Rahasyamay Stree - 10 in Marathi Moral Stories by Akash Rewle books and stories PDF | रहस्यमय स्त्री - भाग १०

Featured Books
Categories
Share

रहस्यमय स्त्री - भाग १०

रहस्यमय स्त्री भाग १०




अमरला कार मद्धे बेशुद्ध अवस्थेत बघून पवार घाबरले होते , अमरच डोक रक्ताने माखल होत . ते बघून तो वाचेल की नाही याची अजुनच चिंता वाटू लागली होती .
त्यांनी आजूबाजूला असलेल्या व्यक्तींना आपण पोलीस असल्याचे सांगितले व त्यांच्या मदतीने अमरला कार मधून बाहेर काढले . अमरला पवार यांच्या बाईकवर बसवले व त्याच्या मागे तेथेच जमलेल्या व्यक्तिंमधील एक व्यक्ती गाडीवर अमरला पकधून बसला ...
पवार पोलिस असून आज ट्रीपल सीट बाईक चालवत होते पण परिस्थितीतच तशी होती !!!
पवार अमरला जवळच्या इस्पितळात घेवून गेले .

खूप वेळापासून अक्षयचा कॉल पवारला येत होता , म्हणून पवार आपला मोबाईल बघत इस्पितळाच्या बाहेर आले , सोबत आलेला व्यक्तीही बाहेर आला ...
रोडवर पोहचून पवारने एका चालत्या रिक्षाला हात दाखवला तशी ती रिक्षा थांबली व सोबत आलेल्या त्या व्यक्तीचे आभार व्यक्त करून त्या रिक्षातून जायला सांगितले ...

पवार यांना पुन्हा अक्षयचा कॉल आला ...
" काय पवार ??? तुम्ही तर बातमी द्यायला कॉल करतच नाहीत !!! निदान आमचे कॉल तरी उचलत जा !! , इतके कुठे व्यक्त झालात ??? ,
' इन्कमिंग कॉल उचलायला पैसे नाही लागत ' !!! "

पवार - " तस काही नाही साहेब , करणारच होतो कॉल पण अमरच्या गाडीचा अपघात झाला होता तर त्याला घेवून आलो होतो "

अक्षय हसत म्हणाले " अमरला तर त्याच्या बायको जवळ असायला हव होत , बायकोला सोडून गेला मग अपघात तर होणारच ना ...!!
बरं मस्तीचा विषय जाऊद्या हे सांगा की अपघात झाला कसा आणि कुठे ?? "

पवार - " बोधर गावावरून थोड्याच अंतरावर , कार एका झाडाला आदळली , खूप रक्त गेल्याने बेशुद्ध झाला असेल पण काही सांगता येत नाही "

अक्षय - का गेला होता बोधर गावात काही समजल ??

पवार - कोणाला तरी शोधत होता , बाकी काही माहिती मिळाली की कळवतो !!!

अक्षय - आणि हो ... आठवणीने फोन करत जा किमान उचला तरी !!

पवार - हो साहेब ...

येवढं बोलून पवार इस्पितळात गेले ..
खूप वेळानंतर डॉक्टर आल्यावर पवार यांना म्हणाले ...
" डोक्यावर लहानशी इजा झाली आहे व त्यातून रक्तस्राव जास्त झाल्याने रुग्ण बेशुद्ध पडले !!! , घाबरायच काही कारण नाही कोणत्याही क्षणी रुग्णाला शुद्ध येवू शकते !!! "

पवार इस्पितळाच्या बेंचवर बसले होते , अमरच्या
शुद्धीवर येण्याची वाट ते बघत होते , बघता बघता कधी डोळा लागला त्यांना कळलच नाही !!!

जेव्हा ते उठले तेव्हा सकाळ झाली होती , सकाळचे सात वाजत असतील ... उठून बघतात तर त्याच्या अंगावर पांघरून होत . थोड विचारपूस केल्यावर कळलं की एका नर्स ने रात्री पांघरून त्यांना पांघरले होते ...

पवार त्या नर्स जवळ गेले व तिला बघताच त्यांना त्यांच्या लहान बहिणीची आठवण आली !!

पांघरून परत करत पवार नर्स ला म्हणाले " रात्री तुम्हीच पांघरून दिलं होत ना ... धन्यवाद !!!"

नर्स त्यांना एक स्मित हास्य देत म्हणाली " त्यात कसले धन्यवाद ??? तुम्ही आमच्या साठी दिवस रात्र ड्युटी करता तर इतका तर देणं लागतो आम्ही !!! "

पवार चकित होवून म्हणाले " तुम्हाला कसं माहिती मी पोलिस दलात आहे ?? "

नर्स - " तुमच्या बुटांवरून ... आणि हो , तुम्ही काल आणलेल्या रुग्णाला आत्ताच शुद्ध आली आहे !! "

पवार गालातल्या गालातच हसले व अमरच्या बेडच्या दिशेने निघाले ...

अमर नुकताच शुध्दीवर आला होता , तो कुठे आहे ?? इथे कसा आला ?? अश्या नजरेने आजू बाजूला बघत होता !!!

पवारला बघताच अमरच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता ...

तुम्ही इथे ??? ...
मी इथे कसा ??....
काय झालं होत ?? ....

पवार - " तुझा अपघात झाला होता , तुला मीच घेवून आलोय इथे !!

अमर - " म्हणजे तुम्हीच माझा पाठलाग करत होते ?? ..."

पवार - " हो !! "

अमरला अचानक काहीतरी सुचले व घाबरत घाबरत त्याने पवार यांना विचारले !!!

आज तारीख काय आहे ???

" ३० मार्च , का अचानक ???

अमरच्या जीवात जीव आला त्याने पटकन विचारले ...
" वेळ ??? "

पवार - " ७ : ३५ , का विचारतोय पण ???"

अमर तोंडातल्या तोंडात बाडबडला ... म्हणजे माझ्या कडे अजून १६ तास २५ मिनिटे बाकी आहेत ....!!!
येवढं बोलून लावलेलं सलाईन काढले व बाहेर जाऊ लागला !!!

तेवढ्यात पवारने त्याला आवाज देवून थाबवले !!!

अचानक आलेल्या आवाजाने अमर दचकला व त्यांना मागे वळून पवारांना पाहू लागला !!!

पवार त्याला बघून म्हणाले ... " मला काही जाणून घ्यायचा आहे तुझ्याकडून , सुनील तावडेचा खून तूच केलास ना !!! "

हे ऐकुन अमर म्हणाला - " तुमचा काहीतरी गैर समज होत आहे !!! तुम्ही माझा जीव वाचवला तुमचा आभारी आहे मी , पण आता खूप घाई मद्धे आहे ... मला माफ करा मला जावं लागेल , वाटलच तर माझं काम झाल्यानंतर वेळ काढून नक्कीच भेटेन तुम्हाला , पण मला आता जावं लागेल !!! "

असं बोलून अमर बाहेर पडला ... पाठी पाठी पवार धावत त्याच्या जवळ आले व त्याला थाबवून म्हणाले ...

" मला माहिती आहे ते चारही खून तूच केले आहेत ... आणि पाचवा करायला जात असशील !!! "

हे ऐकुन अमरला आश्चर्याचा धक्का बसला ... सर्व माहिती असून अमरने काहीच माहिती नाही असा चेहरा बनवत त्यांना म्हणाला " क्क कक काय ?? , काहीही काय बोलताय साहेब तुम्ही "

पवार - " बघ अजून एकदा विचार कर खर सांगितलस तर मदत करू शकतो मी तुझी "

मोठ्या आवाजात बोलणारा अमर अचानक हळू आवाजात बोलताना पाहून पवार यांचा ही आत्मविश्वास वाढला होता ...

अमर - " हो सर्व खर तेच सांगतोय साहेब , मी का करेन खून !! अक्षयला पण पुरावे दिले होते मी ...

पवार - " त्या रात्री सुनील तावडे बद्दल कॉल वर मीच माहिती दिली होती तुला !!! "

हे ऐकुन अमरच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता , त्याच्या कडे काहीच उत्तर नव्हत ..

पवार पुढे म्हणाले - " मला हे ही माहिती आहे की तू स्वप्नाली व अभिजित पानसे यांना शोधतोय " !!!

अमर - तुमच्या कडे काही पुरावा आहे की हवेत बोलताय ?? जरी हे खरं असलं तरी काय पुरावा आहे तुमच्या कडे ??

पवार हसले , हसून पवारांनी नर्स ला बोलवून अमरचा शर्ट मागवला ,
अमरच्या कॉलरला चिटकवलेला मिनी माईक काढत म्हणाले " हा माईक व माझ्या मोबाईल मद्धे सर्व गोष्टींची रिकॉर्डिंग , अजून काही हवाय पुरावा ???" ...

अमर - " मी बेशुद्ध असताना चीपकवला असेल हा माईक तुम्ही !!! "

पवारांनी मोबाईल मधील रिकॉर्डिंग सुरू केली व म्हणाले " झाल समाधान , आता तरी खर सांगशील की अक्षय सरांकडे जाऊयात ??? "

अमरचा खेळ संपला होता , काय करावे काहीच कळत नव्हत ... तो फक्त एवढा विचार करत होता की हा माईक पवारने केव्हा चीपकवला ??

अमरने काजल सोबत झालेला संवाद रेकॉर्डिंग वर ऐकला व त्यांना म्हणाला " बघितलं या रेकॉर्डिंग मध्ये पण असं काही नाहीये की ते चार खून मी केले आहेत असं !!! "

" मला माहिती आहे , या रिकॉर्डिंग मद्धे चार खून नमूद नाहीत पण मला हे सांग ....

एकी कडे तुझी बायको आजारी असताना तू बाहेर कसा पडू शकतोस ??? आणि आज चक्क बोधर गावात स्वप्नाली व अभिजित बद्दल माहिती मिळवत होतास ... आता त्यांना मारायचा प्लॅन आहे का ??? "

जर खरे सांगितले तर पवार विश्वास करणार नाहीत तर असे काहीतरी सांगावे ज्याने आपले काम होईल असं अमरने विचार केला व अमर त्याला खोटी गोष्ट बनवून सांगू लागला ...

" जसा तुमचा कॉल आला होता , तसाच मला अनाथ आश्रमातून कॉल आला होता की तुझ्या ज्या वडिलांनी तुला इथे सोडून गेले होते ते बोधर गावातील विनकाय दिवेकर आहेत , व मी तिथे पोहोचल्यावर कळलं की माझी बहिण स्वप्नाली दिवेकर पळून गेल्याने आई वडिलांनी आत्महत्या केली होती , माझी बहिण पळाल्यानंतर ती कोणत्यातरी अडचणीत आहे हे काजल नावाच्या तिच्या मैत्रणीकडून कळलं . एकमेव नात म्हणून मी माझ्या बहिणीला शोधतोय ....
अमरने बोलता येईल ते सर्व खोटं सांगितल होत !!!

पवार यांना अमरची गोष्ट पटली नाही , अमर अनाथ होता ही माहिती त्यांनी काढली होती , येवढ्या वर्षांनंतर कोणाचा कॉल येणं ..., आपल्या पत्नीला सोडून आपल परिवार शोधणं ..., शुद्धीत आल्यावर वेळ काळ विचारणं ..., त्यात चार खून व सर्वात महत्त्वाचे या सर्वांचा खुनाशी काय संबंध ?? या मुळे पवारांना अमरची गोष्ट हजम होत नव्हती ...

पण एकी कडे अमरची गोष्ट ऐकुन पवार यांना स्वतःच्या लहान बहिणीची सुद्धा आठवण झाली होती ... त्यांची लहान बहीण सुद्धा अशीच पळून गेली होती , नंतर तिला कधीच त्यांनी पाहिलं नव्हत !!!
....... जर अमर जर खर बोलत असेल तर ???
तर विनाकारण त्यांच्यामुळे एका निर्दोष व्यक्तीला त्याच्या बहिणीपासून वंचित राहावे लागेल ...

अमरचे दुःख ते समजू शकत होते तसेच त्यांना एका बाजूला अमरवर शंका ही होती म्हणून त्यांनी स्वप्नाली ला शोधायला अमरची मदत करायचे ठरवले ,

अमर सोबत असल्यावर त्यावर लक्ष ही ठेवता येईल व काही कृत्य केल्यास त्याला रंगे हात ही पकडता येईल ह्या विचाराने पवार यांनी अमरला मदत करायचे ठरवले व अमरला मदत करण्याची इच्छा दर्शवली !!!

अमर - साहेब तुम्ही कशाला त्रास करून घेता ?? मी शोधन तिला !!!!

पवार अमरला म्हणाले ... " पोलिसांचं कामच आहे ते , त्याचाच पगार मिळतो आम्हाला ..."

अमरला इच्छा नसताना त्यांची मदत घ्यावी लागणार होती म्हणून अमरने होकारार्थी मान हलवली !!!

पवार - " तुला तिच्या बद्दल काही माहिती आहे का की कुठे गेली होती किव्वा कोणा सोबत पळली होती ?? "

अमर - " कुठे ते माहिती नाही पण अभिजित पानसे सोबत पाळली होती " ...

पवार आठवत अमरला म्हणाले - " मी रेकॉर्डिंग मद्धे ऐकल्या प्रमाणे .... मंदिरा मधील मुलगी म्हणाली होती ना की शेवटी केसरी लॉज मद्धे जाणार होती असं !!! "

अमर आठवत म्हणाला - " हो हो , "
व काजल ने दिलेला नंबर पवार यांना देत म्हणाला
" ह्या नंबरने शेवटी तिने कॉल केला होता !! "

तो नंबर पवार यांनी एका व्यक्तीला पाठवला ...
व कॉल वर म्हणाले " वाघमारे ... एक काम होत !!
ह्या नंबरची सर्व माहिती पाठवा की जरा अर्जंट आहे !!"

वाघमारे - " हो साहेब थोड्या वेळाने कॉल करतो "

पवार व अमर कॉल ची वाट पाहत होते...

तेवढ्यात अमरने पवारांना विचारले " साहेब तुम्ही कधी ती चीप चीपकवली कळलच नाही , कमाल आहे !! "

पवार मिश्याला पिळा देत म्हणाले " असाच पगार घेत नाही , अस्सल पोलीस आहे !!! जेव्हा इस्पितळातून बोधर गावाला निघण्याआधी तू मोबाईल मद्धे गुंग होतास तेव्हाच धक्का देताना चीप चिपकली होती !!! "

पवार - पण मला हे नाही समजल की गावात पोहोचल्यावर तू स्वतःशीच काय बोलत होतास ??

अमर - मी मृत विनायक देवलवर यांच्याशी बोलत होतो ...

पवार अमरवर हसले व म्हणाले सकाळ पासून मीच भेटलो ना !!! तुझ्या बोलण्या नंतर कर्कश आवाज येत होता म्हणून विचारलं होत ...

तेवढ्यात पवार यांचा फोन वाजला ... फोन वाघमारे चा होता ..

" दिलेला नंबर ' सलीम शेख ' याच्या नावावर आहे , हा नंबर सध्या बंद आहे शेवटचा लोकेशन केसरी लॉज होता ... दिलेल्या डॉक्युमेंट वरचा पत्ता व्हॉट्स ऍप करतो , आठवणीत नाही राहिला तर मलाच कॉल करून त्रास देशील माहिती आहे मला !!! "

पवार हसत म्हणाले - "बरोबर आहे तुझं " ,

पवारने फोन ठेवला व पत्ता बघितला तर पत्ता अशोक नगरच्या आधी येणाऱ्या म्हणजे शास्त्री नगरचा होता !!

अमरने इस्पितळाचे बिल भरले व आपल्या जुन्या रक्त लागलेल्या शर्ट वर बाहेर पडला .
पवार अमरला घेवून आपल्या बाईकवर शास्त्री नगरच्या दिशेने निघाले ...
रस्त्यात पवारांनी एका कपड्याच्या दुकानावर घाईगडबडीत मिळेल ते शर्ट व एक टोपी विकत घेतली .
जुन्या शर्टवर रक्ताचे डाग असल्याने अमरने जुने शर्ट बदलून नवीन शर्ट घातले !!
डोक्यावरील पट्टी दिसू नये म्हणून टोपी घातली !!

अखेर ते शास्त्री नगर मद्धे पोहोचले ..सकाळचे दहा वाजत आले होते ... वेळ खूप वेगाने निघत असल्याने अमरची चुळबुळ सुरु होती !!!
पण अचानक त्याच डोक दुखू लागल होत म्हणून तो बाईकवर काही क्षण थांबला ...

पवार गडबडीने शिवशक्ती अपार्टमेंट मध्ये तिसऱ्या मजल्यावर जाऊन बेल वाजवू लागले ...
अमरला काही वेळा नंतर बरं वाटलं व तो पवारांच्या मागे इमारतीत जात होता .

एका लंगड्या व्यक्तीने दरवाजा उघडला ,

पवार - ' सलीम शेख ' ????

" हो मीच आहे बोला !! "

पवार - मी पोलिस सहाय्यक ' पवार ' आपण अभिजित पानसे यांना ओळखतो का ??

सलिमचा चेहरा गोंधळल्या प्रमाणे झाला होता , म्हणून पवार अमर कढून मिळालेला नंबर सांगत म्हणाले ... " हा नंबर तुझाच होता ना !!!

सलीम खूप विचार करून म्हणाला ... हो मीच आहे अभिजित पानसे !!!

पवार गोंधळून त्याला विचारू लागले " मग सलीम शेख कोण ?? असं का सांगितलस की तूच सलीम शेख आहेस ??? !!
तेवढ्यात अमर सुद्धा वर पोहोचला होता ...

सलीम शेख - हो सांगतो .. आत या तुम्ही !!!

काजलने दिलेल्या फोटो मद्धे जो व्यक्ती होता त्याच व्यक्तीला सामोरा समोर पाहून अमरच्या जीवात जीव आला होता !!!
त्याला कळले की हाच अभिजित पानसे आहे पण तो एका पायाने दिव्यांग होता , तो हाच विचार करत होता की हे कसे झाले ???

अमर घरात गेला , सलीम ने दोघांना पाणी दिलं ...

अमर म्हणाला " ' स्वप्नाली दिवेकर ' हिला तूच पळवून घेवून गेला होतास ना ?? " कुठे आहे ती ???

नाव ऐकताच सलिमच्या डोळ्यातून अश्रू ओघळले ..
तो म्हणाला " ती नाही आता या जगात !!! "

अमर - क्‍क क्क काय , कसं झालं हे ??

तेवढ्यात पवार म्हणाले " आधी सलीम आणि अभिजीत याच्या बद्दल सांग !! "

सलीम पुन्हा म्हणाला " मीच सलीम शेख अन् मीच अभिजित पानसे "
माझं खरं नाव सलीम , लहानपण इथेच गेल्याने खूप चांगला मराठी बोलू शकतो ...

माझी जात बघता मला नोकरी मिळण्यात अडचण निर्माण होवू लागली !!!
आधी जिथे कामाला होतो तिथे मी मुस्लिम असल्याने मला दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती ,
म्हणून मी लोकांना सलीम ऐवजी अभिजित पानसे नाव सांगू लागलो .

नाव बदलताच केसरी लॉज वर मला काम मिळाले ... , सर्व खूप चांगलं चाललं होत . कामावर नवीन आलेल्या मुलाने मला फेसबुक बद्दल सांगितल व मी तो हातळायला सुरुवात केली !!
त्यावर नवीन प्रोफाइल बघताना मला स्वप्नाली दिसली , एकच नजरेत मला ती आवडली होती व रोज तिचे फोटो बघून माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची , माझ्या सोबतच्या मित्रांना हे कळलं त्यांनी धीर दिल्यावर मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली .मला स्वतःवर विश्वास बसत नव्हता .. काही दिवसांनी तिने ती एक्सेप्ट सुद्धा केली ...

मी हळू हळू तिच्यासोबत बोलू लागलो , दिवसातून खूप वेळ तिच्या सोबत बोलण्यात जायचा ...
खूप दिवसांनी तो क्षण ही आला जेव्हा आम्ही भेटलो !!
व असाच एकदा भेटल्यानंतर गावकऱ्यांनी आम्हाला भेटताना पाहिलं आणि तिच्या वडिलांजवळ घेवून गेले
त्या दिवसानंतर आमचं बोलणं व भेटणं बंद झालं ...

मी काजलला तिच्या घरी आपला निरोप घेवून पाठवला व वेळ बघून ती घरातून पळून आली ...

आम्ही लग्न केलं ... खूप खुश होतो दोघं , बोलता बोलता सलीम आपले अश्रू लपवत होता ...

स्वतःची खोली घ्यावी इतके पैसे नव्हते अन् भाड्यावर घ्यायला मॅरेज सर्टिफिकेट नव्हते !!!

म्हणून मी राजाराम साहेबांना फोन केला तेव्हा ते म्हणाले आपल्या हॉटेल मध्ये एक रूम आहे ती तू घे , अन् जेव्हा भाड्यावर खोली भेटेल तेव्हा तू तिथे रहा अस म्हणाले !!!

देवासारखे धावून आले होते अस वाटल होत पण त्यांचा बेत काही औरच होता , ...

राजाराम पाटील सुबोध मोहिते , जयकांत चव्हाण व सुनील तावडे पहिल्या मजल्यावर दारू पीत बसले होते ,
बाकी नोकरांना सुट्टी असल्याने मला रात्री २०३ रूम मध्ये असलेल्या जोडप्याचे जेवणाचे पार्सल आणण्यासाठी स्पाइस हॉटेल मध्ये पाठवलं ...
मी मोबाईल चार्ज होण्यासाठी ठेवला व हॉटेल मद्धे गेलो ... २०३ मद्धे आर्डर देवून परत आपल्या खोलीत जाऊ लागलो होतो ...

खोली बंद होती मी स्वप्नालीला आवाज दिला मात्र ती दरवाजा उघडत नव्हती ... आतून वेगळाच आवाज मला आला .
माझा जीव वर खाली होवू लागला होता माझ्या जवळ असलेल्या दुसऱ्या चावीने मी दरवाजा उघडला .... पुढे जे पाहिलं त्याने माझ्या मनाला घात केला ,
ज्या व्यक्तीला ' देवाचा ' दर्जा दिला होता त्याला ' जनावर ' बोलण्याच्या ही लायकीचा तो उरला नव्हता !!!

मी खोलीत नसताना तो माझ्या बायकोसोबत जबरदस्ती कुकर्म करण्याचा प्रयत्न करत होता !!!

मला ते असहाय्य झाल तेव्हा मी त्या नालायक व्यक्तीवर धावून गेलो ... त्याला स्वप्नाली पासून दूर ढकलले ... व स्वप्नाली ला घेवून तेथून निघत होतो तेवढ्यात राजाराम ने आरडाओरड केल्याने सुबोध मोहिते , जयकांत चव्हाण व सुनील तावडे तेथे आले !!!
त्या नराधमांनी मला बेदम मारले व रूम मध्येच बांधले ... रात्र भर माझ्या डोळ्या समोर तीच्या शरीराचे लचके तोडत होते !!!

मला राग खूप येत होता मात्र मी असहाय्य होतो ... १३ दिवस मला तसच तेथे बांधून ठेवले व माझ्याच डोळ्यासमोर सर्व गोष्टी ...

सालिमला झालेली गोष्ट सांगताना अनावर होत होत , त्याचे अश्रू थांबतच नव्हते ..

तिला सिगरेटचे चटके द्यायचे , जबरदस्ती दारू तिच्या तोंडात ओतायचे , ती एका मृत शरीराप्रमाणे सर्व सोसायची , मनाच्या समाधानासाठी ते दानव तिला चामड्याच्या पट्ट्याने मारायचे !!! जेवढं नरकात यातना दिल्या जात नसतील तेवढ्या भूतलावर तिला दिल्या गेल्या !!

एक दिवस सर्व जास्त दारू पिले असल्याने शुद्धीत नव्हते , दरवाजा उघडा होता ...
मृता प्रमाणे असलेल्या स्वप्नाली मद्धे एकाएक ऊर्जा आली होती , ती उठली फळीवर त्या दिवशी ठेवलेला माझा मोबाईल घेतला व काजल ला कॉल करून हकीकत सांगणार तोवर सुबोधला जाग आली ...

त्याने तिला कोणाला तरी फोनवर बोलताना पाहिलं त्याने तिच्या हातातून मोबाईल घेतला व खाली आदळला ...

स्वप्नाली ने सूबोधला धक्का दिला व तशीच बाहेर धावली ... तिच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते !!!

सबोधला सर्वांना उठवायला थोडा उशीर झाला सर्व तसेच तिच्या माघे धावले !!!

ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांचे कपडे मातीने मिळाले होते . त्यांना मी स्वप्नाली बद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले " तुझ्या स्वप्नाली ला आताच गाडून आलोय आता तुझी बारी आहे !!!

त्यांनी मला पुन्हा मारायला सुरुवात केली , माझ्यावर असलेल्या सर्व दारूच्या बाटल्या फोडल्या . त्यांना वाटल माझा जीव निघून गेला आहे तेव्हा त्यांनी मला अशोक नगर रोडच्या कडेला फेकले ...

मी रात्र भर तसाच तडफडत होतो , सकाळ झाली तेव्हा काही लोकांनी मला इस्पितळात दाखल केले , माझ्या पायाच्या नसावर बाटली फुटली असल्याने माझा एक पाय निकामा करावा लागला !!

सलिमची गोष्ट ऐकुन अमरला तो दिवस आठवत होता , चौथा शनिवार होता रात्री जेवण्यासाठी रेशमाच्या घरी जात असताना एक नग्न मुलगी लिफ्ट मागत होती , शरीरावर जागोजागी जखमा , डोक्यातून रक्त वाहून चेहऱ्यावर येत होत , चेहरा रक्ताने माखला असल्याने त्याला चेहरा नीट दिसला नव्हता ...
दफन भूमी आली म्हणून रेशमाने आपल्या पदराने चेहरा झाकला होता . रेशमा अजुनच घाबरु नये म्हणून हे दृश्य तिला सांगितले नव्हते !!!

ती रहस्यमय स्त्री स्वप्नालीच असेल !!!
म्हणून ती माझ्या चुकीची शिक्षा रेशमाला देत आहे ...

अमरला आता सर्व कळत होत !!!

अमर आतून तुटला होता कारण त्याच्याच मुळे स्वप्नाली पूर्ण पणे संपली होती , जर त्याने त्या दिवशी त्याने तिला लिफ्ट दिली असती तर आज ती या चार दानवा विरुद्ध लढली असती . मात्र या जगात नसून सुद्धा ती त्या सर्वांशी लढतच आहे !!! त्या चार दानवांना मारून अमरला आता स्वतःवर गर्व वाटत होता .

मात्र स्वप्नाली अभिजित पानसे म्हणजे सलीमला का मारायला सांगतेय ???

अमर सलिमला मारू शकत नव्हता .त्याने स्वतःला त्याची जागी ठेवून बघितल ...त्याचे अश्रू व त्याचे स्वप्नाली पोटी असलेले प्रेम बघून तो त्याला मारूच शकत नव्हता ... कारण सलिमने आधीच खूप सहन केलं होत .

अमर व पवार इमारतीतून बाहेर पडत होते . दोघांचे डोळे पाणावले होते ....
अमर पवारांना म्हणाला मीच ते चार खून केले आहेत अन् पाचवा अभिजित पानसे म्हणजे सलीम चां करायला जात होतो ...
पण त्याच्या प्रेमा समोर माझे प्रेम हारले !!!
मी माझा गुन्हा कबुल करतो मात्र मला शेवटच माझ्या बायकोला भेटायचं आहे !!!

--------- पुढील भाग लवकरच ---------