Naa kavle kadhi - 1-25 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | ना कळले कधी Season 1 - Part 25

Featured Books
  • तेरा...होने लगा हूं - 9

    मोक्ष क्रिश को लेकर शेखावत हाउस के लिए निकल गया। वहीं स्कूल...

  • गुरु का मिलना

    कहावत सुनी ही होगी जब शिष्य तैयार होता है गुरु प्रकट होता है...

  • द्वारावती - 79

    79                             रात्रि भर उत्सव यमुना तट पर ब...

  • ट्यूशन

    मेरे पिता जी का ट्रांसफर जलालाबाद (थानाभवन) से बदायूं हो गया...

  • बदलाव ज़रूरी है

    नमस्कार दोस्तों कैसे हैं आप सब, आशा है सब बढ़िया ही होंगे. आग...

Categories
Share

ना कळले कधी Season 1 - Part 25

      'हे बघ आई ह्या विषयावर खूप वेळा बोलणं झालं आहे मला नाही वाटत ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट'. 'आणि मुलगी शोध काय शोध अस माहिती नसलेल्या कुठल्याही मुलीशी लग्न छे! आयुष्याचा प्रश्न आहे'. 'अरे मग माहिती असलेल्या मुलीशी कर ना',' मी कुठे काय म्हंटल तू ते ही करत नाही'. #तुझ्या इतक्या मैत्रिणी आहेत त्यातली एखादी', सिद्धांत ची आई म्हणाली. 'आई काही काय बोलतेस ग तू मैत्रिणींपैकी म्हणे'.' ही नको, ती नको पाहिजे कोणती मग तुला, ते ही सांगत नाही ह्याच तुझ्या एका गोष्टीला कंटाळली आहे मी'. 'सिद्धांत माझ्या कडे पण आहेत चांगले चांगले स्थळ मी सुचवू का'? आर्याची आई बोलली. 'हो सांगा न नक्की बघु त्याला काय विचारता'?इति सिद्धांत ची आई. 'मला चालेल तुमच्या मुलीला चालेल का विचारा एकदा'! सिद्धांत मनातच म्हणाला. आणि आर्या कडे पाहिलं तिचा चेहरा अजूनही तासाच आहे. 'आई कडे कुठले ठिकाण आले काय माहिती म्हणे मी सुचवते काय गरज आहे नसत्या उचपत्या करण्याची'!. 'आपल्याला काय करायचं शोधून घेईल न तो इतकीच हौस आली आहे लग्नाची तर'.आर्या मनातच म्हणाली, आणि तिने तिच्या आई कडे रागानेच पाहिलं. 'आई तूझ्या कडे कुठून आलीत ग स्थळे?' आर्याने थोडस रागातच विचारलं. तू नाही ओळखत त्यांना आर्या ची आई म्हणाली. 'अग हो मी नसेल ओळखत पण तू आधी सरांच्या अपेक्षा तर विचार म्हणजे तुला कळेल ना की नेमक कुठलं सुचवायच'. 'अय्या हो की! मी विसरलेच की हा सिद्धांत सांग तुझ्या अपेक्षा काय आहे'. 'ओ हो आर्या तुला अपेक्षाच जाणून घ्यायच्या का मग बघ आता'. तो मनातच म्हणाला आणि मग त्याने एकदम मुद्दामूनआर्याच्या स्वभावाच्या  विरुद्ध अपेक्षा सांगितल्या. आणि आर्या कडे पाहून खोचक हसला. काय 'सिद्धांत तुला अशी मुलगी हवी आहे?' त्याच्या आई ने आश्चर्य चकित होऊन विचारलं कारण त्यांना वाटलं सिद्धांत आर्या जशी आहे तश्याच स्वाभावाची अपेक्षा सांगेल पण नेमकं उलटंच झाले.'हो मला अशीच हवी आहे'.'बर चालेल मी शोधेल अशी 'आर्याची आई म्हणाली. 'चला आम्ही निघतो आता, बराच उशीर झाला आहे' 'निघायचं ना सिद्धांत !' झालं का तुझं काम,?'हो झालं निघुया'. 'चल आर्या बाय take care मी उद्या येतो भेटायला ऑफिस झाल्यावर'. आर्या ने फक्त हो म्हंटल.आणि ते निघाले.तिला या वेळेस सिद्धांत चा खूप राग आला होता.
        'आई काय गरज ग उगाचच आपलं त्यांच्या मधात पडायचं.' आर्या चिडुनच तिच्या आईला बोलली. 'आर्या किती स्वार्थी आहेस ग तू त्याने बिचाऱ्याने आपली इतकी मदत केली. तुझ्यासोबत थांबला इतक्या वेळ तुला तर आनंद व्हायला हवा होता पण तुझं तर आपलं उलटंच'. 'त्याने आपली मदत करताना असा काही विचार केला का?'  अस वागणं अजिबात चांगल नाही ह आर्या! तिची आई तिला म्हणाली. 'सुचव ना आणखी सुचव माझं काय चाललं आणि त्याच्या साठी आई तू मला भांडतीये लक्षात असू दे'.आर्या म्हणाली. 'मी भांडत नाही आहे तुझं चुकतंय ते तुला सांगत आहे'.'आणि आता तू आराम कर बराच वेळ झाला बसून आहेस. मी थोड्या वेळाने जेवायला वाढते'. अस म्हणून तिची आई  बाहेर गेली.
         'सिद्धांत मला अजिबात नाही आवडल हा तू जे वागलास ते'. अस करत का कुणी ? त्याची आई त्याला म्हणाली. 'अग आई आर्याकडे आज खरच कुणी नव्हतं म्हणून मी थांबलो त्यात काय एवढं?' तुला आवडलं नाही का?. 'मी नाही जाणार पुढच्यावेळे पासून'. सिद्धांत म्हणाला. 'मी त्याबद्दल म्हणत नाही आहे'. ते तू चांगलच केलं. मग? काय झालं? 'अरे तू त्यांना अश्या अपेक्षा का सांगितल्या?' 'आई तुझा प्रॉब्लेम च मला कळत नाही मी सांगितलं तरी प्रॉब्लेम नाही  सांगितलं तरीही'! 'मी करू काय? सिद्धांत म्हणाला. 'बर आता मी तुझ्या अपेक्षे प्रमाणे मुलगी शोधून आणते आणि मग तू नाही म्हणून दाखव हा'! 'अरे तू आर्या समोर अस कस बोलला काय वाटलं असेल तिला.'' इतकी चांगली मुलगी आहे बिचारी आणि तू मात्र तिच्या मनाचं थोडाही विचार करत नाही हा'.त्याची आई म्हणाली. 'आई तिच्या मनात असत तर ती काही बोलली असती ती बोलली का ?काही नाही, ना मग तू का एवढं मनाला लावून घेते?. सिद्धांत त्याचा आई ला म्हणाला. 'जाऊ दे तू कधी तुझी चुकी मान्य करावी मी नाही बोलणार काही काही कर तुला जे वाट्टेल ते कर'. सिद्धांत ची आई त्याला म्हणाली.
           'सिद्धांत दुसऱ्या मुली बघणार तर मला का इतका त्रास होतोय'. 'आणि मुळात माझी त्याच्या कडून अपेक्षाच का'? तो माणुसकीच्या नात्याने मदत करत असेल, त्याच्या अपेक्षे मध्ये मी कुठेही नाही. आणि मीच तर त्याला म्हणाले होते की 'आपली साधी friendship पण नाही'. मग मी का अपेक्षा ठेवावी. त्याला तर किती चांगल्या चांगल्या मुली भेटतील.मग मला का निवडेल. मी उगाचच अपेक्षा ठेवते. आर्याचा मनातच विचार चालू होता. 'बिचारी आर्या चेहरा पाहायचा होता तिचा खर तर मला पण तुझ्याशी अस वागावं नाही वाटत ग पण ती डायरी वाचली म्हणून मला कळलं तरी की जे मला feel होतंय' same feelings 'तुला पण आहेत'.'आर्या माझ्या सोबत राहणं सोपं नाही आहे. माझ्या आयुष्यात जे काही चटके मला बसले आहे त्याची झळ तुला पोहचू नये एवढच मला वाटतं'.म्हणून मी खर तर तुला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. पण आता तुला ह्याची जाणीव करून द्यायला हवी.पण ती वेळ अजून आलेली नाही पण तीही लवकरच येईल.' आर्या झोप उडवलीस यार तू माझी' !'खर तर कधी एकदा तुला मनातलं सांगतोय अस झालं पण नको सध्या तू बरी हो.आणि माझ्या एका परीक्षेत पास होऊन दाखव'! तो कितीतरी वेळ असाच तिचा विचार करत होता.
         आर्याची प्रकृती दिवसेंदिवस सुधारत चालली होती तिचा ऑफिस ला जाण्याचा हट्ट चालू होता पण तिच्या आई ने तिला काही जाऊ दिले नाही. सिद्धांत पण ऑफिस मधून घरी जाताना तिला भेटून जायचा ,आणि अधून मधून तिला फोन न ही करायचा. तो खूप काळजी घेत होता तिची. आणि भेटल्यावर तेवढीच मजा ही घ्यायचा त्याची. खर तर दोघांनाही त्यांच्या नकळत त्यांच्या सहवासाची सवय होऊन गेली होती.आर्या तर त्याच्या येण्याची वाटच बघत असे. असेच काही दिवस निघून गेले. 'हे बघ आई आपण डॉक्टरांकडे जाऊन आलो आणि त्यांनी आता ऑफिस ला जाण्याची permission दिली आहे मी आता उद्या पासून जाणार ऑफिस ला'हो जा मी नाही अडवणार आता तुला.आर्या तर फार आनंद झाला चला उद्या पासून मी मोकळी ऑफिस ला जाण्यासाठी!. आणि त्या ही पेक्षा जास्त आनंद तिला सिद्धांत सोबत दिवस भर काम करायला मिळणार ह्याचा झाला होता.
क्रमशः