SHIV SIHASAN PART 3 in Marathi Short Stories by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE books and stories PDF | शिव-सिंहासन-भाग ३

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

शिव-सिंहासन-भाग ३

शिव-सिंहासन-भाग ३

त्या थंड हवेत चौघांना कधी झोप लागले ते कळलेच नाही...कोणीतरी टीम मेंबर पैकी चादरी आणून त्यांच्या अंगावर टाकल्या होत्या...सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणांनी त्यांना जाग आली.. तेव्हा ६. ३० वाजले होते...प्रसादने वरती पहिले आकाश निरभ्र होते.. अजून अर्ध्या तासाने सामान रोपवेने वर येणार होते...घाईघाईत सर्व आटपून वर येणाऱ्या सामानाची वाट बघण्यात सर्व तयार झाले.... ७. १५ वाजल्यापासून एक एक सामान वर येऊ लागले...८ वाजेपर्यंत सर्व सामान वर आले...आलेल्या सामानाची सर्वानी मिळून १ तासात जुळवाजुळव केली...आणि चार निवडलेल्या ठिकाणी...चार जण वेगवेगळ्या टीम घेऊन कामाला लागले ....मिलिंद होळीचा माळ...प्रसाद बाजारपेठेतील मार्ग...अमित वाघ्या कुत्र्याचा पुतळ्या पलीकडे जे पठार आहे तिथे आणि भिवाजी वाघ-दरवाजा आणि आसपासचा परिसर...


सर्वप्रथम चुना टाकून जिथे खोदकाम करायचे आहे तिथे आखणी केली जाते...आणि मग खोदकाम...आखणी करण्यासाठी चुना घेऊन येत असतानां एका मजुराचा पाय सटकला आणि चुन्याच्या दोन गोणी हत्तीतलावात पडल्या आणि सर्व चुना पसरला गेला..पाणी फुकटचं खराब झालं..चुना साफ करायला सांगून मिलिंद होळीच्या माळावर खोदकामासाठी निघून गेला...सोनार साऊंड नॅव्हिगेशन सिस्टम वापरून जमिनीखाली असलेल्या वस्तू शोधायला सुरवात केली....जमिनीखाली जवळ जवळ २५ फुटांपर्यत दिसत होते...१ ते १. ३० तास तसाच शोधण्यात गेला...आणि काही वेळाने मॉनिटर वर हळू हळू काही प्रतिमा दिसायला लागल्या...मशीन एका ठिकाणी बराच वेळ बीप बीप आवाज करत होती...स्ट्रॉंग सिग्नल मिळत होते...नक्की काय आहे ते समजत नव्हते... त्या ठिकाणी खोदकाम करायला स्वतः मिलिंदने सुरुवात केली...५ ते ६ फूट खाली खोदल्यावर...टण टण असा आवाज आला..काहीतरी नक्की हाताशी लागले होते...हळू हळू त्या वास्तूच्या आसपासची माती बाजूला कार्य सुरुवात केली...ती वस्तू किती रुंद आहे लांब आहे काही कळत नव्हते...पुढेच काही अंतरावर प्रसादने बाजारपेठेत काम चालू केले होते...बाजारपेठेतला जो रस्ता आहे तिथे प्रसादने सोनार साऊंड नॅव्हिगेशन सिस्टम वापरून शोधायला सुरुवात केली आणि काही वेळातच त्यालाही सिग्नल मिळणे चालू झाले...नशीब आज जोरावर होते...
हळू हळू मिलिंदला जमीखाली सापडलेल्या वास्तुवरचा मातीचा एक एक थर साफ होऊ लागला...सर्व कुतुहलाने पाहत राहिले...ती एक ३ फूट x ३ फूट एक दगडी पेटी होती...सर्वानी दोर लावून पेटी आधी जमीनीवर घेतली आणि जोर लावून त्याचे झाकण उघडले...त्यात बघतात तर काय...२ ते ३ तरवारी.. काही अंगरखे..छोटी महादेवाची पिंड...एक कवड्याची माळ...आणि एक जिरेटोप...सोन्याचे कडे...सर्वांची उत्सुकता ताणली गेली...हे सर्व सामान राजांचे तर नसावे ना??? तिकडे प्रसादलाही एक छोटी तोफ...काही बंदुका...तरवारी..काही भांडी..असे सापडले...दुपारचे ३ ते ४ वाजले होते ...


कामाच्या गडबडीत जेवायलाही वेळ नव्हता...अजून अर्धा तास काम करून मिलिंदने आणि प्रसादने मिळालेलं सर्व सामान आपल्या कॅम्पपाशी आणून ठेवले आणि अमितच्या मदतीसाठी पुढे वाघ्या कुत्र्याचा पुतळ्या पलीकडे जे पठार आहे तिथे गेले...पण अमित ला काहीच हाताला लागत नव्हते...कारण एकतर पठारावर सर्व टणक दगडच दिसत होता....खोदायला लागल्यावर फक्त १ ते २ फूट खाली खोदायला १ ते २ तास लागत होता..मग अमितने मिलिंद आणि प्रसादशी बोलून काम थांबवले..


तिथे वाघ दरवाजा आणि आसपासचा परिसर भिवाजी सकाळपासून पिंजून काढत होता त्याला आशा होती काहीतरी हाताला लागेल...कारण झुल्फिकारखानाचा जेव्हा वेढा पडला होता...तेव्हा छत्रपती राजाराम महाराज ह्या वाघ दरवाजानेच निसटले होते...आता तर ३५० ते ४०० वर्षांनंतर अजून त्या दरवाजभोवतीचा परिसर अजून दुर्गम झाला होता...रान अस्ताव्यस्त पसरले होते...पण एका कपारीत एक दोन फुटक्या भांड्याशिवाय आणि २ तोफगोळ्याशिवाय काहीच सापडले नाही...त्या भागात रॅपलींग करून करून भिवाजी आणि त्यांचीं टीम दमली होती..उन्ह उतरू लागली होती...तेव्हा त्यांनी आटोपत घ्यायला सुरवात केली...जे काही मिळाले होते ते घेऊन त्याची टीम कॅम्पपाशी येऊन बसले....सापडलेल्या सामानाची तपासणी चालू झाली ...सापडलेली दगडी पेटी खुद्द राजांची होती का?? आणि ते शिवलिंग आणि कवड्याची माळ.....सर्व गोष्टी तर नेहमीच्या राजांच्या वापरातल्या होत्या...पण पुरावा काय होता??त्या वस्तू साफ करून आणि नीट पॅकिंग करून ठेवण्यात आल्या...सर्वप्रथम त्या वस्तू तिथून हलवून..पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयात नेणे गरजेचे होते...नाहीतर त्या वस्तू पाहायला गर्दी उसळली असती...आणि काम करणे अजून कठीण झाले असते...

मिलिंद,प्रसाद,भिवाजी,अमित सर्व रिपोर्ट तयार करून आणि आपल्या वरिष्ठांना रिपोर्टींग करून...राजवाड्यात जवळ असलेल्या मिनारात येऊन बसले होते...अजून थोडा थोडा संधीप्रकाश होता...समोरच अगदी काठोकाठ भरलेला गंगासागर तलाव हिंदकळत होता...आणि काही अंतरावर असलेला हत्ती तलावातल्या पाण्याने अगदीच ताल गाठला होता...सकाळी पडलेला चुना अजून साफ झाला नव्हता..ते पाहून मिलिंद अजून वैतागला आणि पुन्हा जाऊन त्याने मजुरांना जाऊन बोलावले आणि खरडपट्टी काढली..तो त्यांना तेव्हाच उतरायला सांगत होता...पण आता जवळ अर्धा तासात काळोख झालं असता आणि त्या काळोखात तिथे उतरणे धोकादायक होते...मग सकाळी ९ वाजण्याधी साफ करायची सूचना दिली...आणि पुढे काय करायचे आणि कुठे शोधायचे यावर चर्चा करण्यासाठी ते अमित ने रायगडवाडीतून मिळवलेला नकाशा पाहू लागले...

तेवढ्यात प्रसादच मोबाईल वाजला वरिष्ठांनाचा कॉल होता...त्यांनी खास विनंती करून मागवलेले २ " ड्रोन " ३ दिवसात येणार होते...ते ऐकून सर्व खुश झाले...त्या ड्रोन मुळे जिथे जाणे किंवा उतरणे शक्य नाही अशा ठिकाणी पाहता येणार होते...आणि तेवढ्यात जोराचा पाऊस सुरु झाला...मिलिंद,प्रसाद,भिवाजी तिथेच पहुडले अमित मात्र समोरच्या पसरलेल्या दोन्ही तलावांकडे पाहत राहिला होता....त्याला अचानक एक गोष्ट खटकली...येवढा पाऊसाचा महिना पाऊस पडत होता...गंगासागर तलाव काठोकाठ भरलेला होता...आणि काही अंतरावर असेलला हत्ती तलाव मात्र खाली खाली होता का तिथे पाणी साठत नव्हते ...नक्कीच काहीतरी पाणी मुरत होते...उद्या मिलिंद,प्रसाद,भिवाजी बरोबर आधी तो हत्ती तलावाचा तळ पाहायचा हे त्याने अगदी मनोमन ठरवून टाकले....