Shiv Shankrachya mahiti naslelya ranjak katha in Marathi Spiritual Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | शिव शंकराच्या माहिती नसलेल्या रंजक कथा

Featured Books
Categories
Share

शिव शंकराच्या माहिती नसलेल्या रंजक कथा

शिव शंकराच्या माहिती नसलेल्या रंजक कथा

हर हर महादेव

भगवान शिव जो विध्वंसाचा देव म्हणुन ओळखला जातो

याच्या स्वभावाच्या काही कोमल छटा सुद्धा आहेत

या आहेत काही गोष्टी

ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील

  • 1 - भगवान शिवाला सहा मुले होती.
  • भगवान शिवाचा पहिला मुलगा भगवान गणेश अथवा भगवान कार्तिकेय नसून भगवान अय्यप्पा होते.

    लोक स्वाभाविकपणे हे विसरतात कि भगवान शिवाला दोन पेक्षा अधिक मुले होती.

    शिवाला सहा मुले होती ( अय्यप्पा, अंधका, भौमा, खुजा, गणेश आणि कार्तिकेय / सुब्रम्हण्या} आणि

    एक मुलगी (अशोक सुंदरी }

    या मुलांपैकी अय्यप्पा हा सर्वात मोठा आणि गणेश व कार्तिकेय हे सर्वात लहान होते.

    स्वामी अय्यप्पा हा भगवान शिवा आणि मोहिनी { जो भगवान विष्णुचा अवतार होता } यांच्या मिलनातून जन्माला आला होता.

    अय्यप्पा, अंधका, भौमा, खुजा आणि अशोक सुंदरी यांच्यानंतर यांच्यानंतर खूप उशिरा गणेश आणि कार्तिकेय जन्माला आले.

    असे मानले जाते की जेंव्हा गणेशाला मस्तक लावले गेले त्या वेळेस अशोक सुंदरी तेथे उपस्थित होती.

    ***

    2 - सस्मित मुद्रेचे भगवान शिव हे रागीट कालीमातेच्या पायतळी आहेत.

    संभवतः सर्वात विनम्र गोष्टी आपण पौराणिक कथा मधून शिकतो.

    भगवान शिव म्हणजेच महादेव हे देवी कालीमातेच्या पायतळी आहेत तरीही हास्यमुद्रेत आहेत.

    ते खरेतर “रोष” आणि “रागाचे” प्रतिनिधित्व करतात तरीही ते सर्वात दयाळु रुपात आहेत

    असे का बरे ?

    याचे कारण असे की.

    एकदा देवी कालीमाता क्रोधाने विध्वंस करीत चालली होती

    कोणताही देव, मानव, अथवा राक्षस तिच्या या रक्तपिपासु कृत्याला थांबवायचे धाडस करीत नव्हता

    या महाशक्ती रुपातील थैमानाला थांबवण्यासाठी भगवान शिवाला सर्वांनी एक सामुहिक प्रार्थना केली

    या देवतेची शक्ती इतकी होती कि ती जिथे पाय ठेवेल तिथे पूर्णपणे विध्वंस होत असे.

    भगवान शिवाना समजले कि त्यांना सुद्धा या शक्तीच्या बळाचे आकलन होत नव्हते.

    त्यांना भावनिक माध्यमातुनच तिच्यापर्यंत पोचायला लागणार होते.

    त्यामुळे त्यांनी ठरवले की या देवतेच्या रस्त्यात पडून राहायचे

    अखेर जेव्हा कालीमाता त्या जागेवर पोचली जेथे शिव पडून राहिले होते, त्यांच्या छातीवर पाय ठेवेपर्यंत तिने त्यांना पाहिलेच नाही.

    आतापर्यंत प्रत्येक गोष्ट ज्याच्यावर ती पाय ठेवत होती तीगोष्ट विनाशाकडे जात होती

    फक्त हा एकच अपवाद होता.

    कालीमातेला खाली पाहायला भाग पाडले गेले आणि तिला भगवान शिव दिसले.

    अचानक झालेल्या जाणीवेने ती तिच्या दिवास्व्प्नातून बाहेर आली आणि अतिशय लज्जित झाली.
    स्वाभाविकपणे आपली जीभ तोंडातून बाहेर काढून तिने आपली क्षमा दर्शवली.

    यापासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

    एखाद्याकडे कितीही संसाधने असली तरी काही काही वेळा युक्तीने काम करावे लागते जसे भगवान शिवानी केले

    दुसरे म्हणजे किचकट प्रसंगातून आपल्याला स्वतःच्या विचारानेच बाहेर पडता येते,

    या गोष्टीतून आपल्याला भगवान विष्णूच्या स्वभावाच्या छटा पाहायला मिळतात जेव्हा परिस्थितीशी सामना करतात.

    ***

    3 - भगवान हनुमान हे भगवान शिवाचे अवतार आहेत

    असे म्हणतात की भगवान हनुमान हे भगवान शिवाचा अकरावा पुनर्जन्म आहे.

    भगवान हनुमान हे रुद्रावतार किंवा रुद्राचा पुनर्जन्म म्हणून ओळखले जातात

    भगवान शिव सुध्दा रुद्र म्हणून ओळखले जातात

    मानवांचे पूर्वज असलेल्या वानरांनी रामायणात रामाला मदत केली होती. {हा विष्णुचा पुनर्जन्म होता.}

    त्यांच्या मदतीविना राम रावणाचा पराभव करू शकले नसते.

    भगवान हनुमान हे रामावरच्या एक्निष्ठ्तेमुळे आणि पापावर पुण्याचा विजयात केलेल्या त्यांच्या सहभागामुळे पुजन केले जातात

    पुराणात असे चित्रण आहे की भगवान शिवाची भगवान विष्णूवर पूर्णपणे अनंत भक्ती आहे कारण त्याने वानराचा पुनर्जन्म घडवून आणला आणि पूर्ण क्षमतेने त्याची सेवा केली.

    ***

  • 4 - अमरनाथ गुफेची कथा
  • देवाच्या भक्तांसाठी अमरनाथ गुफा अतिशय महत्वाची आहे.

    भगवान शिवाच्या पत्नीला, पार्वतीला सांगितलेले अमरत्वाचे रहस्य याच्याशी अमरनाथ गुफेचे पौराणिक महत्व संबंधित आहे.

    जेव्हा शिवाच्या पत्नीने अमरत्वाचे रहस्य सांगण्यासाठी त्यांना भाग पाडले तेव्हा त्यांनी गुफेकडे निघायचा निर्णय घेतला.

    त्यांच्या गुफे कडे जाणाऱ्या वाटेमध्ये त्यांनी काही गोष्टी केल्या, ज्या त्यांच्या भक्तांच्या मते अतिशय महान आहेत.

    या काही गोष्टींच्या मुळे गुफेकडे जाणारा पूर्ण रस्ता आनंदी होऊन गेला.

    खरेतर अमरकथेचे रहस्य प्रकट करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला व आपल्या वाहनाला वेगवेगळ्या निर्जन परिसरात सोडले याच कारणामुळे या सर्व जागा तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध झाल्या .

    अमरनाथ प्रवासाचे दोन रस्ते आहेत.

    पेहेलगाम आणि सोनमर्ग बालताल..

    पुराणानुसार भगवंतानी गुफे पर्यंत पोचण्यासाठी पेहेलगामचा रस्ता निवडला होता.

    ***

  • 5 - नंदी बैलासोबत भगवान शिवाचे नाते
  • भगवान शिव आणि नंदी हे अविभक्त आहेत.

    नंदी हे हिंदू देव शिवाचे वहान आहे.

    हिंदू पुराणाप्रमाणे नंदी हा सत्य आणि प्रामाणिकपणाचा वाहक आहे.

    भगवान शिव नंदीचे सहयोगी कसे बनले ह्याचे वर्णन या गोष्टीत आहे.

    एक दिवस सुरभी, जी सर्व जगातल्या गायींची मूळ माता होती तिने अनेक अतिशय पाढर्या शुभ्र अशा गायींना जन्म देण्यास सुरवात केली.

    त्या सर्व गायींच्या दुधामुळे देवाच्या घरात पूर आला.

    हिमालयात कुठेतरी साधनेला बसलेल्या शिवाच्या तपस्येत त्यामुळे व्यत्यय आला आणि चिडून त्याने आपल्या तिसर्या डोळ्याच्या अग्नीने या गाईवर हल्ला केला.

    याचा परिणाम म्हणून या गाईंच्या कातडीचे काही भाग तपकिरी झाले.

    तरीही रागावलेल्या देवाला शांत करण्यासाठी इतर देवानी एक उपाय शोधला आणि त्याला एक नंदी नावाचा शानदार बैल भेट केला, जो सुरभी आणि कश्यप यांचा पुत्र होता आणि ज्याला शिवाने वाहन म्हणून स्वीकृत केले.नंदी सुद्धा सर्व प्राण्यांचा संरक्षक बनला.

    नंदी देवाचा सहायक असल्याने तो स्वतः सुद्धा अनेक वर देऊ शकत होता.

    दक्षिण भारतात नंदीच्या कानात आपली इच्छा सांगण्याची प्रथा आहे आणि ती पूर्ण होते असा विश्वास असतो.

    ***

  • 6 - सुदर्शन चक्र भगवान शिवाने भगवान विष्णूला बहाल केले.
  • सुप्रसिद्ध असे सुदर्शन चक्र भगवान शिवाने भगवान विष्णूला बक्षीस दिले होते एकदा विष्णू शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवाचे सहस्त्रनाम जपत होता

    त्याने शंभर कमळे देवाला प्रसन्न करण्यासठी ठेवली.

    देवाला भगवान विष्णूच्या भक्तीची परीक्षा पहायची होती म्हणुन त्याने त्या फुला मधील एक फुल उचलले जे भगवान विष्णू शिवाच्या पिंडीवर त्याच्या प्रत्येक नामांसोबत अर्पण करणार होते.

    एक हजारावे नाम घेताना एकही फुल शिल्लक नसलेले पाहून विष्णूला नवल वाटले आणि त्याने स्वतःचा डोळा काढला व देवाला अर्पण केला.

    विष्णूला कमलनयन म्हणून ओळखले जाते त्यामुळे त्याच्या डोळ्याने कमळाची कमतरता पुरी केली.

    त्याच्या भक्तीचा स्तर पाहून शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला सुदर्शन चक्र बक्षीस दिले

    ***

  • 7 - भगवान शिव आपल्या संपूर्ण शरीरावर राख का फासून घेतात ?
  • भगवान शिवाचे संपूर्ण शरीर नेहेमीच राखेने लिंपलेले असते आणि शिवभक्त आपल्या कपाळावर आणि हातावर भस्मतिलक लाऊन घेतात

    भगवान शिव या राखेशी कसे जोडले गेले याबाबत एक अत्यंत मजेदार कथा शिव पुराणात आहे.

    एकदा तेथे एक ऋषी राहत होते ज्यांचा वंश भृगु ऋषीशी मिळताजुळता होता.

    त्यांनी अतिशय उग्र तप केले होते आणि शक्तिशाली बनले होते.

    ते फक्त फळे खात असत आणि नंतर फक्त हिरवी पाने.

    म्हणून त्यांना “प्रणद” हे नाव मिळाले.

    प्रणद ऋषींनी आपले उग्र तप चालू ठेवले आणि ज्या जंगलात ते राहत होते तेथील प्राण्यावर आणि वनस्पतीवर नियंत्रण मिळवले.

    एकदा त्यांची झोपडी दुरुस्त करण्यासाठी गवत कापत असताना ऋषींचे मधले बोट कापले गेले .

    त्यांना आश्चर्य वाटले जेव्हा जखमेतून रक्ताऐवजी झाडांचा हिरवा रस वाहू लागला

    आता प्रणद ऋषींना वाटले, ते इतके पवित्र आहेत कि त्यांच्या शरीरात रक्ता ऐवजी वनस्पतींचा रस वाहू लागला आहे.

    त्यांच्या मनात गर्वाचा शिरकाव झाला आणि ते उन्मादाने जोरजोरात ओरडू लागले की ते जगातले सर्वात पवित्र मानव झाले आहेत.

    हा प्रसंग पाहिल्यावर भगवान शिवानी एका वृद्ध माणसाचा वेश घेतला आणि ते तेथे पोचले.

    जेव्हा त्या वृद्ध माणसाने त्यांच्या अनिर्बंध आनंदाचे कारण विचारले

    तेव्हा प्रणद म्हणाले ते या जगातले सर्वात पवित्र मानव आहेत कारण त्यांचे रक्त आता झाडांच्या आणि फळांच्या रसा प्रमाणे बनले आहे.

    त्यावर वृद्ध माणुस म्हणाला यात आनंदित होण्यासारखे काय आहे ?

    हा तर फक्त झाडांचा रस आहे.

    पण जेव्हा झाडे आणि रोपे जळतात तेव्हा त्यांची राख होते.

    फक्त राख शिल्लक उरणे हे नक्कीच सर्वात उच्च दर्जाचे आहे.

    याचे उदाहरण देण्यासाठी त्या वृध्द माणसाने आपल्या बोटाचा तुकडा कापला आणि लगेच त्यातून राख बाहेर पडली.

    प्रणद ऋषींना लगेच समजले त्यांच्या समोर भगवान शिव उभे होते.

    त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल क्षमा करावी अशी प्रार्थना केली.

    असे म्हणले जाते की तेव्हापासून आपल्या भक्तांना अंतिम सत्याची आणि शरीर सौन्दर्यावर मोहित होण्याच्या मूर्खपणाची जाणीव करून देण्यासाठी भगवान शिवानी स्वतःला राख लिंपून घेतली आहे.

    ***

    8 - भगवान शिव देवी पार्वतीची परीक्षा घेतात.

    आपल्यापैकी काही लोकांना माहित आहे की देवी पार्वतीला पत्नी म्हणुन स्वीकार करण्यापूर्वी त्यांनी तिच्या भक्तीची पुर्णतया परीक्षा घेतली होती.

    त्यांनी स्वतःला एका तरुण ब्राम्हणाच्या वेशात सादर केले आणि पार्वतीला विचारले की एका निर्धन आणि भणंगा प्रमाणे राहणाऱ्या भगवान शिवासोबत लग्न करणे तिच्यासाठी चांगले असु शकते का ?

    जेव्हा भगवान शिवाच्या बद्दल असे शब्द ऐकले तेव्हा पार्वती खुप रागावली.

    तिने त्याला सांगितले की ती भगवान शिवा व्यतिरिक्त कोणाशीही विवाह करणार नाही. तिच्या उत्तराने प्रसन्न झालेले शिव पुन्हा आपल्या मूळ रुपात प्रकटले आणि पार्वतीशी विवाह करायला तयार झाले.

    राजाने हा विवाह सोहळा अत्यंत धामधुमीत पार पाडला.

    ***