सिद्धांत घरी आला. खूप उशीर झाला त्यामुळे त्याने स्वतःच्याच किल्लीने दरवाजा उघडला. त्याने पाहिलं त्याची आई झोपलेली होती, त्याने काही disturb केलं नाही. तो आपल्या रूम मध्ये आला. खरं तर झोपण्यासाठी तो बेड वर पडला पण त्याची झोप उडालेली होती, 'sorry तर बोललो तिला तरीही का तगमग कमी होत नाही आहे. तीचही बरोबर आहे चुकी दोघांचीही आहे. मग मला का इतकं वाईट वाटतंय? आर्यालाही वाईट वाटत असेल.. तिची चुकी असेल नसेल मला माहिती नाही, पण मी limits cross नव्हत्या करायला पाहिजे. आर्याने काय विचार केला असेल माझ्या बाबतीत की मी ही बाकी मुलांसारखा...... कितीतरी वेळेस कित्येक मुलींनी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला पण मी कधीच कुणालाही येऊ दिलं नाही. आणि आज मात्र मी स्वतःच तिच्या जवळ गेलो. असा कसा वागू शकतो मी! उद्या ऑफिस मध्ये आर्याला कुठल्या तोंडाने सामोरं जाऊ. काय होऊन बसलं हे!!!'
इकडे आर्याचीही काही परिस्थिती वेगळी नव्हती. तिचीही सिद्धांत सारखीच अवस्था झाली होती. 'कशी जाऊ मी उद्या सिद्धांत समोर. तो काय विचार करत असेल, मी इतकी कशी वाहवत जाऊ शकते? का मी 'नाही' म्हंटल? त्याचा सहवास इतका प्रिय वाटावा की मला कशाचेच भानही नाही उरावे! नेमकं हे कुठलं नात आहे तेच कळत नाही, त्याला जर वाटत असेल काही माझ्याबद्दल तर तो बोलतही नाही, पण त्याला काय वाटतं हेही माहिती नाही. आणि माझं काय? मलाही तो आवडतो?? छे!!! मग त्याने सतत जवळ असावं असं का वाटतं? तो सोबत असताना अगदी निर्धास्त असते मी. बापरे विचार करून करून आता माझं डोकं जड पडतंय..... आता ह्या नंतर मी नाही विचार करणार. शक्य होईल तितकं सिद्धांत पासून स्वतःला दूर ठेवणार, पण शक्य होणार हे माझ्या कडून????'
दुसऱ्या दिवशी ऑफिस चालू झालं. दोघंही जण आले. सकाळी सिद्धांतने त्याच्या टीमची मीटिंग घेतली. पण मीटिंग मध्ये त्याने एकदाही आर्याकडे पाहिलं देखील नाही. त्याने तिचा review घेतला तेव्हाही त्याचं लक्ष लॅपटॉप कडेच होतं. आर्याच्या दृष्टीने तो एकप्रकारे चांगलच करत होता. कारण खरं तर तिला त्याला सामोरं जाणं अवघड होतं. 2-3 दिवस असेच गेले. दोघंही एकमेकांशी काहीही बोलले नाही. आता थोडा थोडा त्यांना त्या गोष्टीचा विसरही पडत चालला होता. असाच एक दिवस विक्रांत सिद्धांतकडे येऊन बसला, 'काय रे सिद्धांत, तुमचं काही बिनसलं का?' सिद्धांत त्याच्या कामात व्यस्त होता. 'कोणामध्ये विक्रांत ? स्पष्ट बोल रे.. अश्या कोड्यातल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आता माझ्याकडे वेळ नाही आहे', सिद्धांत म्हणाला. 'मी तुझ्या आणि आर्या बद्दल विचारत आहे. परत भांडण झालं का तुमच?' त्याचा हा प्रश्न ऐकून सिद्धांत 2 मिनिटे थांबला आणि म्हणाला, 'हे बघ विक्रांत, बिघडायला काही तरी असावं लागतं आणि आमच्या मध्ये तर काहीच नाही. आणि मला वाटतं हे बराच वेळेस सांगून झालंय आता तुला. तरीही तुझं आपलं तेच.', सिद्धांत त्याला म्हणाला. 'काहीही नाही.. मग तू पार्टीला का आला? ती जेव्हा पार्टीत आली तेव्हा चेहरा पाहायचा होता तुझा! ती नसताना कसा पाडून बसला होता आणि काय रे काहीच नाही तर तिचा accident झाला त्या दिवशी लागलं तिला होत त्रास तुला होत होता, तिच्या सोबत तिच्याच घरी बसून काम करत बसला, कधी उभ्या आयुष्यात तू घरी बसून काम केलेलं मला तर नाही आठवत, पण आर्यासाठी तू ते ही केलं आणि please आता मी हे माणुसकीच्या नात्याने केलं असं तर अजिबात म्हणू नको, मग ही माणुसकी फक्त आर्याच्याच बाबतीत का?? ट्रिप मध्येही सतत तिच्या सोबत होता. तिच्यासाठी वाट्टेल ते करू शकणारा तू चक्क असा म्हणतोय की आमच्यात काहीही नाही!!! आणि तू अस वागताना आर्याचा थोडाही विचार केला का कधी? तिला काय वाटत असेल? तू कितीही चिडलास, कितीही रागावला तरीही प्रत्येक वेळेस तिने तुला समजून घेतलं, तुझा हा इतका रागीट स्वभाव असूनही ती सतत तुझ्या सोबत असते. ते का उगाचच!! तुला काय? तू हवे तसे निर्णय घेऊन मोकळा होतो परंतु एकदा तरी तिचा विचार करून बघ!!! तुझ्या नेहमी बदलणाऱ्या अश्या मूडचा काय अर्थ लावायचा तिने???', विक्रांत बरंच काही बोलून गेला. 'मलाही तेच वाटतं कधी तरी तिनेही येऊन हक्काने मला अस विचारावं!! पण ती नाही बोलत कधीही किंवा तिला नसेल काही फरक पडत अश्या वागण्याचा', सिद्धांत त्याला म्हणाला. 'नाही, मला वाटत तिने कदाचित सवय करून घेतली आहे आता ह्या वागण्याची.', विक्रांत म्हणाला. 'हे बघ विक्रांत, तिला मी आवडतो, नाही आवडत हे मला माहिती नाही आणि हे मला कस कळणार? होऊ शकतं तिच्या मनात अस काही नसेलही आणि मी तिला काही बोलणं म्हणजे तिच्या निरागसपणे वागण्याचा गैरफायदा घेण्यासारखं नाही का?', तो विक्रांतला म्हणाला. सिद्धांतच्या ह्या बोलण्यामुळे विक्रांत शांतच झाला. 'पण बर झालं सिद्धांत, कमीतकमी आज तू बोलला तरी. निदान तुझ्या मनात काय आहे हे तरी कळाल!' सिद्धांतला आज खरं तर विक्रांत जवळ मन हलकं करून खूप बरं वाटत होतं. खर तर आर्याच्याही मनात त्याच्याविषयी soft corner आहे हे त्याला माहिती होत. पण ते क्षणिक ही असू शकत, अस त्याच मत होतं. आणि इकडे जसे जसे दिवस जात होते तसं तसं आर्याची निराशा वाढत चालली होती. तिला कुठेतरी वाटलं होतं की सिद्धांत एकदा तरी बोलेल किंवा परत सगळं काही नॉर्मल होईल. पण ह्या वेळेस असं काहीही झालं नव्हतं आता ही शांतता तिला सहन होत नव्हती. त्यामुळे हल्ली तिची चिडचिड पण खूप वाढली होती मुळात तिचं मनच थाऱ्यावर नव्हतं. ना तिचं जेवणात लक्ष होत ना कामात.
तिला असच सिद्धांतनी तीचं काम verify करण्यासाठी बोलावलं. त्याने तिच्या बऱ्याच चुका काढल्या आणि त्या दुरुस्त करायला सांगितलं. खरं तर अश्या चूका त्याला मान्यच नसायच्या पण आर्याची मनस्थिती ठीक नाही हल्ली हे काही त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं. म्हणून तो तिला ह्या वेळेस काहीही नाही बोलला. दुसऱ्या वेळेस जेव्हा ती तेच काम घेऊन आली, तेव्हा मात्र सिद्धांतला धक्काच बसला, 'आर्या, अग काय करून ठेवल तू हे तुला जे changes सांगितले होते ते तर तू केलेच नाही आणि हे काय करून ठेवलं. तुझं लक्ष नाही आहे कामात काय झालं?? ह्या चुका तर मला मान्यच नाही आणि तुझ्याकडून तर अजिबातच नाही. are you all right?????', त्याने विचारलं.
क्रमशः