कॉलेजचा दुसरा दिवस उजाडला . पहिल्याच दिवशी अनुजला चांगला ग्रुप मिळाला होता . आणि अनुजने त्याच दिवशी ठरवलं आपण ह्याच ग्रुपला धरून राहायचं ... छान आहेत ना सर्व .... हसरी मालती , बोलकी रेवा , निख्या तो तर जाम भडकतोच कधी कधी लहरी आहे तो ... प्रितम आहे बऱ्यापैकी मनमिळावू वृत्तीचा ... आदिती , तिचं नाव ओठावर येताच तो गालातल्या गालात हसला ... आधी वाटायचं मला , खूप रागीट असावी पण मनाने कशी भडभडी आहे ती .... तसच असायला पाहिजे तेव्हाचा राग , रुसवा तेव्हाच समोरच्या व्यक्तीवर काढून मोकळं झालेलं बरं ! नाही तर कुणाला सवय असते कुणाचा राग कुणावर .... आवडायला लागली का आदिती आपल्याला .... छे छे काही पण ना ! पहिल्याच दिवशी ? असं वाटतंय .... असो निघू आता आपण कॉलेजला ....
” निघतो ग मॉम मी ….. ” अनुज आईला सांगून हॉलच्या बाहेर पडला .
“अरे टिफिन घेऊन जा …. ” हा काय टेबलवरच ठेवला होता .
” असुदे ग मॉम , जेवण केलंय मी …. आता दुपारी जेवायची सवय
नाहीये मला … ” ,
” बरं …. नीट जा ….”,
” yes मॉम …. bye … “,
अनुजला वाटेत मालती ऑटोला हात देत उभी दिसली . त्याने कार
तिच्या समोर नेली … आपल्या समोर उभ्या असलेल्या कारकडे
बघून आधी तर दुर्लक्ष केलं तिने .
” मालती …… मालती …. ” अनुजने तिला काच खाली करून आवाज दिला .
” अन्या , तू ….. ” ,
” हो … “,
” कॉलेजमध्ये चालला का ? “,
” नाही चौपाटीला चालतोय मरीन ड्राईव्हला …. चलतेस तू …. “,
” नाही यार कसा आहेस तू …. आज कॉलेज आहे ना मग कधी ! “,
” मी उनाडक्या मारतोय तिकडे जाऊन चल ये बस्स …. कॉलेजलाच चलोय … “,
” अरे ये …. मागे काय गेली … मी समोरचा दार उघडला ना … तुझा ड्राईव्हर नाही मी समोरचा शीटवर येऊन बस्स … “,
” मला वाटलं तुला काही अडचण असेल तर ….. “,
” मला कसली ग अडचण …. “,
” ही कार तुझी स्वतःची आहे ? ” ,
” नाही चोरीची आहे ,कालच डाका टाकला एका ग्यारेजवर …. “,
” सॉरी यार मला तसं नव्हतं म्हणायचं …. आपल्या ग्रुपमध्ये कोणी असं कारने येत नाही ना कॉलेजला …. “,
” इट्स ok ग …. आय एम जस्ट किडींग …. ही कार माझ्या डॅडची आहे …. मी ड्राईव्ह करतो …. ” ,
” बाय द वे , तू रोज कशाने येते कॉलेजला ?? “,
” बस …. “,
” स्कुटी नाही का तुझ्याकडे …. “,
” असून काय फायदा , चालवता यायला पाहिजे ना ! ” ,
” तुला स्कुटी चालवता येत नाही …. ok नो प्रॉब्लेम उद्या पासून आज होती त्या बसटोपवर उभी रहा … “
“Done …..! ठरलं मग …. ” ,
” तुला बॉम्बे IITला एवढ्या टॉप मोस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन कशी मिळाली मधेच …. “,
” अगं 1st इयरला मी क्लासमध्ये टॉपर होतो … “,
” ओहहह मग तुला ऍडमिशन तर मिळेलच … “
बोलता बोलता दोघेही कॉलेजमध्ये आले . अनुजने गाडी पार्कींगला लावली . मालती त्याची वेट करत गेट जवळ उभी होती … तिला दुरूनच विपिन येताना दिसला ..
” हे विपिन …… यार काल कुठे गेला होता तू कुणाचा कॉल पण घेत नव्हता होतास कुठे ?? खूप खूप मिस केलं आम्ही सर्वांनी तुला …. “,
” अगं कुठे नाही …. हॉस्पिटलमध्ये जरा काम होतं …. तू इथे गेटवर कुणाची वाट बघत उभी आहेस ….”
” आला … ” विपिनने मागे वळून बघितलं .
” हा अनुज आहे आपल्या क्लास मध्ये नीव आला … कालच त्याच्या सोबत आमची फ्रेंडशिप झाली … अनुज दिल्ली IIT ला होता … ” ,
” Hello …. नाईस टू मिट यू …. ” दोघांनी हॅन्डशेक घेतला . आणि
क्लासकडे वळले …
” कालचा खूप मोठा डे मिस केला म्हणजे मी …. अनुजचा पहिला दिवस सेलिब्रेट नाही करता आला . मी तुमच्यात असायला हवा होतो यार … “,
” विपिन सोड अरे आता मी तुमच्या ग्रुपचा हिस्सा झालो … अजून सेलिब्रेशन करायला दिवस आहेत आपल्याला … “,
” बरोबर बोलला मित्रा …. ” ,
विपिन सर्वाना आपलंसं करून घेणारा होता . त्याच्या गमतीदार बोलण्याने तो ग्रुपमध्ये सर्वांचा चाहता होऊन गेला . त्यामुळे अनुजलाही त्याने खूप लवकर आपल्या ग्रुपमध्ये सामावून घेतलं ….
पाच लेक्चर होऊन सुट्टी झाली आणि सर्वांनी आज फिरायला कुठेतरी जायचं ठरवलं … अनुजला विपिनच बोलणं आठवलं … तो येण्याच्या खुशीत सेलिब्रेशन …
” Guy’s ….. आज हम फाइव्ह स्टार चलते है ! “,
नक्कीचही पार्टी अनुज देणार होता म्हणून सर्व हो म्हणून ओरडली पण , विपिनच्या डोक्यात काही वेगळाच प्लान चालू होता .
” नाही यार …. “, पार्टीला विपिनने नकार दिला .
” काय नाही “,
” अनुज , मला नाही यायचं हॉटेलमध्ये …. “,
” अरे …. असं कसं मगाशीच तर बोलला की तुला मी यायचा खुशीच सेलिब्रेशन हवंय …. आता अचानक काय झालं ?? “,
” हो म्हटलं होतं , पण आज नाही … “,
” मग …. मग कधी ??”,
” आज माझं खूप महत्त्वाचं काम आहे … “,
” तुम्ही सर्वे चालणार का माझ्यासोबत …. “,
“अरे हो … पण कुठे ??” सर्व विचारात पडली . निखिलला तर पार्टी हवी होती आज .. पण ह्याला मधेच काम सुचतात असं वाटून तो गप्प बसला .
” काय यार …. पार्टी सोडून कुठे जायचा बेत आहे तुझा … आम्हाला देखील कळू दे ! “
” सिटी गार्डन …. ” ,
” सिटी गार्डन ….. तिकडे काय काम ? “,
” तिथे गेल्यावर कळेलच …. चालायचं …. “, सर्व त्याच्या सोबत चलायला तयार झाली .
अनुजने कार सिटी गार्डन समोर आणून थांबवली . सिटी गार्डन अनुजच्या घराजवळचं होतं . त्याच्या घरापासून अर्ध्या तासाच्या दुरीवर . त्याने कार पार्किंगला लावली . सर्व कार मधून उतरून विपिनच्या तोंडाकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते …
” आता काय करायचं इथे …. ” आदिती त्याला विचारू लागली .
” काय करायचं म्हणजे काय ? चला आत गार्डनमध्ये …. “
गार्डनमध्ये पाय ठेवताच विपिनने आपली बॅग काढली … त्यातून दोन तीन रोपटे आणि एक छोटंसं झाड त्याने बाहेर काढलं …
” अरे यार , हा काय प्रकार आहे तू बॅगमध्ये ही छोटी छोटी रोपटे भरून आणली …. खरचं विप्या तू ना , असं काय आहे ह्या झाडात ……..” ,
” मला खूप आवडतात बकुळीची फुल ….. भविष्यात इथे येणाऱ्या प्रत्येकाला हे झाड आपल्याकडे आकर्षित करून घेईल …. ” फुलांबद्दल एवढा जिव्हाळा , अनुजला पहिल्यांदाच एखाद्या बकुळप्रेमीला भेटल्यासारखं वाटतं होतं … तो होताही बकुळीच्या प्रेमात ….
अनुज , रेवा आणि मालती ह्यांना तर अजून बकुळीच फ़ुलं काय असते माहिती नव्हतं .
” कसं असते रे बकुळीच फुलं ?? ” विपिनला आश्चर्याचा धक्काच बसला .
” तुम्हाला बकुळीच फुलं नाही माहिती ??”,
” नाही तू सांग ना … जेव्हा हे झाडं मोठं होईल तेव्हा इथे एन्जॉय करायला आपण सर्व एकत्र येत जाऊ …. मग बकुळीची फुले आपल्यावर वर्षाव करतील …. ” रेवा भविष्याचे स्वप्न रंगवत बोलत होती .
” तू पण येशील ना विपिन इथे …. “,
“मग काय …. मी इथेच पहुडलेला असेल … असं का विचारतेस ….”,
” नाही अरे , काय आहे ना तू अजून कोणत्या दुनियेचा शोध लावशील … तुझं आपलं कशात ना कशात भान हरवून बसणं चालूच असतं …. गेल्यावर्षी तुझं प्राजक्तावर प्रेम होतं …. आता बकुळी …. दोन वर्षाने तुला वड वैगरे आवडायला लागला तर … “,
” ये यार मस्करी नको करुस ग आदे अशी , मला प्राजक्तही खूप जवळचा वाटतो आणि तेवढीच बकुळीही …..
सुंदर, नाजूक आणि तनामनाला भुरळ घालणाऱ्या सुवासिक फुलांनी बहरलेले बकुळी …… जणू सुगंधघकोषाचे भांडारच! निसर्गाची अद्भूत अत्तर असावे असे …. नुसती रूपानेच नाही तर सुगंधानेही गर्भश्रीमंत अशी बकुळी आपल्या सुगंध सुवासाने दिपवून टाकणारी . संध्यासमयी अथवा पहाटे पहाटे या झाडाखाली बकुळीचा वर्षाव अनुभवणे म्हणजे स्वर्ग सुख …. बकुळीचा दरवळणारा तो सुगंध अंगाला भेदनारा गारवा … ! किती किती आल्हादायक ….
माझ्या घरापासून अर्धातास अंतरावर असलेल्या बागेत मी नित्यनियमाने सकाळी चालायला जातो आणि अचानक एक दिवस चालत असताना एका ओळखीच्या सुगंधाने मनाला भुरळ घातली. सुगंध ओळखीचाच होता पण मला नाव आठवत नव्हतं. सुगंधाच्या दिशेने आपोआप पावले वळली. माझ्या आनंदाला तर उदामच आलं. कित्येक वर्षानंतर मी बकुळीच्या झाडाखाली उभा होतो . नक्षत्रांसारख्या सुवासिक फुलांचा सडा पडला होता. मन भूतकाळात गेलं. मनात बालपणीच्या अनेक आठवणी उचंबळून आल्या मी सहावीत असेल तेव्हा आमच्या घरी बाबांच्या गावाला अंगणात डोलदार बकुळीचं झाड होतं …. बकुळीचा सुगंध मला तेव्हा पासून परिचित आहे … नंतर बाबांच्या बदल्या होत गेल्या आणि बकुळीचा सुगंध काय तो आपलासा होऊन गेला … फक्त ओळखीपुरता ….
1
आता ते गाव ओस पडलं ..... आजी , आजोबा कोणीच आपलं नाही तिथे , गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या की मन तिकडे घेऊन जातं मला भूतकाळात ... पाऊले मात्र आहे त्या जागीच स्थिर रहातात .... "
अनुजला मधेच प्रश्न पडला ,
” झाडं असेल ना रे अंगणात बकुळीच …. “,
” माहिती नाही आता असेल की नाही ते , मोठेपणीही लहान होऊन मी तोच अनुभव भान हरपून घेतला … आता दोन दिवसाआधीची मी फिरायला जात असताना कुठूनतरी हा सुगंध दरवळताना माझ्या पर्यंत आला आणि त्या सुगंधाचा मागोवा घेत मी झाडपर्यंत पोहोचलो , पटापटा बकुळीची ओंधळभर फुले गोळा केली आणि भरभरून त्यांचा सुवास घेतला. मन प्रसन्न झाले . ती फुले ओंजळीत घेऊन घरी आलो ….
ओंजळीतून फुले पातेल्यात सोडावी असं वाटलंच नाही …. फुलांनी ओंजळ भरूनच रहावी असं सारखं वाटतं मनाला , ह्या फुलांची विशेषतः म्हणजे ही फुले कालांतरानेे वाळू लागतात. पण सुगंध मात्र कमी होत नाही. फुलं आकारानं लहानशी, नाजूक, आपल्या शर्टाच्या बटनाएवढी, रंग-सफेद, हलकिशी पिवळसर झाक, पाकळ्यांची नजाकत चांदणीसारखी. इतकी देखणी असतात की टक लावून पाहात बसावं आणि सुगंध तर केवळ दैवी असतो ….. तो अनुभवल्याशिवाय कळणारच नाही .
या फुलांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मिटलेली फुले. पाण्यात टाकल्यावर पुन्हा उमलतात इतर फुलांसारखी ही फुले कुजत नाहीत. वाळतात. वाळल्यावरसुद्धा आपला मादक, मंद सुवास कायम राखतात …. तिसरी चौथीत मी गावाकडे असताना बकुळीची फुले पुस्तकात ठेवायचो मला खूप आवडायचे , पुस्तकांचे पान अलगद उघडत असतानी जो पानांपनातून सुगंध यायचा तो बकुळीच्या उमलत्या पाकळीतून येतोय असा मी भान हरपून जायचो . “
बकुळीच्या फुलांची महती ऐकता ऐकता सारी त्याच्या सांगण्यात हरवून गेली होती …..
” चला आता आपण ही बकुळी इथे लावून घेऊ …. ” ,
” हो …… यार खूप खूप आनंद मिळाला इथे येऊन … तुझे आभार विपिन तू आम्हाला घेऊन आला …. झाड मोठं झाल्यावर इथे येणारा प्रत्येक झण झाडाजवळ दहा मिनिटे तर थांबेल … सुखावेल … आणि आपली सारी दुःख क्षणभरासाठी विसरून इथून पुढे समाधानी होऊन जाईल …. ” ,
” हे तू बोलतोय निख्या ….. Unbelievable …… ” ,
” का ? मला नाक नाही का ? ” ,
” मला वाटलं तुला फक्त तोंडच आहे गिळायला आणि बोलायला …. ” प्रितम निखिलची मज्जाक घेत हसायला लागला …. त्याला असं हसताना बघून निखिलने झाडांसाठी गड्डा करायला सांगितला …
**************
विपिनने बकुळीची तीन झाडे लावली , पण त्यातलं जगलं एकच ….. खूप मोठं झालं ते झाड … गार्डनमध्ये जाणाऱ्या येणाऱ्याच्या हृदयात घर करून बसलं …. किती पक्षी त्याच्या फांद्यांवर आसरा घ्यायचे . थकलेला जीव त्यांच्या आडोशाला येऊन बसायचा .
==============================================