Bakulichi Fulam - 2 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | बकुळीची फुलं ( भाग - 2 )

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

बकुळीची फुलं ( भाग - 2 )



” ये …. अरे आंधळा आहेस का तू ? दिसतं की नाही डोळ्याने … कोणी मुलगी जात आहे ते समोरून … ” अनुज घाईत ऑफिसकडे जायला निघाला होता .

” राहू दे ना ! मी उचलते माझे बुक … तू आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन डोळे चेक करून घे स्वतःचे … ” त्याने ऐकून न घेता बुक उचलून देत तिच्या हातात ठेवले .

” हे घे तुझी बुक्स … आणि i am really sorry … ” अनुज तिथून निघून गेला …

” काय बावळट मुलगा आहे ना … कॉलेजचा पहिलाच दिवस स्पोईल केला ह्याने … “

” काय झालं आदी , कुणावर रागावली आहेस ? ” क्लासरूमकडे जाणाऱ्या मालतीने प्रश्न केला .

” काही नाही ग एक बावळट मला टकरावला … “

” ओहह …. अच्छा तरी म्हटलं काय झालं असं आल्या आल्या चिडायला …. लागला असेल चुकून धक्का …. एवढं काय हायपर होतेस ….. “,

” अगं तुला माहिती नाही ही मुलं जाणून असं करतात … आधी धक्का द्यायचा मग सॉरी म्हणत मैत्रीचा हात पुढे करायचा … पण नाही यार तो तसा नव्हता … सॉरी म्हणून निघून गेला … “,

” हो तेच सांगत आहे …. घाईत असेल तो जाऊदे … चल आता क्लासमध्ये … ” दोघीही क्लासकडे निघाल्या .

” Hey guy's …… निख्या …. प्रितम …. अरे तुम्ही सर्व आलेत पण आज लवकर … what a pleasant surprise यारो … मी तर म्हटलं , नेहमीसारख कॉलेज दहाला असते न तुम्ही येणार बाराला आपल्या ब्रम्ह मुहूर्तावर …” सर्वाना लवकर आलेलं बघून आदिला आश्चर्याचा धक्का बसला .

” अगं हो हो , श्वास तर घे जरा बोलताना …. आम्ही आता लवकर यायचं ठरवलं ! फस्ट इअरला चाललं ग … आता सिरिअसली स्टडीला लागायचं … “

” क्या बात है प्रितम …. हो यार खूप झाला टाइमपास करून … अरे रेवडी कुठे दिसत नाही आहे … आली नाही का अजून …. “,

” रेवा आली नाही येणार आहे ती ट्राफिकमध्ये फसलेली असेल …. आणि निख्या तू तिला रेवडी रेवडी का करतो रे , एवढं छान नाव आहे तिचं रेवा . “

” रेवडी कापराच्या वडी सारखी आहे …. कापूर कसा हवेते ठेवला की उडून जातो , तशीच ती न सांगता उडून जाते … म्हणून मी तिला रेवडी बोलतो … आणि मी म्हणेल रेवाला ” रेवडी ” माझा हक्क आहे तो . ” हसत हसत निखिल रेवाची खिल्ली उडवत होता .

” थांब येऊ दे तिला सांगते …. ” आदितीने ताकदीचा स्वर काढला .

” काय गं आदे जा सांग घे आली ती … अरे रेवडी कोणाला घेऊन आली सोबत … ” रेवाचा मागे निखिलला क्लासमध्ये नवीनच मुलगा येताना दिसला .

” Hey फ्रेन्डस ….. ” रेवा त्यांच्या घोळक्यात शिरली .

” ये तुझीच वाट होती … नाही म्हणजे आम्ही तुझीच चर्चा करत होतो ..”,

” आम्ही नाही ग रेवा हा निख्या हा तुला …… “, मालती रेवाला तक्रारीच्या स्वरात सांगायला लागली .

” यार चुप रहा ना तू मालती …. हा कोण नवीनच आला क्लासमध्ये ?? तू घेऊन आली का रेवडे ह्याला …. “,

” निख्या …. तू ना आधीतर मला असं चिडवू नकोस … आणि त्याला मी ओळखत पण नाही …. “

” हा …. हा तोच आहे ज्याच्यासोबत माझी ऑफिससमोर टक्कर झाली … हा आपल्या क्लासमध्ये कसा काय ?? ” त्याला बघून लगेच आदितीला आठवलं . हा तोच होता ज्याने आपल्याला धक्का दिला .

” अच्छा म्हणजे हा तोच बावळट आहे का ज्याच्यावर तू चिडली होती… ” मालती तिला विचारती झाली .

” हो हा तोच आहे …. ” अनुजकडे बघतच आदितीने तिला हा तोच असल्याचं सांगितलं .

अनुज समोरची दोन तीन बेंच सोडून मागे आला ... त्याने निखिलच्या बाजूला येऊन बॅग ठेवली .... आणि बसायला गेला एवढ्यात मागच्या बाकांवर गप्पा करत असलेल्या निखिलच त्याच्याकडे लक्ष होतच .

” ये हिरो …. हा तूच तिथून बॅग घेऊन मागच्या नाहीतर समोरच्या बेंचवर बस ती माझ्या मित्राची जागा आहे …. ” निखिलने बसल्या जागून अनुजला उठवलं .

अनुजला हा प्रकार रॅगिंग सारखाच वाटला … त्याने आपली बॅग घेतली आणि मागच्या बाकावर जाऊन बसला .

” काय रे निख्या , अजून आला नाही विपीन ….कशाला उठवलं त्याला बसू द्यायचं होतं ना ! नवीन आहे तो कॉलेजमध्ये …. “,

” तुला बरी सहानुभूती वाटायला लागली गं मालती त्याची …. बरं जाऊन त्याला सॉरी म्हणून का मी , की पाया पडू त्याचा मला माफ कर म्हणून …. ” निखिल जरा चिडला होता .

” अरे काय हे …. सॉरी बोलण्याने काय चाललं तुझं … समोरच्याला आपल्या चुकीने वाईट वाटलं असेल तर सॉरी म्हणून चूक दुरुस्त करता येते माणसाला … ” मध्ये पडून रेवा त्याला समजवत होती .

” OK ….. OK …. जाऊन त्याला सॉरी म्हणतो …. खुश ना आता ! ” निखिल तडक आपल्या बेंचवरून उठून अनुज जवळ गेला .

” हॅलो …. सॉरी …. तुला वाईट वाटलं असेल माझं बोलणं …. “,

” नो .. नो …. इट्स ओके …. “,

” बाय द वे …. आय एम निखिल …. निखिल परांजपे … ऍण्ड यू ?? “,

” आय एम … अनुज ......“,

” आता मध्येच ऍडमिशन कशी काय केली तू इथे ? “,

” काही कारणास्तव मला दिल्ली सोडून इथे यावं लागलं … सो इथे ऍडमिशन घेतली … “,

” गुड …. चल …. एन्जॉय युअर फस्ट डे इन नीव कॉलेज …. “अनुजने फक्त स्माईल दिली … निखिल परत आपल्या ग्रुपला जॉईन झाला .

” हा विपीन आज येतो का नाही कॉलेजला …. यार सर पण नाही आलेत चला बाहेर कॅन्टीनवर जाऊ … ” , विपीन ह्या ग्रुपची जान होता आज त्याचा काही पत्ता नव्हता कॉलेजला .

” नको रे प्रितम …. सर येतीलच एवढ्यात एक लेक्चर झालं की जाऊ बाहेर मग .” ,

” तू पण ना आदी …. ठीक आहे . “,

पहिले तीन लेक्चर झाले आणि सर्व निघून गेलेत .

” चला आता आपण मस्त धम्ममाल करूयात ही मंडळी गेली आता घरी …. “

” प्रतिम पार्टी वैगरे नको यार ….. कॅन्टीन मध्ये जाऊन काही खाऊन घेऊ आणि निघू मला डान्स क्लासला जायचय … “

” मालती तुझे डान्स क्लास न तू …. धन्य हो …. चला कँटीनला …” सर्वांनी आपल्या आपल्या बॅग घेऊन क्लासचा बाहेर निघाले . निखिलच अनुजकडे लक्ष गेलं तो एकटाच आपल्या बाकावर बसून कसल्या तरी विचारात डूबला होता .

” अनुज …. अनुजच ना …. ” दचक्कतच त्याने भानावर येत मान हलवली …

” चल कॅन्टीनला आमच्यासोबत …. सर्व क्लास निघून गेला , आता लेक्चर नाही होणार आहे … “

” कॅन्टीन ला ….. मी … “,

” आय नो तू नवीन आहेस पण ओळख करावं लागेल ना … आणि इथे सर्व ग्रुप पडलेत तुला एखादा ग्रुप जॉईन करावं लागणार आहे …. “,

” अरे ये निख्या चल ना यार …. लवकर ये … आम्ही सगळे बाहेर वाट बघतोय तुझी ” दाराजवळ येत रेवाने आवाज दिला त्याला …

” हो आलोय जस्ट वेट …. “

” चालतो का आता तू ? ” निखिलने जबरदस्तीने अनुजला आपल्या सोबत नेले .

सर्व कॅन्टीन मध्ये एकत्र येऊन बसले . त्या जुन्या मित्रांमध्ये अनुजची एक नव्याने भर पडली … अनुजने आपली ओळख सर्वाना करून दिली . एक वर्ष अनुजने दिल्लीच्या IIT कॉलेजमध्ये केलं होतं अचानक काही आजाराने त्याचा वडिलांची डेथ झाली आणि दिल्ली सोडून त्याला मुंबईला आपल्या आईजवळ यावं लागलं . अनुजसाठी खूप मोठा धक्का होता तो .

” अनुज ही रेवा आहे सर्वात बडबडी …. अगदी तुला हिच्या बोलण्याने कंटाळा आला तरी हिला ऐकून घेण्याशिवाय ऑप्शन नाही … हिटलरशाही चालते हिची सर्वांवर …. ” प्रितम आपल्या ग्रुपमधील सर्व मित्रांची अनुजला ओळख करून देत होता .

” ये अनुज असं नाहीच रे हा प्रितम तुला जास्त सांगतो आहे माझ्याबद्दल … ” रेवा जरा आव आणतच बोलली .

” झालं का माझं बोलून, सांगू तर दे अजून तुझे स्किल काय आहे ते …. आणि हो रेवाला भटकंती करायला जंगली जनावरांचे फोटो काढायला खूप आवडते … हिने क्षेत्र चुकीचं निवडलं असं मला कधी कधी वाटतं . “

” बस्स पुरे झालं आता प्रितम …. नेक्स्ट सांग … ” ,

” नेक्स्ट हा … निख्या … निख्या आपल्या कॉलेजमध्ये चॉकलेट बॉय … एका वर्षात ह्याला क्लास मधल्या आणि कॉलेजमधल्या वीसक मुलीने प्रपोज केलं पण ह्याने कुणालाच होकार दर्शविला नाही …”

” का ? ” अनुजने प्रश्न केला .

” अरे सांगतो आहे …. कारण ऐकून तू हसू नको मात्र …. ह्याला ना ती मधुबाला आवडते ‘आईये महेरबा बैठिये जाने – जा; शौक से लीजिये जी , प्यार का इम्तेहा … आइये मेहरबाँ ‘ न थांबता प्रितमने गण्याचं पहिलं कडवं पूर्ण करत बोलू लागला ......" हे गाणं गुणगुणत असतो हा मधुबालाच सारखं …. आता तूच सांग ह्याला ती ओल्ड 1920 मधुबाला कुठून मिळणार आणि ह्या अश्या मॉर्डन युगात , हा डिजे वाले बाबू सोडून असले song ऐकतो आईये महेरबा ..”, प्रितम मोठ मोठ्याने हसू लागला .

” ये भसाड्या तुला काय माहिती आहे रे मधुबाला बद्दल ? शी माईट बी द मोस्ट ब्युटीफुल वूमन एव्हर walked इन द प्लेस आफ्टर माय मॉम , शी इस pure ब्युटी वन ऑफ द मास्टर पीस एव्हर क्रिएटेड बाय God … आणि माझ्या गाण्याची वाट लावली यार तू … आता एक शब्द पण गाशील ना तर मुसकाट धरून आवरेल हं तुझं “ निखिलला असं चिडलेलं बघून सर्व परत हसायला लागले होते .

” खिदळायला का लागली सारीच .. ओके मी जातो इथून हसत बस्सा …. ” निखिल उठून तावातावाने जायला निघालाच होता . प्रितमने त्याला ओढूनताणून आणतं बसवलं .

” यार निख्या कुल रे … मला पण रात्री झोपण्यापूर्वी जुणी गाणी ऐकायला आवडतात त्याशिवाय झोपच येत नाही . ” त्याला समजवण्यासाठी मालती बोलू लागली . आता हे कितपत खरयं तिचं तिला माहिती ..

” त्यात ओल्ड काय नीव काय चॉईस इस चॉईस ….. आणि कुणाकुणाला आवड असते जुन्या collection ची …. “अनुज खऱ्या अर्थाने निखीलची बाजू घेत होता .

” व्वा …. अगदी मनातलं बोलला रे अन्या …. मलाही भेटेल अशीच कोणीतरी जी फक्त आणि फक्त माझ्यासाठी बनली असेल सिंगल पीस ओन्ली फॉर मी … म्हणून ना मी कुणाच्या मागे जात नाही , मर्मिड कशी हवेत हळुवार उडत असते ती पण तशीच न सांगता येईल माझ्या आयुष्यात … ” प्रितमच्या खांद्यावर हात ठेवून निखिल बोलला .

” बघू कधी भेटते तर तुझी मधुबाला ….. ” रेवा त्याला चिडवत होती .

” ये अनुज तुझी पण आहे का कोणी …… ती ….. असेल तर आताच आम्हाला सांगून दे ! “,

” नाही रे प्रितम अजून मी कुणाच्या प्रेमात पडलेलो नाहीये …. पण कवितेच्या प्रेमात असतो नेहमी गुंतलेलो …. “,

” अरे व्वा ! ….. म्हणजे तू कविता देखील करतोस …. भारी हा …. तुला माहिती आहे आपल्या ग्रुप मध्ये आदी i mean आदिती सुद्धा खूप छान कविता लिहिते …. चला तर आपल्या ग्रुप मध्ये आता अजून एका कवी महोदयांची भर पडली … ” मालती खूप खुश झाली . तिला कविता लिहिता येत नसल्या तरी कविता वाचायला खूप आवडायच्या .

अरे देवा ! ही तीच तर मुलगी आहे . नाकावर फुगा …. अनुज आदितीकडे सारखा बघत होता … विचारशून्य नजरेने पण , त्याच्या डोक्याततर विचाराचं चक्रीवादळ आलं होतं ….

” काय झालं अनुज आदितीला बघून तुझ्या चेहऱ्यावरची स्माईलच उडाली ?? “,

” कुठे काय काही नाही …. छान आहे ना ती पण कविता करते तर …. “
अनुज आदितीकडे जरा तिरकस नजरेने बघत बोलला .

” अनुज सॉरी अरे , मी जास्तच बोलले तुला …. काय तू पण ना बघून चालायचं ना ! ” ,

” अगं सॉरी तू कशाला बोलते माझीच चुकी आहे …. मी खूप घाईत जात होतो मला काय माहिती समोरून तू येत आहे ते …. पण तेव्हाचे आदीती ती तूच आहेस ना ! तेव्हा मला वाटलं झालं आता आपलं काही खरं नाही …. “

” म्हणजे तुला काय म्हणायचं ….. “,

” तेव्हा तुझं नाक किती फुगून होतं असं माठा सारखं ….. ” अनुज हसत होता .

” ये माठा सारखं नाही हा …. “,

” बरं …. आता आपण फ्रेंडस ना ! “,

” हो फ्रेंड्स …. मला आवडेल तुझ्याशी फ्रेंडशिप करायला …. ” आदितीने अनुज सोबत हात मिळवला . तिचा तो हात त्याने असाच कितीतरी वेळ हातात धरून ठेवला होता . आदिलाही त्याच्या हातातून आपला हात सोडून घ्यावं वाटलं नाही . निखिल हळूच अनुजला धक्का देत त्याच्या कानात कुजबुजला .

” अरे सोड की आता तिचा हात … ” भानावर येत तसच अनुजच्या हातून तिचा हात निसटला . “

” अनुज आता सर्वांशी तुझी ओळख पटली ना ! शिवाय तुला प्रत्येकाची नावही माहिती झाली . “

” काहीतरी खायचं मागवू …. आज पार्टी माझ्याकडून …. ” आदिती ओरडली .

” हो हो ….. काय खाणार ते ठरवा आधी … “,

” निख्या तू पण ना इथे कॅन्टीनवर समोश्या , वड्या शिवाय दुसरं काय असतं खायचं …. पिज्जा बर्गर खायचं असेल तर मोठ्या हॉटेलमध्ये चला उठा इथून … “,

मालती तिथून उठायच्या तयारीत होती , एवढ्यात पाऊस पडायला सुरुवात झाली . पावसाचं असं अचानक येणं तिथे बसलेल्या सर्वाना नको होतं ,पण अश्या अचानक येणाऱ्या पावसाची अनुज आतुरतेने वाट बघायचा … आणि पावसाचं स्वागतही मोठ्या उत्साहाने करायचा … रिमझिम सरी ना बरसायला नुकतीच कुठे सुरूवात झाली होती . पाऊस तसा वेग धारण करत होता . विजेचा कडकडाट नव्हता की ढगाचा गडगडाट नव्हता . थंडावा काय तो सर्वत्र पसरला होता .

” wow ….. पाऊस ….. How romantic atmosphere ….. चला ना आपण सर्व पावसात भिजूयात मग मस्त कॉफी घेऊ …. “, अनुजच्या मनातलं बोलत होती आदिती .
” ये आदे तुला काय वेडबिड लागलं का पावसात भिजायला …. ” रेवा चिडलीच तिच्यावर ….

” किती गजगज असते ग आदी मी नाही येत …. “, प्रितमने पावसात भिजायला नकार दिला .

” हे बघ प्रितम तुला यायचं नसेल तर नको येऊ रहा इथेच बसून …. मी भिजते एकटीच ….. “,

” ये थांब थांब ….. आम्ही आहोत ना तू एकटी कुठे चालली …. “

निखिल , मालती …. तिच्यासोबत पावसात भिजायला उठले …. खरंतर अनुजलाही भिजायचं होतं त्या पावसात पण तो जागेवरून उठला नाही … त्याला आदितीला पावसात भिजताना बघायचं होतं …. फुलपाखरू कसं मनसोक्तपणे आनंद लुटतो ह्या झाडावरून त्या झाडावर उडण्याचा आदिती तशीच पावसात भिजण्याचा आनंद लुटत होती … बसल्या जागून अनुज तिचं भिजणं पावसात खळखळून हसणं …. हाताने सरीना झेलण … त्या सरी निखिल आणि मालतीवर शिंपडनं डोळ्याने टिपत होता …. आपल्या नजरेत भरत होता ते दृश्य …. त्याला तिचं असं मनसोक्त वागणं बघून आपणच पावसात भिजतो आहोत की काय असं वाटायला लागलं …



एक मोठी सर धावून आली आणि मग सारखा संथ पाऊस पडत होता . अर्धा तास तिघे पावसात चिंब भिजत राहिले ...

” वेटर …… वेटर ……. छे प्लेट समोसा लाना , और छे ग्लास कॉफी …. ” प्रितमने ऑर्डर दिली . आणि त्या तिघांना आवाज दिला ….

” निख्या , मालती ….. आदिती , या आता खूप झालं पावसात भिजून ..”

सगळ्यांनी मिळून नास्ता फस्त केला . तसा पाऊसही गेला होता . सर्व आपल्या आपल्या घरी जायला निघाली …

अनुज कॉलेज मध्ये कारने यायचा . त्याने कार कॉलेजच्या मेन गेटसमोर पार्किंगला लावून ठेवली होती . सर्वाना गुड बाय बोलून अनुज मेनगेट वर आला . कार पार्क केली आणि घराची वाट धरली .

वाटेत एक ब्रीज आला, पुढच्या चौकातील सिग्नल रेड असल्याने मागे पुलावर गाड्या जाम… ट्राफिक एवढं गच्च भरलेलं . अर्धा तास तरी लागणार होता . म्हणून अनुजने रेडिओ लावला …. आणि बसला गाणे ऐकत एवढ्यात त्याच लक्ष काचेच्या बाहेर गेलं …. काच त्याने खाली घेतली ….

मुसळधार पावसाच्या दिवसातही घामाघूम झालेला एकजण त्या चढावरून हातगाडी ढकलत होता, अनुज उजव्या लेनमधून ब्रिजच्या वरच्या टोकावर आलेल्या त्याला पाहत होता . खूप जोर लावून तो गाडा ढकलत होता…

रापलेल्या मानेवरून ओघळणारा घाम, गुडघ्यापर्यंत दुमडलेला पायजमा,टरारून फुगलेल्या पोटऱ्या..

कधी एकदा हा चढ संपतोय असं त्याच्याकडे पाहून वाटत होतं… शेवटी एकदाचा तो चढ संपला…. आता उतार …. आजूबाजूला ट्रॅफिक जॅममुळे वैतागलेलं पब्लिक, अस्वस्थता घालवायची म्हणून असेल ….उगाच वाजणारे हॉर्न…. त्या गाडीवाल्याकडे सहानुभूतीने पाहणाऱ्या कित्येक नजरा…. सिग्नल सुटला.. अनुजची लेन तरीही जाम… डाव्या बाजूची लेन निघाली..तो गाडावाला निघाला.. अनुजची लेन साधारण अर्ध्या मिनिटाने सुटली…
ब्रीजच्या उतारावर तो त्या गाडीवाल्याला पाहत होता .. क्षणभरासाठी अनुजला वाटतं होत त्याला मदतीला जावं … पण ती गर्दी जवळ जवळ लागून असलेल्या गाड्या त्यात अनुजही फसला होता . ही गर्दीच आपल्याला त्याच्या मदतीपर्यंत पोहचायला आड येत आहे …
मगाशी ब्रीज चढताना करावी लागली होती त्यापेक्षा अधिक कसरत त्याला आता उतारावर करावी लागत आहे ….
आयुष्य असंच असतं नाही का..?
कष्ट,दुःख असतं तेव्हा काही ध्येय असतं समोर ,तेव्हा आपण त्या ध्येयाकडे नजर ठेऊन त्रास सहन करत तो चढ चढत असतो …
ध्येय साध्य झालं, हवं ते यश मिळालं..की मग खरी कसरत सुरू होते…
यश मिळवणं कठीण असतं ना ! पण त्या कष्टाने मिळालेल फळ आपल्या कर्तबगारीचं असतं …. आपल्या वडिलांनीही शून्यातून असचं जग उभं केलं तेव्हाकुठे “ड्रीमर” आजही खंबीर उभं आहे . पण डॅड आपल्यातून निघून गेले हे सर्व मागे टाकून ह्याची त्याला आठवण झाली . आणि तो भावुक झाला डॅडसाठी …त्यांच्या नसण्यासाठी …. गाड्याचे हॉर्न वाजू लागले … किरकोळ आवाजाने अनुज विचारातून जागा झाला . त्या गर्दीतून अनुजची गाडीही निघाली आपल्या वाटेने ….