TIME TRAVEL PART 1 in Marathi Short Stories by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE books and stories PDF | टाईम ट्रॅव्हल भाग १

Featured Books
  • Mosadapreethi - 2

    ಇಲ್ಲಿ ತಾರಾ ಹಳ್ಳಿಯಿಂದ ನಗರಕ್ಕೆ ಬಂದ ಮುಗ್ಧ ಹುಡುಗಿ, ಆದರೆ ಜೂಲಿ ತಾರ...

  • Mosadapreethi - 1

    ಏರೋಪ್ಲೇನ್ ಸೀಟಿನ ಮೇಲೆ ಕುಳಿತ ತಾರಾ ನೆಮ್ಮದಿಯ ನಿಟ್ಟುಸಿರು ಬಿಡುತ್ತಾ...

  • सन्यासी -- भाग - 27

    सुमेर सिंह की फाँसी की सजा माँफ होने पर वरदा ने जयन्त को धन्...

  • ಹರ್ಷನ ಕೀರ್ತಿಗೆ ವರ್ಷಳ ಸ್ಪೂರ್ತಿ

    ಹರ್ಷನ ಕೀರ್ತಿಗೆ ವರ್ಷಳ ಸ್ಪೂರ್ತಿ(ಆದರ್ಶ ದಂಪತಿಗಳ ಕಥೆ)      ಲೇಖಕ -...

  • ಚೂರು ಪಾರು

    ಚೂರು ಪಾರು (ವಿಭಿನ್ನ ಪ್ರೇಮ ಕಥೆ) (ಲೇಖಕ ವಾಮನಾ ಚಾರ್ಯ) ಅಂದು ಪವನ್ ಪ...

Categories
Share

टाईम ट्रॅव्हल भाग १

तारीख : ३०.०५.२१३०
स्थळ :HIP 13044--NGC 224 (आपल्या सर्वात जवळच्या आकाशगंगेतील एक ग्रह)

समोरच्या स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांकडे पाहत एडवर्ड ,मसुको बेंजामिन ,मॅक आणि व्लादिमिर...आपले स्पेस सूट घालून पुढच्या आदेशाची वाट पाहत बसले होते...एका महत्त्वाच्या मोहिमेसाठी त्यांना निवडले होते...तेवढ्यात त्यांच्या समोरच्या स्क्रीनवर एक बातमी पॉपप झाली..एका व्हिडिओ एकसारखा दाखवला जात होता...तीन तेजोगोल प्रचंड वेगाने पर्वतराजित पडताना दिसत होते...आणि खाली बातमी सरकत होती "

"LAST NIGHT 3 HUMAN SIZE PODS CAME CRASHING DOWN FROM SPACE...3 HUMAN FOUND IN HIBERNATION MODE...FURTHER, THEY MOVE TO NEARBY LAB FOR INVESTIGATION...FURTHER DETAILS AWAITED..."

येवढ्यात त्या पाच जणांना यानात जाऊन बसण्यासाठी आदेश आला...

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

तारीख: २१.०८.२०२४

स्थळ: नासा..अमेरिका

"वर्ल्ड टाईम ट्रॅव्हल " कॉन्फरन्स भरली होती...शंभरहून अधिक देशांचे प्रतिनिधी.. १०,००० अधिक शास्त्रज्ञ...अनेक खाजगी आणि सरकारी अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्था''....त्या कॉन्फरन्स साठी जमल्या होत्या...कारण १९९८ पासून फ्रान्स व स्वित्झर्लॅडच्या सीमेवर ५७५ फूट जमिनी खाली आणि २७ किलोमीटरच्या भुयारात चालू असलेला प्रयोग यशस्वी झाला होता...२५ ते ३० फूट लांब आणि नियंत्रित "कृष्ण-विवर" तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले होते..कॉन्फरन्स मध्ये बोलण्याचा मान आता भारतीय शास्त्रज्ञ अभय अष्टेकर( भारताच्या गगनयान आणि आदित्य मोहिमेचे प्रमुख) यांच्याकडे आला होता...घसा खाकरून आणि समोर ठेवेलेल्या ग्लासातले पाणी पिऊन आणि नाकावरचा चष्मा थोडा तिरका करून डॉ . अभय अष्टेकर बोलू लागले

कृष्ण-विवर केव्हा तयार होते???

आपल्याला प्रकाश देणारा सूर्य हा एक तारा गेली कोट्यावधी वर्षे जळतो आहे... एक वेळ अशी येईल जेव्हा सूर्याच्या गर्भातील सर्व हायड्रोजन ज्वलन होऊन संपेल आणि रूपांतरित हेलियमचे ज्वलन होण्यास सुरवात होईल.अखेरीस जेव्हा हेलियमसुद्धा संपेल तेव्हा सूर्याचा पृष्ठभाग स्वतःच्या केंद्राच्या दिशेने कोसळेल. तारा जितका आकाराने मोठा तितका हायड्रोजन ज्वलनाचा वेग जास्त, त्‍यामुळे प्रचंड मोठे तारे संख्येने कमी असतात. आपल्या सूर्याचे इंधन संपायला एक हजार कोटी वर्षे लागतील.
तर सूर्याच्या केवळ ३ पट मोठा असणारा तारा ५० कोटी वर्षेच टिकेल.जेव्हा तारा कोसळतो त्या वेळी त्याचा प्रचंड स्फोट होतो त्या तार्‍याला सुपरनोव्हा म्हणतात. सुपरनोव्हानंतर तार्‍याचे प्रचंड द्रव्य आतल्या बाजूला कोसळते. या द्रव्याचा दाब इतका प्रचंड असतो की अणूंमधील इलेक्ट्रॉन बंध तुटतात आणि तार्‍याचे आकारमान मोठया प्रमाणात कमी होते. याची परिणती तार्‍याचे गुरुत्वाकर्षण वाढण्यात होते. अशा प्रकारे सुपरनोव्हानंतर तारा हा वस्तुमानानुसार न्यूट्रॉन तारा, पल्सार वा कृष्णविवर बनतो.
प्रयोगातून असे सिद्ध झाले, की कृष्णविवरात ओढली गेलेल्या वस्तू एका विशिष्ट छोट्या आकारात आक्रसली जाते आणि त्यानंतर विश्वाच्या दुसऱ्या भागात किंवा दुसऱ्या विश्वात ती पूर्णपणे फेकली जाते....म्हणजेच कृष्णविवर म्हणजे एका भल्या मोठ्य़ा बोगद्याचं एक तोंड आहे, जे आपल्या विश्वात आहे. या बोगद्याचं दुसरं तोंड आहे दुसऱ्या विश्वात. कृष्णविवरानं (आपल्या विश्वात) गिळलेल्या वस्तू बोगद्याच्या दुसऱ्या तोंडातून दुसऱ्या विश्वात जात असाव्यात. याचाच अर्थ आपण आता टाईम ट्रॅव्हल या संकल्पनेच्या जवळ येऊन पोहचलो आहे...आणि मी असे घोषित करू इच्छितो कि..येत्या ५ ते ६ वर्षात मानव सही-सलामत एका विश्वातुन दुसऱ्या विश्वात संचार करू शकेल...

थोडक्यात सांगायचे झाले तर...आपल्याला समजा "A" ह्या ठिकाणाहून निघून "B" ह्या ठिकाणी पोहचायचे आहे..त्याला आता १ तास लागतो आहे..पण
"टाईम ट्रॅव्हल" ह्या तंत्रज्ञानाने आपल्याला ते "A" आणि "B" दोन बिंदू एकत्र आणता येतील णि कदाचित फक्त १ ते २ मिनिटांत तिथे पोहचतो येईल ...

भाषण जसे संपले तसा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला...सर्व देशांनी मुक्तकंठानी वाहवाह केली... पण डॉ . अभय अष्टेकर थोडे साशंक वाटले...ते आपल्याच विचारात जागेवर येऊन बसले..

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

पैसे आणि मशिनरी यांना अजिबात तोटा नव्हता...प्रश्न होता फक्त कोण स्वतःहून या मोहिमेत सहभागी होणार ?? आणि झालेच तर ?? येवढ्या निवड चाचण्या ते पार करू शकतील का??..सहभागी झालेल्या शंभर देशातून फक्त पाच जणांना या अदभूत आणि आश्चर्यजनक प्रवासाला जाण्याची संधी मिळणार होती...पण...या मोहिमेचा शेवट कशाप्रकारे होईल ते माहित नव्हते...ते इच्छित स्थळी पोहचतील का?? आणि पोहचले तर परतीचा प्रवास कसा करतील?? या मोहिमेत त्यांच्या शरीरावर काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना?? कारण प्रवासाचा कालावधी १ मिनिट ते १ वर्ष किंवा १० वर्षे कितीही असू शकतो...गिनी-पिग म्हणून येवढ्या खर्चिक मोहिमेवर मनुष्य प्राण्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला पाठवून चालणार नव्हते...


क्रमश :