Rahasyamay Stree - 11 in Marathi Moral Stories by Akash Rewle books and stories PDF | रहस्यमय स्त्री - भाग ११ ( शेवटचा )

Featured Books
  • నిరుపమ - 7

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 20

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • మనసిచ్చి చూడు - 6

                         మనసిచ్చి చూడు -06అప్పుడే సడన్గా కరెంట్...

  • నిరుపమ - 6

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 19

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

Categories
Share

रहस्यमय स्त्री - भाग ११ ( शेवटचा )

रहस्यमय स्त्री भाग ११ ( शेवटचा )

अमर पवारांना म्हणाला मीच ते चार खून केले आहेत अन् पाचवा अभिजित पानसे म्हणजे सलीमचां करायला जात होतो ...
पण त्याच्या प्रेमा समोर माझे प्रेम हरले !!!
मी माझा गुन्हा कबुल करतो मात्र मला शेवटच माझ्या बायकोला भेटायचं आहे !!!

पवारांना शंका होतीच पण अचानक अमरला काय झाले हेही त्यांना कळत नव्हत !!! अभिजित पानसेला का मारायचं होत , हे ही समजल नाही !! चौकीत गेल्यावर विचारपूस करू असा विचार करून , पवार त्याला अशोक नगर जवळील इस्पितळात जिथे त्याची बायको ऍडमिट होती तेथे घेवून गेले ...

अमर खूप निराश झाला होता , तो इस्पितळात पोहचे पर्यंत पवारांशी काहीच बोलला नाही .

दोघं इस्पितळा जवळ पोहोचले , अमर गाडीवरून उतरला व धावतच इस्पितळात शिरला .

अमर पळून तर जाणार नाही ना या विचाराने पवार सुद्धा त्याच्या मागे धावले , आत जाऊन बघितले तर अमर रेशमाच्या पायावर डोके ठेवून रडत होता तो काहीतरी बडबडत होता ...
" त्याच्या प्रेमा पुढे माझं प्रेम कमी पडल , मी नाही मारू शकलो त्याला ...
तू का आपल्या पतीला मारते आहेस , जीवापाड प्रेम केलं त्याने आणि तू म्हणतेस की तो मेला आहे माझ्यासाठी ??? '
तुला बदलाच घ्यायचा आहे ना मग माझ्या सोबत हवं ते कर , पण माझ्या रेशमाला सोड ... माझ्या रेशमाला सोड स्वप्नाली ... माझ्या रेशमाला सोड !!!! "

पवारांना काहीच समजत नव्हते की अमर असा का बरळतोय !!!
तो मनातल्या मनात विचार करू लागले की आपल्या बहीणी बद्दल ऐकुन अमर वेडा तर झाला नाही ना !!!

पण तेवढ्यात त्यांना वेड लागायची पाळी आली होती , आणि त्याला कारणही काही तसेच होते ....

..... जी रेशमा गेल्या सहा - सात दिवसापासून बेशुद्ध होती ती चक्क उठून बसली होती . अन् कर्कश अावाजात बोलू लागली ...
" तुझं प्रेम कमी नाही पडलं , याउलट तुझं प्रेम इतरांपेक्षा जास्त होत . मला माहिती होत तू आपल्या प्रेमासाठी काहीही करशील म्हणून मी तुझ्या रेशमाचा वापर केला ...

तू हेच विचारत होतास ना की तो माझ्या साठी का मेला ते !!! तर लक्षपूर्ण ऐक .. पण एक शर्त आहे माझ्या जागेवर तू तुझ्या बायकोला ठेवून बघ आणि मला सांग मी त्याला जिवंत मानू की मारायला सांगू !!

लहापणापासूनच लाडीगोडीने वाढले होते .
माझे शिक्षण गावा बाहेर झाले , तेथे माझ्या बहुतेक मैत्रिणी प्रेमात पडल्या होत्या मात्र माझ्या गावी या सर्वांना गुन्हा मानला जायचा , मुला सोबत बोलताना सुद्धा पाहिलं की घरात गुन्हेगाराच्या नजरेने पाहिले जात होते . माझ्या घरात हा प्रकार नव्हता पण गावातले वातावरण पाहता माझी हिम्मत नाही झाली .
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समोरासमोर जे नाही करता येत ते फेसबुक द्वारे करू लागले . मुलांशी फेसबुक वर बोलू लागले .
व असच बोलताना माझी मैत्री अभिजित पानसे सोबत झाली ,

हळू हळू त्याच्यासोबत बोलू लागले , दिवसातून खूप वेळ त्याच्याच सोबत बोलायचे ...
खूप दिवसांनी तो क्षण ही आला जेव्हा आम्ही भेटलो !!
आम्ही असच एकदुसऱ्याला भेटू लागलो .
व असेच एकदा भेटल्यानंतर गावकऱ्यांनी आम्हाला भेटताना पाहिलं आणि बाबांजवळ घेवून गेले .
त्या दिवसानंतर आमचं बोलणं व भेटणं बंद झालं ...

एक दिवस काजल माझ्या घरी आली ती बोलू लागली की " अभिजीतने स्वतःची हालत खराब करून घेतली आहे , तो नीट जेवतही नाही ... तो तुझ्या शिवाय नाही जगू शकणार .. मी सुद्धा त्याच्या प्रेमात पडले होते ...
म्हणतात ना प्रेम आंधळ असत , खरे आहे ते .
वेळ बघून मी घरातून पळून आली ...

आम्ही लग्न केलं ... खूप खुश होतो दोघं ,
त्याने मला संगतीले की तो काम करतो तेथेच मालकाच्या खोली मद्धे राहतो ...
" स्वतःची खोली घ्यावी इतके पैसे नाहीत अन् पैसे मिळाले तरी भाड्यावर घ्यायला मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा नाही " !!!

म्हणून त्याच्या सांगण्यावरून केसरी लॉज वर त्याने खोली बुक केली , त्याला सर्वच तेथे ओळखत होते ...
मला गडबड वाटू लागली पण डोळ्यावर प्रेमाची पट्टी असल्यावर खर तेही खोट अन् खोटं ते खर वाटत , माझ्या सोबत काही असच घडत होत !!

पूर्ण विश्वास करून त्याच्या सोबत आले होते , स्वतःच सर्वच सोडून !!

लग्ना नंतरची पहिली रात्र होती , मी भविष्याबद्दल खूप काही विचार केले होते . आम्ही सोबत खूप स्वप्न रंगवली होती .
तो थोड्याच वेळात येतो म्हणून बाहेर गेला अन् मी खोली सजवू लागले होते , त्याने आणून दिलेल्या गुलाबाच्या पाकळ्या बेडवर टाकून बेड सजवू लागले ते करता करता पुढच्या विचारत मग्न झाले ...

एकाएक आवाजाने मी दचकले ... आवाज दरवाजाचा होता . मला वाटलं अभिजित आला असेल म्हणून दाराजवळ जाताना बोलत चालू लागले ... " किती वेळ किती वाट पाहत होते मी ......."

पुढे काही बोलणार पण एकाएक चूप झाले . दरवाजा एका अनोळख्या व्यक्तीने उघडला होता ...
माझ्या मनात प्रश्न आला .
' त्याच्या जवळ खोलीची चावी कुठून आली ??? '
म्हणून त्याला मी विचारले
" तुम्ही कोण " ???

तो पस्तिशितला व्यक्ती काहीच बोलला नाही , फक्त हसत माझ्या दिशेने येत होता व तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडत होता " भारीच माल आणलाय !!!"

तो माझ्या जवळ येताना पाहून मी घाबरले होते , म्हणून मी खोली बाहेर जाण्याचा विचार करू लागले . अभिजितला मोठ्या मोठ्या ने आवाज देत मी बाहेर जाऊ लागले पण त्या नराधमाने माझा हात पकडला व मला मागे ओढले ...
सजवलेल्या बेडवर मला आदळले , मी त्याचा विरोध करत होती मात्र त्याच्या ताकदीपुढे माझा निभाव लागला नाही ... मी फक्त अभिजितला जिवतोडून बोलवण्याचा प्रयत्न करत होते मात्र अभिजित आलाच नाही ...

मला ते सर्व असहाय्य होत होत , माझं अंग तूट तूट तुटत होत , मात्र मी काहीच करू शकले नाही ,
एक क्षण असा आला की प्रचंड वेदनेने मला ग्लानी आली .
मला जेव्हा जाग आली तेव्हा माझ्या शरीरावर कपडे नव्हते , समोर चार व्यक्ती दारू पीत बसले होते , अन् मला बेडला हतकडीने लॉक केलं होत . शरीरावर जागोजाग जखमा , संपूर्ण अंगाची आग आग होत होती ...
स्वतःच्या शरीराची इतकी किळस येत होती की वाटत होत ... ओतू तेल अन् फुकुन घेवू स्वतःला ...

ते नराधम इतक्यावरच नाही थांबले , तब्बल १३ दिवस एक एक करून शरीराचे लचके तोडत होते !!!

एखाद्या निर्जीव वस्तू प्रमाणे माझा वापर केला , कधी सिगरेटचे चटके द्यायचे , कधी जबरदस्ती दारू तोंडात ओतायचे , मनाच्या समाधानासाठी कधी चामड्याच्या पट्ट्याने मारलं अन् मी एका मृत शरीराप्रमाणे सर्व सोसत राहिले ...
तेव्हा मनात कुठे न कुठे हेच वाटत होत की माझ्या अभिजितला या राक्षसांनी काहीतरी केलं आहे , म्हणून तो मला वाचवायला येत नाही आहे . मनात फक्त एकच विचार होता जर मी वाचले तर या नराधमांना जिवंत नाही सोडायचं ...

तेरा दिवसांनंतर ( चौदाव्या दिवशी) चौघे ही थकले होते ते इतके नशे मद्धे होते की त्यांनी मला बांधून सुद्धा ठेवले नव्हते पण माझ्या शरीरात उठायची ताकद नव्हती !!! मी खूप प्रयत्न करून उठत होते तेवढ्यात दरवाजा जोर जोरात कोणीतरी वाजवला , ते चौघे जमिनीवरच झोपले होते , त्यातील पस्तिशितला व्यक्ती उठला त्याने दरवाजा उघडला ....

.... अभिजित पानसे आत आला , एका हात खिश्यात ठेवून दुसऱ्या हाताने मोबाईल फिरवत मला एक नजर हसून पाहिलं व तो त्या पस्तिशितल्या व्यक्तीला म्हणाला " नवीन माल आणला आहे , रूम नंबर १०४ मद्धे आहे "

माझ्या शरीरात उठायची सुद्धा ताकद नव्हती मात्र अभिजितला बघून तळपायाची आग मस्तकाला गेली . कसं माहिती पण मी ताडकन उठले अन् खाली पडलेली दारूची बॉटल त्याच्या डोक्यात फोडायला जात होते मात्र तो सावध होता व मागे सरकला यामुळे बॉटल त्याच्या पायावर फुटली त्या घातामुळे तो खाली कोसळला , त्याचा खाली पडलेला मोबाईल घेतला अन् मी तेथून पळत होते ...मात्र तेवढ्यात त्या पस्तिशितल्या व्यक्तीने त्याच्या जवळची बॉटल माझ्या डोक्यावर फेकून मारली त्यामुळे माझ्या डोक्यातून रक्त वाहू लागलं होत '

मी तेथून त्याच अवस्थेत बाहेर पळाले ...
पळता पळता मी काजल ला फोन केला तिला हकीकत सांगणार पण मागे ते नराधम धावत होते ... मागे वळून पळताना मोबाईल खाली पडला अन् त्यातून सिम व बॅटरी वेगळी झाली .
सर्व गोष्टी उचलण्या एवढा वेळ नसल्याने मी पुढे धावू लागले होते ...

माझ्या शरीरात जीव उरला नव्हता तरी शेवटच्या श्वासापर्यंत मी धावत होते साधारण पांढरा मिनिटे धावल्या नंतर दफन भुमिजवळ पोहोचले ...

तेव्हा तुझी गाडी बाजूने गेली मी तुला लिफ्ट मागण्याचा प्रयत्न केला पण तू माझा अवतार बघून तसाच निघून गेलास ... तेव्हा माझ्या मनात खूप विचार येत होते की जर माझ्या जागी तुझी आई, बायको असती तर ??? तो राग माझ्या मनात होताच !!!

जेव्हा माझ्या बाजूला पोलिसाची जीप येवून थोड्या अंतरावर थांबली तेंव्हा माझ्या जीवात जीव आला ...
मी त्या पोलिसांच्या जीप जवळ पोहोचले .
जीपमधून एक पोलिस बाहेर पडले त्याचा चेहरा अंधारात दिसत नव्हता . तो ही माझ्याच दिशेने येत होता ...

मी त्याला घडलेला प्रकार सांगितला . यावर तो म्हणाला चार व्यक्ती ... व अभिजित पानसे याने तुला तिथे नेले ...
तू सांगीतल्या प्रमाणे पास्तिशितला व्यक्ती राजाराम पाटील , म्हणजे दुसरा त्याचा पार्टनर सुबोध मोहिते , तिसरा नक्कीच नगरसेवक सुनील तावडे असेल पण चौथा कोण ???

मी त्याला सांगू लागले त्याला लांब पिळदार मिष्या होत्या धिप्पाड असे शरीर , रंग सावळा ...

सर्व ऐकुन पोलीस हसला व जिपच्या हेडलाईटच्या प्रकाशात स्वतःचा चेहरा दाखवू लागला " तो हा तर नाही ??? "
जीपच्या हेडलाईट मुळे मला त्याचा चेहरा दिसला अन् मला खूप मोठा धक्का बसला , तो चेहरा त्या चार व्यक्ती मधील एकाचा होता !!!

त्याने माझे केस पकडले आणि मला फरफटत दफन भूमी मद्धे घेवून जावू लागला ... घेवून जाताना तो म्हणू लागला " तुला काय वाटलं आमच्या हातातून पळून जाशील ??? इतकं सोप्पं नाही , तुझ्या सारख्या केत्तेक आल्या तुला काय वाटलं तू या जयकांत चव्हाण च्या हातून निसटू शकशिल !!!

मला अश्या अवस्थेत दफनभूमी मध्ये घेऊन जात असताना दफनभूमी मधील वॉचमनने पाहिले .
तो जयकांत चव्हाणला अस करण्या पासून रोकु लागला होता .

तेवढ्यात सुधीर मोहिते , राजाराम पाटील व सुनील तावडे तेथे पोहोचले . दफनभूमी च्या वॉचमनला ते बेदम मारू लागले ...

सुनील तावडे ने दफनभूमी मद्धे असलेल्या फावड्याने वॉचमनच्या शरीरावर असंख्य वार केले ...
वॉचमन आपल्या जीवाची त्यांच्यासमोर भिक मागू लागला ,
" शाब मेरी बिवी - बच्चो का मुझे छोडकर इस दूनिया मे कोई नही है !!! , हमे छोड दो शाब ... हमे छोड दो , हम किसी को भी नै बतायेगा तुम्हारे बारेमे ."

पण त्यांनी कोणाचंच नाही ऐकल ... व आमच्या दोघांच्या शारिरांना त्याच दफन भूमी मद्धे दफन केल ...

जेव्हा त्या वॉचमन ची बायको त्याला शोधायला इथे आली तेव्हा जयकांत चव्हाण याने तिला राजारामच्या बार वर जबरदस्ती ठेवले व दोन्ही लहान मुलांना ४५ हजारांसाठी भिकाऱ्यांच्या टोळीच्या हवाली करून दिले !!!

या सर्वांचा सूड घेण्यासाठी तोही त्याच दफनभूमी मध्ये भटकत होता ,
बिना शरीराचे आम्ही काहीच करू शकत नव्हतो , अखेर बहादुरला विशालचे अन् मला रेशमाचे शरीर मिळाले ...

तुझं प्रेम जिंकल तुझी रेशमा तुला मुबारक , आता तूच ठरव अभिजित पानसे याला जिवंत असायला हव की मृत !!! "

येवढं बोलून स्वप्नाली रेशमाच्या शरीरातून बाहेर पडली !!!

रेशमा हळू हळू शुद्धीवर येवू लागली होती ...
ती शुद्धीवर येवून अमरला म्हणाली " काय ठरवलं आहेस तू ?? "

अमर तिला शुद्धीवर आल्यावर पाहून खूपच खुश झाला होता , तो म्हणाला " कशा बद्दल "

रेशमा - कशा बद्दल म्हणजे , अभिजित पानसे याला ठार मारण्या बद्दल !!!

अमर - आता सर्व ठीक झाल आहे , नको हे सर्व कोणत्याही क्षणी पवार येतील मला अटक करतील !!!

रेशमा - मी सहा दिवस स्वप्नाली सोबत होते , एक स्त्री म्हणून तिचे दुःख जाणते !!! जानू तू काहीही कर मला माहिती नाही पण अभिजित पानसे याला जिवंत नको राहू देवू !!!

पावर यांचे हात पाय थरथरत होते ... ते अजून हाच विचार करत होते की स्वप्नाली रेशमाच्या शरीरात होती ??? अमर स्वप्नाली सोबत बोलत होता !!!

पवार यांना आता सर्व समजत होत ... की का अमर अभिजित पानसे याला ठार मारण्या साठी निघाला होता ... का त्याने चार खून केले होते ...

पवार काहीतरी मोजत अमर जवळ पोहोचले व म्हणाले " फक्त तीन तास उरले आहेत !!! मी इथेच होतो जेव्हा रेशमाच्या शरीरातून स्वप्नाली बोलत होती ,

पवार पुढे म्हणाले - तुझ्या जागी मी असतो तर मी सुद्धा तेच केलं असतं पण माझे हात ह्या वर्दी मुळे बांधले गेले आहेत , तू ज्यां व्यक्तींचा खून केलास ते काही थोर व्यक्ती नव्हते ... जनतेला फसवून लुबाडणारे हैवान होते , एक राजाराम पाटील जो लॉज व ड्रग्स चा धंदा करून तरुण पिढीला दलदलीत ढकलत होता ,

सुबोध मोहिते - जो अनधिकृत बांधकामे करून कमी किमतीत लोकांना घरे द्यायचा , नगरपालिके ने कारवाई केली तर बिचारे तीच गरीब लोक बेघर व्हायचे .... पण त्याला काय तो तर पैसे खाऊन मस्त !!!

जायकांत चव्हाण हा वाईट धंदे करणाऱ्या व्यक्तींचा पाळीव कुत्रा , जो पगार सरकारचा घ्यायचा पण कामे त्यांची करायचा !!!

सुनील तावडे बाहेरील राज्यातून मुली आणून डान्स बार मध्ये जबरदस्ती ठेवायचा ... शेवटी नगर सेवक कोणी काय वाकड केलं असतं त्याचं ?? "

मला कधी कधी गर्व होतो तुझा , जी कामे पोलिसांना केली पाहिजेत ती तू केलीस ... आमचे तर याच वर्दिने हात बांधले आहेत , थोडी चिरीमिरी देवून आमचं तोंड बंद केलं जातं ... जर विरोधात तक्रार केली तर नोकरी धोक्यात येईल याची भीती , आम्ही तरी काय करायचं ??? याच नोकरीच्या पगारावर घर चालतं आमचं !!

मी जरी सर्वांच्या विरोधात गेलो तर माझीच नोकरी धोक्यात येईल , कारण माझ्या वरच्या व्यक्तींना त्याचा हप्ता मिळतो !!

मला शंका होती की तूच चारी खून केलेस , ज्या सुनील तावडेला फासी दिली पाहिजे अश्या नराधमाला पोलिस ' पोलीस स्टेशनमध्ये ' प्रोटेक्शन देतात , त्याचा जीव जात असताना तेच पोलिस जीवतोडून त्याला वाचवायचा प्रयत्न करतात , अश्या वर्दीची मला लाज वाटत होती म्हणून मीच तुला कॉल केला !!! सर्व माहिती असून मी अक्षय देवलकर ला काहीच सांगितल नाही , कारण मला कुठे तरी तू बरोबर वाटलास !!!! फक्त आता एक शेवटच काम कर "!!

अमर - " हो बोला ना साहेब , काय करू ??? "

पवार - " मुलींना फसवून नराधमांच्या हवाली करणाऱ्या हरामखोराला जिवंत सोडू नकोस , काहीही मदत लागली तर मी आहे सोबत तुझ्या !!! , आयुष्यात पहिल्यांदा या वर्दीचा चांगला उपयोग करायचा आहे ... "
पवारांचे वाक्य ऐकून अमरला त्यांना कडकडून सल्यूट करायचं मन करत होत !!
पण आपल्या इच्छा लपवून रेशमाचा निरोप घेतला ...

पवार व अमर सलीम शेखच्या ( अभिजित पानसे) घरी जाऊ लागले ..

पवार गाडी चालवू लागले ... मागे वळून अमरला म्हणाले " तू येवढ्या चलाखीने चार खून केलेस , तू इतपर्यंत दिमाख लावलास की काचेचे ग्लास घेताना कॅमेरा दिसल्या नंतर तू दुसऱ्या दुकानातून ग्लास विकत घेतले आणि घरी ठेवलेस .... मग तुझ्या हे कसं लक्षात नाही आल ??? "

पवार साहेब कशा बद्दल बोलत आहेत हे अमरला काही समजलं नाही म्हणून तो म्हणाला " कशा बद्दल बोलता आहात ??? "

पवार - " सलीम शेख जवळ खोली घेण्याचे पैसे नव्हते आणि मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा नव्हते अस तो बोलला होता , म्हणून त्यांनी केसरी लॉज वर राहायचे ठरवले ... बरोबर ???

अमर - " हो बरोबर !!!" , पण आता का हा विषय ??

पवार - " त्याच्या जवळ खोली नव्हती तर ज्या सिम वरून स्वप्नाली ने काजलला कॉल केला तो सलीमचा पत्ता शास्त्री नगरचा कसा ?? , त्या पत्त्यावर त्याला ते कार्ड कसं मिळालं तो तिथे कसा राहतो ?? याचा अर्थ तो तिथे आधी पासून राहत आहे !!! " जर तेव्हाच आपण ही खून पकडली असती तर तेव्हाच आपल्याला सर्व समजल असत !!!

अमर विचार करत म्हणाला - " मी तरी साधारण व्यक्ती आहे ज्याने परिस्थितीमुळे चार खून केले पण तुम्ही तर पोलीस आहात ना !!! तुमच्या कडून अशी अपेक्षा नव्हती साहेब !!

पवार म्हणाले - माझ्या जर हातात असतं ना तर रोज तडपवून तडपवून मारेन त्याला ... चौदा दिवस त्याने स्वप्नाली वर जो अत्याचार केला ना त्याला आपण सोळा दिवस तडपवू ... रोज त्याचे एक एक बोट कापलं असत आणि सोळाव्या दिवशी सोळावं !!!
( पवार आपल्या बहिणीला स्वप्नाली च्या जाग्यावर ठेवून बघितले अन् त्यांना जो संताप झाला त्यांनी तसाच अमरला सांगितला )

अमरला समजल नाही म्हणून अमर विचार करू लागला की एक पाय नाही त्याला म्हणजे पंधरा बोटे असतील मग सोळावं ???
थोड्या वेळात अमरला कळलं पवारांना काय सांगायचं होत !!!

तेवढ्यात ते शास्त्री नगर मद्धे पोहोचले होते ... गाडी खाली लावून दोघं तिसऱ्या मजल्याच्या दिशेने धावू लागले होते ...
वर पोहोचल्यावर बघतात तर दरवाज्याला कुलूप होत !!

दोघांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती , अमरचा राग अनावर होत होता ...
त्यांना काहीच सुचत नव्हत काय करावे अन् काय नाही !!!

अमर बाजूला असलेल्या शिड्यांवर बसला व पवारांना म्हणाला " त्याला समजायला वेळ लागला नसेल की आपण त्याला पकडायला आलो होतो , म्हणून त्याने खोटी गोष्ट सांगितली आणि तो आता लंपास झाला !!! "

आता कशाचा भेटणार आहे तो आपल्याला !!! एक - दीड तासात खूप दूर निघून गेला असेल तो ... अमर निराश होऊन बोलू लागला होता.

तेवढ्यात अक्षयचा पवारांना कॉल येत होता...

पवारांनी तो उचलला ...

अक्षय - काय साहेब तुम्ही तर अमच्याहून जास्त बिझी झालात , रात्री पासून एक कॉल नाही घरी तरी जाऊन आलात का काल पासून ??? बायकोचे पण फोन नाही उचलत तुम्ही ... आम्हाला नाही कळवलत निदान धरम पत्नीला तरी फोन करून कळवायच !!
घरी कोणी आपल वाट बघत असत माहिती आहे की नाही ??? आमचं सोडा निदान घर तरी सांभाळा !!! ... अमरची केस घेतल्या पासून तुम्ही पण अमर सारखे वागायला लागलात !!!

पवार - तस काही नाही साहेब , अजून अमरला शुद्ध नाही आली आहे ..

अक्षय - मग तुम्ही काय करताय तिथे , शुद्धीवर आणायचं काम डॉक्टरांचं आहे ...

पवार - हो साहेब घरीच जातोय !!!

अक्षय - तुम्ही नेमके तिथेच आहात ना की तुमचे लाईव्ह लोकेशन बघू ??? घरी जावा आता सकाळी चौकीत हजर पाहिजेत तुम्ही , खूप प्रेशर आहे वरून , समझा तुम्ही .... सिनियर आहात तुम्ही !!! , काही नाही सापडत तर अमरलाच गुन्हेगार ठरवा , लवकरात लवकर बंद होईल फाईल , किव्वा असं काही तरी करा जेणेकरून या खूनावरून सर्वांचे लक्ष दुसऱ्या गोष्टीवर जाईल !!!!

पवार - नाही साहेब मी इस्पितळातच आहे ..
काहीतरी करतो साहेब !!!! विश्वास ठेवा !!!!
येवढं बोलून पवारांनी फोन ठेवला ...

बोलताना त्यांना एक कल्पना सुचली ...

खूप विचार करून पवारांनी एक फोन केला ..

वाघमारे ... एक काम आहे , दुपारी ज्या व्यक्तीबद्दल विचारायला कॉल केला होता , त्या पत्त्यावर किव्वा त्या व्यक्तीच्या नावावर दुसरा नंबर चालू आहे का बघ !!!

वाघमारे - " किती काम देतोस रे एका दिवसात !!! , दुसरी पण काम असतात मला "

पवार - " जरा अर्जंट आहे फालतू विनोद नकोत आता कामाला लाग !!! "

वाघमारे - " सिरीयस केस आहे वाटत , ठीक आहे भडकू नका साहेब थोड्या वेळात सांगतो " ..

पवार व अमर कॉल ची वाट बघत जिन्यावर बसले होते ,

वाघमारेचा कॉल आला ...

वाघमारे - " एक नंबर आहे जो दोन महिन्यापूर्वी घेतला होता , तो चालू आहे सध्या " ...

पवार - " त्याची लाईव्ह लोकेशन पाठवत रहा मला , "

वाघमारे - " अरे मी नाही करू शकत हे , लेखी स्वरूपात द्यावं लागेल तुला हे ... मला वरच्यांना ही उत्तरे द्यावी लागतात ."

पवार - " आयुष्यात कधी लेखी स्वरूपात न घेता लोकेशन पाठवले नाहीत का तू ??? , कधी तुझे ही येईल काम तेव्हा लेखी बघेन तुझी "

वाघमारे - " पाठवतो रे , पण काही झाल्यावर सांगू नकोस की मी मदत केली होती "

पवारांनी होकार देवून फोन ठेवला ...

जेव्हा त्यांनी लोकेशन पाहिलं तर ते सतत बदलत होते म्हणजे सलीम कोणत्यातरी वाहनावर प्रवास करत होता ...

पवार लगेच खाली उतरले व सलीमच्या लोकेशन चा पाठलाग करू लागले ...

जे पवार कधी ३० - ४० च्या वर कधी गाडी चालवली नव्हती ते आज चक्क ८० च्या गतीने सलीमचा पाठलाग करत होते ... साधारण दीड तासांनी तुळींज रेल्वे स्थानकाच्या थोड्या अंतरा आधी सलीम ज्या रिक्षात जात होता ती रिक्षा अडवली ...

आपली बाईक रस्त्याच्या कडेला लावून अमर सलीम च्या उजव्या बाजूला व पवार डाव्या बाजूला रिक्षात बसले ...
दोघांना पुन्हा बघून सालिमच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते ...

चालकाला पोलीस असल्याचे सांगून रिक्षा पुन्हा शास्त्री नगर जवळ फिरवायला सांगितली ...

पवारांना अक्षयचे कॉल येत होते .. त्यांनी आपला मोबाईल बंद केला व सलीमची कॉलर पकडून त्याला विचारू लागले ...
तू सर्व खर खर सांगशील की तुझ्याकडून गुन्हा कबुल करून घेवू आम्हीच ???

सलीम पवारांना बघून हसू लागला , !!!

"
मी नाही धंदा करत मुलींचा , तुम्हीच धंदा करायला भाग पाडता ... तुम्हाला काय वाटतं मला पकडून समाज सुधारेल ??
अरे... बिलकुल नाही , तुमच्या जागी देव सुद्धा आला ना तरी हे जग काही बदलणार नाही . आज मला तू पकडणार उद्या दुसरा कोणी जन्म घेईल अन् तुमच्या आई - बहिणींना माझ्याच सारखं बाजारामध्ये विकेल !!! काय वाकडं कराल तुम्ही त्याचं ??? तुम्हाला तर कळणार पण नाही !!!

आणि आम्ही तर सामजसेवाच करतोय ... तुम्हाला काय वाटतं साहेब मला आवडतं का हे सर्व करायला ???
तुम्हीच भाग पाडता आम्हाला , बाहेरून तुम्ही जेवढे सभ्य आहात आतून तेवढेच पापी आहात आणि मला पकडायला निघालेत !!!

जे बार वर येतात त्याच्या घरी सुद्धा पण आई - बहीणी आहेत ना ??? त्यांना हे ही माहिती असत ना की ज्या मुली त्याचे मनोरंजन करत आहेत त्याही कोणाच्या आई - बहीणी असतील !!! तेच जर आमच्या जवळ आले नाहीत तर का आम्ही का कोणाला त्याच्या हवाली करणार ??? जेवढा मी गुन्हेगार आहे तेवढाच समाज ही आहे , आधी समाजाला बदला मग मला अटक करा !!!

तुम्हाला काय वाटल मी अस काही बोलेन ???

अरे हट्ट ....

खरतर वेगवेगळी नावे बदलून केलेलं प्रेम काही औरच !!!
मुलींना फसवून त्यांना प्रेमात पडायचं मग दुसऱ्याच्या हवाली करण्यात जी मज्जा आहे ना तुला नाही समजणार !!!

थोडंसं प्रेमाने बोललं थोड तिच्या आवडीसारख वागल तर लगेच प्रेमात पडतात मुली , अन् वीस दिवसांच्या प्रेमा साठी वीस वर्षाची नाती सोडून पळून पण येतात ... मला तर कधी कधी वाटतं मुली साधं सुध प्रेम नाही करत .. " आंधळ प्रेम करतात , आंधळ " ...

त्यांना वेदना दिल्या नंतर किती आनंद मिळतो माहिती आहे का ??
तुम्हाला काय माहिती असणार !!! तुम्ही तर किन्नर आहात !!! ... जेव्हा त्यांना सिगरेटचे चटके दिल्या नंतर त्याच्या चेहऱ्यावर येणारे भाव बघून आम्ही वेगळ्याच विश्वात रमतो , ती एक नशा आहे !!!
... चामड्याच्या पट्ट्याने कधी मार खाल्ला आहे का साहेब ???
मी खाल्ला आहे लहान पणी !!
जेव्हा चामड्याच्या पट्टा हातात आला ना तर एक वेगळीच खाज हाताला सुटते ... ती खाज मिटवायला आम्हाला त्याचं मुलींना मरावं लागत !!!

त्यांचा तो आक्रोश ..वाह वाह !!! त्यां जेव्हा गळा फाडून रडतात तेव्हा मन एकदम तृप्त होत !!!
असच सर्व मुलींना जिवंत पणी नरकयातना देवून धंद्यावर ठेवलंय !!!

" काय वाकडं करणार तुम्ही माझं ??? , जास्तीत जास्त मला अटक करणार ... चल समज झालीच अटक तर काय होईल ??? तुझे जे साहेब आहेत ना तेच सोडतील त्यांना इतका पैसा पोहोचला आहे ना की लगेच सोडून देतील ...
चला हे पण मानुयात की मला नाही वाचवलं त्यांनी तर ... लगेच .. लगेच चुटकीमध्ये बेल मिळेल अन् मी बाहेर !!!
अरे इतक्या मुली गेल्या ही स्वप्नाली कोण होती !! सोडून द्या ना साहेब मागाल तेवढे पैसे देतो !!!
पुढे सलीम अजूनही काही बोलणार होता पण रिक्षा अचानक थांबलेली पाहून तो अवाक होऊन पाहू लागला !!!

पवार व अमर सुद्धा रिक्षा चालका जवळ पाहू लागले !!

रिक्षा चालक मागे वळला अन् सालीमच्या दोन मुस्काडित लावून दिली ... अन् पवारांना म्हणू लागला " साहेब हे सर्व ऐकुन रक्त गरम नाही होत का तुमचं ?? "

" कशाला याला जेल अन् फेल ??? इथच गाडा साल्याला "

पवार काहीतरी विचार करून म्हणाले " अशोक नगर जवळील दफन भूमी जवळ घेवून चला !!! "

या वाक्याने रिक्षा चालकाच्या चेहऱ्यावर समाधान जाणवले !!!

त्याने लगेच रिक्षा चालू केली अन् त्याच दिशेने जाऊ लागला ...

अचानक दोन थोबाडीत खाऊन सलीम चांगलाच घाबरला , तो पवार ला म्हणू लागला " कुठे घेवून जातोय ??? सांग !!! सांग ना !!! "

" दफन भूमीत कशाला ??? "

" पोलीस स्टेशन मध्ये घेवून चल !!! "

" बघ जर माझं बरं वाईट झालं तर तू फसशिल तुझी नोकरी धोक्यात येईल !!! "

" कायदा हातात घेऊ नकोस तू पोलीस आहेस हे लक्षात असू दे !!! "

दफन भुमिमध्ये पोहचे पर्यंत सलीम असाच घाबरून बोलत होता मात्र त्याच्यावर कोणीच लक्ष दिल नाही !!!

रिक्षा दफनभूमीच्या बाहेर थांबली ...
पवारने त्याची मान पकडून रिक्षातून बाहेर काडले ... अन् ढकलत ढकलत दफनभूमीच्या आत घेवून जाऊ लागले ...

ढकलत असताना सलीम खाली पडला ... अमरने त्याचा पाय पकडला व फरफटत त्याला गेटच्या आत घेवून जाऊ लागला ...
अमर घेवून जाताना त्याला बोलू लागला " खाज सुटते काय तुझ्या हाताला ??? थाम तुझी खाज मिटवतो !!!
मुलींना खेळणं समजता तुम्ही आज तुझ्या शरीराच्या प्रत्येक एका भागाला वेदना नाही दिल्या ना तर रेशमाचा पती नाही म्हणणार स्वतःला !!!

पवारने बाजूला असलेला एक लहान दगड उचलला अन् त्याचे एक एक बोट ठेचू लागला !!! " हरामखोर आजही मुली रात्री अपरात्री बाहेर पडायला घाबरत आहेत .... ते फक्त तुमच्या सारख्यां मुळे , किन्नर आम्ही नाहीत ... तू तर किन्नर बोलण्याच्या लायकीचा पण नाहीस , ते तरी मनाने चांगले असतील तुम्ही , जनावर आहात जनावरं ..... एका मुलीला बांधून ठेवून तिच्यावर अत्याचार करता ... तिचे हात खोलल्या नंतर एक पाय गमावून बसलास ना !!! आई शप्पत जर तुला जिवंत ठेवला ना तर माझी कोणत्याही मुलीला बहिण बनवण्याची लायकी समजणार नाही मी !!!

...........

अचानक रिक्षा चालकाला काय झाले काय माहिती तो रिक्षात जाऊन टूल किट घेवून येवू लागला , येता येता त्याने बाजूला असलेली कुदळ सुद्धा आणली !!!

त्याने टूल किट मधील पकडीने त्याची सर्वी बोटे तोडून वेगळे करू लागला !!!

सलीम वेदनेने विव्हळत होता ... मात्र त्याला अस पाहून रिक्षचालकाला समाधान वाटत होत !!!

दफनभूमी मधील कुदळीने त्याच्या शरीरावर असंख्य वार करू लागला होता ..

स्क्रू ड्रायव्हर ने त्याचे दोन्ही डोळे फोडून बाहेर काढले ... व वेगळ्याच कर्कश आवाजात म्हणू लागला ... " इसी आखो से हमारी मां - बेहनोको देखता था ना तू ??? , ऊस चव्हाण के साथ मिलकर मेरी पत्नी को भी तूनेही उन दरिंदो के हवाले कर दिया ना ???" असं म्हणत दोन्ही डोळे पायाखाली तुडविले !!!

त्याचा आवाज पुन्हा बदलला " प्रत्येक मुलींना प्रेमात पाडून दुसऱ्याच्या हवाली करण्यात मज्जा येते ना तुला ??? " असं म्हणत हातातील स्क्रू ड्रायव्हर ने त्याच्या शरीरात असंख्य वेळा वार केले ... "

अखेर सलिमने प्राण सोडले ...

येवढ्या क्रूर पणे मारताना पाहून अमर व पवार दोघंही सुन्न झाले होते ...

रिक्षा चालकांच्या चेहऱ्यावर वेगळेच स्मित होते !!!

चालक अमर जवळ आला , अमरचा हात हातात घेऊन वेगळ्याच कर्कश आवाजात म्हणाला " दादा तुझ्या मुळे मी आज मुक्त होवू शकले ... माझा कोणी भाऊ नव्हता पण मी आशा करेन की प्रत्येक मुलीला तुझ्याच सारखा भाऊ मिळो "

लगेच आवाज बदलला गेला अन् पवारांच्या खांद्यावर हात ठेवून पुढे नेपाळी व्यक्ती प्रमाणे बोलू लागला " शाब , मेरी बीवी बच्चो की जान तुम्हारे हाथ मे है , उनको बाचालो शाब उनको बाचा लो !!! "

बोलता बोलता अचानक रिक्षा चालकाचे हावभाव बदलू लागले होते ...
तो हाताला लागलेल्या रक्ताला पाहून एकाएक ओरडला " काय केलं हे मी ?? साहेब हे रक्त ... हा स्क्रू ड्रायव्हर ... रिक्षाचे टूल किट ... कसं झालं हे ???
मला काहीच का आठवत नाही आहे ???
याला येवढ्या क्रूर पणे कोणी मारलं ???

पवार - " अरे असा काय बोलतो आहेस , तूच तर मारलस त्याला !!! ,
तूच रिक्षातून टूल किट आणून त्याल मारलस , आम्हाला कसं माहिती असले तुझ्या रिक्षातील टूल किट कुठे ठेवलं आहे ते ??? त्याच स्क्रू ड्रायव्हर ने तू त्याला मारून टाकलस !!

रिक्षा चालक - " साहेब खरंच मला काहीच नाही आठवत आहे ... मी नाही मारलं त्याला , साहेब काही तरी करा मला वाचवा ... तसाही आपल्या आई - बहिणींना विकणारा नराधम होता ... खरंच साहेब नाही मारलं मी त्याला ...!!!!"

पवार - एक खड्डा खणा आणि पुरा आधी त्याला , नंतरच नंतर बघू आपण ...

काहीच मिनिटात त्यांनी एक खड्डा खणला आणि सलिमचे छिद्र छिद्र झालेले शरीर त्यात ढकलले अन् माती टाकली ...

आपले टूल किट साफ करून रिक्षात ठेवले अन् पवार साहेबांना स्वतःला वाचवायची विनवणी करू लागला ...

पवार - आधी एक काम कर आम्हाला जिथे आमची बाईक पार्क केली होती ना तिथे आम्हाला सोड !!!

सर्व लगेच रिक्षात बसले ...

बाईक जवळ पोहचणार होते तोवर पवार रिक्षाचालकाला म्हणाले ...
" ही जी घटना घडली ती फक्त आपल्या तिघांमध्ये असू दे आणि जर का ही गोष्ट कुणाला कळाली तर तुला मी काय स्वतः देवसुद्धा खाली उतरले तरी तुला कोणी वाचू शकणार नाही ?? "

रिक्षा चालक - " साहेब मी वेडा आहे का , स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायला , मी का सांगणार कोणाला !!! "

ते बाईक जवळ पोहोचले...

तू इथून निघून जा आम्ही बघून घेतो पुढचं आणि जी गोष्ट घडली ती एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा !!!

दोघं आपल्या बाईक जवळ पोहोचले ...पवारांनी अमरला इस्पितळात सोडले ...

अमर रेशमासोबत घरी गेले !!!

पवार काही पोलीस साथीदारांसोबत मिळून सर्व बार वर रेड मारली आणि ८५ मुलींना सोडवलं ... त्यात बहादुरची बायको सुद्धा होती ... तिच्या मदतीने भीक मागणाऱ्या टोळीला पकडवून तिच्या मुलांना तिला सोपवल आणि सुखरूप नेपाळ मध्ये पाठवलं !!!

या मोठ्या छाप्यामध्ये ते चार खून दडून राहिले , पाचवा तर कोणाला कळला सुद्धा नाही !!!
त्या चार खुंनांबद्दल काहीच माहिती न मिळाल्याने अक्षयची पुन्हा बदली झाली !!!

अमर आणि रेशमा पुन्हा आपला सुखी संसार करू लागले !!!!

कथा कशी वाटली नक्की कळवा !!!!

---------- धन्यवाद ----------
सर्वात जास्त कोणते पात्र तुम्हाला आवडले नक्की कळवा ....
( ही एक पूर्ण पणे काल्पनिक कथा आहे )