AGENT - X (10) in Marathi Fiction Stories by Suraj Gatade books and stories PDF | AGENT - X (10)

Featured Books
Categories
Share

AGENT - X (10)

१०.

"मला वाटलेलं तुम्ही शॅम्पेन पाजून हजारेला मारताय...!" मी सुन्न होऊन बोललो.
"वेडायस की काय? एवढी महाग शॅम्पेन मात्री कोण करणार? बिसाईड्स, आय नेव्हर युज माय ट्रिक ट्वाईस! पकडलं जाण्याची शक्यता असते!"
मला माहितीय मिस्टर वाघ पित नाही. पण मला चिडवण्यासाठी तो उपहासानं तसं म्हणायला होता...
"हजारेचा खून झालाय म्हंटल्यावर इन्वेस्टीगेशन झालं असेल?"
"हो."
"मग तुम्ही वाचला कसे?"
यावर तो हसला.
"तुझ्या लक्षात आलं असेल, तर याचं उत्तर दिलंय मी तुला." तो म्हणाला.
"बरं. पण त्याचे अकाऊंट स्टेटस तपासलं असेलच. त्यांनी मरणाआधी तुम्हाला एवढी मोठी अमाऊंट ड्रान्जॅक्ट केल्याचं समोर आलं असेल..."
"तो असले ड्रान्जॅक्शन्स करण्यासाठी त्याच्या बायकोचं अकाऊंट वापरायचा. ती एका श्रीमंत घरातली मुलगी आहे. त्यामुळं मोठी रक्कम तिच्या अकाऊंटवर पडूनच असायची. टोचे वडील देखील ते अकाऊंट वापरतात त्यामुळं मोठं ड्रान्जॅक्शन्स पहिल्या पासून तिच्या अकाऊंट वरून होत आलंय. त्यामुळं कोणी कधी चौकशी केली, तरी ऑब्जेक्शन घेण्याचा प्रश्नच येणार नाही. शिवाय त्याच्या बायकोचं अकाऊंट व्हेरिफाय करायला सहसा कोणी जाणार नाही याची त्याला खात्री असावी." मिस्टर वाघनं माझी शंका दूर केली व तो कळकळीनं पुढं म्हणाला,
"वाईट या गोष्टीचं वाटतंय, की हजारेची बायको त्याच्या पापात सहभागी होती. मला जेवू घातलं होतं त्या माऊलीनं..."
"पण तरी तुमच्या अकाऊंट वर..." माझी शंका अजून दूर झाली नव्हती.
"तो ऑनलाईन ड्रान्जॅक्शन्स करतोय हे बघून मी त्याला माझे पर्सनल अकाऊंट डिटेल्स न देता माझ्याच एका सेवाभावी संस्थेच्या अकाऊंट वर त्याला ते पैसे ट्रान्स्फर करायला लावलं."
"तुमच्याकडं सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात नाही...!" मी तोंड वाकडं करून म्हणालो.
"मी अडकण्याची तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही सूरज!" तो हसत म्हणाला.


मिस्टर वाघ घराकडं ड्राईव्ह करत असताना त्याला त्याच्या स्क्रिनच्या जीपीएस ट्रेकिंग वरील पॉईंट हाललेला दिसला. आणि गंभीर होण्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.
आणि त्यानं गाडी वळवली ती मिथिलच्या घराकडं!

कुणाची परवानगी न घेता मिस्टर वाघ त्या व्यक्तीला घेऊन मिथिलच्या घरात शिरला. ती व्यक्ती समोर असल्यानं मिस्टर वाघला पण कोणी अडवलं नाही. फक्त वायरलेस वरून आत इंफॉर्म केलं गेलं.
व्हिएक्सचा होणारा परिणाम थांबण्यासाठी मिथिल स्वतःची ट्रीटमेंट करत बसला होता. त्यानं अगदी कुलली समोर उभारलेल्या मिस्टर वाघकडं बघितलं,
"आह! मिस्टर वाघ! मी तुमच्याकडं येणारच होतो!" म्हणत त्यानं मिस्टर वाघचं कॅमेरा डिव्हाइस त्यानं समोरच्या टी-पॉयवर टाकलं. म्हणाला,
"हे कोणीतरी माझ्या कारला चिकटवलं होतं!" मिथिल म्हणाला.
"प्रयत्न चांगला होता, पण फसला. काय?" मिथिलनं कसल्या तरी व्हाईल मधून सिरेंज भरत मिस्टर वाघला विचारलं!
"तुमचा माणूस!" मिस्टर वाघनं त्या व्यक्तीला त्याच्या समोर फेकलं.
"मर्डर वेपन म्हणून याचा वापर करायचा प्लॅन होता तुमचा. तुमचे बोर्ड मेंबर्स आदिनाथ, शीतल, नारायण, सबइन्स्पेक्टर कैरव, जर्नलिस्ट उपेंद्र आणि पोलीस प्रोसिक्युटर रजत, आणि दोन सामान्य नागरिक करन आणि बिलाल, जे वस्तुतः सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते; सगळे तुमच्या विरुद्ध पुरावे गोळा करणारे. या सगळ्यांना तुम्ही मारलंत." मिस्टर वाघनं त्या व्यक्तीकडं बोट केलं,
"याचा वापर करून!"
"म्हातारी माणसं ओ! आपल्या तरुणांच्या नवीन कल्पना त्यांच्या पचनीच पडत नाहीत! काही करायला जावं, तर फक्त आडवं लावायचं एवढंच त्यांना माहीत असतं. प्रगती करायची असेल, तर पहिला यांना निवृत्ती द्यायला हवी!" मिथिल म्हणाला.
"हो! मग त्यासाठी त्यांचा जीव घ्यावा लागला, तरी चालेल. होय की नाही?" मिस्टर वाघ गूढ स्मित ओठांवर घेऊन डोळे बारीक करून मिथिलला म्हणाला,
"तुम्ही तुमच्या बोर्ड मेंबर्सना मारण्याचा सपाटा लावलात! सुरवात केलीस कंपनीचे फाऊंडर असलेल्या तुझ्या वडलांपासून. तू त्यांना मारून गडबडीनं दहन पण करून टाकलंस. आणि नंतर याला हाताशी धरून तुझ्या मार्गात आडवं येणाऱ्या लोकांना संपवण्याच्या मार्गाला लागलास.
"बोर्ड मेंबर्स मेल्यानंतर तू नवे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स इलेक्ट करणार होतास. जे तुझ्या तालावर नाचतील. या खूनांच्या तपासात जे-जे तुझ्या जवळ पोहोचले, त्या सगळ्यांनाही तू चोरीच्या गाड्या वापरून याच्या सहाय्यानं संपवलंस! भविष्यात गोष्टी हाताबाहेर गेल्या असत्या, तर याला बळीचा बकरा केला असतात तुम्ही! हो की नाही?!
"पण तुमचा उतावळेपणा नडला तुम्हाला मिथिल साहेब! आणि तुम्ही स्वतःच खून पाडलेत! काय?" मिस्टर वाघनं हसून समोर बसत मिथिलला प्रतिप्रश्न केला.
"दिनेशलाही मारलंत तुम्ही! आणि दोन तासांपूर्वी निशांत अँड फॅमिली पण स्वर्गवासी झाली!"
"तुम्हाला तर सगळंच माहीत आहे! याचा अर्थ माहितेय?" मिथिलनं विचारलं,
"आता मरावं लागेल!" तो मिस्टर वाघला म्हणाला.
"हो! पण तुम्हाला!"
मिस्टर वाघ हे बोलताच समोर पडलेली व्यक्ती अचानक उठली आणि त्याने मिलींद हजारेच्या पिस्टलनं मिथिलवर गोळी झाडली.
हेड शॉट! मिथिल जागीच गतप्राण झाला!
गोळी चालवलेला आवाज घुमल्यावर लगेच मिथिलची माणसं मिस्टर वाघ व त्या व्यक्ती भोवती गोळा झाली.
"आम्हाला मारून तुम्हाला काहीच मिळणार नाही! तुमचे घसे भरणारा कधीच मरून पडलाय!" मिस्टर वाघ शांतपणे जागा न सोडता म्हणाला.
ती माणसं जागी तशीच उभी राहिलीत. ती बेसावध झाल्याचं पाहून ती संधी साधून मिस्टर वाघनं टी-पॉयवर पडलेली मिथिलची पिस्टल घेऊन त्यांच्यावर फायर केलं. त्याच्या हाताला ग्लव्ह्ज् अजून तसेच होते. त्या माणसानंही त्यांतील काही लोकांवर गोळ्या झाडून त्यांना संपवलं.
सगळं शांत झाल्यावर मिस्टर वाघनं मिथिल भरत असलेली सिरेंज व व्हाईल पहिली. तो हसला.

"काय होतं ते?" मी विचारलं.
"डायझेपाम" मिस्टर वाघनं उत्तर दिलं.
"डायझेपाम? पण त्यानं तर झोप येते ना?" मी गोंधळून विचारलं.
कारण मिस्टर वाघ समोर असताना अशी रिस्क घेण्याची हिंमत कोण करेल? आणि जो करेल, तो एक तर मूर्ख असला पाहिजे, नाही तर भयंकर धाडसी...!
"ओव्हर कॉन्फिडन्स! त्याच्या टेरिट्रीत होतो मी. म्हणून त्यानं फाजील धाडस केलं असेल. मला पटकन मारून आराम करायची इच्छा असावी त्याची. हं! पण मी कायमचाच आराम दिला त्याला!"

ती व्यक्ती मिस्टर वाघच्या बाजूला बसली. दम खात... मिस्टर वाघ मागं टेकला आणि त्यानं त्या व्यक्तीकडं पाहत त्याला विचारलं,
"मग सिदात! काही सांगायचंय?"

"सिदात! म्हणजे तो माणूस सिदात होता? जर तो मिथिलचा माणूस होता, तर त्यानं... मग त्यानं तुम्हाला मदत का केली?" माझा गोंधळ उडाला होता.
"पण सगळ्यात आधी; मिथिल त्या विषारी व्हिएक्स नर्व एजन्ट पासून वाचलाच कसा?" मी प्रश्न बदलला.
"मिथिल जर ते बनवू शकता होता, तर त्या पासून स्वतःच रक्षण कसं करायचं हे त्याला माहित असणारच! नाही?" मिस्टर वाघनं नेहमीच्या सवयीनं मलाच प्रतिप्रश्न केला.
मी होकारार्थी मान हलवली.
"डायझेपाम तो त्यासाठीच घेत होता. ते एक सेडेटीव्ह आहे. रिलॅक्सेशनसाठी हे युज करतात. म्हणूनच हे घेतल्यावर घेरी आल्या सारखं होतं आणि झोप लागते. एंझाईटी, अल्कोहोल विड्रॉव्हल व मसल स्पॅजम्स वर हा एक इलाज आहे. " असं म्हणून त्यानं स्पष्टिकरण देणं चालू केलं,
"मी सिदातला घेऊन त्याच्या लिविंगरूम मध्ये पोहोचलो, तेव्हा त्याच्या बाजूला एक पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर पडलं होतं. यावरून तुला कळालं असेल, की त्यानं काय केलं असेल!"
मिस्टर वाघनं एक क्लिप त्याच्या टीव्ही स्क्रिनवर चालू केली.
स्क्रिनवर मिथिलची तीच 'गोलमेज परिषद' दिसत होती...
"श्रीलंकन इस्टर्न बॉम्बिंग, ट्वेन्टी फस्ट ऑफ एप्रिल टू थाऊसंड् नाइंटिन. चर्चेस अँड हॉटेल्स वेअर अटॅक्ड् बाय सुईसाईड बॉम्बर्स! वी वॉन्ट टू अवेंज फॉर दॅट!" त्यांतील एक व्यक्ती म्हणाली,
"लूक एट माय फादर, ही इज सफरिंग फ्रॉम हार्ड प्रॉब्लेम. लास्ट स्टेज! वी लॉस्ट आवर फॅमिली इन दॅट एक्सप्लोजन! इन हिस थिस कन्डीशन, ही हॅड सीन हिस फॅमिली डाईंग..."
"अँड वी अस्युम दॅट सम इंडियन्स अल्सो वेअर इनवॉल्व्ड् इन दॅट कॉन्सिरसी! वी वॉन्ट टू युज थिस केमिकल बॉम्ब इन इंडिया फस्ट! डुइंग दॅट, वी कॅन टेस्ट द बॉम्ब अँड अफ्टर् दॅट, वी विल हेडिंग टू इराक, श्रीलंका अँड दि रिअल मास्टर माईन्ड्स हू वेअर बिहाईंड दिज एक्सप्लोजन्स्!
"लूक, आय वॉन्ट टू गिफ्ट थिस रिवेंज टू माय फादर बिफोर् हिस डेथ. सो आय अस्युम दॅट यू आर रियलाईजिंग आवर अर्जन्सी!"
"नो प्रॉब्लेम. वी आर ऑल प्रिपेयर्ड्!" मिथिलनं त्याला आश्वासन दिलं.

त्यांचं संभाषण चालू असतानाच बाहेरून गोळी झाडलेला हलकासा आवाज झाला. सगळे सावध झाले. नकळतच चपळाईनं आपापल्या गन्स सगळ्यांच्या हातात आल्या होत्या. टिनचं काही तरी पडल्याचा पुन्हा आवाज झाला. थोड्याच वेळात आत गॅस पसरला. मिथिलला त्या गॅस बद्दल माहिती असल्यानं ते काय आहे हे लगेच त्याच्या लक्षात आलं आणि...
तो त्या ऑक्सिजन मास्क लावलेल्या माणसाकडं धावला. त्यानं त्याचा ऑक्सिजन मास्क व सिलेंडर हिसकावून घेतले. त्याच्या सोबतच्या माणसानं त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण मिथिलनं त्याच्या पिस्टलनं त्याला बिझनेस ऑफर दिलेल्या माणसालाच गोळी झाडून जखमी केलं. हे हे दर्शवण्यासाठी होतं, की तो त्या वृद्धाला मारण्यास संकोच करणार नाही. मग मिथिलनं त्या आजारी माणसालाच हॉस्टेज म्हणून बरोबर घेतलं. त्याच्या कनपट्टीला त्याची पिस्टल लावली. त्यामुळं तिथल्या लोकांच्याकडं पण आर्म्स असून व ती मिथिलवर रोखली गेलेली असली तरी ते काही करू शकले नाहीत....
मिथिलनं त्याच्या तोंडाला एव्हाना ऑक्सिजन मास्क लावला होता. तो त्या आजारी वृद्ध माणसाला फरपटत खोलीतील दुसऱ्या बाजूच्या दरवाजाकडं पळाला. मिस्टर वाघचा टायनी कॅमेरा त्याला फॉलो करत होता.
मिथिल त्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूने दरवाजा तोडून बाहेर पडला. मिस्टर वाघनं तोही लॉक करण्याची दक्षता घेतली होती. पण मिथिलनं गोळी झाडून त्याचं लॉक तोडलं होतं आणि त्या माणसाला तिथंच टाकून फक्त ऑक्सिजन सिलेंडर घेऊन तो तेथून पळाला होता.
त्याच्या गाडीत त्यानं डॅशबोर्डमधून कसलं तरी व्हाईल आणि सिरेंज काढून त्यानं स्वतःला इंजेक्ट करून घेतलं. थोडावेळ मागं टेकून बसला आणि काही वेळाच्या आरामा नंतर त्यानं गाडी चालू केली...

(म्हणून त्याची गाडी मूव्ह झालेली मिस्टर वाघाला त्याच्या गाडीच्या स्क्रिनवर दिसली होती...)

त्या पडायला आलेल्या बिल्डिंगमध्ये ती माणसं 'व्हिएक्स'मुळं मृत झाली होती... ती बातमी पाहिल्याचं आत्ता मला आठवलं... जी मी विसरून गेलो होतो... एनआयए अजूनही त्याचा तपास करत आहे...

टीव्ही स्क्रिन ब्लू झाली होती. जे पाहिलं ते खूप विचलित करणारं होतं. कोणाला तर अशा प्रकारे मरताना मी पहिल्यांदाच पाहत होतो...
मिस्टर वाघ तर क्रूर आहेच, पण मिथिल पण काही कमी नव्हता!
पण दोघांची बरोबरी मात्र होऊ शकत नाही. मिस्टर वाघ काही मिथिल सारखा स्वार्थी नाही! आणि हा मिथिल मिस्टर वाघ सारखा संयमी नाही!

"व्हिएक्सला प्रिव्हेन्ट करण्यासाठी 'एट्रोपीन' हे अँटिडोट आहे! हे केमिकलची एक्शन ब्लॉक करतं व हृदयाला उत्तेजित करतं आणि नाक, तोंड व फुफ्फुस यांच्यातील स्राव कमी करून श्वसनक्रिया सुधारण्यास मदत करत. एट्रोपीन सोबत 'प्रॅलिडोक्सिम' दिलं जातं. जे विषामुळं किंवा नर्व एजंटमुळं होणाऱ्या मसल विकनेसन व पॅरॅलीससला रिव्हर्स करत.
"गाडीत तेच त्यानं इंजेक्ट करून घेतलं होतं. तो व्हिएक्सवरच काम करत असल्यानं त्याचं अँटिडोट तो सोबत बाळगत असणार. त्यामुळं त्याच्याकडं सुरुवातीपासूनच अँटिडोट कसं अशी शंका बाळगण्यात काही अर्थ नाही!" मिस्टर वाघनं माझं शंका निरसन केलं आणि मी पुढं काय विचारणार हे आधीच ओळखून शेवटच्या वाक्यात त्याचंही उत्तर दिलं...

पण अजून काही प्रश्न होतेच... जसं की,

"मिथिल पुढच्या दरवाजानंच का नाही पळाला?" माझी बाळबोध शंका मी विचारली.
पण मला हे जाणून घ्यायचं होतं, की दरवाजा तोडूनच पळून जायचं होतं, तर तो समोरून का बाहेर पडला नाही...
"कदाचित मागील दरवाजा उघडा असेल म्हणून. पण मी शिकारीला पळायला जागा सोडत नाही हे त्याला माहित नव्हतं. तो दरवाजाही मी लॉक केला होता. दुसरं कारण हे असू शकतं, की मी समोर असेन म्हणून पण तो मागून पळाला असेल... मागच्या दारानं पळून मी समोर आहे का याची त्यानं खात्री करून घेतली असावी. मी नाही हे बघून तो गाडी घेऊन निघाला. त्यावेळी त्याला स्वतःला वाचवणं जास्त गरजेचं होतं. माझ्याशी त्यावेळी लढणं त्याला परवडणारं नाही. असा त्याचा विचार असावा.
"एवढं करूनही तो वाचला नाहीच...! त्या दिवशी त्याचं मरण अटळ होतं! मीच जे त्याचं नांव मृतांच्या यादीत कधीच टाकलं होतं!" तो कुत्सित हसत बोलला.
"आणि तुम्ही समोर असता, तर?" मी विचारलं.
"त्याच्याकडं गन होती! लपून त्यानं आधी मला मारलं असतं, आणि तो निघाला असता!" तो हे देखील थंडपणे म्हणाला!
'हा मरणाबद्दल किती सहज बोलतोय...' असा भाव माझ्या चेहऱ्यावर उमटला.
ते पाहून तो म्हणाला,
"काय? एक ना एक दिवस सगळ्यांनाच मरायचंय!" तो मनमोहक स्मित करत म्हणाला.
याला आता काय बोलावं हे मला कळेना... हा मृत्यू किती कॅज्युअल घेतोय... हो घेतोच! म्हणून तर कीटक मारल्यासारखी हा माणसं मारतो...
आता तर मी त्याला अमक्याला का नाही वाचवलं? असं विचारणंही बंद करायचं ठरवलंय. कारण तसं विचारलं, तर त्याचं उत्तर ठरलेलं असतं. तो म्हणतो,
"एव्हरी वन हॅस टू डाय सम डे! आय डोन्ट सेव पीपल. आय ओन्ली पनिश डिलिग्विन्ट्स!"
माझा काय विचार चालू आहे हे मिस्टर वाघाच्या लक्षात आलं असावं. तो हसला.
पण मी गंभीरच होतो.
"खरंच श्रीलंकेत जे झालं त्यात आपल्याकडील कुणाचा हात होता?" मी अत्यंत गंभीर होत विचारलं.
"फक्त एकाच नांव घेतलं जातंय. ते तुला माहीत असेलच. हल्लेखोरांवर त्याच्या इन्फ्लुएन्स आहे असं म्हंटलं जातंय. पण एक्सपोलजन मध्ये श्रीलंकेचेच लोक त्यात सामील होते. सात पुरुष आणि एक महिला सुसाईड बॉम्बर्स.
"पण आपणही या स्फोटात आपले अकरा नागरिक गमावलेत. हे आपण विसरता कामा नये! आपणही तितकेच इफेक्टेड आहोत, जितके श्रीलंकन नागरिक व इतर फॉरेनर्स ज्यांचं कोणी ना कोणी त्या हल्ल्यात मारलं गेलंय. हा माणुसकीवर झालेला हल्ला आहे. म्हणून सर्वच जण याच्याशी संबंधित आहेत!" तो याच्यावर पुढं काहीच बोलला नाही.
"या संदर्भात तुम्हाला कोणी अप्रोच झालं नाही?"
"नाही. श्रीलंकन ऑफिशियल्स यावर इन्वेस्टीगेशन करत होते. माझ्याकडून या संदर्भात कोणत्याही मदतीची मागणी कोणत्याच गव्हर्नमेंटनी केलेली नव्हती. आता तर श्रीलंकन प्रेसिडेंटनी याचा तपास थांबवण्यास त्यांच्या पोलिस चीफ व डिफेन्स सेक्रेटरीला सांगितलं आहे. इंटेलिजन्स फेल्युअर असल्यानं त्यांनी त्याच्या पोलीस चीफला सस्पेंड केलं आणि त्याच्या टॉप डिफेन्स ऑफिशियलला पण डिसमिस केलं."
"का?" मी विचारलं.
ही माहिती माझ्यासाठी खूप शॉकिंग होती. या प्रकरणाचा तपास झालेला त्याच्या प्रेसिडेंटनाच नकोय. पण का?
त्यावर मिस्टर वाघ म्हणाला,
"राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्यानं त्यांचं तसं मत आहे. भारताकडून या संदर्भात आलेली इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन त्यांच्या ऑफिशियल्स कडून त्यांच्या पर्यंत वेळेवर पोहोचवली गेली नाही अशी त्यांची तक्रार आहे. पण श्रीलंकन गव्हर्नमेंटने पीएसआय म्हणजे पार्लमेंट सिलेक्ट कमिटी अंतर्गत इन्वेस्टीगेशन जून मध्ये पुन्हा चालू केलं आहे! त्यांच्या-त्यांच्यातच मतभेद चालू आहेत. इन्वेस्टीगेशनसाठी ही केस दुसऱ्या कोणाला देतील यात शंकाच आहे."
"म्हणजे तुम्ही यात काहीच करणार नाही?"
"जो पर्यंत माझ्या पर्यंत कोण येत नाही, तो पर्यंत तरी नाही!" त्यानं आपला निर्णय सुनावला. आणि पुढं म्हणाला,
"त्यात मी एक प्रायव्हेट इन्वेस्टीगेटर आणि शिवाय परदेशी. त्यामुळं मला ते कधीच अप्रोच होणार नाहीत! हा पण इस्लामिक स्टेटनं हल्ल्याची जबाबदारी घेतली असली, तरी श्रीलंकेचा मुख्य संशय तेथील लोकल इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप नॅशनल 'तौहीद जमात' व 'जमियातुल मिलातु इब्राहिम'वर आहे. श्रीलंकन ऑथिरीटीजनाच नाही वाटतं, की या मध्ये कोणी इंडियन सामील असेल."
"आणि ती लोकं कोण होती, जी भारतात व्हिएक्सचं एक्सप्लोजन घडवून आणणार होती?"
"ते कोणी प्रस्थापित टेररिस्ट्स नव्हते. पण ते जे काही करू इच्छित होते, ते मात्र अतिरेकी होतं. या घटनेचे सूत्रधार भारतीय, श्रीलंकन, इराकी, की आणखी कोणी? नक्की कोण हे त्यांना माहीतच नव्हतं. इस्लामिक स्टेट ऑर्गनायझेशन्स कडून क्लेम केले गेले असले, तरी खरंच त्या लोकांनी हल्ले घडवले का? हे स्पष्ट नव्हतं. जे काही कानावर पडत होतं, त्यावर ते आततायी एक्शन घेणार होते. या एका कारणासाठी त्या ठिकाणी मृत झालेल्या अमेरिकन निवासी विल्सन या फॅमिलीचे नातेवाईक एकत्र येऊन त्यांनी याचा बदला घेण्याचं ठरवलं होतं. त्यांचे काही फॅमिली मेंबर्स सुट्टीसाठी श्रीलंकेत आले होती."
"काय त्यांची इतकी मोठी ताकद होती, की ते हे घडवून आणू शकत होते?"
"हं!" मिस्टर वाघनं स्मित केलं. म्हणाला,
"जगातला जवळजवळ वीस पर्सेन्ट तेल व्यापार हे फॅमिली मेंबर्स मिळून कंट्रोल करतात. यावरून समजतं, की त्यांची ताकद काय असेल!"
"मग ते तसंही संबंधित देशांना गोत्यात आणू शकत होते, मग त्यांनी हा पर्याय डिस्ट्रक्शनचा पर्याय का निवडला?" मी प्रश्न केला.
"फॉरेन पॉलिसीज सूरज! खूप कॉम्प्लिकेटेड असतात! त्यांनी एकट्यानी निर्णय घेऊन काही झालं नसतं. त्यांच्या देशानं त्यांच्या पर्सनल इंटरेस्टसाठी त्यांना ते करू दिलं नसतं. म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला असावा.
"पण ते शिक्षा करणार कोणाला? नेमकं टार्गेट माहीतच नव्हतं! म्हणून त्यांनी मास किलिंग करण्याचा निर्णय घेतला असावा असा माझा अंदाज आहे..."
"आणि म्हणून तुम्ही त्यांना मारलंत!" मी मिस्टर वाघला विचारलं.
"हो!" तो गंभीरपणे म्हणाला.
माझी चक्की गरम झाली होती.
"हे सगळं किती अमानवीय आहे..." मी विचलित होत म्हणालो.
यावर मिस्टर वाघ स्मित करत म्हणाला,
"मानवीय आहे सूरज! मानवीय आहे! हे सगळं माणसंच तर घडवून आणणार होते!"
आय डोन्ट सेव पीपल म्हणणाऱ्या मिस्टर वाघनं एवढ्या मोठ्या संकटातून असंख्य लोकांना वाचवलं होतं...
आणि त्यानं असं करून पुन्हा माझ्या त्याच्या विषयीच्या समजाला छेद दिला होता...
"सिदातनं काय सांगितलं?" मी विचारलं.

हे सगळं पचवणं माझ्यासाठी अत्यंत अवघड जात होतं. अनामिक मृत्यू टळला होता... मिस्टर वाघमुळं... माहीतही नव्हतं, की मृत्यूच्या छायेत काही काळ काढलाय... मरण दारात उभं होतं... आणि... आणि कोणालाच त्याचा पत्ता देखील नव्हता...
या विचारानं माझ्या माथ्यावरून घामाचे काही थेंब ओघळले. थंडी असूनही... आजही बाहेर पाऊस चालू होता... माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मिस्टर वाघ काही काळ थांबला होता...
त्यावेळी पसरलेल्या शांततेत बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज कानावर आला आणि पावसाचा जोर बाहेर वाढत आहे हे माझ्या लक्षात आलं.
आणि हेही लक्षात आलं, की मिस्टर वाघ मघाशी मला इतका हरवलेला का वाटत होता.
मिस्टर वाघनं जे काही सांगितलं, त्यामुळं वातावरणात कमालीचा तणाव निर्माण झाला होता आणि त्यामुळं एका भीतीचं जाळं माझ्या चहूबाजूनं पसरलं होतं...
मी मानसिक भीतीतून सावरलेलो नव्हतो. त्या लोकांना जे करायचं होतं तसं झालं असतं, तर?... घटना टळून देखील त्याबद्दल सतत न घडलेल्या घटनांबद्दल मेंदू चित्र तयार करत होता... मृतदेहाचे खचच खच माझ्या डोळ्यासमोर फिरू लागले...
पण पुढं काय झालं ते मला जाणून घ्यायचंच होतं. शिवाय या सगळ्यांशी हानिया कशी जोडली गेली आहे याचा उलगडाही अजून व्हायचा होता...
म्हणजे तसे तर सगळेच या प्रकरणाशी जोडले गेले होते... पण हानिया डिरेक्ट्ली जोडली गेली होती, पण ती कशी...? हे देखील मला माहिती करून घ्यायचं होतं!

"आय वॉज वर्किंग इन यूएस मरीन्स एज वॉरन्ट ऑफिसर वन. आय एम अ इंडियन ओरिजिन अमेरिकन! टू थाऊसंड् वनला अमेरिकेनं अफगाणवर जेव्हा इन्वेजन केलं, अमेरिकन सोल्जर्स आणि अफगाण गव्हर्नमेंट ट्रुप तेव्हा तालिबान विरुद्ध तिथं लढत होते. आय वॉज दि पार्ट ऑफ दॅट अमेरिकन ट्रुप." सिदातनं मिस्टर वाघला सगळं सविस्तर सांगायला सुरुवात केली,
"युद्ध चालू असताना आम्ही करीम नांवाच्या एका अफगाण नागरिकाला पकडलं होतं. आमच्या लेफ्टनंटनं त्याच्या बहिणीला फिशिकली अब्युज करण्याचा प्रयत्न केलाय असा त्याचा आरोप होता. लेफ्टनंटचा खून करण्यासाठी तो बॅरेकमध्ये खुसला होता. फूड सप्लायचं काम त्याच्याकडं असल्यानं त्याला कॅम्प मध्ये एंटरन्स अलाव्ड् होता. म्हणून त्याला ते शक्य झालं होतं.
"पण लेफ्टनंटवर हल्ला करण्या आधीच तो पकडला गेला. त्याला इम्प्रिसंड् करण्यात आलं, पण त्याच्या बोलण्याचं व्हेरिफिकेशन पण केलं गेलं. आणि तो खरं बोलतोय हे समोर आलं. म्हणून मग लेफ्टनंटला अमेरिकेला परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेस त्याचं कोर्ट मार्शल करणार असावेत.
"अमेरिका व अफगाण मध्ये टेन्शन क्रिएट होऊ नये म्हणून हे प्रकरण दाबण्यात आलं. त्याच्या बाबतीत जी काही एक्शन घायची ती अमेरिकेत घेऊ असा विचार करून सिक लिव्हच्या रिजननं त्याला नॉर्मली अमेरिकेला रवाना करण्याचं ठरवलं गेलं.
"लेफ्टनंटला सेफ अँड साऊंड सिक्रेटली एअरबेस पर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्यावर सोपवण्यात आलं होतं. जातना लेफ्टनंटनं मला विनंती केली, की त्यानं जे काही केलंय त्याचा त्याला रिग्रेट आहे, त्यामुळं त्याला करीमच्या फॅमिलीकडं अपोलोजाईझ करायचंय.
"मी त्याची विनंती नाकारू शकलो नाही आणि त्याला करीमच्या घरी घेऊन गेलो. जेव्हा करीमच्या घरापाशी पोहोचलो, लेफ्टनंटनं मला बाहेर थांबण्यास सांगितलं आणि तो घरात शिरला.
"काही वेळानं आतून आवाज येऊ लागले. मी आत जाऊन पाहिलं, तर लेफ्टनंट करीमच्या बायकोला व त्याच्या बहिणीला मारत होता.
"ही वॉज युजिंग व्हेरी अब्युजीव लँग्वेज अगेंस्ट देम. मी लेफ्टनंटला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं मलाच मागं ढकललं आणि माझी हँडगन हिसकावून घेऊन त्यानं त्या दोघींनाही शूट केलं. मी शॉक्ड् झालो. आय... आय लॉस्ट माय माईंड फॉर अ व्हाईल... लेफ्टनंटचं असं वागणं माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड् होतं...
"पण काही क्षणातच मी भानावर आलो कारण करीमची चार वर्षांची मुलगी समोर उभी होती. शी वॉज स्केअर्ड् टू डेथ! लेफ्टनंटची नजर तिच्यावर पडली होती. त्यानं तिच्यावरही गन पॉईंट केली.
"मी कसलाच विचार करू शकलो नाही. आय... आय स्नॅत्च्ड् माय गन फ्रॉम हिम अँड किल्ड् द लेफ्टनंट!"
एवढं बोलून तो दमल्यासारखा श्वासोच्छ्वास करत पडून राहिला.
"पुढं!" मिस्टर वाघनं त्याला सांगण्यास उद्युक्त केलं.
"घरात शोधाशोध करून तिथले हाताला लागतील तिवढे पैसे घेतले आणि त्या मुलीला घेऊन तेथून पळून गेलो."
"एव्हना माझ्यासाठी व लेफ्टनंटसाठी आमच्या मरीन्सची शोधाशोध चालू केली होती. पण तिथल्या करीमच्या नेबर्सनी मला तेथून निघण्यास मदत केली...
"मी कसा बसा इथं भारतात पोहोचलो. अफगाणी सोल्जर्स सोबत काम केल्यानं मुस्लिम कल्चर ओळखीचं झालं होतं. कलर पण ब्राऊन असल्यानं व मी मुस्लिम असल्याचं प्रिटेंड केल्यानं मधल्या देशांमध्ये मला काही प्रॉब्लेम आला नाही."
"तू इथं स्थायिक कसा झालास?"
"करीम सोबत काम करणाऱ्या काही व्हेजिटेबल एक्स्पोर्टर्स सोबत मी इंडियात आलो. इथं आल्यावर मी स्वतःचं नांव बदललं. आणि फेक रेसिडेंसी अँड आयडेंटिटी पेपर्स तयार केले. दॅट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट. यू नो दॅट!
"आणि इथं मिळेल ते काम चालू केलं. तिकडं व्हर्जिनिया मध्ये माझ्या लेफ्टनंटला मारून पळून जाण्यानं माझ्या फॅमिलीला खूप हॅसल सहन करावं लागत होतं. पण त्या मुलीची जबाबदारी आता माझ्यावर असल्यानं मी परत जाऊ शकत नव्हतो... काही महिन्यांत, वर्षांत माझी फॅमिली तर मेबी इन्कवायरीतून सुटली असती, पण हानियाला मी कुठं सोडणार होतो? सोडली असती, तर काय झालं असतं तिचं? म्हणून मी तिच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला..." त्यानं श्वास सोडला व पुढं म्हणला,
"ज्या मुलीला मी अफगाण वरून घेऊन आलो, ती हानिया! करीमची मुलगी!..."

म्हणजे हानिया ही अशा प्रकारे या सगळ्या प्रकरणाशी जोडली गेलेली होती तर...
किती भोगलंय तिनं. तरी ती किती लाईव्हली आहे. तिचं नांव येताच मोहक स्मित करणारा हॉस्पिटल मधला तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. नो वंडर, की मिस्टर वाघ तिला 'ब्रेव गर्ल' म्हणतो...!
"यू आर ए गुड मॅन सिदात! यू सॅक्रिफाईज्ड् युअर होल लाईफ फॉर दॅट अन्नोन लिटल गर्ल! यू रिअली आर अ ग्रेट मॅन!" मिस्टर वाघ सिदात म्हणाला. जे खरंच खूप खरं होतं...
"मिथिलशी कसा संपर्क झाला?" मिस्टर वाघनं त्याला पुढं विचारलं.
"अफगाणिस्तान ते भारत या जर्नीत हानियाच्या डिसऑर्डर बद्दल समजलं होतं. तरी कसं तरी सावरत मी तिला इथं घेऊन आलो होतो.
"इथल्या कामात मिळणाऱ्या पैशांतून तीची ट्रीटमेंट करणं आणि दोघांचा जगण्याचा खर्च करणं माझ्यासाठी इम्पॉसिबल होतं. म्हणून वर्षभरात मी धन्वंतरी फर्माचे फाऊंडर व त्यावेळचे एमडी अदीप भारद्वाज यांना भेटलो. त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट बद्दल मी ऐकलं होतं. त्यांना हानियाची अवस्था सांगितली. ही व्हॉज रिअली अ गुड मॅन. अफ्टर् हिअरिंग हानियाज् प्रॉब्लेम, ही गेव मी अ जॉब विथ गुड सॅलरी अँड अल्सो ही स्टार्टेड् हानियाज् ट्रीटमेंट. फ्यू मंथ्स बिफोर्, अफ्टर् हिस सडन डिमाईस, एव्हरी थिंग वॉज कोलॅप्स्ड्!
"बट वन डे, मिथिल कॉल्ड् मी. आय व्हॉज वर्कींग एज ए जॅनिटर इन धन्वंतरी फार्मा. दॅट्स वाय हानियाज् ट्रीटमेंट्स प्रोब्लेम ऑक्यूअर्ड अगेन. आय हॅड नो मनी फॉर हर मेडिकेशन. आणि हे मिथिलला माहीत होतं. त्यानं माझ्या समोर एक प्रपोसल ठेवलं. बोर्ड मेंबर्सना मारण्याचं.
"त्यानं माझी सगळी हिस्ट्री जाणून घेतली होती. मी जर त्याचं काम केलं नाही, तर तो ही माहिती इंडियन व अमेरिकन गव्हर्नमेंटला सेंड करेल असं त्यानं मला थ्रेट केलं. तसं जर झालं असतं, तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण हानिया एकटी पडली असती. शिवाय तिचा आजार... मेली असती ती...
"मी जर त्याला मदत केली, तर तो हानियाच्या ट्रीटमेंटसाठी खर्च करेल व तिची काळजी घेईल असं त्यानं मला प्रॉमिस केलं. मग... हा... आय वॉज हेल्पलेस... आय हॅड टू जॉईन हिम... आय हॅड टू जॉईन हिम फॉर हानिया...
"मी त्याच्या कामाला रेडी असून मी कधी त्याच्या अगेंस्ट जावू नये, त्याचा प्लॅन र्युन करू नये, म्हणून मला तो ड्रग्स इंजेक्ट करत होता. मी त्याच्यासाठी लोकांचे मर्डर्स करणार होतो आणि त्या बदल्यात मिथिल हानियाच्या ट्रिटमेंटची सगळी काळजी घेणार होता.
"माझ्याकडं पर्याय नव्हता. मी तयार झालो. आणि त्यानं त्याचं सायकियॉटिक ड्रग माझ्यावर टेस्ट करायला चालू केलं. त्यामुळं मला पॅरानोईया व एंझायटी फील व्हायची... डिझिनेस जाणवायचा. अफगाण मध्ये घडलेल्या घटना समोर जशाच्या तशा उभ्या रहायच्या... एवढं जाणवतंय... इन बिटविन मी काय करायचो; तया वेळी मला लक्षात रहायचं नाही... पण नंतर ते सगळं मला हाउंट करायचं..."
"तू तुझा ल्युटेनेन्ट समजून खूप माणसं मारलीस!" मिस्टर वाघ म्हणाला.
"सॉरी फॉर दॅट! आय रिअली डिडन्ट इंटेनडेड टू डू दॅट...!" सिदात पुढं म्हणाला,
"पण त्या ड्रगचा इफेक्ट उतरल्यावर पण मला सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स व्हायचे... खूप जोरात हेडएक व्हायचं..."
"आय नो! सतत ड्रग डोस मिळत राहील्यानं तसं होत होतं." मिस्टर वाघ एवढंच म्हणाला.
"बट थँक्स टू यू! यू सेव्ड् मी फ्रॉम दि हेल...!" सिदात मिस्टर वाघला कृतज्ञतेनं म्हणाला.
"नो. डोन्ट थँक मी!" मिस्टर वाघ पुढं काही बोलला नाही.
त्याच्या डोक्यात काय चालू होतं कोण जाणे...
"कॅन यू हेल्प मी फाईंड हानिया?" सिदातनं मिस्टर वाघला विनंती केली.
"तू शेफ पण आहेस का?" मिस्टर वाघनं मध्येच त्याला विचारलं.
विषय बदलण्यात तसा तो एक्सपर्ट आहेच.
"हो... म्हणजे सुरवातीचा काही काळ मी एका रेस्टॉरंटमध्ये पण काम केलं होतं. तिथं मी शिकलो होतो." सिदातनं सांगितलं.
"चक स्टेक तुझी स्पेशालिटी आहे!"
"हो. तुम्हाला..." सिदात विचारणार इतक्यात मिस्टर वाघ त्याला वाक्य पूर्ण करू न देता त्याला म्हणाला,
"शी मस्ट बी हिअर समवेअर! लेट्स गो फाईंड हर!"
मिस्टर वाघनं उठून मिथिलची गन त्याच्या एका रिकाम्या होलस्टर मध्ये खोचली. आणि सिदात कडून हजारेची पिस्टल घेऊन तो आतल्या बाजूला चालून गेला. सिदातनं ही हानियासाठी शोध चालू केला...

दोघांनी मिथिलचं घर धुंडाळलं. घरातील शेवटच्या खोलीत हानियाला ठेवण्यात आलं होतं. एक नर्स तिच्या देखभालीसाठी तिथं होती. बाहेरील बंदुकांच्या आवाजांमुळं ती गांगरली होती. पण त्या गोंधळाचा हानियावर काहीच फरक पडला नव्हता.

"ती तिथंच असेल हे तुम्हाला कसं ठाऊक? तुम्ही ते कसं ओळखलंत?" मी आश्चर्यानं विचारलं.
"सिदातला ब्लॅकमेल करण्यासाठी मिथिलला हानियाला सोबत ठेवणंच गरजेचं होतं. मग तो तिला त्याच्या घरीच ठेवणार हे ओळखणं अवघड नाही." तो सहज म्हणाला.
'एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात ठेऊ नये?' असा त्याच्या बोलण्याचा टोन होता. जो माझ्या लक्षात आला.

मिस्टर वाघ व सिदातनं खोलीत प्रवेश करताच ती नर्स तेथून पळून गेली होती. ती इतकी घाबरलेली होती व गडबडीनं पळून गेली होती, की तिनं सिदात व मिस्टर वाघकडं पाहिलं देखील नव्हतं.
सिदातनं हानियाला आपल्या कवेत घेतलं. अश्रू आणि हानियाला भेटल्याचा आनंद या संमिश्र भावना त्याच्या चेहऱ्यावर उमटल्या होत्या. हानिया देखील सिदातला पाहून हसू लागली...
त्याचक्षणी मिस्टर वाघनं हजारेची सिदात कडून घेतलेली गन सिदातवर रोखली.
सुरवातीला सिदात आश्चर्यचकित झाला, पण नंतर कमालीचा शांत होत तो मिस्टर वाघला फक्त एवढंच म्हणाला,
"गो अहेड!"
तो हे बोलताच मिस्टर वाघनं ट्रिगर दाबला आणि सिदात हानियाच्या मिठीतच गतप्राण झाला. त्याच्या रक्ता-मांसाचे तुकडे सगळ्या बाजूना व हानियावरही विखुरले. मिस्टर वाघ देखील या पासून अछूता राहिला नाही...
आणि मग तो हजारेची गन तिथंच टाकून हानियाला घेऊन तेथून बाहेर पडला...