?' एरवी त्याला तिच्या मनातलं सगळं कळत होतं, पण ह्या वेळेस त्याला काहीही थांगपत्ता लागत नव्हता. 'मला नाही सहन होत आता हे सगळं, मला नाही कळत आहे की मी चुकीचं वागतीये की बरोबर , नेमकं मला काय हवं आहे ते माहिती नाही, काय चांगलं काय वाईट कळत नाही आहे पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा खरंच खूप त्रास होतोय.' आता सिद्धांत ला तिच्या बोलण्याचा थोडा थोडा संदर्भ लागत होता. पण ह्या वर काय बोलाव हेच त्याला नेमकं समजत नव्हतं. 'सर माझं काही चुकलं आहे का ????' 'नाही गं आर्या, तुझं काहीही नाही चुकलं.' 'मग का तुम्ही अस वागत आहात माझ्यासोबत? मी मान्य करते की त्या दिवशी झाली असेल माझ्या कडून काही चुकी पण मी माफी मागायला तयार आहे. पण त्या एका चुकीमुळे मला इतकं का दूर केलं? माझ्याशी तुम्ही साधं बोललाही नाही. मी गेले कित्येक दिवस वाट बघत होते की सगळं नीट होईल, पण नाही.. उलट गोष्टी आणखीन बिघडत गेल्या. माझं असं काय चुकलं ते कळत नाही, त्यामुळे माझी चिडचिड वाढत आहे कुठल्याही कामात लक्ष नसतं, काहीही खाण्याची इच्छा नाही राहिली. मला काहीही नाही कराव वाटत आहे आणि तो पर्यंत माझ्या मनाला शांती नाही मिळणार जो पर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरे नाही मिळणार, जी मी खूप शोधायचा प्रयत्न करतीये पण मला नाही मिळत आहे. ती न मिळाल्यामुळे माझी अजून चिडचिड वाढत आहे. मला प्रश्न पडतो असं का होतं? ह्या आधी मला असं कधीच झालं नाही. मग आताच का?', शेवटी आर्या बोलून मोकळी झाली. 'हे बघ आर्या, तू आधी शांत हो, तू बस इथे', त्याने तिला बसवलं, पाणी दिल. 'मी समजू शकतो आर्या तुला कस feel होतंय ते . पण ह्या परिस्थितीतही स्वतःला सांभाळता आलं पाहिजे. तुला मिळत नाही आहे ना उत्तरे.. ठीक आहे.. वेळ जाऊ दे सगळ्या गोष्टींचा आपोआप उलगडा होईल. त्यासाठी का उगाचच इतका त्रागा करून घ्यायचा. मला काय वाटतं की तू थोडा वेळ जाऊ दे सगळं नीट होईल आणि राहिला माझा प्रश्न की मी असा का वागलो? कस असत ना आर्या काही गोष्टींचा पुढे जाऊन त्रास होण्या पेक्षा आधीच झालेला बरा. म्हणजे पुढे जड जात नाही.', तो म्हणाला. 'म्हणजे मला नाही कळालं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते?', आर्याने विचारलं. 'कळेल लवकरच.. तू सध्या ह्या कुठल्याही गोष्टींचा विचार करु नको. परत टेन्शन घेऊन आजारी पडशील.', सिद्धांत तिला हसत म्हणाला. 'नाही आता नाही पडणार मी आजारी.', ती म्हणाली. 'चला निघायचं का आता ? बराच वेळ झाला.' 'हो निघुया. कॉफी घ्यायची जातांना? मला माहिती आहे तुला आवडत नाही पण एखादा दिवस तर घेऊच शकते हो ना?', त्याने विचारलं. 'ठीक आहे पण आजच्याच दिवस बर!!', आर्या म्हणाली. आता त्यांच्यामधील ताण बराचसा हलका झाला होता. 'आर्याला काय झालंय हे नेमकं तिला कळलं नाही पण बरं झालं ती बोलून मोकळी झाली आता जास्त उशीर करून चालणार नाही. लवकरात लवकर ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला हवा. तिला तर समजून सांगत होतो मी की वेळ जाऊ दे होईल सगळं नीट, पण तिला काय माहिती की थोड्याबहोत फरकाने माझीही हीच अवस्था आहे. स्वःताला कस समजून सांगू की मी ही तिच्या शिवाय राहू नाही शकत. किती प्रयत्न केले मी तिच्यापासून दूर जाण्याचे पण प्रत्येक प्रयत्न तितकाच जवळ घेऊन आला. आणि आर्याही माझ्या शिवाय राहू नाही शकत हे तिने आज सिद्ध करून दाखवले. माझ्यापेक्षा जास्त त्रास तिला होतो. त्रास तर मलाही होतो. पण आर्या खूप निरागस आहे. तिला हे सहन नाही झालं आणि लपवता तर बिचारीला काहीच येत नाही.', तो गाडी चालवत असतांना विचार करत होता. ते एका कॅफे मध्ये बसले. सिद्धांतने ऑर्डर दिली. आणि तो आर्याकडे पाहून हसला. 'काय झालं?', तिने विचारलं. 'काही नाही, आर्या एक सांगू का?' 'हा बोला ना', 'तू ना अशीच रहा. कधीही बदलू नको.', सिद्धांत तिला म्हणाला. 'अशीच म्हणजे?' 'म्हणजे अशीच रडकी.....', सिद्धांत तिला चिडवत म्हणाला. 'काय सर? तुम्हाला मीच भेटते. मी अजिबात रडकी नाही आहे', आर्या म्हणाली. 'हो पाहिलं थोड्या वेळापुर्वी आणि आजच कशाला नेहमीच पाहतो मी. मी थोडाही चिडलो की लगेच पाणी येतं तुझ्या डोळ्यात.' 'त्याला रडकं नाही म्हणत, त्याला हळवं असंन म्हणतात सर आणि मला कोणीही थोडही बोलल की लगेच लागत मनाला.', आर्या म्हणाली. 'अग मग माझ्या सोबत राहायचं असेल तर ह्या गोष्टीची सवय करावी लागेल तुला', सिद्धांत म्हणाला. 'म्हणजे???', आर्या म्हणाली. 'अरे यार काय माती खाल्ली मी!' सिद्धान्त मनातच म्हणाला. 'अग म्हणजे, हे बघ, तू माझ्या सोबत काम करते ना.. मग तर माझे नेहमीच बोलणे खावे लागतील मग कस होणार तुझं? तर सवय करून घे असं म्हणायचं होत मला!', 'ok ok.. असं का..', आर्या म्हणाली. 'हुश्श!! हिने जास्त काही नाही विचारलं', त्याने मोकळा श्वास घेतला. 'काय सर तुम्ही मला रडकी म्हणता आणि तुमचं काय? तुम्ही पण काही कमी नाही हा!', आर्या म्हणाली. 'म्हणजे?' 'म्हणजे तुम्ही किती चिडता!! जस मला म्हणता न की प्रत्येक गोष्टीवर रडायला येतं तस तुम्ही प्रत्येक गोष्टीवर चिडता!', आर्या म्हणाली. सिद्धांतने तिच्या कडे थोडं रागानेच पाहिलं आणि म्हणाला, 'बॉसशी असं बोलतात का ग!' 'म्हणजे मला अस नव्हतं म्हणायचं. Sorry! I'm just kidding!' आर्या म्हणाली. 'माझी मजा घेते तू कळत का तुला?', सिद्धांत तिच्याकडे थोडं रोखून पाहत म्हणाला. आर्याचा चेहरा लगेच पडला 'sorry!!! चुकलं माझं', ती म्हणाली. सिद्धांत तिचा चेहरा बघून हसायला लागला, 'आर्या किती भोळी आहेस ग तू !!! लगेच मनावर घेतल.', 'काय सर, तुमचं हे बर असत मी थोडीही बोलली की लगेच तुमच्यातला बॉस जागा होतो.', आर्या म्हणाली. 'मग.. आहे माझ्याकडे हा advantage!', सिद्धांत म्हणाला आणि मिश्कील हसला.